Swatantra Veer Savarkar Information in Marathi स्वातंत्र्यवीर सावरकर नाशिक जिल्ह्यातील कँटोन्मेंट विरुद्धच्या चळवळीत प्रसिद्ध झालेल्या गोकुळ या गावी इसवीसन 1883 च्या मे महिन्यात सावरकरांचा जन्म झाला. त्यांचे वडील दामोदरपंत हे खूप साधे भोळे आणि धार्मिक गृहस्थ होते. शिवाय ते स्वतः एक प्रतिभावान कवी होते. सावरकरांचे घराणे अतिशय खानदानी होते. त्यांच्याकडे बऱ्याच लोकांची सतत ये-जा असते. Veer Savarkar in Marathi सावरकरांच्या पूर्वजांनी कधीकाळी पेशवाईत बऱ्यापैकी मोठा पराक्रम करून एक लहानशी जहांगीर संपादन केली होती.
ही साधारण 1990 पर्यंत म्हणजे सरकार जप्त करेपर्यंत सावरकरा च्या घराण्यात होती. दामोदर पंत यांना एकूण चार अपत्ये होती. गणेशपंत उर्फ बाबासाहेब सावरकर. त्यानंतर आपले नायक विनायक . तिसऱ्या श्रीमती मैनाबाई आणि चौथी डॉक्टर नारायणराव सावरकर. सावरकरांची आई सावरकर नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूबाई यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील इसवीसन 1899 च्या प्लेगला बळी पडले.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माहिती – Swatantra Veer Savarkar Information in Marathi
नाव (Name) | विनायक दामोदर सावरकर |
जन्म (Birthday) | 28 मे 1883 |
जन्मस्थान (Birthplace) | नाशिक जिल्ह्यातील कँटोन्मेंट विरुद्धच्या चळवळीत प्रसिद्ध झालेल्या गोकुळ या गावी |
वडील (Father Name) | दामोदर पंत |
पत्नी (Wife Name) | यमुनाबाई |
मुले (Children Name) | विश्वास सावरकर, प्रभात चिपळूणकर, प्रभाकर सावरकर |
मृत्यू | 26 फेब्रुवारी 1966 |
लोकांनी दिलेली पदवी | स्वातंत्र्यवीर |
वि दा सावरकर हे काय होते
सोबतीच्या मुलांना गोळा करून किल्ले सर कर, शिवजयंती साजरी कर अशाच वाढत होता. देवाने याला आणखीन दोन गोष्टी ची जबरदस्त देणगी दिली होती. ती म्हणजे कोणत्याही गोष्टीला बेधडक भेट देण्याचे धाडस आणि अप्रतिम वकृत्व. वयाच्या आठव्या वर्षी एका खुल्या वकृत्व स्पर्धेत भाग घेतला. त्यात इतकं जबरदस्त भाषण केलं की परीक्षकांना हे भाषण स्वतः सावरकरांनी लिहिलेले पटेना म्हणून त्यांनी त्यांना बक्षीस नाकारलं. विनायक मुळातच बंडखोर त्यांनी सर्वांसमोर परीक्षकांना जाब विचारला.
तर त्यांनी सांगितलं तुझं भाषण अप्रतिम आहे, पण ही शैली एका आठ वर्षाच्या मुलांची असं शक्यच नाही. तेव्हा सावरकर म्हणाले, हे भाषण माझच आहे असं तुम्हाला वाटत असेल तर मला आत्ता या ठिकाणी एक आयत्या वेळचा विषय द्या, मी त्यावर बोलून दाखवतो. परीक्षकांनी एक आयत्या वेळचा विषय दिला, तर बाहेर बसून चार पाच मिनिटात विषय लिहून सावरकरांनी पहिल्या भाषणा इतकच अप्रतिम भाषण केलं. ते पाहून सगळे सभागृह परीक्षक भारावून गेले.अन बक्षीस सावरकरांना देऊ लागले. त्यावर सावरकर बोलले,ज्या परीक्षकांना माझी प्रतिभा ओळखता आली नाही त्यांच्याकडून मला कसलेही बक्षिस नको.
सावरकरांच्या कविता
नाव तुमचे विनायक
क्रांतीचे तुम्ही महानायक
बुद्धीचे दैदीप्यमान तेज
आज ही तस्वीरितून जाणवते
केला क्रांतीचा सशस्त्र उठाव
महान है तुमचा त्याग
कोणी मानो न मानो
स्वातंत्र्याच्या चळवळीत तुमचा
अजरामर आहे सहभाग
जरी नाही दिसला नोटा वरती आज
तरी ज्यांना तुम्ही कळलात
त्यांच्या हृदयात चिरंजीवी आहात
संकटाचा अवघड सागर पळून जाणारे अविचल तारू
निश्चयाचा महामेरू
शिक्षण
स्वातंत्र्यवीर सावरकर वयाच्या 13 -14 वर्षापासून कविता करू लागले. 1899 साली जनरल रेडचा वध केल्यामुळे चाफेकरबंधूंना फाशी देण्यात आली. ती बातमी ऐकून विनायक रात्रभर झोपला नाही. मध्यरात्री देव्हाऱ्यातील देवी समोर बसून त्यांनी शपथ घेतली. या ‘मायभूमीच्या स्वातंत्र्यासाठी मारिता मारिता मरोनी झुंजेन’. पुढे महाविद्यालयिन शिक्षण घेण्यासाठी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला आले. तिथे विदेशी कपड्यांची होळी करणे, इंग्रजांविरुद्ध मोर्चे काढणे या कारणावरून प्राचार्य रॅग्लर परांजपे यांनी त्याना दंड म्हणून कॉलेजमधून काढण्याची धमकी दिली. ही गोष्ट लोकमान्य टिळकांना समजतात त्यांनी मध्यस्थी केली. तेव्हा टिळकांचे लक्ष या तरुणाकडे गेल.
त्यांनी आपल्या लोकांना सांगून 1966 साली सावरकरांना लंडनला पाठवलं. तिथून पुढची चार वर्षे सावरकरांनी अक्षरश थैमान घातलं. अखंड भारतभराचे सहकारी जोडले. त्यांना हार प्रकारे मदत केली,छुप्या मार्गाने शस्त्रे पुरवली, हल्ले घडवले आणि याच काळात सखोल अभ्यास करून त्यांनी “1857 चं स्वातंत्र्यसमर” हे पुस्तक लिहिलं. या काळात अखंड भारतभर कुठे इंग्रज अधिकारीचा खून झाला, हल्ला झाला. त्याचे धागे कुठून ना कुठून सावरकरापर्यंत येऊन पोचायचे. इतकी दहशत निर्माण झाली.
स्वातंत्रवीर सावरकर लंडनमध्ये शिकून बॅरिस्टर झाले. लंडनमध्ये असताना स्वातंत्र्यवीर सावरकर शांत बसले नाहीत. तिथे त्यांनी “फ्री इंडिया सोसायटीची “स्थापना केली. तिथे शिवउत्सव,विजयादशमी, 1857 चा स्वातंत्र्य संग्राम हा सोहळा, गुरुगोविंद सिंग जयंती यासारखे भारतीय व राष्ट्रवाद पोचणारे पोसणारे सण साजरे केले.लंडनला जात असताना मदनलाल धिंग्रा हे त्यांच्यासोबत होते. ते एका सुखसंपन्न घराण्यातील होते. त्यांना त्यांच्या आईची आठवण झाली व ते रडू लागले. आपली मातृभूमी पारतंत्र्यात असताना तू आपल्या आईसाठी कसा काय रडू शकतो. असे खडे बोल त्यांनी सुनावले.पुढे मदन लाल धिंग्रा हे अभिनव भारतचे सदस्य झाले व त्यांनी कर्जन वायली यांचा गोळ्या घालून खून केला. धिंग्राना न्यायालयीन निर्णय होण्यापूर्वी गुन्हेगार ठरवण्याचा सावरकरांनी जाहीर निषेध केला.
इंग्रजांना काहीतरी कारण पाहिजे होते. त्यांनी सावरकरांना म्हटले तुम्ही या निषेधार्थ माफी मागा अन्यथा तुमची बॅरिस्टरची पदवी काढून घेण्यात येईल. पण केवळ एका पदवीसाठी मायभूमीची सेवा सोडणे त्यांना मान्य नव्हते व त्यांनी माफी न मागता बॅरिस्टर या पदवीवर पाणी सोडले. तो काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता. त्यांना शैक्षणिक धक्का मिळत असताना त्यांना कौटुंबिक धक्क्याला सामोरे जावे लागले. त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकर त्यांच्यावर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि त्यांचा तुरुंगातच मृत्यू झाला. लहान बंधू नारायणराव सावरकरांना अटक झाली याचा ताण त्यांच्या मनावर पडला.
1899 मध्ये सशस्त्र क्रांतीच्या कार्यासाठी त्यांनी “राष्ट्रभक्त समूह” या गुप्त मंडळाची स्थापना केली. जानेवारी 1900 मध्ये क्रांती कार्याला वाहून घेतलेल्या निष्ठावंत तरुणासाठी “मित्रमेला” ही ची स्थापना केली. 1904 मध्ये मित्रमेळा चे रूपांतर “अभिनव भारत” या संस्थेत झाले.
1910 मध्ये जगभरातील सावरकरांच्या सहकार्याची धरपकड चालू झाली. तेव्हा स्वतःला अटक होणार हे माहित असून देखील सावरकर लंडनमध्ये आले. अन झालंही तसंच. लंडनच्या भूमीवर पाय ठेवतात त्यांना अटक झाली. त्यांना अटक करून मोरिया नावाच्या बोटीवर चढवत असताना त्यांचे सहकारी NPT आचार्य यांनी त्यांना सांगितलं की गोष्टी जर नीट जुळून आल्या तर मारसेलिस या फ्रान्सच्या बंदरावर भेट होईल. बोटीवर सावरकर कैद्यांच्या वेशात होते.हातात साखळदंड.
त्यांनी लघु शंकेचा बहाणा करून आत गेले अन बोटीला जि लहानशी खिडकी असते त्यातून दिल स्वतःला झोकून. समुद्रात सरसर पोहत किनाऱ्यावर पोचले. तिथला कट्टा चढून बंदराच्या गेट वर आले. त्यांनी पहिले तिथे NPT आचार्य कुठे दिसेनात. मग त्यांनी फ्रेंच पोलिसांकडे धाव घेतली पण सावरकरांना फ्रेंच येत नसल्यामुळे गोंधळ उडाला अन तेवढ्या वेळात बोटीवरचे सैनिक येऊन सावरकरांना पुन्हा अटक केली. त्यानंतर पाच मिनिटात NPT आचार्य मॅडम कामा गाडी घेऊन आले होते. सावरकरांची ही उडी अखंड जगभर गाजली.
त्यावेळच्या प्रत्येक वृत्तपत्राचा मथळा हीच बातमी होती. पुन्हा जेव्हा भारतामध्ये आणून त्यांच्यावर खटला चालवला आणि त्यांना दोन जन्मठेपेच्या म्हणजे पन्नास वर्षे शिक्षा सुनावली. एखादा माणूस हे ऐकून जागीच गळून पडला असता पण सावरकर हसून कोर्टात बोलले की मला पन्नास वर्षे शिक्षा होते याचा अर्थ तुमचा हिंदू संस्कृती आणि पुनर्जन्मावर विश्वास आहे तर. अंदमानच्या सेल्युलर जेल चा इतिहास होता की तिथे जाईल तो हाती पायी धड परत यायचं नाही. पण सावरकरांनी तिथे जाऊन अनंत हालअपेष्टा सोसल्या.
विनायक दामोदर सावरकर पुस्तके
दिवसभर कोल्लू चालवले,कित्येक वेळा चाबकाने अंग फोडून घेतलं. एक तांब्याभर पाणी मिळायचं त्यात सगळा दिवस घालवायचा. तिथे त्यांनी आंदोलन केली. तिथला जेलर बारी बाबा यांच्या सोबत अखंड वेळा खटके उडाले. नरक म्हणावा असा एकांतवास भोगला. अशा काळात सुद्धा त्यांनी “कमला” हे महाकाव्य लिहिले. लिहिण्यासाठी काही साधन नसल्याने त्यांनी 7500 कवन तोंडपाठ केले आणि पुन्हा सुटून बाहेर आल्यावर पुनर्लेखन केलं.
अंतमनातून सुटून भारतात आल्यावर त्यांनी लेखनाचा सपाटा सुरू केला. त्यानंतर त्यांनी अस्पृश्यता निवारण चळवळीला वाहून घेतले. सर्वधर्माच्या लोकांना प्रवेश मिळावा म्हणून “पतित-पावन” मंदिराची स्थापना केली. ते म्हणत एखाद्याच्या स्पर्शाने अपवित्र होतो त्याला मी देव मानत नाही. सेक्युलर या शब्दापेक्षा त्यांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे असे त्यांना वाटे. सावरकर हे व्यक्तिमत्व जात-पात धर्म प्रांत या पलीकडचे आहे. वयाच्या केवळ 26 व्या वर्षी त्यांचे 26 ग्रंथ लिहून झाले होते. अगदी कमी वयात स्वतंत्र प्राप्तीचा विचार येतो आणि वयाच्या 83 वर्षापर्यंत ते केवळ राष्ट्रासाठी मातृभूमीसाठी जगतात.
स्वातंत्र्यानंतर गांधीहत्येच्या संशयाखाली अटक झाली. घरावर हल्ले झाले. इंग्रजांच्या अत्याचाराने माणूस कसला नाही तितका त्याला आपल्या लोकांनी खचवला. देशाच्या एकात्मतेसाठी आयुष्य वेचणाऱ्या अब्राहम लिंकनला अमेरिकेचा सर्वकालीन महान राष्ट्राध्यक्ष म्हणून इतिहासात मान मिळाला पण आपल्या भारत देशात देशाच्या एकात्मतेसाठी आयुष्याची अक्षरच्या होळी करणाऱ्या सावरकर यांची अवस्था अगदी त्यांच्या विरुद्ध होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेच गांधीहात्येच्या संशयाने घरावर दगडफेक केली. खटला चालवला. अटक झाली. इंग्रजांच्या गोळ्या निधड्या छाती झेललेला माणूस स्वतःच्या देशाकडून मिळालेले या वागणुकीने पुरता कोसळला.
आम्ही दिलेल्या swatantra veer savarkar information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vinayak damodar savarkar information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि vinayak damodar savarkar in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये savarkar in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
1966 ला लंडन पाठवले . ह्या वाक्यावर बदल आवश्यक आहे.