shri krishna information in marathi श्री कृष्ण माहिती मराठी, हिंदू धर्मामध्ये अनेक देवांना मानले जाते आणि श्री कृष्ण देखील एक हिंदू धर्मातील एक देव आहेत ज्यांनी महाभारतामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे आणि आज आपण या लेखामध्ये भगवान श्री कृष्ण यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. भगवान श्री कृष्ण हे हिंदू धर्मातील एक देव होते आणि ते भगवान विष्णू यांचा आठवा अवतार देखील होते. भगवान श्री कृष्ण यांचा जन्म ५२४७ वर्षापूर्वी द्वापार युगामध्ये तुरुंगामध्ये देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी झाला,
परंतु त्यांनी त्यांच्या मुलाला आपल्या सोबत न ठेवता त्यांचे मित्र नंदा आणि यशोदा यांच्याकडे भगवान हरी कृष्णांना जन्मल्यानंतर लगेच नेऊन दिले आणि असे करण्यापाठीमागे कारण होते. भगवान श्री कृष्णांना एक खोडकर बालक म्हणून देखील ओळखले जाते होते कारण ते त्यांच्या लहानपणी मथुरेमधील गोपिकांच्या खोड्या काढत होते.
तसेच त्यांना लोणी खूप आवडायचे त्यामुळे ते अनेक गोपिकांच्या घरातील लोणी देखील आपल्या सोबतींच्यासोबत चोरत होते त्यामुळे त्यांना माखन चोर म्हणून देखील ओळखले जात होते. भगवान श्री कृष्ण हे नंदा आणि यशोदा मय्या यांच्या सोबत राहत होते आणि त्यांची जीवनशैली हि खूप साधी आणि गाई पाळणाऱ्या समाजातील होती त्यामुळे भगवान श्री कृष्ण देखील आपल्या मित्रांच्यासोबत गाई चरण्यासाठी घेऊन जात होते.
श्री कृष्ण माहिती मराठी – Shri Krishna Information in Marathi
भगवान श्री कृष्ण यांचा जन्म – birth
भगवान श्री कृष्ण यांचा जन्म मथुरेमध्ये कंसाच्या तुरुंगामध्ये इ. स. पूर्व ३२२८ मध्ये म्हणजेच भाद्रपद कृष्ण अष्टमी २१ जुलै, बुधवार या दिवशी देवकी यांच्या पोटी झाला आणि त्यावेळी भगवान श्री कृष्ण यांना वाडील वासुदेव यांनी भगवान श्री कृष्ण यांना जन्मताच यशोदेकडे सोपवले आणि योशोदेने भगवान श्री कृष्ण यांना लहानाचे मोठे केले.
कंस आणि भगवान श्री कृष्ण यांची कथा – shri krishna story in marathi
देवकीचा भाऊ कंस याला असे सांगण्यात आले होते कि तुझ्या बहिणीचा आठवा पुत्राच्या हातून तुझा वध होईल आणि त्यावेळी कंसाने असा विचार केला कि देवकीला आणि वासुदेवाला तुरुंगामध्ये ठेऊन त्यांच्या आठव्या पुत्राचा वाढ करायचा आणि तसेच केले त्यांना तुरुंगामध्ये ठेवले.
आणि देवकीच्या पोटी जन्म घेणाऱ्या सात मुलांना मारले परंतु भगवान श्री कृष्ण यांच्या जन्माच्या वेळी भगवान श्री कृष्णांनी आपल्या आई वडिलांना दर्शन देऊन असे सांगितले होते कि मला जन्मानंतर तुमच्या मित्राच्या घरी म्हणजेच नंदा आणि यशोदेकडे सोडण्यासाठी सांगितले.
आणि त्यासाठी तुरुंगाचे दार उघडेल तसेच तुम्हाला यमुना नदी देखील पार करण्यासाठी मदत होईल आणि त्याप्रमाणेच वासुदेवांनी श्री कृष्णांना नंदा आणि यशोदेकडे पोहचवले आणि त्यांच्या मुलीला त्यांच्या सोबत आणले आणि मुलगी झाल्याचे सांगितले त्यामुळे भगवान श्री कृष्ण कंसापासून वाचले आणि पुढे श्री कृष्णांनी कंसाचा वध केला.
भगवान श्री कृष्ण यांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- भगवान श्री कृष्ण या नावाने जास्त प्रचलित असले तरी त्यांची आणखीन १०८ नावे आहेत आणि यांना गोविंद, गोपाल, केशव, माधव, कान्हा, देवकीनंदन, श्याम, गिरिधारी, बांके बिहारी, मोहन, अच्युतम, घनश्याम अश्या अनेक नावांनी ओळखले जाते .
- ज्यावेळी भगवान श्री कृष्ण आणि बलराम यांनी सांदिपनी मुनींच्या कडून शिक्षण पूर्ण केले त्यावेळी भगवान श्री कृष्णांनी त्यांचे गुरु सांदिपनी मुनींना असे विचारले कि तुम्हाला गुरु दक्षिणा म्हणून काय पाहिजे त्यावेळी मुनींनी त्यांच्या मृत्यू झालेल्या मुलाला परत आणण्यास सांगितले आणि श्री कृष्णांनी सांदिपनी मुनींच्या मुलाला पुन्हा जिवंत केले.
- भगवान श्री कृष्ण हे पांडवांशी संबधित होते कारण कुंती हि पांडवांची आई आणि वासुदेवाची बहिण होती आणि वासुदेव हे भगवान श्री कृष्ण यांचे वडील होते.
- भगवान श्री कृष्ण यांचा मृत्यू हा शापांचा परिणाम होता यामध्ये गांधारीने कृष्णाला दिलेला शाप हा असा होता कि तो ३६ वर्षामध्ये त्याच्या संपूर्ण कुळासह मरण पावेल तसेच त्यांना दुर्वास ऋषींनी देखील एक शाप दिला होता कि त्यांचा मृत्यू हा त्यांच्या पायामुळे होईल आणि अश्या अनेक शापांच्यामुळे भगवान श्री कृष्णांचा मृत्यू झाला.
- भगवान श्री कृष्ण हे भगवान विष्णूंचा आठवा अवतार म्हणून पूजले जातात आणि स्वताच सर्वोच्च देव म्हणून देखील पूजले जातात.
- भगवान श्री कृष्णला बासरी वाजवण्याची खूप आवड होती आणि ते रिकाम्या वेळी आणि गाई चरण्यासाठी घेऊन गेल्यानंतर बासरी वाजवत होते त्यामुळे त्यांना कृष्ण मुरारी म्हणून देखील ओळखले जात होते.
- भगवान श्री कृष्ण यांनी महाभारतामध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे आणि त्यांनी महाभारतामध्ये गौरवपुत्र अर्जुनाला वेळोवेळी योग्य तो सल्ला देण्याचे काम केले आहे.
- भगवान श्री कृष्ण यांना मोरपंख खूप आवडत होते आणि भगवान श्री कृष्णाने डोक्यावर घातलेले मोरपंख हे पवित्रतेचे प्रतिक मानले जाते आणि हे मोरपंख राधा आणि क्रिशन यांचे शाश्वत बंधन दर्शवते असे देखील म्हटले जाते.
- भगवान आणि श्री कृष्ण यांचे नाव जरी राधेशी जोडले असले तरी भगवान श्री कृष्णाचा विवाह रुक्मिणीशी झाला होता.
- विठ्ठल हा भगवान श्री कृष्णाचा अवतार आहे.
- भगवान श्री कृष्ण यांचा जन्म द्वापार युगामध्ये झाला आणि म्हणून त्यांना युगावतार किंवा युगपुरुष म्हणून ओळखले जात होते.
- भग्वदगीता हे भगवान श्री कृष्ण आणि अर्जुनामधील संवाद आहे.
आम्ही दिलेल्या shri krishna information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर श्री कृष्ण माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या shri krishna story in marathi या shri krishna sarda information in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about shri krishna in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट