जागतिक आरोग्य संघटना माहिती World Health Organisation Information In Marathi

या लेखामध्ये आपण पाहणार आहोत world health organisation information in marathi language, नमस्कार मित्रांनो, जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच ‘ World Health Organisation’ याचे संक्षिप्त रूप WHO असल्यामुळे त्याला WHO असेच संबोधले जाते. २०१९ साली आलेल्या या कोरोनाच्या महामारी मूळे जागतिक आरोग्य संघटना हा अगदी सर्वांच्या परिचयाचा विषय बनला आहे. पण नेमकी ही संघटना कशी काम करते?याची स्थापना कधी झाली? ही कोणाच्या आधिपत्याखाली चालते? या संघटनेला पैसा कोण पुरवते? आपल्या भारताचे यामध्ये काय स्थान आहे? इत्यादी सारख्या प्रश्नांची उकल आपण या सदरात करून घेणार आहोत.

World-health-organisation-INFORAMTION-IN-MARATHI
जागतिक आरोग्य संघटना माहिती

संपूर्ण जगभर थैमान घातलेल्या या महाभयंकर रोगाने म्हणजेच कोरोनाने करोडो प्राण गिळंकृत केले. चीन मधून सुरू होऊन हळू हळू कोविड ची लाट जगभर पसरत चालली होती. वाटेत येणाऱ्या प्रत्येक मनुष्य जातीला संपवत चालली होती. याला नियंत्रित करणे अक्षरशः अवघड जात होते, अशावेळी योग्य उपायाची गरज होती. आणि शेवटी उपाय सापडला. स्तिथी सुधारत गेली. पण अशा जैविक संकटांना सावरण्यासाठी निष्णात अनुभवी तज्ञ व त्यांनी घेतलेल्या निर्णयावर जागतिक स्तरावरील मानंकानाची गरज असते. अशावेळी जागतिक आरोग्य संघटना महत्वाचे कार्य बजावते.

जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना: Establishment of (WHO) World Health Organisation Information In Marathi

७ एप्रिल १९४८ रोजी संयुक्त राष्ट्र म्हणजेच UN ने जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केली. या संघटनेची मूळ संघटना ही संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषद आहे. तेड्रॉस अधानोम हे या संघटनेचे सध्याचे संचालक आहेत. त्यांनी १ जुलै २०१७ रोजी हा पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी ते  माजी आरोग्य मंत्री व इथिओपिया या देशाचे परदेश मंत्री होते. तसेच याचे मुख्य कार्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड. येथे आहे. अशा या संघटनेचे सध्याचे बजेट ७.९६ दशसहस्त्र लक्ष डॉलर आहे. यातील १२.१८ टक्के रक्कम ही जर्मनी , ७.८५ टक्के United States म्हणजेच अमेरिका संघराज्य व ११.६५ टक्के रक्कम ही बिल गेट्स व मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांच्याकडून मिळते. जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेनंतर ‘जागतिक आरोग्य विधानसभा’ २४ जुलै १९४८ रोजी भरवण्यात आली होती.

जागतिक आरोग्य संघटनेची  उद्दिष्टे: Objectives Of WHO

 1. संपूर्ण जगावर येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या जैविक संकटांना शमवण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची काही उद्दिष्टं, तत्व आहेत.
 2. सार्वत्रिक आरोग्य सेवेचे समर्थन करणे २.सार्वजनिक आरोग्य जोखीम नियंत्रित करणे
 3. आरोग्य आपत्कालीन परिस्थितीत समन्वयात्मक प्रतिसाद करणे
 4. मानवी आरोग्य आणि कल्याण याला प्रोत्साहन देणे ५.देशांना तांत्रिक सहाय्य प्रदान करणे
 5. आंतरराष्ट्रीय आरोग्य मानक आणि मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणे.
 6. जागतिक आरोग्य सर्वेक्षणांद्वारे जागतिक आरोग्य विषयावरील माहिती गोळा करणे.
 7. जागतिक आरोग्य अहवाल तयार करणे.
 8. जागतिक आरोग्य विषयाचे तज्ञ मूल्यांकन आणि सर्व राष्ट्रांवरील आरोग्याच्या आकडेवारी प्रदान करणे. १०.आरोग्याच्या मुद्द्यांवरील शिखर परिषद आणि चर्चेसाठी मंच म्हणून काम करणे. ही या जागतिक आरोग्य संघटनेची उद्दीष्टे असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी १९४ देशातील प्रतिनिधी आणि ३४ आरोग्य तज्ञांचे कार्यकारी मंडळ असते. १९४ देशांपैकी भारत ही एक आहे. या सर्वांचा मिळून एक सर्वोच्च निर्णय घेणारा गट असतो. अशा सर्व कार्यकुशल व विद्वान मंडळीनी या जागतिक आरोग्य संघटनेची धुरा सांभाळली आहे. जर कोणत्याही नवीन देशाला जागतिक आरोग्य संघटनेमध्ये आपलं सदस्यत्व निश्चित करायचे असेल त्या राष्ट्राला एक अर्ज सादर करावा लागतो आणि तो अर्ज जर जागतिक आरोग्य विधानसभेने मंजूर केला तर तो देश या संघटनेचा सदस्य बनू शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेची कार्य: Work of WHO

आपण या संघटनेची उद्दिष्टं, व ही संघटना कोण कशी नियंत्रित करते ते पहिले. आता आपण या संघटनेनी काय महत्त्वाची कार्ये केली आहेत ते पाहू. जागतिक आरोग्य संघटनेचे मूळ ध्येय ‘ जगातील सर्व मनुष्य जातीने निरोगी आरोग्याचा अत्युच्च स्तर प्राप्त करणे’ हा आहे. तर असे ध्येय गाठण्यासाठी सर्व लोकांनी निरोगी म्हणजेच सर्व रोगांपासून अगदी दूर असणे आवश्यक आहे. मग या मध्ये सर्व प्रकारचे रोग, व्याधी, वेदना येतात. शारीरिक व मानसिक आजार ही येतात. अगदी साध्या सर्दी खोकल्यापासून ते HIV आणि कोरोना सारख्या रोगानाही उखडून काढणे गरजेचे आहे.

यासाठी या संघटनेने आजारांची वर्गवारी केली आहे. ती म्हणजे संसर्गजन्य रोग, असंसर्गजन्य रोग. याप्रमाणेच कोणत्या घटकामुळे आजार किंवा रोग उद्भवतात या द्वारे देखील वर्गवारी केली जाते. पर्यावरणीय आरोग्य, जीवनक्रम आणि जीवनशैली, शस्त्रक्रिया आणि आघात काळजी, इत्यादी सारख्या बाबी विचारात घेतल्या जातात. संसर्गजन्य रोगामध्ये HIV,इबोला, कोविड, मलेरिया, आणि ट्यूबर्क्युलोसीस यासारखे आजार येतात. असंसर्गजन्य रोगामध्ये हृदय रोग, क्षयरोग इत्यादी यासारखे रोग येतात जे मानसिक विकार, हिंसा, दृष्टिय कमजोरी यामुळे उद्भवतात. यानंतर वारा, पाणी, भूमी प्रदूषण, रासायनिक संपर्क, हवामान बदल, अतिनील किरणे यासारख्या पर्यावरणीय घटकामुळे होणारे आजार विचारात घेतले जातात. त्याचबरोबर गर्भधारणा, प्रसूती, नवजात काळ, बालपण, पौगंडावस्था यासारख्या आयुष्यातल्या विविध टप्प्यांवर येणारे आजार आणि तंबाखू , दारू, इतर नशेची औषधे, सायकोएक्टिव्ह पदार्थ, असंतुलित आहार आणि शारीरिक हालचाली यासारख्या जीवनशैली मूळे होणारे रोग, रस्त्यावर व  कोणत्याही ठिकाणी होणाऱ्या अपघातामुळे होणाऱ्या व्याधी व त्या मुळे कराव्या लागणाऱ्या शस्त्रक्रिया यासारख्या बाबीवर जागतिक आरोग्य संघटना विशेष लक्ष ठेऊन असते.

 1. जागतिक आरोग्य संघटना स्थापन होण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्वच्छताविषयक परिषद ही २३ जून १८५१ रोजी स्थापन झाली होती. या परिषदेच्या कालावधीतच १८९२ साली कॉलरा या रोगावर व पुढच्या पाच वर्षानंतर प्लेग सारख्या महाभयंकर रोगावर निदान करण्यात आले होते. याच परिषदेनंतर दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्राने पॅन अमेरिकन सॅनिटरी ब्यूरो, ऑफिस इंटरनॅशनल दी हाय्जीन पब्लिक, लीग ऑफ नॅशनल हेल्थ ऑर्गनायझेशन यासारख्या संघटनांना एकत्रित समाविष्ट करून जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना केली.
 2. यानंतर हळू हळू जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओचे संपूर्ण निर्मूलन करण्यास प्रारंभ केला. या कार्यात WHO ने UNICEF या संघटने बरोबर  या पोलीओचे ९९ टक्क्याने निर्मूलन केले.
 3. १९९०-२०१० या काळात ट्यूबरक्युलोसीसने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण ४० टक्क्याने कमी करण्यात जागतिक आरोग्य संघटना यशस्वी झाली होती.  
 4. २००७  मध्ये H1N1 या सारख्या जिवाणूंमुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारावर लस शोधण्यात आली.              .
 5. २००९ ते २०१५ या काळात HIV AIDS सारख्या आजारावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात आले. १५-२४ वर्षे वयोगटातील HIV ची लागण झालेल्या लोकांची संख्या ५० टक्क्याने कमी करण्यात आली. लहान मुलांमध्ये HIV ची लागण ९० टक्क्याने कमी करण्यात आली आणि या विषाणूमूळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण देखील २५ टक्क्याने खाली आले.    
 6. २००१ मध्ये मिझलस नावाच्या आजारावर नियंत्रण आणण्यात सुरुवात केली ती २००७ पर्यंत ६८% ने कमी करण्यात आला.
 7. त्याच बरोबर चेचक सारख्या आजाराचे संपूर्ण निर्मूलन, इबोला वर लस शोधण्यात यश मिळवले आहे.

कोरोना काळात जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष कार्य: Work Of WHO in COVID-19 Pandemic

पण यासर्वांनंतर सर्वात मोठी पर्वणी होती ती म्हणजे कोरोना विषाणू. सर्वात पहिल्यांदा डिसेंबर २०१९ मध्ये चीनमध्ये सर्वसामान्य न्युमोनिया ची लक्षणे दिसून आली. काही दिवसांनी हा न्यूमोनिया एका अज्ञात कारणामुळे होत असल्याचे समोर आले. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने ताबडतोब जानेवारी २०२० मध्ये व्यवस्थापन समर्थन कार्यसंघ तयार केला . त्यामुळे असे लक्षात आले की हा रोग व्यक्ती व्यक्तीच्या साध्या स्पर्शाने देखील फैलावतो. त्यामुळे याची माहिती रुपी चेतावणी देण्यात आली. तरीसुध्दा जागतिक वाहतूक आणि व्यापार याला धक्का लागू नये म्हणून कोणत्याही प्रकारचे  लॉकडाऊन करू नये असे सांगण्यात आले. पण परिस्थिती हाताबाहेर चालली आहे हे लक्षात येताच संघटनेचे प्रथम प्राधान्य म्हणजे कोरोनाचा संपूर्ण नायनाट करणे असे ठरले. यासाठी प्रथम लसचे डिझाईन बनवण्याचे काम जर्मनी वर सोपवण्यात आले. यावेळी WHO ने UNICEF बरोबर एकत्रित या प्रश्नावर छडा लावण्याचे ठरवले. जागतिक आरोग्य विधानसभा देखील ऑन लाइन भरवण्यात आली. दरम्यान मोठ्या प्रमाणात निधी ही गोळा केला जातो ७.४ दशसहस्त्र लक्ष युरो इतका निधी लोकहितासाठी वापरण्यात आला. अखेर नोव्हेंबर पर्यंत लस तयार झाली. जागतिक आरोग्य संघटनेने २ दश लक्ष PPE  किट व १ दशलक्ष निदान किट जगभरातील १२० देशांना पुरवले. तसेच कोविड बद्दल खबरदारी कशी घ्यावी यासाठी बहु भाषेमधील एक कोर्स ही तयार केला. ज्यामुळे सर्व स्तरातील लोकांना याबद्दल योग्य माहिती मिळत राहील. तसेच कोणतीही अफवा पसरवली जाऊ नये म्हणून या संघटनेचे प्रतिनिधी सदैव सक्रियपणें ऑनलाईन व ऑफलाईन कार्यरत असतात.

अशाप्रकारे जगावर येणाऱ्या कोणत्याही जैविक संकटांना सामोरे जाण्यासाठी व संपूर्ण मानव जातीचे रक्षण करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना ही नेहमी तत्पर व दक्ष असेल पण त्याबरोरच स्वतःची काळजी स्वतः घेण्यात आपणही तितकेच जागरूक असणे हेही तितकेच महत्वाचे आहे.

आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या World Health Organisation information in marathi या article मध्ये upadate करू

मित्रांनो हि World Health Organisation Information In Marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद ..अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

1 thought on “जागतिक आरोग्य संघटना माहिती World Health Organisation Information In Marathi”

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!