30 ऑगस्ट लघु उद्योग दिवस 2023 Small Industry Day Information in Marathi

National Small Industry Day Information in Marathi 30 ऑगस्ट लघु उद्योग दिवस 2022 दर वर्षी 30 ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय लघु उद्योग दिवस म्हणून म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो.छोट्या उद्योगांना प्रेरणा देणे आणि बेरोजगारांना काम देणे हाच महत्त्वपूर्ण हेतू या आंतरराष्ट्रीय लघुउद्योगाच्या मागचा आहे. आपल्या देशात अनेक लघु उद्योग आणि कुटिरोद्योग आहेत.ज्यातून शासनालाही आर्थिक मदत होऊ शकते. लघुउद्योग सामाजिक सभ्यता आणि संस्कृती चांगल्या प्रकारे जपली जाते. मानवी दृष्टिकोनाने विचार केल्यास लघुउद्योगात साधी रहाणी अंन उच्च विचारसरणी पहायला मिळते.

small industry day information in marathi
small industry day information in marathi

30 ऑगस्ट लघु उद्योग दिवस 2022 – Small Industry Day Information in Marathi

30 ऑगस्ट लघु उद्योग दिवस माहिती

साध्या साध्या उद्योगातून शासनाला आर्थिक मदतीच पाठबळ मिळते. नैसर्गिक साधनांचा उपयोग करून कलात्मक आणि परंपरागत वस्तू निर्माण करून तरुणांच्या श्रमाला दाद दिली जाते.अशा असंख्य छोट्या उद्योगातून सामान्य माणसाची प्रगती व्हावी. आणि देशाच्या उत्पन्नात किंबहुना देशाच्या औद्योगिक, आर्थिक, प्रगतीत भर पडावी याच उद्देशाने संपूर्ण जगभर लघुउद्योग आणि कुटिरोद्योगया व्यवसाना पाठिंबा दिलेला आहे.

याच उद्योगामुळे श्रमजीवी अन् कष्टकरी जनतेत समानतेचे, मैत्रीचं नातं निर्माण होतं. लघु उद्योगामुळे छोट्या छोट्या कष्टाला प्रेरणा प्राप्त होताना दिसत आहे. कमी शिक्षण असणारे अनेकजण अशा लघु क्षेत्राशी एकरूप होताना दिसतात. म्हणून अशा उद्योगांना प्रेरना, चालना देण्यासाठी याला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला आहे. आणि म्हणूनच 30 ऑगस्ट हा दिवस जगभर उत्साहाने, नवचैतन्य निर्माण करणारा आणि छोट्या उद्योजकांना.

प्रेरणा देणारा असाच आहे.लघु उद्योगासाठी लागणारा  कच्चां मालं आणि कौशल्याच्या तांत्रिक बाबी बाहेरूनच मागविल्या जातात. अशा विविध औद्योगिक उद्योगात कमीतकमी १० ते ५० कामगार असतात. आणि त्यांच्याच कौशल्याने छोट्या छोट्या वस्तूंची निर्मिती केली जाते. रोजगारांच्या संधी मध्ये वाढ करणे आणि बेरोजगारांचे समाधान करणे हाच मुख्य उद्देश या आंतरराष्ट्रीय लघु उद्योगाचा स्पष्टपणे नजरेसमोर येतो.

भारत सरकारने ‘राष्ट्रीय लघुउद्योग निगम लिमिटेड’ स्थापन केले आहे .यातून कामगारांना उत्पन्नाची गुणवत्ता,आणि दर्जा,योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. मंत्रालयाने देखील तीन राष्ट्रीय उद्यम संस्थांची स्थापना केली आहे. ज्यातून संशोधन विकास, उद्योजकांना योग्य प्रशिक्षण देण्याची केंद्र उपलब्ध करून देण्यात आली आहे.

छोट्या उद्योजकांना सवलतीच्या दरात किंवा आणि कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा प्रकारच्या कर्ज योजना आमलात आणल्या आहेत. त्यातूनही देशाच्या विकासाचा दर निश्चित वाढेल यात शंकाच नाही.

भारत सरकारने सबसिडीतून औद्योगिक, लघु, कुटीरोद्योग यांना उत्पादन वाढवण्यासाठी त्या उत्पादनाची गुणवत्ता टिकवून इतर देशात निर्यात करून देशाच्या आर्थिक विकासात भर पडावी या उद्देशाने सरकारही ठोस पावले उचलून लघुउद्योग आणि बेरोजगारी कमी करण्याच्या प्रयत्नांना चालना देत आहे.

मोठमोठ्या उद्योगातील उत्पादनातील किरकोळ आणि सुटे भाग बनवण्यासाठी संपूर्ण जगभर लघुउद्योगाचे फार मोठे योगदान आहे. लघुउद्योग मध्ये सूक्ष्म लघु उद्योग, मध्यम लघुउद्योग आणि लघुउद्योग अशी विभागणी केलेली दिसते. संपूर्ण देशात जवळ जवळ ३ करोड ६० लाख लघु उद्योग आहेत. त्यातून १२ करोड लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

या उद्योगात अनेक छोट्या मोठ्या व्यवसायांचा समावेश होतो. त्यामध्ये वस्तृद्योग, कातडी उद्योग, कागद, लाकूड, रबर, प्लास्टिक,  वीज,  भोजन, मशिनारि उद्योग, इत्यादी उद्योगांचा समावेश होतो. अशा अनेक व्यवसायांचा समावेश लघुउ्योजकांत होतो.

या सर्वांना चालना देण्यासाठी दरवर्षी ३० ऑगस्टला निवडक लघुउद्योजकांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. म्हणूनच लघुउद्योजांना ३० ऑगस्ट हा दिवस खूपच प्रेरणादायी आहे. आपण सर्वांनीच या आंतरराष्ट्रीय पातळीवरील दिवसाला स्मरणात ठेवून लघुउद्योजकांना एक प्रकारची साथ देऊया मनापासून कौतुकाची प्रेरणा देऊ.

आम्ही दिलेल्या national small industry day information in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “30 ऑगस्ट लघु उद्योग दिवस” small industry day quotes विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या small business industry day 2021 या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about small industry day in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण small industry day India या लेखाचा वापर असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!