आदित्य बिर्ला यांची माहिती Aditya Birla Information in Marathi

aditya birla information in marathi आदित्य बिर्ला यांची माहिती, भारतामध्ये असे अनेक उद्योजक आहेत ज्यांचे नाव हे आकाशाला भिडले आहे म्हणजेच ते एक उद्योजक म्हणून भारतामध्ये तर लोकप्रिय आहेत परंतु ते भारताबाहेर देखील प्रसिध्द आहेत आणि त्यामध्ये एक नावलौकिक उद्योजक म्हणजे आदित्य बिर्ला आणि आज आपण या लेखामध्ये आदित्य बिर्ला यांच्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. आदित्य बिर्ला यांना उद्योग क्षेत्रातील एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखले.

कारण ते भारतातील असे पहिले उद्योजक आहेत ज्यांनी पहिली भारतावर आधारित बहुराष्ट्रीय कंपनी स्थापन केली आणि त्यांनी वयाच्या २४ व्या वर्षी जागतिक बाजारपेठेमध्ये आपल्या व्यवसायाचे साम्राज्य उभारण्याचे स्वप्न पहिले होते.

aditya birla information in marathi
aditya birla information in marathi

आदित्य बिर्ला यांची माहिती – Aditya Birla Information in Marathi

नाव  आदित्य विक्रम बिर्ला
जन्म१४ नोव्हेंबर १९४३
जन्म ठिकाणकलकत्ता (भारत)
ओळखउद्योगपती
पालकबसंत कुमार बिर्ला आणि सरला बिर्ला

आदित्य बिर्ला यांची वैयक्तिक माहिती आणि प्रारंभिक जीवन – personal information and early life

आदित्य बिर्ला यांचा जन्म कलकत्ता या शहरामध्ये १४ नोव्हेंबर १९४३ मध्ये झाला आणि त्यांचे पूर्ण नाव आदित्य विक्रम बिर्ला असे होते. त्यांचे आजोबा घनश्याम दास बिर्ला हे स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाचे व्यक्ती महात्मा गांधी यांचे सहकारी होते आणि ते देखील उद्योगपती (अॅम्बेसेडर कार उत्पादन) होते आणि त्यांचे वडील देखील उद्योगपती असल्यामुळे त्यांच्या उद्योगांचा वारसा त्यांच्या आजोबांच्याकडून आणि वडिलांच्याकडून मिळाला होता.

जरी त्यांची घराची परिस्थिती चांगली असली तरी त्यांनी त्यांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही तर त्यांनी त्यांचे शाळेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कलकत्ता मध्ये असणाऱ्या सेंट झेवियर्स या कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंग करण्यासाठी मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी या कॉलेजमध्ये शिक्षण घेतले.

आणि आपली केमिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. आदित्य विक्रम बिर्ला यांच्या वडिलांचे नाव बसंत कुमार बिर्ला आणि आईचे नाव सरला बिर्ला असे होते आणि त्यांनी राजश्री बिर्ला यांच्याशी लग्न केले होते. या जोडप्याला दोन मुले होती वासवदत्त बजाज हि मुलगी आणि कुमार मंगलम हा मुलगा होता.

आदित्य विक्रम बिर्ला यांची कामगिरी – career

  • आदित्य बिर्ला हे एक प्रसिध्द उद्योजक होते आणि त्यांनी दूरसंचार, कापड आणि पेट्रोकेमिकल अश्या वेगवेगळ्या विभागामध्ये आपला व्यवसाय वाढवला आणि त्यामध्ये मोलाची कामागिरी करून या उद्योगांना एका उंचीवर नेले.
  • त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर प्रथम आपले लक्ष कापड उद्योगाकडे वळवले आणि त्यांनी अनेक स्पिनिंग मिल्स यशस्वी बनवल्या.
  • त्यांनी १९६९ मध्ये आणि १९७३ मध्ये दोन कंपन्यांची स्थापना केली सर्वप्रथम इंडो थाई सिंथेटिक कंपनी लिमिटेड आणि दुसरी पिंटी एलिगंट टेक्स्टाईल या कंपनीची सुरुवात केली.
  • त्यांनी तेल क्षेत्रामध्ये देखील व्यवसाय केला आणि पुढे त्यांनी पॅन सेंच्युरी हे मलेशियामध्ये समाविष्ट केले आणि ती त्यानंतर जगातील सर्वात मोठी कंपनी बनली.
  • त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये कापड उद्योगामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावली आणि त्या संबधित अनेक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या आणि तशीच १९८२ मध्ये त्यांनी पीटी इंडो भारत रेऑन या कंपनीची सुरुवात केली.
  • त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये धाग्यांच्या विषयक अनेक संस्था स्थापन केल्या.

आदित्य विक्रम बिर्ला यांच्याविषयी काही विशेष आणि मनोरंजक तथ्ये – facts

  • आदित्य विक्रम बिर्ला यांनी कुटुंबाची पार्श्वभूमी उद्योगामधील असल्यामुळे त्यांना देखील उद्योगाविषयी आवड होती आणि त्यांनी वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी संपूर्ण बिर्ला कंपनीचा कारभार सांभाळला होता आणि त्यांनी कंपनीचा विस्तार वेगाने वाढवला होता.
  • १९८० मध्ये बिर्ला ग्रुपने कापड, अॅल्युमिनियम, लोह, रसायन आणि खते, सिमेंट या सारख्या क्षेत्रामध्ये चांगला विकास घडवला आणि चांगली प्रगती केली.
  • त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये  उद्योग क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे कामगिरी केली आणि म्हणून त्यांना बिझनेस पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले.
  • आदित्य बिर्ला यांचे नाव पुण्यातील एका हॉस्पिटलला नाव दिले आहे आणि आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल असे नाव देण्यात आले आहे.
  • बिर्ला कुटुंबाचा उगम हा बनिया वैश्य व्यापाऱ्यांच्या महेश्वरी जातीशी होता.
  • थाई कार्बन ब्लॅक हि कंपनी १९७८ मध्ये मलेशियामध्ये समाविष्ट केली आणि ती जगातील पाम ऑईल कंपनी बनली.

आदित्य विक्रम बिर्ला यांना मिळालेले पुरस्कार – awards

आदित्य बिर्ला यांनी उद्योगांच्या मध्ये अनेक वेगवेगळे बदल घडवले तसेच उद्योगांना वेगळ्या उंचीवर नेले आणि म्हणून त्यांच्या उद्योगामधील चांगल्या कामगिरीसाठी काही पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. खाली आपण आदित्य बिर्ला यांना मिळालेल्या पुरस्काराची यादी पाहूया.

  • १९८५ मध्ये त्यांना वाणिज्य आणि उद्योगाचा सर्वोत्तम पुरस्कार मिळाला.
  • आदित्य विक्रम बिर्ला यांना १९८६ मध्ये व्यापार आणि उद्योगामधील आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
  • त्याचबरोबर बिझनेसमन ऑफ द इयर ( bussinessman of the year ) हा पुरस्कार त्यांना १९९० मध्ये मिळाला.
  • त्यांना रोटरी इंटरनॅशणलद्वारे युरोपियन उत्कृष्टता हा पुरस्कार १९९५ मध्ये मिळाला. 

आदित्य बिर्ला यांचे निधन – death

आदित्य बिर्ला यांना १९९३ मध्ये प्रोस्टेट कॅन्सर झाल्याचे समजले आणि ते बाल्टीमोरमधील जॉन्स हॉपकिन्स या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. १९९५ मध्ये त्यांनी अनेक महिने उपचार घेतले पण त्यांनी तब्येत खूप खालावली आणि त्यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी म्हणजेच १ ओक्टोंबर १९९५ दिवशी निधन झाले.

आम्ही दिलेल्या aditya birla information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आदित्य बिर्ला यांची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या aditya birla wiki in marathi या aditya birla wikipedia in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि Aditya birla information in marathi wikipedia माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!