टोमॅटो माहिती मराठी Tomato Crop Information in Marathi

tomato crop information in marathi टोमॅटो माहिती मराठी, लोक आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या अनेक प्रकारच्या भाज्यांचा समावेश हा आपल्या आहारामध्ये करून घेत असतात आणि तसेच टोमॅटो या फळभाजीचा देखील मोठ्या प्रमाणात आहारामध्ये वापर केला जातो त्यामुळे टोमॅटो या फळभाजीची लागवड भारतामध्ये आणि इतर काही देशांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणूनच आज आपण या लेखामध्ये टोमॅटो या फळभाजीविषयी थोडीसी माहिती, त्याचे शेती कशी करायची, ते लावायचे कसे, झाडांची काळजी कशी घ्यायची आणि एकुनता याची लागवड आणि चांगल्या प्रकारे पिक कसे घ्यायचे या विषयी माहिती घेवूया.

टोमॅटो हि एक प्रकारची फळ भाजी आहे जी अनेक पदार्थ बनवण्यासाठी वापरली जाते तसेच त्यामध्ये अनेक असे आरोग्यविषयक गुणधर्म देखील आहेत ज्यामुळे बाजारात या खूप मागणी असते त्यामुळे अनेक देशांच्या मध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आणि जातीचे टोमॅटोचे पिक घेतले जाते आणि टोमॅटोच्या एकूण ९००० ते १०००० प्रकार आहेत.

tomato crop information in marathi
tomato crop information in marathi

टोमॅटो माहिती मराठी – Tomato Crop Information in Marathi

टोमॅटो वनस्पतीचे वैज्ञानिक नाव आणि भारतामध्ये पिक घेण्याची सुरुवात

टोमॅटोचे वैज्ञानीक नाव ‘सोलॅनम लायकोपार्सिकम’ असे आहे. हि वनस्पती मुळात दक्षिण अमेरिकेतील असून भारतामध्ये १९ व्या शतकापासून टोमॅटोचे पिक घेण्यास सुरुवात झाली.

टोमॅटोची रोपे कशी तयार केली जातात ?

जरी टोमॅटोची लावण करताना त्याची रोपटी लावली जात असली तरी ती रोपटी सेंद्रिय खात वापरून तयार केलेल्या मातीमध्ये टोमॅटोच्या बिया पेरून तयार केलेली असतात.

  • टोमॅटोची रोपे तयार करत असताना पेरणीच्यापूर्वी २५ ते ३० दिवसा सोलारीकरण करून घेणे आवश्यक असते.
  • त्यानंतर ८५ ते ९० सेंटी मीटर उंचीचा एक मातीचा बेड शेतामध्ये तयार केला जातो.
  • तसेच त्या बेडवर सेंद्रिय खत किंवा शेणखत याचा वापर केला जातो आणि तसेच पाण्याने तो बेड किंवा माती थोडी मऊ केली जाते आणि मग त्यावर टोमॅटोच्या बिया पेरल्या जातात.
  • त्या बियांना रोज पंपाने किंवा छोट्याश्या कॅनने पाणी मारले जाते जेणेकरून बियांना पुरेसे पाणी मिळेल.
  • पिकांचे किंवा रोपांचे संरक्षण करण्यासाठी रोपवाटिकाचे बेड नायलॉन जाळीने झाकून घ्यावे.
  • त्याचबरोबर लावणीनंतर १० दिवसांनी अन्नद्रव्यसह ( लिहोसिना, मेटालॅक्झी ) फवारणी करावी.
  • बिया पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी त्याची रोपे तयार होतात आणि ती लावणीसाठी तयार असतात.

टोमॅटोची लागवड केंव्हा केली जाते ?

टोमॅटोची लागवड हि क्षेत्रानुसार किंवा जमिनीच्या प्रकारानुसार बदलते म्हणजेच जर डोंगराळ भाग असेल तर त्या भागामध्ये मार्च महिन्यामध्ये या पिकाची लागवड केली जाते आणि इतर भागामध्ये म्हणजे लाल मातीची शेते आणि काळ्या मातीच्या शेतांच्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये केली जाते. 

टोमॅटोच्या चांगल्या पिकासाठी काही टिप्स – tips

  • टोमॅटो हे पिक उष्ण हंगामातील एक पिक आहे आणि ह्या पिकाची लावण हि उष्ण हंगामाच्या सुरुवातीस केली तर उत्तम ठरते आणि या पिकाला २५ ते ३० से तपानाची गरज असते त्यामुळे हे पिक उन्हाळी पिक आहे.
  • कोणत्याही रोपट्याला पुरेसे पाणी पुरवणे हे महत्वाचे असते आणि तसेच टोमॅटोच्या रोपट्यांना देखील आवश्यक तेवढे पाणी देणे गरजेचे असते आणि उन्हाळ्यामध्ये या रोपट्यांना कमी कमी ४ ते ५ दिवसांनी पुरेसे पाणी द्यावे आणि हिवाळ्यामध्ये टोमॅटोच्या झाडांना १० ते ११ दिवसांनी पाणी देणे गरजेचे असते.
  • कोणत्याही प्रकारच्या झाडाची लागवड करत असताना त्या संबधित जमिनीची मशागत करून जमीन बुसबुशीत करून घेतली जाते म्हणजे माती मऊ बनवून घेतली जाते आणि तसेच टोमॅटो झाडांची लावण करण्याअगोदर देखील जमिनीची मशागत करू घ्यावी आणि शेणखत वापरावे त्यामुळे तुमचे पिक चांगले येण्यास मदत होते.
  • टोमॅटोची शेती हि काळी माती, चिकनमाती आणि पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होणाऱ्या शेतामध्ये केली जाते.
  • टोमॅटोच्या चांगल्या वाधीसातही मातीचा पीएच ( PH ) हा ७ ते ९ इतका असणे आवश्यक असते.
  • माती आणि जमिनीची मशागत करणे किंवा तयार करणे हे एक उत्तम व्यवस्थापन आहे त्यामुळे पिक चांगले येण्यासाठी मदत होते.
  • टोमॅटोची कापणी करण्यासाठी हातांचा वापर केला जातो म्हणजेच ते हाताने तोडले जाते आणि फांद्यांच्यापासून वेगळे केले जाते.
  • त्याचबरोबर हाताने तोडण्याऐवजी टोमॅटो काढणीसाठी टोमॅटो हार्वेस्टर मशीनचा वापर केला जातो.
  • टोमॅटोच्या चांगल्या प्रकारच्या पिकांच्यासाठी आणि जास्त प्रमाणात पिकांच्यासाठी योग्य प्रकारची आणि योग्य वेळी खते आणि टॉनिक्स देणे आवश्यक असते.

टोमॅटोची लागवड किंवा शेती करण्याची पध्दत – method

  • जर एखादा शेतकरी टोमॅटोची लागवड किंवा शेती करत असताना प्रथम तुम्ही टोमॅटोच्या जात निवडून घ्या आणि तो रोपे आणा.
  • आता लावण करण्याअगोदर जमिनीची मशागत करणे देखील महत्वाचे असते आणि त्यानंतर जमिनीसाठी शेणखत पुरवले जाते आणि सरी पाडून घेतली जाते.
  • जमिनीपासून सरीची उंची ३० सेती मीटर इतकी असावी.
  • रोपांची लावण करत असताना ६० सेंटी मीटर अंतरावर रोपांची लावण करणे आवश्यक असते.

टोमॅटोच्या काही सामान्य जाती – types

काही टोमॅटोचे प्रकार असे आहेत जे सामान्यपणे अनेक ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात वापरले जातात आणि त्या प्रकाराविषयी खाली आपण थोडीसी माहिती पाहणार आहोत.

मनी मेकर

मनी मेकर हा टोमॅटो खूप प्राचीन काळापासून पिकवला जाणारा टोमॅटो आहे पण आता त्याचे पिकाचे प्रमाण कमी आले आहे. या टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात पिक घेता येते म्हणून या टोमॅटोला मनी मेकर टोमॅटो असे म्हणतात.

चेरी टोमॅटो

चेरी टोमॅटो हे आकाराने लहान असतात इतके लहान कि ते आपण एका वेळी तोंडात टाकू  शकतो. हे टोमॅटो इतके रसदार असतात कि तोंडामध्ये टाकताच त्याचा रास बाहेर येतो. या टोमॅटो उपयोग शक्यतो सलाड बनवण्यासाठी किवा कबाब बनवण्यासाठी होतो.

बेटर बॉय

बेटर बॉय टोमॅटो हा एक संकरीत जातीचा टोमॅटो आहे हा टोमॅटो मऊ आणि आकाराने मोठा असतो ज्याचे आपण स्लायसेस करू शकतो.  अमेरिकेमध्ये या टोमॅटोचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

आम्ही दिलेल्या tomato crop information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर टोमॅटो माहिती मराठी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या Tomato crop information in marathi wikipedia या Tomato crop information in marathi pdf download article मध्ये update करू, मित्रांनो हि information about tomato in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये tomato meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!