मालमत्ता हस्तांतर कायदा माहिती Transfer of Property Act in Marathi

transfer of property act in marathi मालमत्ता हस्तांतर कायदा माहिती, आज आपण या लेखामध्ये मालमत्ता हस्तांतर कायदा (transfer of property act) या विषयी म्हणजेच हा कायदा कायदा काय आहे आणि तो कशा प्रकारे काम करतो या बद्दल माहिती घेणार आहोत. मालमत्ता हस्तांतर कायदा हा १८८२ मध्ये मालमत्ता हस्तांतर करण्यासाठी काही नियम घालून देण्यासाठी हा कायदा भारतामध्ये लागू झाला होता. मालमत्ता हस्तांतरण म्हणजे एखाधी व्यक्ती आपली मालमत्ता दुसऱ्या व्यक्तीकडे सोपवते त्याला मालमत्ता  हस्तांतरण म्हणतात आणि हे करताना अनेक नियम आणि कायद्याचे पालन  करावे लागते.

हा कायदा १७ फेब्रुवारी १८८२ मध्ये मंजूर केला आणि मग १ जुलै १८८२ मध्ये हा कायदा लागू करण्यात आला आणि हा कायदा १८८२ मध्ये लागू केला आहे म्हणून ह्या कायद्याला मालमत्ता हस्तांतर कायदा १८८२ म्हणून देखील ओळखले जाते. सामान्यता मालमत्तेचे हस्तांतरण हे दोन प्रकारे केले जावू शकते ते म्हणजे दोन किंवा अधिक पक्षाच्या कृतीद्वारे किंवा मग कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे केले जावू शकते.

मालमत्ता हस्तांतरण कायद्याच्या कलम ७ मध्ये एखाद्याच्या मालमत्तेच्या हस्तांतरणासाठी पात्रतेच्या निकषाबाबत नियम दिले आहेत आणि या कायद्याच्या नियमानुसार मालमत्ता हस्तांतरण करार करण्यास सक्षम असलेली व्यक्ती मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी पात्र असते. चला तर आता आपण मालमत्ता हस्तांतरण कायदा या विषयी आणखीन माहिती खाली घेवूया.

transfer of property act in marathi
transfer of property act in marathi

मालमत्ता हस्तांतर कायदा माहिती – Transfer of Property Act in Marathi

कायद्याचे नावमालमत्ता हस्तांतर कायदा (transfer of property act)
केंव्हा मंजूर झाला१७ फेब्रुवारी १८८२
केंव्हा लागू केला१ जुलै १८८२
उद्देशमालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी नियम घालणे.

मालमत्ता हस्तांतरण कायदा म्हणजे काय ?

मालमत्ता हस्तांतरण कायदा हा १ जुलै १८८२ मध्ये संपूर्ण भारतामध्ये लागू झाला आणि ह्या कायद्यामध्ये एकूण १३७ कलमे आहेत. या कायद्याचा मुख्य उद्देश हा मालमत्ता हस्तांतरण करण्यासाठी काही नियम घालून देणे.

कायद्यानुसार मालमत्ता हस्तांतरण म्हणजे काय ?

मालमत्ता हस्तांतरण म्हणजे टर्म मध्ये विक्री करणे. भाडेपट्टी, गहाण, कारवाई योग्या दावा देवाणघेवाण द्वारे हस्तांतरण हे या कायद्यामध्ये समाविष्ट आहे. कायद्याच्या अंमलबजावणीद्वारे जप्ती, वारसा, दिवाळखोरी किंवा अंमलबजावणीद्वारे विक्रीच्या स्वरुपात कोणतीही हस्तांतरे या कायद्यामध्ये समाविष्ट नाहीत.

मालमत्ता हस्तांतरण पध्दती कोणकोणत्या आहेत ?

देवाना घेवाण, मालमत्ता विक्री, भाडेपट्टी, कारवाई योग्य दावा तयार करून किंवा गहाण अश्या प्रकारे मालमत्ता हस्तांतरण केली जावू शकते.

मालमत्ता हस्तांतरण कायदा विषयी मुख्य घटक

आता आपण मालमत्ता हस्तांतरण कायद्याविषयी काही महत्वाचे घटक कोणकोणते आहेत ते पाहणार आहोत.

  • कोणत्याही मालमत्तेचे हस्तांतरण करण्यासाठी मालमत्ता हि हस्तांतरनिय असावी.
  • मालमत्ता हस्तांतरणीय होण्यासाठी या कायद्यामध्ये दिलेल्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे. अट कायद्याने अनैतिक, अशक्य किंवा सार्वजनिक धोरणास विरोध झाल्यास हस्तांतरण निरर्थक मानले जाते.
  • मालमत्तेचे हस्तांतरण हे एखाद्या व्यक्तीच्या जीवनकाळामध्ये होणे अवश्यक असते आणि हस्तांतरण दरम्यान शास्वत नियमांचे पालन केले जावू नये.
  • मालमत्तेचे हस्तांतरण हे लिखित किंवा तोंडी कराराद्वारे केले जावू शकते. ज्या वेळी लिखित करार आवश्यक आहे त्यावेळी लिखित करार आणि तोंडी करारावर हस्तांतरण होत असल्यास तोंडी करार.
  • मालमत्तेचे हस्तांतरण हे सक्षम व्यक्तीने केले पाहिजे म्हणजे ती व्यक्ती मनाने आणि शरीराने सदृढ असावी.

मालमत्ता हस्तांतरण करताना विक्रेता आणि खरेदीदाराच्या जबाबदाऱ्या

विक्रेत्याच्या जबाबदाऱ्या 

  • कोणत्याही मालमत्ते मध्ये काही भौतिक दोष असल्यास विक्रेत्याच्या त्या मालमत्ते संबधित सर्व माहिती हि खरेदीदारास उघड आणि काहीही न लपवता सांगितली पाहिजे.
  • विक्रेत्याने मालमत्ता हस्तांतरण केल्यानंतर त्या वेळी अस्तित्वात असलेल्या मालमत्तेवरील सर्व हक्क किंवा भार हे सोडले पाहिजेत.
  • जो व्यक्ती मालमत्ता खरेदी करणार आहे त्याने विनंती केल्यावर विक्रेत्याने मालमत्ते संबधित शीर्षकाची सर्व कागदपत्रे उघड करणे किंवा सदर करणे आवश्यक आहे.
  • कोणत्याही विक्रेत्याने विक्रीच्या तारखेच्या पर्यंत मालमत्तेच्या संबधित जमा केलेले भाडे आणि सर्व सार्वजनिक शुल्क न चुकता भरणे आवश्यक आहे.
  • मालमत्तेची विक्री आणि वितरणाच्या कराराच्या तारखेच्या दरम्यान, विक्रेत्याने मालमत्तेची आणि त्याच्या ताब्यातील सर्व संबधित कागदपत्रांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली पाहिजे.
  • विक्रेत्याने त्याच्या माहिती नुसार शीर्षक किंवा मालमत्तेच्या संदर्भात खरेदीदाराने मांडलेल्या सर्व संबधित प्रश्नाची उत्तरे देणे आवश्यक असते.
  • मालमत्ता हस्तांतरण झाल्यानंतर विक्रेत्याने आपल्या मालमत्तेचा पूर्ण ताबा हा खरेदीदाराकडे दिला पाहिजे.

खरेदीदाराच्या जबाबदाऱ्या 

  • ज्यावेळी कोणत्याही मालमत्तेची किंवा तो खरेदी केलेल्या मालमत्तेची मालकी खरेदी दाराकडे हस्तांतरण केले जाते त्यावेळी खरेदीदाराने मालमत्ता विकल्या जाणाऱ्या कोणत्याही बोजा किंवा त्यावर जमा होणारे व्याज आणि मालमत्तेवर देय होऊ शकणारे भाडे आणि सर्व सार्वजनिक शुल्क यावर देय असलेला मुल निधी अदा करणे आवश्यक आहे.
  • खरेदीदाराने विक्री पूर्ण होण्याच्या ठिकाणी आणि वेळी विक्रेत्याला खरेदी किंमत अदा करणे आवश्यक असते.
  • जर खरेदीदाराला मालमत्ते बद्दल काही तथ्य माहित असेल ज्या बद्दल विक्रेत्याला माहित नाही तर खेरेदिदाराने हि माहिती विक्रेत्याकडे उघड करणे गरजेचे असते.
  • जेंव्हा मालमत्तेची मालकी खरेदी दाराकडे हस्तांतरित केली जाते त्यावेळी खरेदीदाराने नाश किंवा मालमत्तेचे मूल्य कमी झाल्यामुळे होणारे कोणतेही नुकसान हे आपण सहन केले पाहिजे कारण एकदा संपत्ती हस्तांतरित झाली कि विक्रेत्याचा त्या मालमत्तेशी काही संबध नसतो.

आम्ही दिलेल्या transfer of property act in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर मालमत्ता हस्तांतर कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या transfer of property act pdf in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि transfer of property act 1882 in marathi pdf माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!