तबला वाद्याबद्दल माहिती Tabla Information In Marathi

नमस्कार मित्रांनो, tabla information in Marathi language तबला हा बहुतेक लोकांच्या परिचयाचा आहे. आपण दूरदर्शन वर किंवा अगदी शेजारीच कुठेतरी भजन, कीर्तन ऐकायला गेलो असेन तर पाहिला असेल. तसेच ज्यांना संगीताचा नाद किंवा आवड आहे. अशा लोकांना तबल्याबद्दल माहिती असेलच. तरीही आपण या लेखात तबल्याच्या इतिहास, तबल्याची रचना , तबला कसा वाजवला जातो? याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. (tabla chi mahiti)

tabla-information-in-marathi
तबला या वाद्याबद्दल माहिती

तबाल्याचा इतिहास! (History Of tabla) (tabla information in marathi)

तबला हा भारतीय शास्त्रीय संगीताशी निगडित आहे. १८ व्या शतकापासून भारतीय उपखंडात तबला वाजवला जात आहे. भजन ,कीर्तन , इत्यादी सारख्या पारंपरिक कार्यक्रमात गोडी आणण्यासाठी तसेच एक विशिष्ठ सुंदर ठेका बसवण्यासाठी तबला हे वाद्य वापरले जाते. मुख्यतः तबला ने नाव ‘ तबल’ या अरेबियन शब्दावरून घेण्यात आले आहे, असे म्हटले जाते. तबल याचा अर्थ ‘ढोल’ असा होतो. तबला हा भारत , बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, अफगाणिस्तान, श्रीलंका यांसारख्या देशात ही लोकगीतं सादर करताना वापरला जातो.
तसेच भारतात हिंदू वा शिख धर्मातील भक्ती परंपरा असलेली आरती, पूजा, भजन, कीर्तन करताना तसेच सुफी संगीतकार कवाली सादर करताना तबला हे मुख्य वाद्य म्हणून वापरले जाते. कथ्थक हा  नृत्यप्रकार सादर करताना तबल्याचे सहाय्य घेतले जाते.आपण जर इतिहासात डोकावून पाहिले तर मुस्लिम आणि मुघल राज्यकर्ते यांच्या काळात ही तबला वाजवला जायचा असे म्हटले जाते. पण त्याबद्दलचे स्पष्ट पुरावे हे सापडले नाहीत. त्यानंतर १७४५ साली तबला वापरल्याचे स्पष्ट चित्राच्या स्वरूपातले पुरावे समोर आले. आणि खऱ्या अर्थाने तबला हे वाद्य १८०० साला पासून मोठ्या प्रमाणात निरनिराळ्या संगीताच्या मैफिलीत वापरले जाऊ लागले. तसेच याबरोबर  ६ व्या आणि ७ व्या शतकामध्ये सुद्धा मुक्तेश्वर आणि भुवनेश्वर च्या मंदिरांमध्ये प्राचीन भारतीय ‘पुस्करा” नावाच्या ढोलाचे अवशेष किंवा पुरावे सापडले आहेत. पुस्करा ढोलापासूनच पुढे तबल्याचा उदय झाला, असे म्हटले जाते.

अशाप्रकारे हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मांच्या प्राचीन इतिहासात तबल्याचे पुरावे सापडले आहेत. हिंदूंच्या इतिहासात पाहिले असता, “नाट्यशास्त्र” नामक ग्रंथांमध्ये तबला वादनाचे धडे मांडले आहेत. दक्षिण भारतीय ग्रंथ  “सिलापट्टीकरम” नामक या ग्रंथामध्ये सहस्राब्दी मधील अगदी पूर्वीच्या शतकांमध्ये ३० प्रकारचे ढोल नमूद केले आहेत. त्यातीलच “पुस्करा” नावाचा ढोल हा ही एक आहे. ज्यापासून पुढे तबला तयार झाला आहे असे आपण लेखात यापूर्वीही पाहिले आहे.

आपण जर मुस्लिम किंवा मुघलांच्या काळामध्ये डोकावून पाहिले तर असे दिसून येते की त्यावेळी मुघल सैन्य “नगारा” या वाद्याचा वापर आपल्या शत्रूला घाबरवण्यासाठी किंवा चेतावणी , सूचना देण्यासाठी करत असत. नगारा हा ढोलच असून तो आकाराने मोठा असतो. त्यालाही तबल असेही म्हटले जायचे. त्यामुळे असे दिसून येते की तबल हा जरी अरेबियन शब्द असला तरी तबला हे वाद्य अरेबिया मधून आयात केलेलं नाही. असे म्हटले जाते,की अल्लाउद्दीन खिलजी याच्या दरबारातील संगीतकाराने असाच एक ढोल जो दोन्ही बाजूने ढोलकी सारखा वाजवता येत असायचा तो मधून तोडून त्याचे दोन भाग केले. व नंतर तोच तबला म्हणून वापरला जाई लागला. पण याचेही काही स्पष्ट पुरावे नाही आढळले. अगदी त्या संगीतकाराप्रमाणे १८ व्या शतकात अमीर खुर्सो नावाच्या एका संगीतकाराने पखवाज नावाचे वाद्य दोन भागांत विभागून तबला म्हणून वापरले होते. अशा प्रकारे काहीसा स्पष्ट अस्पष्ट इतिहास आहे.

तबल्याची रचना किंवा वर्णन !( Description Of Tabla) (tabla chi mahiti)

तबला म्हणजे हाताने वाजवायचा ढोल असे पूर्वी सोप्या भाषेत ओळखले जायचे. पण ढोल हा एकच असतो आणि तबला मात्र दोन भागांत विभागाला गेलेला आहे. दोन्ही भाग वेगवेगळ्या माप आणि आकाराचे असतात. दोन्हीही भाग आतून पोकळ असून लाकूड, चिनी माती किंवा धातूंपासून बनलेले असतात. जो भाग लहान असतो तो स्वर गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी व दुसरा भाग ज्याला डग्गा म्हणतात जो आकाराने ही मोठा असतो तो खर्ज सांभाळण्यासाठी ज्याला आपण इंग्रजीत Bass असे म्हणतो. दोन्ही भाग हे टिक आणि रोझ वूड पासून बनवतात. आणि तबल्याच्या संपूर्ण खोलीच्या मध्यापर्यंत पोकळ बनवलेले असतात. लहान भाग हा १५ सेंटिमीटर व्यास व २५ सेंटिमीटर उंची चा असतो. मोठा भाग हा २० सेंटिमीटर व्यास व २५ सेंटिमीटर उंची चा असतो. हा भाग पितळ, तांब्यापासून बनवला जातो. स्टील आणि अल्युमिनियम पासूनही स्वस्तात बनवता येते. याबरोबरच पंजाब मध्ये लाकूड व बंगालच्या उत्तरीय पूर्व भागात चिकणमातीचा ही वापर केला गेला आहे. पण टिकाऊ पणा कमी असतो. तबल्याच्या मध्य भागी एक काळया रंगाचे वर्तुळ असते. ती एक प्रकारची शाई असते ती स्टार्च आणि काळया चुर्णपासून बनवली जाते. या शाईचेही खूप महत्त्व आहे. कर्णमधुर समृद्धी, आवाजातील स्पष्टपणा, स्वरातील विविधता हे सर्व नियंत्रित करण्यासाठी शाईचा वापर होतो.

तबला वादनाचे काही नियम! (Some rules of tabla !)

हे सर्व सांभाळायला खप कसब लागतं. तबला वाजवताना वेगेगळया प्रकारचे ताल अभ्यासले जातात.  ताल हे ३ ते १०८ मात्रांमध्ये विभागले गेले आहेत. तसेच टाळी व खाली अशा दोन क्रिया असतात. टाळी म्हटलं की तबल्यावर आपल्या तळताने थाप मारायची आणि खाली म्हटलं की नाही मारायची.
तालाबरोबरच लय ही तबला वाजवताना खूप महत्वाचा आहे. लय हे ३ प्रकारचे असतात.

१. विलंबित म्हणजेच निम्न वेग

२. मध्य म्हणजे मध्यम वेग

३. दृत म्हणजे दुप्पट वेग.

त्याबरोबरच आदी लय म्हणजे दीडपट वेग आणि अती अती द्रुत लय म्हणजे खूप खूप वेगाने. असे हे लय असतात. या सर्व तालांमधे  त्रीताल किंवा तींताल हा प्रसिद्ध ताल आहे. त्रिताल मध्ये ४ उपविभाग असतात. प्रत्येक उपविभागाचे ४ मात्रा असतात. एकूण १६ मात्रा झाल्या.
तसेच धमार, एकताल, झूमरा, चाऊ असे मध्यम ताल, झाप रूपक सारखे जलद ताल, दादरा सारखे संथ ताल देखील आहेत. २० व्या शतकापर्यंत तबला वादनाचे लिखित धडे नाही आहेत. पण विष्णु दिगंबर पलुस्कर यांनी  टाळी खाली आणि विष्णु नारायण भातखंडे यांनी मात्रा यांचे लिखित धडे हे Latin व देवणागिरी भाषेत तयार करून ठेवले आहेत.

तबला वाजवण्याची खूप जुनी परंपरा असल्यामुळे विविध भागात विविध तबला वाजवण्याचे नियम तयार झाले. वेगवेगळी घराणी तयार झाली. ही घराणी तबला वाजवण्यात खूप पारंगत होत गेली. तबला वादनाची संस्कृती श्रीमंत बनवत गेली. त्यामध्ये दिल्ली, लखनऊ, अजरादा, फरुखाबाद बनारस, पंजाब इत्यादी घराणी तबला वादन उत्तरोत्तर वाढवत नेले.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा तबला हे वाद्य कसे आहे त्याची रचना व त्याचे कार्य कसे आहे. tabla information in Marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच tabla chi mahiti हा लेख कसा वाटला व अजून काही तबला या वाद्याबद्दल काही राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!