Throw Ball Game Information in Marathi थ्रोबॉल खेळाची माहिती आज या लेखामध्ये आपण थ्रोबॉल या खेळाविषयी माहिती घेणार आहोत. थ्रोबॉल हा खेळ जगभरात खेळला जातो परंतु भारतीय उपखंडात तो सर्वाधिक लोकप्रिय आहे आणि त्याचे परदेशात लोकप्रियतेचे केंद्र मोठ्या प्रमाणात भारतीय समुदाय आहेत. थ्रोबॉल हा खेळ असा खेळ आहे ज्यामध्ये प्रत्येकी ७ खेळाडूंचे २ संघ असतात आणि हा खेळ आत / बंदिस्त जागेमध्ये किंवा मैदानावर खेळला जावू शकतो. हा खेळ व्हॉलीबॉल पासून जन्माला आला आहे, परंतु हा खेळ व्हॉलीबॉल पासून जन्माला आला असला तरी या खेळाचे काही मूलभूत फरक आहेत.
हा खेळ देखील कोर्टवर खेळला जातो आणि या खेळाचा कोर्ट हा मध्यभागी नेटसह दोन भागात विभागलेले असतो परंतु थ्रोबॉलच्या कोर्टची खेळण्याचा पृष्ठभाग हा व्हॉलीबॉल कोर्टपेक्षा खूप मोठी असतो. थ्रोबॉल हा खेळ तीन सेटमध्ये खेळला जातो आणि या खेळामध्ये २ संघामध्ये १२ खेळाडू प्रत्येक संघामध्ये असतात आणि ७ खेळाडू खेळपट्टीवर असतात.
हा खेळ सांघिक खेळ असल्यामुळे खेळाडूंना एकत्र काम करावे लागते आणि त्यांना एकमेकांच्या खेळाची चांगली समज असणे आवश्यक आहे तसेच संवादाचे स्पष्ट माध्यम असणे आवश्यक आहे.
थ्रो बॉल खेळाची माहिती – Throw Ball Game Information in Marathi
खेळाचे नाव | थ्रोबॉल (throw ball game) |
खेळाचा प्रकार | हा खेळ दोन्ही प्रकारे खेळला जावू शकतो, मैदानी प्रकारे किंवा बंदिस्त प्रकारे. |
खेळचा उगम | इंग्लंड |
खेळाचे मैदान | कोर्ट |
मैदानाचा आकार | थ्रोबॉल कोर्ट १२.२ मीटर बाय १८.३ मीटर |
संख | २ संघ |
खेळाडूंची संख्या | प्रत्येकी संघामध्ये १२ खेळाडू त्यामधील प्रत्येकी ७ खेळाडू खेळपट्टीवर खेळतात. |
इतिहास – throw ball game history in marathi
थ्रोबॉल या खेळाची सुरुवात इंग्लंड या देशामधून झाली आणि हा खेळ सुरुवातीच्या काळामध्ये स्त्रियांद्वारे खेळला जाणारा लोकप्रिय खेळ होता. थ्रोबॉल हा खेळ सध्या जगभरामध्ये लोकप्रिय जरी असला तरी जा खेळ भारतीय उपखंडामध्ये मोठ्या प्रमाणात खेळला जातो आणि याची सुरुवात इ.स १९४० पासून चेन्नई या शहरातून झाली.
थ्रोबॉलचे पहिले नियम वायएमसीएच्या हॅरी क्रो बक यांनी इ.स १९५५ मध्ये लिहिले होते आणि पुढील काही वर्षांत हा खेळ हळूहळू लोकप्रिय होत गेला, इ.स १९८५ मध्ये थ्रोबॉल फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली.
- नक्की वाचा: डार्ट खेळाची माहिती
थ्रोबॉल खेळाचे मैदान – throw ball ground information in marathi
थ्रोबॉल हा खेळ आत / बंदिस्त जागेमध्ये किंवा मैदानावर खेळला जावू शकतो आणि या खेळाच्या मैदानाला कोर्ट म्हणतात आणि हा कोर्ट मध्यभागी नेटसह दोन भागात विभागलेले असतो. थ्रोबॉल कोर्ट १२.२ मीटर बाय १८.३ मीटर इतका असतो आणि कोर्टाच्या बाजूला दोन्ही बाजूला १.५ मीटरचे तटस्थ बॉक्स असतात. आणि कोर्टच्या मध्यभागी २.२ मीटर उंचीपर्यंत जाली मारलेली असते.
थ्रोबॉल कसा खेळला जातो – how to play throw ball game
थ्रोबॉल या खेळामध्ये २ संघ असतात आणि प्रत्येकी ७ खेळाडू खेळपट्टीवर खेळत असतात. या खेळामध्ये एका वेळी दोन घेलाडू चेंडू पकडू शकत नाहीत एका वेळी एकच खेळाडू चेंडू पकडू शकतो. चेंडू खेळाडूंना दोन्ही हातांनी चेंडू पकडावा परंतु चेंडू फेकताना एका हातानेच फेकावा लागतो.
तसेह खेळाडून आपला चेंडू खांद्याच्या रेषेच्या वरून सोडला पाहिजे आणि सर्व्हिस बॉल नेटला स्पर्श करू नये. खेळाडूंनी शिट्टी वाजल्यानंतर आणि ५ सेकंदात चेंडू सर्व्ह करावा आणि खेळाडूंनी सर्व्हिस झोनमधून बॉल सर्व्ह करावा परंतु शेवटची रेषा ओलांडल्याशिवाय चेंडू सर्व्ह करावा.
थ्रोबॉल खेळाचा उद्देश
- थ्रोबॉलच्या खेळाचा मुख्य उद्देश हा आहे की एका संघाने प्रत्येक सेटमध्ये विरोधी संघाच्या पेक्षा जास्त गुण मिळवून त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करणे.
- प्रत्येक सेट मध्ये १५ गुण मिळवणे.
- खेळामध्ये एकूण ३ सेट असतात त्यामधील संघाने २ सेट जिंकले तर ते खेळ जिंकतात.
थ्रोबॉल खेळाचे नियम – throw ball game rules in marathi
- कोर्ट १२.२ मीटर बाय १८.३ मीटर इतका असतो आणि कोर्टच्या मध्यभागी २.२ मीटर उंचीपर्यंत जाली मारलेली असते.
- कोर्टाच्या बाजूला दोन्ही बाजूला १.५ मीटरचे तटस्थ बॉक्स असतात.
- रॅली स्कोअरिंगमध्ये फक्त सर्व्ह करताना गुण मिळू शकतात.
- थ्रोबॉल हा खेळ २ संघामध्ये खेळला जातो आणि त्यामध्ये प्रत्येकी १२ खेळाडू असतात त्यामधील ७ खेळाडू कोर्ट मध्ये खेळायला असतात.
- सर्वोत्कृष्ट तीन सेटसाठी सामने खेळले जावेत आणि प्रत्येक सेटचा विजेता १५ गुण मिळवणारा पहिला असेल.
- खेळाडूंना चेंडू उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे हलवण्याची परवानगी नाही.
- व्हॉलीबॉलप्रमाणे बॉल्स व्हॉली करू नयेत पण ते पकडले पाहिजे आणि नंतर पटकन फेकले पाहिजेत.
- कोणत्याही खेळाडूने बॉल टाकते वेळी फक्त खांद्याच्या रेषेतून किंवा वरच्या बाजूने टाकला पाहजे.
- थ्रोबॉलमध्ये पासेसची परवानगी नाही, खेळाडूला चेंडू मिळताच त्यांनी तो ताबडतोब नेटवर परत करावा.
- दोन खेळाडू एकाच वेळी बॉल पकडू शकत नाही, एकाच वेळी एकच खेळाडू बॉल पकडू शकतो.
- सर्व खेळाडूंनी संघाची जर्सी आणि शॉर्ट्स घालून त्यांचा नंबर जर्सीच्या मागील बाजूस छापलेला असावा.
- सर्व संघ सदस्यांना खेळाच्या १५ मिनिटे अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- एकदा बॉल हातात आल्यावर, शिट्टी वाजल्यानंतर किंवा ५ सेकंदात थेट परत फेकणे आवश्यक आहे.
- संपूर्ण खेळाच्या सामन्यात प्रत्येक सेटमध्ये ३० सेकंदांचे दोन टाइम-आउट असतात.
थ्रोबॉल या खेळाविषयी अनोखी तथ्ये
- खेळाडूंना शॉर्ट्स आणि पाठीमागे त्यांचा नियुक्त क्रमांक असलेली संघ जर्सी व्यतिरिक्त कोणत्याही विशेष उपकरणांची आवश्यकता नाही.
- थ्रोबॉलसाठी नियमांचा पहिला संच वायएमसीएचे सदस्य हॅरी क्रो बक यांनी इ.स १९५५ मध्ये तयार केला होता.
- कर्नाटक मधील साबिया एस ही भारतातील सर्वोत्तम थ्रोबॉल खेळाडू म्हणून ओळखली जाते.
- भारतामध्ये हा खेळ सर्व प्रथम इ.स १९४० मध्ये चेन्नई या शहरामध्ये खेळला होता.
- थ्रोबॉल या खेळाच्या मैदानाला कोर्ट असे म्हणतात आणि हे कोर्ट २.२ मीटर बाय १८.३ मीटर इतके असते.
- थ्रोबॉल हा खेळ ऍथलेटिक खेळ आहे.
- या खेळामध्ये व्हॉलीबॉल सारख्या चेंडूचा वापर केला जातो.
आम्ही दिलेल्या throw ball game information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर थ्रोबॉल खेळाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या throw ball information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि throw ball game history in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये throw ball game rules in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट