गोदाम म्हणजे काय ? Warehouse Information in Marathi

warehouse information in marathi – warehouse meaning in marathi गोदाम म्हणजे काय?, आज आपण या लेखामध्ये वेअरहाऊस (warehouse) विषयी माहिती घेणार आहोत ज्याला मराठीमध्ये गोदाम, कोठार किंवा वखार या नावाने देखील ओळखले. कोठार, गोदाम किंवा वखार हि उत्पादनांच्या किंवा वस्तूंच्या साठवणीची एक सुरक्षित जागा असते आणि गोदामांचा वापर हा वेगवेगळ्या वस्तूंचे, अन्न पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या सर्व कंपन्या वापरतात ज्यामध्ये कच्चा माला साठवला जातो.

किंवा संपूर्णपणे उत्पादित झालेला माल साठवला जातो आणि बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी झाल्यानंतर तो बाजारामध्ये विकला जातो. चला तर खाली आपण वेअरहाऊस म्हणजेच गोदाम विषयी सविस्तर आणि संपुर्ण माहिती घेवूया.

warehouse information in marathi
warehouse information in marathi

गोदाम म्हणजे काय – Warehouse Information in Marathi

गोदाम, कोठार किंवा वखार म्हणजे काय – godown meaning in marathi

गोदाम हे वर सांगितल्याप्रमाणे एक वस्तूचे, मालाचे किंवा उत्पादनांच्या साठवणुकीचे एक ठिकाण आहे जे चार मजबूत भिंतीनी आणि सुरक्षित छत्तांनी सुरक्षित असते ज्यामुळे पावसामुळे, थंड वाऱ्यामुळे किंवा उन्हामुळे उत्पादनांचे नुकसान होणार नाही. गोदाम हे घाऊक विक्रेते, वस्तूंची किंवा उत्पादनांची आयात निर्यात करणाऱ्या कंपन्या, उत्पादन विक्रेते यांना गोदामांची खूप गरज असते.

गोदामांचे महत्व – importance of warehouse in marathi

  • गोदामानाचे सर्वात मुख्य महत्व म्हणजे कोणत्याही प्रकारची कंपनी त्यांचे उत्पादन हे त्या ठिकाणी साठवून ठेऊ शकते.
  • ज्यावेळी बाजारामध्ये एखाद्या वस्तूचा तुटवडा भासत असेल त्यावेळी एखाद्या कंपनीने ती वस्तू गोदामामध्ये साठवून ठेवली असेल तर त्याचा फायदा घेवून ते चांगल्या दरामध्ये ती वस्तू बाजारामध्ये उपलब्ध करून देऊ शकतात आणि त्यामुळे कंपनीच्या आर्थिक नफ्यामध्ये चांगला परिणाम आपल्याला पाहायला मिळतो.
  • गोदामे हे असे ठिकाणे आहेत जी उत्पादकांना त्यांची उत्पादने योग्य वेळेला उत्पादने वितरीत करण्यासाठी परवानगी देतात.
  • गोदामांच्या मुळे उत्पादने सुरक्षित राहण्यास मदत करतात.
  • उत्पादने स्टॉकमध्ये राहतील याची खात्री करण्यासाठी मागणीत चढ उतार होत असताना इन्व्हेंटरी उपलब्ध ठेवणे हे गोदामांचे महत्व आहे.
  • जर एखाद्या कंपनीने गोदामांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादने साठवून ठेवली असतील आणि त्यावेळी त्यांना कोठूनही मोठ्या प्रमाणात ऑर्डर आली तर त्यावेळी ती कंपनी निश्चिंतपणे ती ऑर्डर पूर्ण करण्यासाठी सक्षम असते.
  • गोदामांच्यामुळे पैसा आणि वेळ दोन्हीही वाचवण्यासाठी मदत होते.

गोदामांचे फायदे – warehouse Benefits in marathi

  • त्या संबधित कंपनीची सर्व उत्पादने हि गोदामामध्ये ठेवल्यामुळे इंव्हेटरी मॅनेजमेंट वाढण्यासाठी मदत होते.
  • गोदामे हि आपल्या मालासाठी केंद्रीकृत स्थान म्हणून काम करतात आणि त्यामुळे तुम्ही तुमची उत्पादने त्या ठिकाणी साठवून तेथून मालाची निर्यात बाजारामध्ये करू शकता म्हणून त्याला केंद्रीकृत स्थान म्हटले आहे.
  • उत्पादन गोदामांच्यामध्ये साठवून ठेवल्यामुळे तुम्ही उत्तम ऑर्डर प्रक्रिया करू शकता आणि यामुळे उत्पादनांचे सुलभ वितरण देखील होण्यास मदत होते.
  • मोठ्या प्रमाणात उत्पादने साठवण्यासाठी मदत होते.
  • वस्तूंच्या साठवणुकीमुळे उत्तम आणि योग्य ग्राहक सेवा पुरवण्यासाठी मदत होते.

गोदामांचे घटक – elements

ज्यावेळी गोदामांची निर्मिती केली जाते त्यावेळी अनेक वेगवेगळ्या घटकांचा विचार करणे आवश्यक असते म्हणजेच गोदाम कसे असावे, त्याचा आकार कसा असावा, त्यामध्ये जागा किती असावी आणि ते कारखान्याजवळ असावे कि थोड्या अंतरावर असावे याचा विचार केला जातो.

चला तर आपण खाली आता गोदामांची निर्मिती करताना विचारात घेतले जाणारे घटक कोणकोणते आहेत ते पाहूया.

क्षमता नियोजन

जर एखादी कंपनी गोदामांची निर्मिती करत असेल तर त्या कंपनीने सर्वप्रथम त्या गोदामाचे क्षमता नियोजन म्हणजेच पुरेश्या जागेचे नियोजन करणे आवश्यक असते म्हणजेच वर्षामध्ये होणाऱ्या उत्पादनांची पडताळणी करून त्यांनी पुढे गोदामाची क्षमता नियोजन करून त्याची रचना केली पाहिजे.

गोदामांची क्षमता मोठ्या प्रमाणात असेल तर तुम्ही मोठ्या प्रमाणात उत्पादने त्या ठिकाणी साठवून ठेवू शकता.

हवामान नियंत्रण करणे

हवामान नियंत्रण करणे हे उत्पादनांच्या स्वरूपावर अवलंबून असू शकते म्हणजेच हे थंड उत्पादनांच्यासाठी किंवा डेअरी उत्पादनांच्यासाठी वेगळ्या स्वरूपाचे साठवणूक ठिकाणी किंवा गोदाम असते ज्यामध्ये उत्पादने थंड राहतात. ज्यावेळी एखादी कंपनी गोदामांची रचना करत असेल तर त्यांना वस्तूंच्या किंवा उत्पादनांच्या स्वरूपावर गोदामांची रचना करणे आवश्यक असते.

ठिकाण

ज्यावेळी एखादी कंपनी गोदामांची निर्मिती करण्याचा विचार करत असते त्यावेळी त्यांनी ठिकाणाचा विचार करणे आवश्यक असते म्हणजेच गोदामे कंपनी जवळ असली तर ते फायद्याचे ठरू शकते कारण यामुळे वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होते. या उलट गोदामे कारखान्यापासून लांब असतील तर कारखान्यातील उत्पादित झालेला माल हा गोदामांच्यामध्ये ठेवण्यासाठी वाहतूक खर्च करावा लागतो.

पुनर्रचना

पुढे कधीही त्याची गोदामाची पुनर्रचना करायची असल्यास त्याचा विचार देखील गोदामाची रचना करताना केला पाहिजे.

गोदामांची कार्ये – functions

गोदामे हि अनेक प्रकारे कार्ये करतात आणि ती कोणकोणती आहेत ते खाली आपण पाहूया

  • वस्तूंची किंवा उत्पादनांची साठवणूक करणे हे गोदामांचे मुख्य कार्य आहे.
  • कारखान्यामध्ये उत्पादित झालेल्या वस्तू किंवा उत्पादने हि गोदामांच्यामध्ये साठवली जातात आणि पुढे ती गोदामांच्यामधून काढून निर्यात केली जातात म्हणजेच वस्तूंची किंवा उत्पादनांची हालचाल हि गोदामांच्या मधून होते.
  • गोदामांच्यामुळे उत्पादित वस्तूंचे सुरक्षितपणे साठवणूक केली जाते आणि वस्तूंची सुरक्षा करणे हे देखील गोदामांचे महत्वाचे कार्य आहे.
  • गोदामामध्ये आलेल्या वस्तूंची आणि गोदामांच्या बाहेर गेलेल्या वस्तूंची माहिती ठेवणे हे देखील गोदामांचे महत्वाचे कार्य असते.
  • किमंत स्थिरीकरणामध्ये देखील गोदामांची महत्वाची कामगिरी असते.

आम्ही दिलेल्या warehouse information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर गोदाम म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या godown meaning in marathi या warehouse meaning in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि data warehouse meaning in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bonded warehouse meaning in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!