शॉप ॲक्ट लायसन्स माहिती Shop Act Licence in Marathi

shop act licence in marathi – shop act licence documents list in marathi दुकान कायदा माहिती, आज आपण या लेखामध्ये दुकान कायदा या बद्दल माहिती घेणार आहोत म्हणजेच हा कायदा काय आहे आणि हा कायदा कशासाठी लागू केला आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. दुकान कायदा हा असा कायदा आहे जो भारतामध्ये प्रत्येक राज्याचा स्वताचा कायदा आहे आणि या कायद्यामध्ये असणाऱ्या सर्वसाधारण तरतुदी ह्या प्रत्येक राज्यामध्ये ह्या समान आहेत. दुकान कायदा हा राज्यामध्ये असणाऱ्या सर्व दुकानांचे आणि व्यावसायिक आस्थापनांचे व्यवस्थापन नियमन करतो म्हणजेच राज्यातील दुकानांना नियम घालून देतो.

या कायद्यानुसार कोणतेही भौतिक दुकान चालून न करता घरामध्ये बसल्या बसल्या व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तीला किंवा मालकांना देखील नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक असते कारण प्रमाणपत्र किंवा परवाना हा कोणत्याही व्यवसायासाठी मुलभूत नोंदणी म्हणून कार्य करतो. प्रत्येक दुकानदाराने आपेल दुकान चालू केल्यानंतर ३० दिवसाच्या आत या कायद्यांतर्गत स्वताच्या दुकानाची नोंदणी करावी.

दुकान कायद्याचे नियम हे वर सांगितल्याप्रमाणे वेगळे असू शकतात आणि नोंदणी शुल्क प्रक्रियेच्या वेळा आणि इतर दुकान राज्यात नोंदणीकृत आहेत त्यानुसार भिन्न असू शकतात. भारत सरकारने प्रत्येक राज्यामध्ये असणाऱ्या दुकानांना नियमांच्या चौकटी मध्ये ठेवण्यासाठी भारत सरकारने १९५३ मध्ये हा कायदा लागू केला. चला तर आता आपण ह्या कायद्याविषयी आणखीन माहिती जाणून घेवूया.

shop act licence in marathi
shop act licence in marathi

शॉप ॲक्ट लायसन्स माहिती – Shop Act Licence in Marathi

कायद्याचे नावदुकान कायदा (shop act)
केंव्हा लागू झालाहा कायदा १९५३ मध्ये लागू झाला
कोणी लागू केला संपूर्ण देशामध्ये हा कायदा भारत सरकारने लागू केला आणि हा प्रत्येक राज्यासाठी स्वताचा कायदा आहे.

दुकाने म्हणजे काय – what is mean by shop 

कायद्यामध्ये दुकाने हि सामान्यता अशी जागा म्हणून ओळखली जाते ज्या ठिकाणी वस्तूंची विक्री किरकोळ किंवा घाऊक विक्रीद्वारे केली जाते किंवा ग्राहकांना ज्या ठिकाणी सेवा प्रधान केली जाते असे ठिकाण म्हणजे दुकाने.

दुकान परवाना म्हणजे काय – what is shop act licence in marathi

दुकान हि एक व्यावसायिक संस्था आहे जसे कि दुकान, हॉटेल, रेस्टॉरंट, वृतपत्र छपाई, सिनेमा थीएटर, स्टॉक ब्रेकिंग, ट्रेडिंग सेवा या व्यावसायिक आस्थापनेचे संचालन आणि नियमन करण्यासाठी सरकार हे दुकान प्रमाणपत्र किंवा परवाने येतात जे दुकान कायदा १९५३ अंतर्गत येतात.

परवाना का आवशक आहे – how do i will get shop act in marathi

जेंव्हा एखादी संस्था कामाच्या परिस्थितीचे नियमन करण्यासाठी आणि कामगारांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी अनौपचारिक कामगार, करार आधारित कर्मचारी तसेच पूर्णवेळ कर्मचारी ठेवते त्यावेळी हा दुकान परवाना गरजेचा असतो. तसेच या कायद्यातर्गत परवाना घेतला तर आपल्याला अनेक फायदे मिळू शकतात त्यामुळे परवाना आवश्यक आहे.

दुकान नोंदणीसाठी आवशक कागदपत्रे – shop act licence documents list in marathi

आपण जर एखादे दुकान चालू केले तर त्याच्या नोंदणीसाठी आपल्याला काही कागदपत्रे आवश्यक असतात ती कागदपत्रे खाली आपण पाहूया.

 • मालकाचा किंवा ज्या व्यक्तीने दुकान सुरु केले आहे त्याचा ओळखीचा पुरावा.
 • दुकानाचा पत्ता पुरावा.
 • पेमेंट चलन.
 • मालकाचे किंवा ज्या व्यक्तीने दुकान सुरु केले आहे त्याचे पॅन कार्ड.
 • दुकानामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तपशील.

दुकान कायदा विषयी वैशिष्ठ्ये – features of shop act 

 • काम सुरु केल्यापासून किंवा दुकान सुरु केल्यापासून ३० दिवसांच्या आत दुकानाची नोंदणी करणे आवश्यक आहे.
 • जर काही कारणास्तव दुकान बंद झाले तर दुकान बंद झाल्यानंतर १५ दिवसाच्या आतमध्ये दुकान बंद झाल्याची माहिती देणे.
 • दुकान नोंदणी प्रमाणपत्राचे दर वर्षी नोंदणी कालावधी संपण्याच्या अगोदर १५ दिवस अगोदर प्रमाणपत्राचे नुतानिकारून घेतले पाहिजे.
 • मुले, तरुण तसेच महिलांच्या रोजगारासाठी नियम तयार करणे.

दुकान कायदा लागू होणारी दुकाने

दुकान कायदा हा दुकानांना दुकानांच्या चौकटीमध्ये ठेवण्यासाठी सुरु केला आहे आणि या कायद्यामध्ये कोणकोणती दुकाने येतात ते आपण आता पाहूया.

 • भोजनालये, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट.
 • मल्टीप्लेक्स चित्रपट गृहे आणि मनोरंजन पार्क.
 • करमणूक आणि मनोरंजन.
 • आयटी कंपन्या.
 • मॉल आणि गोदामे.
 • फायनान्स, हेल्थकेअर, हॉस्पीटॅलिटी आणि फार्मा.

दुकान कायद्यातर्गत नियम – rules 

 • दुकान कायद्यानुसार कामाचे तास, वार्षिक सुट्टी आणि साप्ताहिक सुट्टी हि ठरवलेली असली पाहिजे.
 • विश्रांतीसाठी मध्यांतर असणे आवश्यक आहे.
 • मुलांच्या कामावर बंदी घालणे.
 • नियोक्त्याद्वारे रेकॉर्ड ठेवणे.
 • रात्रीच्या शिफ्ट मध्ये महिला आणि तरुणांना कामावर ठेवण्यास मनाई.
 • अंमलबजावणी आणि तपासणी
 • वेतन आणि नुकसान भरपाई देणे.
 • मजुरी देण्याची वेळ आणि अट.

दुकान कायद्याचे फायदे – benefits of shop act 

दुकान कायदा हा मुख्यता दुकानांना आणि व्यवसायांना नियमन घालण्यासाठी म्हणजेच दुकानांना नियमांच्या चौकटी मध्ये ठेवण्यासाठी हा कायदा सुरु केला आणि ह्या कायदा लागू झाल्यानंतरचे काही फायदे आहेत ते आपण खाली पाहूया.

 • कोणत्याही दुकानाचा परवाना किंवा प्रमाणपत्र उद्यम भांडवल आणि कर्ज मिळवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते त्यामुळे तुम्ही तुमच्या दुकानाची कायद्यानुसार नोनादानी केली पाहिजे.
 • दुकान प्रमानपत्राशिवाय दुकाने बँक खाते तयार करू शकत नाहीत. परिणामी दुकाने नावावर बँक खाते तयार करण्यासाठी दुकान परवाना आवश्यक आहे.
 • प्रमाणपत्र हे अतिरिक्त नोंदणीसाठी एक पूर्व शर्त म्हणून काम करते.
 • तसेच हे प्रमाणपत्र व्यवसायाचा पुरावा म्हणून देखील काम करतो.

आम्ही दिलेल्या shop act licence in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शॉप ॲक्ट लायसन्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shop act licence documents list in marathi pdf या article मध्ये update करू, मित्रांनो हि shop act licence maharashtra in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!