telecaller meaning in marathi – telecaller information in marathi टेलीकॉलिंग म्हणजे काय, सध्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय आहेत आणि या व्यवसायांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अनेक साधनांचा आणि अनेक मार्गांचा वापर केला जातो आणि त्यामधील एक म्हणजे टेलीकॉलर किंवा टेलिकॉलिंग आणि आपण या लेखामध्ये टेलीकॉलर विषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती पाहणार आहोत. सध्या आपल्याला कॉल सेंटर विषयी माहिती आहे आणि टेलीकॉलर हा कॉल सेंटर मधील एक कामगार असतो.
जो विद्यमान ग्राहक तसेच संभाव्य ग्राहक यांच्यापर्यंत पोहचून त्या संबधित संस्थेविषयी विक्री वाढवण्याचे काम किंवा त्या संस्थेचे मार्केटिंग वाढवण्याचे काम करते. टेलीकॉलर म्हणून नियुक्त असणारे कर्मचारी हे फोनवरील विक्री हाताळण्यासाठी जबाबदार असतात. तसेच सेवांच्या संदर्भात प्रश्न सोडवण्यासाठी देखील ते जबाबदार असतात तसेच ते ग्राहकांच्याकडून महत्वाची माहिती गोळा करणे या प्रकारची अनेक कामे टेलीकॉलर हे फोनमार्फत करत असतात.
टेलीकॉलिंग म्हणजे काय – Telecaller Meaning in Marathi
टेलीकॉलिंगचे प्रकार – telecaller information in marath
टेलीकॉलिंगचे मुख्यता दोन प्रकार आहेत ते म्हणजे इनबाऊंड ( Inbound ) आणि आऊटबाऊंड (outbound). चला तर खाली आपण इनबाऊंड आणि आऊटबाऊंड चा अर्थ काय आहे ते पाहूया.
- इनबाऊंड : ज्या ग्राहकांना सेवा आणि उत्पादन यामध्ये आवड आहे अश्या ग्राहकांच्याकडून कॉल स्वीकारला जातो आणि यालाच इनबाऊंड टेलिकॉलिंग म्हणतात .
- आऊटबाऊंड : आऊटबाऊंड टेलीकॉलिंगमध्ये सेवा आणि उत्पादनाचे विभाजन करतात आणि मग पुढे त्यावर शेड्युल तयार करतात तसेच योग्य टेलीमार्केटर शोधतात आणि अश्या प्रकारचे कॉल स्वीकारल्या जाणाऱ्याला आऊटबाऊंड टेलीकॉलिंग म्हणतात.
टेलीकॉलरची जबाबदारी – telecalling job meaning in marathi
टेलीकॉलर हे कॉल सेंटर मधील कर्मचारी असतात आणि हे कर्मचारी वेगवेगळ्या प्रकारची कामे किंवा जबाबदाऱ्या पार पाडतात. चला तर खाली आपण टेलीकॉलरच्या जबाबदाऱ्या काय आहेत ते पाहूया.
- ग्राहकांच्याकडून माहिती गोळा करणे आणि इतर संबधित माहिती गोळा करणे किंवा प्राप्त करणे.
- प्रत्येक कॉलला ( येणाऱ्या किंवा केलेल्या ) उत्तर देणे.
- ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारने आणि त्यांची इच्छा काय आहे किंवा त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घेणे.
- टेलीकॉलर हे फोनवरील विक्री हाताळण्यासाठी जबाबदार असतात त्याचबरोबर सेवांच्या संदर्भात प्रश्न देखील ते सोडवतात.
- ग्राहकांच्या गरजा भागवणे आणि गरजांच्या आधारित वेगवेगळे उपाय सुचवणे.
- उत्पादने आणि सेवांच्या संबधित ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुरवणे आणि त्याचबरोबर ग्राहकांच्या समस्याचे निराकरण करणे.
- व्यावसायिक प्रकाराने उत्पादन ऑर्डर घेणे आणि त्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया करणे.
- टेलीकॉलर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीकडे फोनवर असणाऱ्या समोरच्या व्यक्तीचे मनपरिवर्तन करण्याची कला असणे आवश्यक आहे.
- ग्राहकांची माहिती हि नियमितपणे राखणे.
- जो व्यक्ती कॉल सेंटर मध्ये टेलिकॉलर म्हणून काम करतो अश्या व्यक्तीने स्वभावामध्ये सायं ठेवणे खूप गरजेचे असते.
टेलीकॉलरसाठी पात्रता निकष आणि कौशल्ये – eiligibility and skills
कोणत्याही प्रकारचा जॉब करण्यासाठी त्या संबधित व्यक्तीला काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि तसेच त्या व्यक्तीमध्ये काही कौशल्ये देखील असणे गरजेचे असते आणि ती कौशल्ये आणि पात्रता निकष कोणकोणते आहेत ते खाली आपण पाहणार आहोत.
कौशल्ये – skills
- टेलीकॉलर होण्यासाठी त्या व्यक्तीला उत्तम प्रकारे बोलता आले पाहिजे म्हणजेच पुढच्या व्यक्तीला आपले म्हणणे काय आहे ते पटवून सांगता आले पाहिजे.
- त्या संबधित व्यक्तीकडे वेळ व्यवस्थापित करण्याची चांगली क्षमता असली पाहिजे.
- तसेच अनेक प्रकारच्या समस्या सोडवण्याचे कौशल्य देखील त्या व्यक्तीकडे असणे आवश्यक असते.
- त्या संबधित व्यक्तीकडे चांगली निर्णय घेण्याची क्षमता, मजबूत संघटन करण्याची क्षमता असणे आवश्यक असते.
- मौखिक आणि लेखी संवाद कौशल्ये असणे देखील आवश्यक असते तसेच त्या व्यक्तीला तणाव आणि दबाव सहन करण्याची देखील चांगली क्षमता असणे गरजेचे असते.
- ज्यावेळी गरज असते त्यावेळी त्या व्यक्तींने टीममध्ये किंवा वैयक्तिकरित्या काम करण्याची देखील गरजे असते.
पात्रता निकष – eiligibility
- जो व्यक्ती टेलीकॉलर होण्यासाठी इच्छुक असतो त्या व्यक्तीने ग्रॅज्यूएशन किंवा डिप्लोमा पूर्ण करणे गरजेचे असते.
- टेलीकॉलर म्हणून नोकरी करू इच्छिणाऱ्या व्यक्तीला टेलीमार्केटर किंवा टेलीकॉलर म्हणून कामाचा अनुभव असणे आवश्यक असते.
चांगला टेलीकॉलर बनण्यासाठी काही टिप्स – telecalling job meaning in marathi
जर एखाद्या व्यक्तीला चांगला टेलीकॉलर बनायचं असल्यास त्या व्यक्तीने काही टिप्स वापरल्या तर तो व्यक्ती एक चांगला टेलीकॉलर बनू शकतो. चला तर खाली आपण टेलीकॉलर बनण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टिप्स कोणकोणत्या आहेत ते पाहूया.
- त्या संबधित व्यक्तीचे बोलणे इतके चांगले असले पाहिजे कि त्याने समोरच्या व्यक्तीचे किंवा फोनवरच्या व्यक्तीचे मन जिंकले पाहिजे.
- आपण ग्राहकाशी बोलत असताना आपल्या बोलण्याचा वेग हा नियंत्रित असला पाहिजे म्हणजेच टेलीकॉलरचा बोलण्याचा वेग हा असा असला पाहिजे कि त्याचे बोलणे ग्राहकाला चांगल्या प्रकारे समजेल.
- तुम्ही एखाद्या ग्राहकाला फोन करत असता त्यावेळी तुम्ही त्याच्यासोबत काय बोलणार आहात किंवा तुमच्या प्रश्नांची तयारी करून ठेवा त्यामुळे ग्राहकाकडून तुम्हाला महत्वाची माहिती गोळा करण्यास मदत होईल.
- तुम्ही ज्यावेळी कॉल चालू करता त्यावेळी त्या समोरील व्यक्तीची बोलण्यासाठी परवानगी घ्या त्यामुळे समोरील व्यक्ती बोलण्यासाठी उत्साही होईल.
- ग्राहकांना उत्पादनांच्या किंवा सेवांच्या विषयी सविस्तर आणि संपूर्ण माहिती द्या.
- टेलीकॉलरने बोलणे संपवताना त्या व्यक्तीचे आभार मानले पाहिजे.
आम्ही दिलेल्या telecaller information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर टेलीकॉलिंग माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या telecaller meaning in marathi या telecalling job meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि bpo telecaller meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये telecaller means in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट