Tomato information in Marathi टोमॅटो हि एक फळ भाजी आहे हे आपल्या सर्वाना माहित आहेच आणि भारतीय स्वयंपाक पद्धती मध्ये टोमॅटोला महत्वाचे स्थान आहे,tomato in marathi टोमॅटोचा उपयोग स्वयंपाक घरामध्ये भाजी बनवण्यासाठी, सूप बनवण्यासाठी तसेच चटणी किवा कोशिंबीर बनवण्यासाठी केला जातो. त्याच बरोबर टोमॅटो काही औषधी फायदेही आहेत टोमॅटोमध्ये पौटैशियम आणि विटामिन सी, विटामिन असते जे आपल्या शरीराला खूप उपयोगी असते तसेच टोमॅटो मध्ये सायट्रिक अॅसिड आणि मैलिक अॅसिड हि असते.
(tomato lagwad) टोमॅटो पासून प्रोसेस्ड उत्पादने हि बनवली जातात ती म्हणजे केचअप, कॅन्ड टोमॅटो , सन ड्राईड टोमॅटो, प्युरे आणि पेस्ट. टोमॅटोचे वैज्ञानीक नाव ‘सोलॅनम लायकोपार्सिकम’ असे आहे हि वनस्पती मुळात दक्षिण अमेरिकेतील असून भारतामध्ये १९ व्या शतकापासून टोमॅटोचे पिक घेण्यास सुरुवात झाली.
टोमॅटो मधील पौष्टिक सत्व (tomato nutritional value)(Tomato information in Marathi)
टोमॅटोमध्ये बरेचसे गुणकारी सत्व असतात आणि यामधील काही पौष्टिक सत्व खाली दिलेले आहेत.
पोषक घटक | प्रमाण १०० ग्रॅम |
विटामिन ए | ८३३ आय यु |
विटामिन सी | १३.७ मिली ग्रॅम |
विटामिन के | ७.९ µg |
विटामिन ई | ०.५३ मिली ग्रॅम |
फोलट | १५ µg |
फायबर | १.२ ग्रॅम |
प्रोटीन | ०.८८ गरम |
कॅलरी | १८ कॅलरी |
पोटॅशियम | २३७ मिली ग्रॅम |
कॅल्शियम | १० मिली ग्रॅम |
शुगर | २.६ ग्रॅम |
टोमॅटोचे प्रकार (types of tomato)
टोमॅटो हि एक अशी फळभाजी आहे ज्यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुण आहेत जसे कि लाइकोपीन, बीटा कॅरोटीन, विटामिन ई, फोलेट, विटामिन सी, विटामिन ए, विटामिन के आणि पौटैशियम असते. टोमॅटोचे ९००० ते १०००० प्रकार आहेत. टोमॅटोचे काही प्रकार खाली दिलेले आहेत.
चेरी टोमॅटो ( cherry tomato information in Marathi )
चेरी टोमॅटो हे आकाराने लहान असतात इतके लहान कि ते आपण एका वेळी तोंडात टाकू शकतो. हे टोमॅटो इतके रसदार असतात कि तोंडामध्ये टाकताच त्याचा रास बाहेर येतो. या टोमॅटो उपयोग शक्यतो सलाड बनवण्यासाठी किवा कबाब बनवण्यासाठी होतो तसेच या टोमॅटो मध्ये कित्येक विटामिन आणि मिनरल्स असतात.
रोमा टोमॅटो ( roma tomato )
रोमा टोमॅटोला रोमास मनुका टोमॅटो या नावानेही ओळखले जातात. हे टोमॅटो चेरी टोमॅटो पेक्षा थोडे मोठे असतात पण याच्या स्लायसेस होत नाहीत. हे टोमॅटो गोड आणि रसाळ असतात आणि याचा वापर सॉस किवा कॅनिंग बनवण्यासाठी होते. या टोमॅटो मध्ये १ ग्रॅम फायबर असते.
हेरलूम टोमॅटो ( heirloom tomato )
हेरलूम टोमॅटोचे रंग लक्षणीय असतात या टोमॅटोचे रंग फिकट गुलाबी पिवळ्या ते हिरव्यापासून खोल जांभळ्या-लाल रंगामध्ये असते. या टोमॅटोची चव गोड असते आणि हे सॉस किवा कॅनिंग बनवण्यासाठी वापरले जातात. या टोमॅटोमध्ये बीटा कॅरोटीन, अँटीऑक्सिडेंट, विटामिन सारखे सत्व असतात.
बेटर बॉय ( better boy tomato information in Marathi)
बेटर बॉय टोमॅटो हा एक संकरीत जातीचा टोमॅटो आहे हा टोमॅटो मऊ आणि आकाराने मोठा असतो ज्याचे आपण स्लायसेस करू शकतो. अमेरिकेमध्ये या टोमॅटोचे पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते आणि या टोमॅटोला अमेरिकन बाजारात खूप मागणी आहे.
मनी मेकर ( money maker tomato )
मनी मेकर हा टोमॅटो खूप प्राचीन काळापासून पिकवला जाणारा टोमॅटो आहे पण आता त्याचे पिकाचे प्रमाण कमी आले आहे. या टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात पिक घेता येते म्हणून या टोमॅटोला मनी मेकर टोमॅटो असे म्हणतात. या टोमॅटोचा रंग गडद लाल आहे आणि याची चव गोड असते.
प्लम टोमॅटो ( plum tomato information in Marathi )
प्लम टोमॅटोला प्रोसेस्ड किवा पेस्ट टोमॅटो या नावांनीही हि ओळखले जाते. या प्रकारचे टोमॅटो सॉस बनवण्यासाठी वापरले जातात. हे टोमॅटो आकाराने लांब आणि दिसायला प्लम सारखे असतात म्हणून या टोमॅटोला प्लम टोमॅटो म्हणतात.
टोमॅटो चे फायदे (benefits of tomato)
टोमॅटोचा उपयोग फक्त स्वयंपाक घरात सूप, भाजी किवा सलाड बनवण्यासाठीच होत नसून टोमॅटोचे अनेक फायदे आहेत. टोमॅटोमध्ये विटामिन सी आणि विटामिन ए असल्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे. टोमॅटोचा उपयोग त्वचेसाठी, चेहर्यासाठी, केसांसाठी आणि अश्या अनेक कारणासाठी होत असतो. टोमॅटोचे काही फायदे खाली दिलेले आहेत.
रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी
टोमॅटो हे रोग प्रतिकारशक्ती वर्धक आहे टोमॅटोच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, बीटा-कॅरोटीनचे आणि लाईकोपीन असते जे आपल्या शरीरामधील रोगप्रतिकार शक्ती सुधारण्यास मदत करतात. टोमॅटो खाल्ल्याने सर्दी होण्यापासून हि टाळता येते.
हाडे मजबूत करण्यासाठी
टोमॅटोचा उपयोग हाडे आणि दात मह्बूत करण्यासाठी होतो. टोमॅटोमध्ये विटामिन के असते आणि हे हाडे मजबूत करण्यासाठी मदत करते.
वजन कमी करण्यासाठी
टोमॅटोमध्ये फायबर चे प्रमाण असल्यामुळे आपण जर रोज टोमॅटोचे सेवन केले तर वजन कमी होण्यास मदत होते. जर आपण टोमॅटोचा ज्यूस करून रोज सेवन केला तर वजन कमी होते.
दात मजबूत करण्यासाठी
टोमॅटो हि फळभाजी अनेक औषधी गुणांनी भरलेले आहे. टोमॅटो मध्ये कॅल्शियम चे प्रमाण असते. टोमॅटो मध्ये कॅल्शियम असल्यामुळे दात मजबूत बनतात.
गरोदरपणात उपयुक्त
टोमॅटो मध्ये फोलेट बी-ग्रुप विटामिन असते जे फोलिक अॅसिड गर्भाशयातील गर्भास मज्जातंतुवेद्य दोषांपासून वाचविण्यास मदत करते तसेच हे पाठीचा कणा आणि मेंदुंच्या आजारावरही गुणकारी आहे.
टोमॅटोचा उपयोग आपली त्वचा चमकदार, गुळगुळीत आणि मऊ बनवण्यासाठी केला जातो. टोमॅटोमध्ये लाइकोपीन आणि बीटा कॅरोटीन असते जे त्वचेचे नुकसान होण्यापासून वाचवते आणि त्वचा मऊ बनवते.
हृदयाच ठोके आणि गती नियंत्रित होते
टोमॅटो मध्ये लाइकोपीन, पोटॅशियम, विटामिन ई, विटामिन सी आणि बीटा कॅरोटीन हे गुण असतात जे कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब रोखण्यास मदत करते आणि कोलेस्टेरॉल आणि रक्तदाब नियंत्रित केल्यास हृदयरोगाचा धोका कमी होतो.
रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी
टोमॅटोच्या अर्कमध्ये लाइकोपीन, बीटा कॅरोटीन आणि विटामिन ई सारख्या बर्याच कॅरोटीनोइड असतात आणि हे सर्व पोषक घटक उच्च रक्तदाब उपचारासाठी उपयुक्त आहेत. लाइकोपीन आणि बीटा कॅरोटीन हे प्रभावी अँटिऑक्सिडेंट म्हणूनही कार्य करते.
टोमॅटो बद्दलची गमतीदार तथ्ये (facts about tomato in marathi)
- जगभरामध्ये टोमॅटोचे कमीत कमी १०००० प्रकार आहेत.
- प्रारंभी टोमॅटोचे झाड विषारी मानले जायचे त्यामुळे टोमॅटो खाण्यास लोक घाबरायचे.
- दरवर्षी स्पेन मध्ये ‘ला टोमातीना’ नावाचा एक उत्सव असतो ज्यामध्ये टोमॅटो खाल्ले जात नाहीत तर एकमेकांच्या अंगावर टाकले जातात.
- शिजलेल्या टोमॅटो मध्ये जास्त प्रमाणात lycopene असते.
- टोमॅटो हा फक्त लाल रंगाचाच नसतो तर टोमॅटो जांभळा, गुलाबी, पिवळा आणि पांढऱ्या रंगाचेही असतात.
- टोमॅटो हि न्यू जर्शीची राज्य भाजी आहे.
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर टोमॅटो या फळ भाजी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या tomato information in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि tomato crop information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर tomato in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट