संत नरहरी सोनार माहिती Sant Narhari Sonar Information in Marathi

Sant Narhari Sonar Information in Marathi संत नरहरी सोनार: कितीतरी शतके अगोदर द्वारकाधीश श्रीकृष्ण आपल्या भक्तांच्या प्रेमापोटी भक्त पुंडलिकाच्या निमित्ताने बालरूप धारण करून विटेवर उभा राहिला होता. अठ्ठावीस युगे त्याचे हात कमरेवर आणि दृष्टी समचरणावर होती. १३ व्या शतकात पांडुरंगाला प्रेमळ भक्त मिळाले, ज्यांनी जनतेला आत्मोन्नतीची दिशा दाखवली व त्यांचा परमार्थाचा मार्ग सुलभ केला.

“अवघी पंढरी सुखाची वोवरी | अवघ्या घरोघरी ब्रम्हानंद ||

अवघा हा विठ्ठल सुखाचीच आहे | अनुसरे तो लाहे सर्व सुख ||”

संत, भक्त, नामस्मरण, भजन- कीर्तन यांची लयलूट या सर्व गोष्टींमुळे जरतारी वैभव लाभलेल्या पांडुरंगाचे वास्तव्य असणाऱ्या पंढरपूरमध्ये “संत नरहरी सोनार” या महान शिवभक्ताचा जन्म झाला.

sant narhari sonar information in marathi
sant narhari sonar information in marathi

संत नरहरी सोनार माहिती – Sant Narhari Sonar Information in Marathi

संत नरहरी सोनार यांचा जीवन परिचय

नावसंत नरहरी सोनार
जन्मइ.स. १३१३ (शके १११५)
जन्मस्थळपंढरपूर, महाराष्ट्र
आई सावित्रीबाई
वडीलअच्युत
जातसोनार
पत्नीगंगा
अपत्येनारायण आणि मालू

वारकरी संप्रदायातील प्रथम शैवपंथी संत नरहरी सोनार यांचा जन्म इ. स. १३१३ ( शके १११५ ) च्या सुमारास श्रावण शुद्ध त्रयोदशीला पंढरपूर येथे सोनार कुळात झाला. त्यांचे मूळ आडनाव महामुनी होते. संत नरहरी हे वडिलोपार्जित सुवर्णकाम करत असल्याने पुढे त्यांचे आडनाव सोनार झाले. ज्या कुळात शिवोपासना पूर्वापार चालत आलेली होती अशा कुळातील संत नरहरी महाराज यांच्या घराण्याची वंशपरंपरा हि रामचंद्रदास-कृष्णदास- हरिप्रसाद- मुकुंदराज- मुरारी- अच्युत आणि नरहरी अशी सांगण्यात येते. चौदाशे वर्षाचे दिर्घायुष्य लाभलेले महान योगी चांगदेव महाराज यांनी नरहरी महाराज यांना आशीर्वाद दिला होता कि, हा मुलगा हरि-हराचा (विठ्ठल – शंकर) समन्वय साधणारा थोर संत होईल. याला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तो शिवभक्त असला तरी विठ्ठलाचा भक्त म्हणून त्रिखंडात प्रसिद्ध होईल.

वयाच्या अठरा ते वीस दरम्यान संत नरहरी सोनार यांचा विवाह गंगा नावाच्या संस्कारी मुलीशी झाला. तीही ईश्वरभक्त होती. कालांतराने त्यांना नारायण व मालू अशी अपत्ये झाली.

शिवोपासक नरहरी सोनार 

नरहरी यांचे वडील थोर शिवभक्त होते. त्यांच्या अंतःकरणात शिव-पार्वती शिवाय कशालाच स्थान नव्हते. ‘शुद्ध बीजापोटी | फळे रसाळ गोमटी|’ या नियमाप्रमाणे त्यांना आपल्या शिवभक्तीचे फळ ‘नरहरी’ यांच्या रूपाने मिळाले.

लहानपणापासूनच नरहरी यांच्यावर घरात असलेल्या शिवभक्तीचे संस्कार होऊ लागले होते.  त्यांच्या वागण्या- बोलण्यातून त्यांच्या अंगी असणाऱ्या संतपणाची लक्षणे स्पष्ट दिसून येत होते. त्यांना कुशाग्र बुद्धी असल्यामुळे लहानपणीच त्यांना अनेक शिवस्त्रोते पाठ होती. रोज शंकराच्या मंदिरात जाऊन शंकराची पूजा पाठ करण्यात त्यांना आनंद वाटत असे. तेही मनोभावे शिवभक्ती करू लागले. लहान वयातच ते थोर शिवभक्त झाले.

संत नरहरी महाराजांच्या वयाच्या सातव्या वर्षी नरहरी महाराजांचा यज्ञोपवित्र उपनयन संस्कार संपन्न झाला. नाथ संप्रदायातील गहिनीनाथ महाराज हे नरहरीना गुरु म्हणून लाभले. त्यांच्याकडून नरहरी महाराजांकडून गुरुपदेश, नाथ संप्रदायाची दीक्षा आणि गायत्री मंत्र प्राप्त झाला.

जसं जसं मोठे झाले तसे त्यांनी शिवभक्तीवर आधारलेले सर्व ग्रंथ वाचून काढले, तेव्हापासून शिवपार्वतीचे महत्व त्यांच्या नजरेत वाढू लागले. त्यांची शंकरावर निस्सीम श्रद्धा होती. त्यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमटविला होता. त्यांचे अंतःकरण म्हणजे शिवमंदिरच जणू जिथे शिव-पार्वती विराजमान आहेत. ते इतर देवतांचे दर्शन घेण्यासाठी जात नसत. त्यांच्या या वृत्तीमुळे काही जणांना त्यांचा राग येत असे.

संत नरहरी महाराजांना हरि-हर साक्षात्कार

संत नरहरी सोनार हे एकनिष्ठ शिवभक्त होते. पंढरपुरात राहूनही पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घेतले नव्हते. संत नरहरी सोनार हे पंढरपुरातील त्या काळातील उत्तम कारागीर होते. एकदा एक विठ्ठलभक्त सावकाराने पांडुरंगाकडे केलेले नवस पूर्ण करण्यासाठी कमरेची सोनसाखळी बनवण्यासाठी नरहरी सोनारास सांगितली. पण नरहरी सोनार ह्यांनी स्पष्टपणे नकार दिला कारण त्यांचा पण होता कि शंकराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख ते बघणार नाहीत. त्यावे उपाय म्हणून सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले. संत नरहरी यांनी सुंदर सोनसाखळी तयार केली पण ती वितभर जास्त झाली. पुन्हा त्यांनी बरोबर माप आणायला सांगून त्याप्रमाणे साखळी करून दिली. परंतु विठ्ठलाला साखळी घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे ते गोंधळले.

अखेर त्यांनी स्वतः मंदिरात जाऊन माप घेण्याचे ठरवले. मात्र मंदिरात प्रवेश करताना त्यांनी स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि विठ्ठल मूर्तीसमोर गेले व जेव्हा ते सोनसाखळी कमरेला बांधू लागले तेव्हा त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनाराचे हात गळ्यापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणवले. त्यांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली आणि बघतात तर समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली पुन्हा तेच घडले. अखेर प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांना दर्शन देऊन सांगितले कि पांडुरंग परमात्माच शंकर भगवान आहे. शिव आणि विष्णू भिन्न नाहीत एकच आहेत, हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहेत. यानंतर त्यांचे लक्ष व्यवसायाकडे कमी आणि भक्तीमध्ये जास्त झाले. ते पांडुरंगाला त्यांच्या अभंगातून म्हणतात,

‘देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार ||’

या साक्षात्कारानंतर नरहरी महाराजांच्या मनात असलेला हरी-हराचा वाद मिटला आणि समाजात, वेगवेगळ्या पंथामध्ये असलेला वाद मिटवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

संत नरहरी सोनार यांचे अभंग

संत नरहरिचे मोजकेच अभंग उपलब्ध आहेत. पांडुरंगाच्या भक्तीमध्ये बुडून गेल्यावर ते म्हणतात,

“देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार ||

मन बुद्धीची कातरी | रामनाम सोने चोरी ||

नरहरी सोनार हरीचा दास | भजन करी रात्रंदिवस ||’

‘सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई’

‘शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा’

सगुण- निर्गुण एकच असून त्यावर देवाची सत्ता आहे. आकाशाप्रमाणे विशाल व निशब्ध अशा अद्वैत ज्ञानाचा आश्रय नामस्मरणाने केला जातो. ते त्यांच्या अभंगात म्हणतात,

‘देह जन्मला व्यर्थ | झाले पापाचे पर्वत ||

दान धर्म नाही केला | शेवटी जन्म व्यर्थ गेला ||

देह अवघा क्षणभंगुर | दिसे स्वप्नवत सार ||

नरहरी म्हणे शेवटी | संगे ण येई लंगोटी ||’

त्यांच्या समकालीन संतांचे वर्णन करताना ते म्हणतात,

“जग हे अवघे सारे ब्रम्हरूप |

सर्वांभूती एक पांडुरंग ||”

“दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी |”

या जगदंबेची प्रसिद्ध आरतीचे कवी हे नरहरी सोनार आहेत

संत नरहरी सोनार समाधी

माघ वद्य तृतीया शके १२३५ ला विठ्ठलाचे नामस्मरण करता करता नरहरी सोनार समाधिस्त झाले. पंढरपूर मधील विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी आहे.

संत नरहरी सोनार यांची पुण्यतिथी

संत शिरोमणी नरहरी सोनार यांची पुण्यतिथी महोत्सव माघ कृष्ण तुतीयेला परळी वैजनाथ आणि अन्य ठिकाणी होतो.

आम्ही दिलेल्या sant narhari sonar information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर संत शिरोमणी नरहरी सोनार यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sant narhari sonar information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about sant narhari sonar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर sant narhari sonar in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!