sir humphry davy information in marathi सर हम्फ्री डेव्ही माहिती, जगामध्ये अनेक शास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शोध लाऊन त्यांनी जगामध्ये अनेक बदल घडवून आणले आणि तसेच सर हम्फ्री डेव्ही हे एक शास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ आहेत ज्याच्याविषयी आज आपण या लेखामध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. सर हम्फ्री डेव्ही हे ब्रिटीश संशोधक आणि रसायनशास्त्रज्ञ होते ज्यांनी अर्क लॅम्पचा आणि डेव्ही दिवा याचा सुरुवातीच्या स्वरूपाचा शोध लावला आणि यांना ग्रेट ब्रिटन मधील महान शास्त्रज्ञानपैकी एक महान शास्त्रज्ञ मानले जाते.
सर हम्फ्री डेव्ही यांचा जन्म हा १७ डिसेंबर १७७८ मध्ये पेन्झांस, कॉर्णवॉल येथे दक्षिण-पश्चिम इंग्लंड भागामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हा शेती करणे हा होता आणि हे कुटुंबातील मोठा मुलगा होता.
सोळाव्या वर्षी सर हम्फ्री डेव्ही यांचे वडील मरण पावले आणि सर्व भार हा सर हम्फ्री डेव्ही यांच्यावर पडला. त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांना भेटण्यासाठी स्कॉटीश शोधक जेम्स वॅटचा मुलगा ग्रेगरी वॅट हे आले आणि त्यानंतर ते हम्फ्री डेव्ही या च्या गरि राहू लागले आणि त्यांच्या घरी राहू लागल्यामुळे त्यांची दोघांची घट्ट मैत्री बनली आणि यामुळे हम्फ्री डेव्ही यांच्या कारकीर्दीवर एक महत्वपूर्ण आणि चांगला प्रभाव पडला.
सर हम्फ्री डेव्ही माहिती – Sir Humphry Davy Information in Marathi
नाव | सर हम्फ्री डेव्ही |
जन्म | १७ डिसेंबर १७७८ |
जन्मठिकाण | पेन्झांस, कॉर्णवॉल येथे दक्षिण-पश्चिम इंग्लंड |
पालक | रॉबर्ट डेव्ही |
ओळख | ब्रिटीश संशोधक आणि रसायनशास्त्रज्ञ |
सर हम्फ्री डेव्ही यांचे प्रारंभिक जीवन – early life
सर हम्फ्री डेव्ही यांचा जन्म हा १७ डिसेंबर १७७८ मध्ये पेन्झांस, कॉर्णवॉल येथे दक्षिण-पश्चिम इंग्लंड भागामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचा व्यवसाय हा शेती करणे हा होता आणि हे कुटुंबातील मोठा मुलगा होता. सोळाव्या वर्षी सर हम्फ्री डेव्ही यांचे वडील मरण पावले आणि सर्व भार हा सर हम्फ्री डेव्ही यांच्यावर पडला.
सर हम्फ्री डेव्ही यांची कारकीर्द – career
- त्यांनी अर्क लॅम्पचा आणि डेव्ही दिवा याचा सुरुवातीच्या स्वरूपाचा शोध लावला आणि यांना ग्रेट ब्रिटन मधील महान शास्त्रज्ञानपैकी एक महान शास्त्रज्ञ मानले जाते.
- डॉ थॉमस बेडडोस यांनी ब्रीस्टॉलमध्ये न्यूमॅटीक इन्स्टिट्यूशन ची स्थापना केली आणि त्यांनी १७९८ मध्ये रासायनिक अधीक्षक म्हणून सर हम्फ्री डेव्ही यांना नियुक्त केले होते.
- त्यांनी त्यानंतर एका वर्षाच्या आतमध्ये एमएआय आणि लाइट विथ अ न्यू थिअरी ऑफ रेस्पिरेशन हे प्रसिध्द प्रकाशने दिली आहेत.
- तसेच त्यांनी नायट्रस ऑक्साईड वायूचे विलक्षण उत्साहवर्धक किंवा मादक गुणधर्म प्रगत करणारे सर हम्फ्री डेव्ही हे पहिले शास्त्रज्ञ होते.
- १८०६ मध्ये नव्याने स्थापित झालेल्या इन्स्टिट्यूशनमध्ये पहिले व्याख्यान दिले आणि लगेचच त्या ठिकाणी ती लोकप्रिय व्यक्ती बनली.
- सर हम्फ्री डेव्ही यांनी वातावरणातील पोटॅशियमद्वारे प्रतिक्रिया देणारे बोरिक अॅसिड गरम करून त्यांनी बोरॉनचा शोध लावला.
- १८११ मध्ये सर हम्फ्री डेव्ही यांनी असा निष्कर्ष काढला कि क्लोरीन एक घटक आहे आणि त्याला क्लोरीन असे नाव दिले.
- त्यांनी अनेक इतर पुस्तके लिहिली जसे कि एलिमेंट ऑफ अॅग्रीकल्चर केमिस्ट्री हे पुस्तक लिहिले आणि हे पुस्तक त्यांनी १८१३ मध्ये लिहिले होते आणि त्याच्या अगोदर म्हणजे १८१२ मध्ये एलिमेंट ऑफ केमिकल फिलॉसॉफी हे पुस्तक लिहिले.
- सर हम्फ्री डेव्ही यांनी १८३० मध्ये कन्सोलेशन इन ट्रॅव्हल हे पुस्तक लिहिले होते.
- १८२० मध्ये सर हम्फ्री डेव्ही यांना रॉयल सोसायटीच्या अध्यक्षपदी बढती मिळाली आणि त्यांनी सात वर्ष त्यांची कर्तव्ये पार पाडली.
सर हम्फ्री डेव्ही यांच्या विषयी मनोरंजक आणि विशेष तथ्ये
- सर हम्फ्री डेव्ही यांनी लेखन आणि प्रकाशनासोबतच विज्ञान आणि प्रकाशन या क्षेत्रामध्ये देखील महत्वपूर्ण कामगिरी केली आहे.
- सर हम्फ्री डेव्ही यांच्या सन्मान करण्यासाठी रॉयल सोसायटीने १८७७ पासून दरवर्षी रसायन शास्त्राच्या कोणत्याही शाखेतील अतुलनीय महत्वाच्या शोधासाठी डेव्ही हे पदक प्रदान केले जाते.
- सर हम्फ्री डेव्ही यांचे रसायनशास्त्रातील कार्य मार्गदर्शन आणि प्रेरणा म्हणून अनेकांना रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि विज्ञानाच्या इतर क्षेत्रांचा अभ्यास करण्यास प्रोत्साहित करते.
- सर हम्फ्री डेव्ही यांच्या पत्नीचे नाव जेन अॅप्रिस असे होते.
- नाइट आणि बॅरोनेट हे पुरस्कार त्यांना त्यांच्या रसायनशास्त्रातील कामगिरीसाठी देण्यात आले होते.
- त्यांनी एमएआय आणि लाइट विथ अ न्यू थिअरी ऑफ रेस्पिरेशन हे प्रसिध्द प्रकाशन आहे आणि त्याचबरोबर त्यांनी एलिमेंट ऑफ केमिकल फिलॉसॉफी, एलिमेंट ऑफ अॅग्रीकल्चर केमिस्ट्री आणि कन्सोलेशन इन ट्रॅव्हल हे पुस्तक लिहिले.
- त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत रॉयल सोसायटीच्या अध्यक्षपदी सात वर्ष काम केले.
- सर हम्फ्री डेव्ही हे कुटुंबातील मोठा मुलां होता आणि १७९४ मध्ये त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सर्व कुटुंबाचा भार हा पूर्णपणे त्याच्यावर पडला.
- यांना कविता लिहिणे, खनिजे गोळा करणे, शुटींग करणे, मासेमारी करणे आणि रेखाटन करणे अश्या प्रकारचे चंद होते.
सर हम्फ्री डेव्ही यांचा मृत्यू – death
सर हम्फ्री डेव्ही यांचा मृत्यू हा स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या शहरामध्ये २९ मे १८२९ मध्ये झाला आहे आणि त्यांचा मृत्यूचे कारण म्हणजे त्यांची तब्येत प्रथम थोडी बिघडली होती आणि नंतर त्यांना अर्धांग वायू होऊन त्यांचा मृत्यू झाला होता.
आम्ही दिलेल्या sir humphry davy information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर सर हम्फ्री डेव्ही माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या sir humphry davy information in marathi language या sir humphry davy information in marathi wikipedia article मध्ये update करू, मित्रांनो हि information about sir humphry davy in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट