Vijay amritraj information in marathi टेनिसपटू विजय अमृतराज माहिती मराठी, टेनिस या खेळाविषयी आपल्या सर्वांना माहित आहेच कारण टेनिस हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि विजय अमृतराज यांचे नाव या खेळाशी जोडले आहे. कारण हे त्यांच्या काळातील एक खूप लोकप्रिय टेनिस खेळाडू आहेत, जे आज देखील एक चांगले टेनिसपटू म्हणून ओळखले जातात आणि आज आपण या लेखामध्ये विजय अम्रितराज यांचे वैयक्तीक आयुष्य, त्यांची खेळाची सुरुवात कशी झाली आणि त्यांनी या खेळामध्ये कशी कामगिरी केली.
या विषयी खाली आपण सविस्तर आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत. विजय अमृतराज हे जागतिक टेनिस खेळामधील एक लोकप्रिया खेळाडू होते आणि त्यांनी भारतीय टेनिस टीमचे जागतिक पातळीवर प्रतिनिधित्व केले होते आणि त्यांना जगातील प्रसिध्द खेळ व्यक्तीमधील एक मानले जाते. चला तर खाली आपण विजय अमृतराज यांच्या विषयी संपूर्ण माहिती घेवूया.
टेनिसपटू विजय अमृतराज – Vijay Amritraj Information in Marathi
नाव | विजय अमृतराज |
जन्म | १४ डिसेंबर १९५३ |
जन्मठिकाण | भारतातीत तामिळनाडू या राज्यातील चेन्नई शहर |
वडिलांचे नाव | रॉबर्ट अम्रितराज |
ओळख | टेनिसपटू किंवा टेनिस खेळाडू |
विजय अमृतराज यांचे प्रारंभिक जीवन – early life
विजय अमृतराज हे टेनिस खेळाडू आहेत याची आपल्याला वर ओळख झालीच आहे आणि खाली आपण त्यांचे वैयक्तिक माहिती आणि त्यांचे प्रारंभिक जीवन कसे होते या विषयी माहिती घेणार आहोत.
विजय अमृतराज यांचा जन्म भारतातीत तामिळनाडू या राज्यातील एक मोठे शहर आणि या राज्याची राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या चेन्नई या शहरामध्ये १४ डिसेंबर १९५३ मध्ये झाला. विजय अम्रितराज यांच्या वडिलांचे नाव रॉबर्ट अमृतराज असे होते आणि ते देखील टेनिसपटू आणि प्रशिक्षक या दोन्हीहि भूमिका बजावत होते.
आणि त्यामुळे विजय अमृतराज यांची टेनिस खेळामधील पार्श्वभूमी असल्यामुळे त्यांना टेनिस या खेळाची आवड लहानपणी पासूनच होती आणि त्यामुळे या खेळाविषयी माहिती देखील त्यांना लहानपणीपासूनच मिळाली त्यामुळे ते पुढे खेळामध्ये निपुण बनले आणि त्यांनी टेनिस क्षेत्रामध्ये भारताचे नाव उंचावले.
एवढेच नाहीत तर विजय अम्रितराज यांचे मोठे भाऊ म्हणजेच आनंद अमृतराज आणि अशोक अमृतराज हे देखील टेनिसपटू होते त्यामुळे त्यांना त्यांच्या मोठ्या भावांचे देखील मार्गदर्शन आणि साथ लाभली. त्यांचा जन्म चेन्नई या शहरामध्ये झाला.
असल्यामुळे त्यांनी त्यांचे प्राथमिक आणि उच्च शिक्षण याच शहरामध्ये पूर्ण केले त्याचबरोबर त्यांनी टेनिस खेळाचे देखील प्रशिक्षण घेऊन त्यांनी या खेळामध्ये देखील प्राविण्य मिळवले ई अनेक वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये खखेळण्यास सुरुवात केली.
विजय अमृतराज यांनी टेनिस मधील कामगिरी – career
- विजय अमृतराज यांनी त्यांच्या व्यावसायिक खेळाची सुरुवात हि १९७० पासून केली आणि त्यांनी १९७० मध्ये प्रथम ग्रँड प्रिक्स स्पर्धा खेळली आणि नंतर त्यांनी पुढे १९७३ मध्ये दोन ग्रँड प्रिक्सस्पर्धा खेळल्या आणि उपांत्यफेरीमध्ये पोहचले आणि हे त्यांचे पहिले एकेरी स्पर्धेमधील यश होते.
- ज्यावेळी १९७४ मध्ये अमेरिकेची ओपन स्पर्धा सुरु होती त्यावेळी त्यामध्ये त्यांनी सहभाग घेऊन दुसऱ्या फेरीच्यावेळी ब्योर्न बोर्गचा पराभव केला होता त्याचबरोबर १९८७ मध्ये विम्बल्डन या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये देखील अशीच कामगिरी केली होती.
- विजय अमृतराज हे १९८० च्या काळामध्ये एकेरी स्पर्धेच्या रँकिंगमध्ये जगामधील खेळाडूंच्यामध्ये १६ व्या क्रमांकावर होते आणि पुढे ते दुहेरी स्पर्धेमध्ये १९८२ मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहचले होते.
- १९८४ मध्ये विजय अमृतराज यांनी जॉन मॅक्रेनोला पराभूत केले आणि ते मास्टर्सच्या पहिल्या फेरीत पोहचेले आणि पुढे त्यांनी सगळ्या सामन्यांच्यामध्ये यश मिळवले आणि विजयी झाले.
- त्यांनी चांगल्या प्रकारे टेनिसमध्ये कामगिरी करून त्यांना भारतामध्ये टेनिस स्टार म्हणून ओळख मिळाली.
विजय अमृतराज यांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts
- विजय अमृतराज हे एटीपी (ATP) टूरवर व्यावसायिक बनवणारा हे पहिले भारतीय खेळाडू होते.
- त्यांनी टेनिस या खेळामधून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी २०६ मध्ये अम्रितराज फाऊंडेशन स्थापन केले आणि या फाऊंडेशन मार्फत त्यांनी समाज सेवा केली म्हणजेच त्यांनी भारतातीत परिस्थितीमुळे असुरक्षित असणाऱ्या आणि रोगामुळे असुरक्षित असणाऱ्या लोकांना या फाऊंडेशनच्या मार्फत मदत केली.
- अनेक लाखो टेनिस चाहत्यांच्यासाठी आणि खेळाडूंच्यासाठी विजय अम्रितराज हे एक प्रेरणास्थान आहेत.
- त्यांनी त्यांच्या टेनिस खेळाच्या कारकिर्दीमध्ये आशियाई एकेरी स्पर्धेमध्ये १५ पेक्षा अधिक किंवा सर्वाधिक विजेतेपद जिंकले होते.
- विजय अमृतराज यांच्या विषयी एक मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांनी जेम्स बाँडच्या ऑक्टोपसिटी या मुव्हीमध्ये काम केले आहे.
विजय अमृतराज यांना मिळालेले पुरस्कार – awards
- विजय अमृतराज हे एक सुप्रसिध्द टेनिसपटू आहेत आणि त्यांच्या या क्षेत्रातील दीर्घकाळा अश्या दिलेल्या चांगल्या योगदानासाठी त्यांना २०२१ या वर्षी गोल्डन पुरस्कार (golden award) देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि हा अंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या वतीने त्यांना देण्यात आला आहे.
- विजय अमृतराज यांना त्यांच्या टेनिस मधील चांगल्या कामगिरीसाठी अर्जुन लॉन टेनिस पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
- १९८३ मध्ये विजय अमृतराज यांना भारत सरकारने पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केले होते आणि पदमश्री हा भारतातील ४ सर्वोच्च नागरी सन्मान आहे जो विजय अमृतराज यांना देण्यात आला.
- आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम आणि अंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाद्वारे देखील त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
आम्ही दिलेल्या vijay amritraj information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर टेनिसपटू विजय अमृतराज माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या vijay amritraj tennis information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि information about vijay amritraj in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट