Mahatma Gandhi information in Marathi महात्मा गांधी माहिती: नमस्कार सदरच्या लेखात आपण आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती घेणार आहोत यांच्याबद्दल जेवढे लिहायला जाईल तेवढे कमीच आहे. तरीही आपण mahatma gandhi marathi mahiti यांच्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, या लेखात आपण त्यांचा इतिहास, त्यांचे शिक्षण, कौटुंबिक जीवन, भारत देश स्वतंत्र होण्यासाठी केलेल्या चळवळी आंदोलने त्यांचे काही महत्वाचे निर्णय परदेशातले कार्य तसेच त्यांनी लिहिलेल्या काही पुस्तकांची माहिती घेणार आहोत. चला तर मग mahatma gandhi in marathi पाहूयात.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती – Mahatma Gandhi information in Marathi
नाव (Name) | मोहनदास करमचंद गांधी |
जन्म (Birthday) | २ ऑक्टोबर १८६९ |
जन्मस्थान (Birthplace) | पोरबंदर, गुजरात |
वडील (Father Name) | करमचंद उत्तमचंद गांधी |
आई (Mother Name) | पुतळाबाई करमचंद गांधी |
पत्नी (Wife Name) | कस्तुरबा |
मुले (Children’s Name) | हरिलाल, देवदास, मनीलाल आणि रामदास. |
भावंडे (Brother & Sister) | लक्ष्मीदास, करसनदास आणि बहिण तेथेपोरबंदर, गुजरात |
मृत्यूस्थान (Death Place) | नवी दिल्ली, भारत |
मृत्यु (Death) | ३० जानेवारी १९४८ |
महात्मा गांधी यांचा इतिहास
महात्मा गांधी हे इसवी सन 1920 साली काँग्रेसचे नेते बनले. इसवी सन 1920 ते 1947 या कालखंडावर महात्मा गांधी यांचा प्रभाव राहिला. त्यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसने स्वातंत्र्याचा लढा लढविला. म्हणून या कालखंडाला “गांधीयुग” असे म्हटले जाते. इसवी सन 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, पण सुरुवातीला काँग्रेस मावळ मतवादी राहिला म्हणून हा काळ मावळ मतवादी म्हणून ओळखला जातो, परंतु इसवी सन 1905 मधील बंगालच्या फाळणीनंतर काँग्रेसमध्ये लाल-बाल-पाल यांच्या विचाराने जहाल मतवादी विचारांचा प्रभाव वाढू लागला.
या काळात लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली भारतात अनेक ठिकाणी आंदोलन आंदोलने केली गेली. टिळकांच्या लेखणीने इंग्रज सरकारला चांगलाच घाम फुटला. हा कालखंड 1905-1920 जहालमतवादीचा राहिला. याने तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात काँग्रेसला जोडला गेला.
लोकमान्य टिळक यांच्या अटकेनंतर देशात इंग्रजांविरुद्ध लढण्यास स्वातंत्र्याच्या लढाईत फार मोठी पोकळी निर्माण झाली होती. अशा वेळी महात्मा गांधी यांचा देशाच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला. गांधीजीनी देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत चळवळीचे समर्थपणे व एक मुखी नेतृत्व केले.
महात्मा गांधी जीवन आणि कौटुंबिक माहिती – Mahatma Gandhi Biography
महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात मधील पोरबंदर येते 2 ऑक्टोंबर 1869 साली एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित घरी झाला. गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. रवींद्रनाथ टागोर यांनी गांधीजींना महात्मा ही उपाधी दिली. तेव्हापासून सर्व जण त्यांना महात्मा गांधी म्हणून ओळखू लागले. लोक प्रेमाने त्यांना “बापू ” म्हणत. सुभाष चंद्र बोस यांनी इसवीसन 1944 मध्ये पहिल्यांदा “राष्ट्रपिता” असे संबोधले.
गांधीजींचा जन्म दिवस 2 ऑक्टोंबर गांधी जयंती म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. गांधी हे वैष्णव वाणी. महात्मा गांधी यांचे आजोबा उत्तम चंद यांना पोरबंदर संस्थानाची दिवानगीरी मिळाली होती. महात्मा गांधी यांचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानाचे व नंतर राजकोट संस्थानाचे दिवाण होते. त्यांच्या आईचे नाव पुतळीबाई. महात्मा गांधींचे वडील करमचंद व आई पुतळीबाई दोघेही धर्मनिष्ठ होते.
ते धार्मिक ग्रंथांचे पठण करत व आपल्या मुलांना धार्मिक कथा सांगत व त्यातून सदाचाराचे महत्व आपल्या मुलांच्या मनावर बिंबवत. महात्मा गांधी आपल्या वडिलांची खूप सेवा करत. ते शाळेची वेळ संपली की थेट घरी येत आणि आपल्या वडिलांची सेवा करत. वडील आजारी होते त्यावेळी त्यांना औषध देत त्यांची सर्व प्रकारे सेवा करत. आणि वडील त्यांना प्रेमाने आशीर्वाद देत होते.
एक दिवस ते वडिलांची सेवा करून अभ्यास करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांच्या भावाने त्यांना सांगितले ही माझ्यावर पंचवीस रुपये उधारी झाली आहे. ते 25 रुपये चुकते करण्यासाठी मोहनदास यांची मदत हवी आहे. मोहनदास यांच्याकडे पैसे नव्हते. शेवटी त्यांना एक युक्ती सुचली. परंतु ते करण्यासाठी त्यांचं मन तयार नव्हतं. परंतु मोठ्या भावाला वाचवायचे होते. आपल्या दुसऱ्या भावाच्या बाजूबंद मधील थोडे सोने काढून घेऊन ते सोनार याला विकले आणि भावाला पंचवीस रुपये दिले.
भाऊ तर कर्जमुक्त झाला परंतु चोरी करण्याचा अपराध यामुळे मोहनदास त्यांचे मन त्यांना खात होते. खाणे-पिणे,अभ्यास,खेळ त्यांचे मन रमत नसे ये बेचैन राहत. साहस करून त्यांनी आपल्या वडिलांना एक पत्र लिहिलं आणि ते वडिलांजवळ गेले. हे पत्र हातात धरून वडिलांजवळ बसले. पत्रामध्ये त्यांनी आपली चूक स्वीकारली होती आणि वडिलांनी कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी विनंती केली. वडिलांनी पत्र वाचले आणि त्यांच्या डोळ्यातुन अश्रू वाहू लागले. त्यांना आपल्या मुलाबद्दल अभिमान वाटला.
महात्मा गांधी यांचा विवाह
गांधीजींचे लग्न कस्तुरबा यांच्याशी झाले. कस्तुरबा यांना सगळेजण “बा” असे म्हणत. त्यांचे लग्न झाले त्यावेळी ते दोघेही तेरा वर्षाचे होते. गांधीजींच्या प्रत्येक निर्णयात या त्यांच्या बरोबर राहत. त्या खूप धार्मिक होत्या पण गांधीजींच्या प्रमाणे त्यांनी जातिभेदाचा त्याग केला. त्या शिकलेल्या नव्हत्या. गांधीजींनी त्यांना लिहायला वाचायला शिकवले. त्यांना चार मुले होती त्यांचे नाव हरिलाल, देवदास, मनीलाल आणि रामदास.
महात्मा गांधी यांचे शिक्षण
महात्मा गांधी इन इंग्लंड
1887 मध्ये महात्मा गांधी मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. उच्च शिक्षण घेण्यासाठी 1888 ला ते इंग्लंडला गेले . इथे ती बॅरिस्टर होण्यासाठी भारतीय कायदा आणि न्याय शास्त्राचा अभ्यास केला. तिकडे बॅरिस्टरची पदवी संपादन करून 1891 मध्ये भारतात आले. येथे आल्यावर त्यांनी प्रथम राजकोट आणि नंतर मुंबई या ठिकाणी वकिली सुरू केली. गांधीजी इ.स. 1893 ला एका हिंदी कंपनीचे वकील म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले.
दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधीजी एकवीस वर्ष राहिले. तिकडे गोर्या राजवटीने वर्णभेदाच्या आधारे भारतीयावर मोठ्या प्रमाणावर जुलूम चालवला होता. त्या जुलूमशाही विरोधात अहिंसक मार्गाने आवाज उठवून लढा उभारला आणि तो जिंकला आणि गांधीजी भारतीयांचे हिरो ठरले. भारतात आल्यानंतर 1917 मध्ये त्यांनी बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यात युरोपीय मने वाल्याकडून निळीच्या मळ्यात काम करणार्या मजुरांची होत असलेली पिळवणूक या विरोधात आंदोलन केले.
त्यानंतर गुजरात मधील खेड्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर इंग्रजा विरोधात सत्याग्रह केला आणि महात्मा गांधीजींना देशभर प्रसिद्धी मिळाली.
महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी.
जे एक उच्चविद्याविभूषित बॅरिस्टर ज्यांनी आपले गुरु गोपाळ कृष्ण गोखले यांच्या सांगण्यावरून भारतभ्रमण केले. तेव्हा त्यांना देशातील गरिब शेतकरी कष्टकरी वर्गातील दुःख दैन्य दमन शोषणाचे दुष्परिणाम या वर्गाच्या पोषाखात दिसून आले. या जनसामान्यांचे नेतृत्व करणारी व्यक्ती त्यांच्याशी संबंधित असावे म्हणजे त्यांचे राहणीमान भाषा व खानपान हे मिळते जुळते असे असावे. या पद्धतीने आभासी सामन्याचे प्रकटन या स्वरूपात महात्मा गांधी धोतर पंचा परिधान करीत राहिले.
आजन्म त्यांचा हाच पोशाख ही त्यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख. तर्कसंगत सांगायचं तर हा पोशाख म्हणजे त्यांच्या जीवनशैलीचा विशेष असून त्यामुळे त्यांची साधी राहणी उच्च विचारसरणी हा एक मानदंड मानले जाते. खरे तर महात्मा गांधी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनाची विविध प्रकारचे प्रयोग केले. त्यापैकी हा फारच यशस्वी प्रयोग म्हणून नोंद घ्यावी असा आहे
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या एक पूर्वाध्यक्ष The Nightingale of India श्रीमती सरोजिनी नायडू यांना लॉर्ड माउंटबॅटन यांनी एक प्रश्न विचारला, जर गांधीजींनी कठोरपणे दारिद्र्यात राहायचे निवडले तर कांग्रेस पार्टी त्यांचे खरोखर संरक्षण करू शकेल का? या प्रश्नावर सरोजनी नायडू यांनी हसून उत्तर दिले. रेल्वेने तिसर्या वर्गाच्या गर्दीतून गांधिजी प्रवास करत असतात तेव्हा अस्पृश्यांच्या वेशात अनेक काँग्रेस कार्यकर्ते सोबत असतात तसेच ते शुद्र वस्तीत असतात तेव्हा देखील असेच असते.
बापू कुटी असो की शेळीचे दूध असो किंवा त्यांच्या हार व्यवहारातील हा वैशिष्टपणा जगताना अर्थात त्यांच्या साधेपणाने राहण्याची किंमत अशी मोठीच असावे असे एक भिन्न वास्तव्य सरोजनी नायडू यांनी सांगितले होते.
महात्मा गांधी यांनी केलेल्या चळवळी
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तीन राष्ट्रव्यापी चळवळी केल्या. या चळवळींनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले इ.स.1920 “असहकार चळवळ”, इ. स. 1930 ची “सविनय कायदेभंगाची चळवळ”. एक इसवी सन 1942 ची ” चले जाव चळवळ” या तीन चळवळी होत्या या चळवळीमुळे भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले.
असहकार चळवळ:
ब्रिटिश सत्तेला वठणीवर आणण्यासाठी मोठ्या जनआंदोलनाची गरज होती. 1920 साली लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. लोकमान्य टिळक भारताचे एक मोठे नेते होते. त्यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रीय सभेची सूत्रे महात्मा गांधींच्या हाती आली आणि त्यांच्या नेतृत्व भारतातील पहिली व्यापक चळवळ उभी राहिली. ती म्हणजे असहकार चळवळ. तत्पूर्वी भारतातील जनतेतील असंतोष रोखण्यासाठी सरकारने रौलट या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
रौलट कायद्याने भारतीयांना विनाचौकशी अटक करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला व भारतीयांना शिक्षेविरोधात अपील करण्याची मनाई करण्यात आली. या अन्याय कायद्याविरोधात भारतभर संतापाची लाट उसळली. गांधीजींनी सत्याग्रह केला व लोकांना हरताळ पाळण्याचे आवाहन केले. ज्याला देशभरात प्रचंड प्रतिसाद मिळाला.
रौलट कायद्याविरोधात पंजाब मध्ये आंदोलन तीव्र झाले होते. सरकारने दडपशाही करून गांधींना पंजाब मध्ये प्रवेश करण्यास मनाई केली. जनरल डायरने सभा बंदीचा आदेश जाहीर केला. बैसाखी सणानिमित्त जालियनवाला बाग येथे जमलेल्या हजारो निशस्त्र लोकावर जनरल डायरने गोळीबार करण्याचा हुकूम दिला. शेकडो निरपराध लोकांचे हत्याकांड घडवले.या घटनेचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिशांनी त्यांना दिलेल्या “सर “या पदवीचा त्याग केला. या हत्याकांडाने भारतीय जनतेच्या असहकार आंदोलनाला जन्म दिला.
खिलापत चळवळ:
पहिल्या महायुद्धानंतर तुर्कस्तानवर अपमानास्पद तह लादण्यात येऊन तुर्की साम्राज्याचे विघटन झाले. त्याने भारतीय मुस्लीम प्रक्षुब्ध झाले व त्यांनी खलिफाला पाठिंबा देण्यासाठी खिलाफत चळवळ चालू केली. तिला हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी गांधीजींनी पाठिंबा दिला.खिलाफत कमिटीने असहकार करण्याचा प्रस्ताव मान्य केला.
जनआंदोलन:
1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने असहकार चळवळीला मान्यता देऊन याची सर्व सूत्रे महात्मा गांधींकडे सोपवली. ब्रिटिश वस्तूंचा बहिष्कार बरोबरच ब्रिटिश शैक्षणिक संस्थांचा बहिष्कार सरकारी नोकरीचा त्याग आणि ब्रिटिशांनी दिलेल्या मान आणि पदव्यांचा त्याग करण्याचे आवाहन गांधीजींनी केले.
असहकार चळवळीला समाजातील सर्व स्तरांमधून उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पंडित मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास यासारख्या नामांकित वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला.मोठ्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले. देशभर राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा,महाविद्यालय स्थापन झाली सरकारने नेहमीप्रमाणे दडपशाही केली. उत्तर प्रदेशमधील चौरी चौरा या ठिकाणी निघालेल्या शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला.त्यामुळे संतप्त जमावाने पोलीस चौकी पेटवून दिली.
यात 22 पोलीस ठार झाले. व्यथित झालेल्या गांधीजींनी चळवळ स्थगित केली. त्यानंतर सरकारने गांधीजींना अटक करून त्यावर हा खटला दाखल केला. व त्यांना सहा वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली. प्रकृतीच्या कारणास्तव त्यांची दोन वर्षात लगेच सुटका करण्यात आली. या आंदोलनामुळे राष्ट्रीय चळवळ जास्तच बळकट झाली.
सविनय कायदेभंग चळवळ :
भारतीय स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या राष्ट्रीय सभेचे पूर्ण स्वराज्य हे ध्येय बनले, पण ब्रिटिश सरकार पुर्ण स्वराज्य घ्यायला तयार नव्हते. महात्मा गांधींनी तडजोड म्हणून संपूर्ण दारूबंदी, 50% शेतसारा माफी, मिठावरील कर रद्द करणे, देशी मालाला सरक्षण, राजकीय कैद्यांची मुक्तता यासारख्या मागण्या ब्रिटिशांच्या पुढे मांडल्या. सरकारने महात्मा गांधींच्या या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष करून दडपशाही सुरू केली. त्यास प्रत्युत्तर म्हणून 14 फेब्रुवारी 1930 रोजी राष्ट्रीय सभेने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली सविनय कायदेभंगाची चळवळ चालू केली.
ब्रिटिशांनी मिठासारखे जीवनावश्यक वस्तू वर देखील कर लादलेला होता. ही एक अन्याय व संतापजनक घटना होती. गांधीजींना हे मान्य नव्हते. त्यांनी सविनय कायदेभंगाच्या मार्ग अनुकरण्याचा मार्ग निवडला. या कायदेभंगाची सुरुवात मिठाचा सत्याग्रह करून करावी अशी कल्पना त्यांनी ठरवले. 12 मार्च1930 रोजी ते साबरमती आश्रमातून स्वराज्य मिळाल्याशिवाय परत येणार नाही.
अशी प्रतिज्ञा करुन समुद्रकिनाऱ्यावरील दांडी कडे मिठाचा कायदा मोडण्याकरीता 72 सत्याग्रहीअनुयायांसह गेले. देशभर आंदोलन उभे राहिले. साबरमती ते दांडी हे 385 किलोमीटरचे अंतर पार करून 6 एप्रिल 1930 रोजी त्यांनी मिठाचा कायदा मोडला.
सविनय कायदेभंगाची स्वरूप असे होते की, मिठाचा सत्याग्रह, सरकारी शिक्षण संस्थावर बहिष्कार,परदेशी माल, दारू, अफू विकणाऱ्या दुकानावर निदर्शने, परदेशी मालाची होळी, हे कायदेभंग चळवळीतील प्रमुख आदेश महात्मा गांधींनी जनतेला दिले होते करण्यासाठी गांधींनी ब्रिटिशांना मुदत दिली.
सविनय कायदेभंगाच्या चळवळीमध्ये देशात देशभक्तीला मोठे उधाण आले. लोकांनी समुद्रकिनारी जाऊन मिठाचा कायदा मोडला. जेथे समुद्रकिनारा नाही तेथे ते लोकांनी साराबंदी व जंगल कायदे मोडले.अनेकांनी सरकारी जागांचे राजीनामे दिले. समाजातल्या सर्व वर्गातील हजारो लोक सत्याग्रहात सामील झाले. सैन्यात राष्ट्रभक्ती वाढली. सुचेता कृपलानी, कमला नेहरू, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू या सारख्या स्त्रिया आंदोलनात सहभागी झाल्या.
वायव्य सरहद्द प्रांतात देशभक्तीचे वारे पसरले. खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली तेथे चळवळ झाली. सरकारने चळवळ दडपण्यासाठी दंड तुरुंगवास लाठी हल्ला इत्यादी पत्रकार केले. दडपशाही करून गांधींना अटक केली गेली. सर्वत्र याचा निषेध करण्यात आला. सविनय कायदेभंगातील प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली.
या सर्वांचा परिणाम म्हणून ब्रिटिश सरकारने पंतप्रधान मॅकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली लंडन येथे पहिली गोलमेज परिषद बोलावली. काँग्रेसने गोलमेज परिषद वर बहिष्कार टाकला. सरकारने काँग्रेसबरोबर तडजोडीचे धोरण स्वीकारले. महात्मा गांधींनी व्हाईसरॉय ची भेट घेतली. महात्मा गांधी वर लॉर्ड आयर्विन यांच्यात फेब्रुवारी 1931 मध्ये बैठक सुरू झाली.
5 मार्च 1931 ला दोघांमध्ये करार झाला. तो करार “गांधीं आयर्विन करार” जेव्हा “गांधी आयर्विन समझोता” म्हणून प्रसिद्ध आहे. या करारानंतर सविनय कायदेभंगाची चळवळ स्थगित केली गेली. इतिहासात ही एक महत्त्वाची चळवळ होती.
चले जाव चळवळ :
1942 छोडो भारत हा लढा वेगळाच होता. असहकार चळवळ आणि सविनय कायदेभंग या दोन्ही आंदोलना पेक्षा वेगळेपण म्हणजे हा उग्र स्वरूपाचा लढा होता. पूर्वीच्या जनआंदोलनाने त्यांचे मार्गदर्शन लाभले पण त्यापेक्षा 1942 चा लढा वेगळा होता.हा लढा जनतेने उत्स्फूर्तपणे लढवला.
महात्मा गांधी यांनी दुसऱ्या महायुद्धात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय
दुसरे महायुद्ध चालू झाले आणि इकडे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाला वेगळीच कलाटणी मिळाली.त्या अगोदर ब्रिटिश स्वराज्य बरीच वर्षे टिकले असे लोकांना वाटत असताना दुसऱ्या महायुद्धाने सर्व समीकरणे बदलली स्वराज्य जवळ आले हे स्पष्टपणे दिसू लागले होते. भारतीय जनतेला न विचारता व्हाइसरॉयने परस्पर भारताला दुसऱ्या महायुद्धात खेचली.
परिणामी त्याच्या निषेधार्थ निरनिराळ्या प्रांतातील काँग्रेस मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. भरीस भर म्हणून काही काळात मुस्लीम लीगने पाकिस्तानची मागणी केली.वैयक्तिक सत्याग्रहा चा आदेश महात्मा गांधींनी दिला. आचार्य विनोबा भावे यांनी वैयक्तिक सत्याग्रहाची सुरुवात केली. त्यानंतर काहींनी तो अमलात आणला मात्र राजकीय कोंडी फुटू शकली नाही.
अशा वातावरणात एकीकडे महायुद्ध व दुसरीकडे भारतातील आंदोलन यात युद्ध परिस्थिती ब्रिटनच्या दृष्टीने फारच बिकट झाली. त्यातच अमेरिका आणि चीन यांनी हिंदी जनतेचे युद्ध सहकार्य मिळवण्यासाठी भरीव राजकीय सुधारणा द्या असा ब्रिटनकडे लकडा लावला. तेव्हा ब्रिटनचा पंतप्रधान चर्चिलने क्रिपसला वाटाघाटीसाठी भारतात पाठवले.
पण गांधीजींनी या योजनेमुळे पुढे भारताचे तुकडे होतील असे सांगितले. काँग्रेस नेत्यांनी वाटाघाटी चालू ठेवला, पण ब्रिटनच्या मनात भारतावरील पकड मजबूत ठेवायचे आहे असे लक्षात आल्यावर काँग्रेसने ही योजना फेटाळली. मे महिन्याच्या अखेरीस गांधीजींनी ब्रिटिशांनी या देशातून ताबडतोब चालते व्हावे अशी मागणी केली.
भारत छोडो चळवळ
तुरुंगातून सुटका झाल्यानंतर गांधींचे कार्य
देशाची फाळणी व स्वातंत्र्य –
इंग्रजांच्या विरोधात 8 ऑगस्ट 1942 ला “चले जाव भारत छोडो” चा ठराव प्रतिनिधींनी सभेत मांडला. हा ठराव ताबडतोब पास केला.याच सभेत गांधीजींनी “करेंगे या मरेंगे “ चा नारा दिला आणि दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्ट 1942 ला गांधीजी आणि त्यांच्या 148 प्रमुख नेत्यांना अटक केली. गांधींजींना अटक झाली आणि देशात अनेक ठिकाणी इंग्रज सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली.
सरकारने ही चळवळ पाडण्यासाठी अनेक प्रयत्न केले, दडपशाही केली पण आंदोलन चालूच राहिले. गांधीजींना तुरुंगात डांबन्यात आलं पण त्यांनी स्वातंत्रसाठी 21 दिवस उपोषण केले. अखेर 6 मे 1944 रोजी त्यांची सुटका करण्यात आली. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे इतर नेते ही सुटले. त्यानंतर इंग्लंडचे पंतप्रधान लॉर्ड ऑटली यांनी 15 मार्च 1946 रोजी भारताच्या स्वातंत्राची घोषणा मान्य असल्याचे स्पष्ट केले.
स्वातंत्र्य भारताची बातमी आल्यावर मुस्लिम लीगचे नेते बॅरिस्टर जीना यांनी वेगळ्या मुस्लिम प्रांताची मागणी केली. गांधीजींनी मुळीच मान्य नव्हतं, पण मुस्लिम लीग या पक्षाने आडमुठपणाची भूमिका घेतल्याने पुढे देशाची फाळणी करण्यात आली. या पाळण्यातून पाकिस्तान भारतापासून वेगळा करण्यात आला. अखेर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात गांधीजी बरोबर अनेक राष्ट्रीय नेते त्यांच्या सोबत जोडले गेले होते. नेताजी सुभाष चंद्र बोस, चंद्रशेखर आजाद, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विनोद भावे असे अनेक नेते गांधीजी बरोबर जोडले गेले होते.
महात्मा गांधीजी बद्दल आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे वेळेचे महत्व. आज-काल कामाच्या गर्दी दिलेली वेळ पाळायची असते ही गोष्टच माणूस विसरून गेला आहे. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधी वेळेचे महत्त्व जाणत होते. एखाद्याला दिलेली वेळ पाळणे म्हणजे त्यांच्या आयुष्यातील तितक्यात वेळेची चोरी करणे होय. चोरी मग कशाचीही असो ती वाईटच. सेवाग्राम आश्रमात बापूजी राहायचे.
सेवाग्राम आश्रम त्यांचा कुटुंबच. त्यात एक मृणालिनी नावाची मुलगी होती. सुट्टीत सेवाग्राम मध्ये राहायला आली होती. दिवसभर मुलात खेळायचं, संध्याकाळी सेवाग्राम मध्ये होणाऱ्या प्रार्थनेत सहभागी व्हायचं. गांधीजींना मुलं फार आवडत.आपल्या व्यग्र दैनंदित जीवनात ते मुलांसाठी वेळ काढत, मुलांशी बोलत, त्यांच्याशी खेळत, त्यांच्यात मिसळत, उमलत्या कळ्यांना फुलवत. एकदा गांधीजींनी मुलांसाठी एक त्रास द्यायचा ठरवलं. ठरलेल्या वेळी ठरलेल्या ठिकाणी सार्या जणांनी जमायचे ठरले.
मुलांच्या आनंदाला सीमा नव्हती. मुलं एकत्र आली, जमली. बापू आणि स्मरण पूर्वक अगदी वेळेवर आले. मुलांशी बोलत असताना धापा टाकत मृणालिनी आली.त्या ठिकाणी सारी पडवी भरलेली. बसायला जागा नव्हती. दारात थोडी जागा होती तिथे मृणालिनी अंग चोरून बसली. बापूजींनी एकदा मृणाल कडे आणि एकदा आपल्या घड्याळाकडे पाहिले. ” उशीर झाला पाच मिनिटे मृणाल तुला “, बापूजींनी विचारलं. त्यांच्या शब्दात नाराजी होती. मृणाल काही न बोलता खाली मान घालून उभी.
झालेला उशीर तिच्या मनाला टोचत होता. मृणाल कडे पाहत साऱ्या हॉल वर नजर फिरवत बापूची म्हणाले, ” या हॉल मध्ये आपण किती जण आहोत. मनातल्या मनात चोरटेपणाने हिशोब करत मृणाल म्हणाली 40 जण आणि तुम्ही “.
“म्हणजे एक चार जणांची प्रत्येकी पाच मिनिट चोरलीस तु. एकूण दोनशे पाच मिनिट” बापूजींनी तिच्या लक्षात आणून दिलं म्हणाले, आपण कोणाला एक मिनिटाचा आयुष्य देऊ शकतो? मग सगळ्यांची इतकी मिनिटं चोरण्याचा अधिकारच काय आपल्याला. एखाद्याच्या आयुष्यातील पाच मिनिटाची चोरी तरी का करायची. दिलेली वेळ न पाळणं म्हणजे दुसऱ्याच्या आयुष्यातील वेळ चोरनच असतं. यावरून समजते की बापूजींना वेळेचे किती महत्त्व होते.
महात्मा गांधी इन साउथ आफ्रिका
फीनिक्स आश्रम :
जॉन रस्किनच्या या तीन सिद्धांताच्या आधारे गांधीजींनी फीनिक्स आश्रमाची स्थापना केली. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी दरबान शहराजवळ सुमारे 40 हेक्टर जमीन खरेदी करून तेथे पहिले फीनिक्स आश्रम स्थापन केले. गांधीजींनी जॉन रस्किनच्या अनटू दिस लास्ट या पुस्तकाचे गुजराती भाषांतर करून “सर्वोज्ञ्” असे नाव दिले.
तसेच फिनिक्स मधून गांधीजींनी ‘इंडियन ओपिनियन’ हे साप्ताहिक छापून प्रसिद्ध करत होते. छापखान्यात यंत्र फिरवण्याचे काम, सामूहिक रित्या शेती करून जीवन निर्वाह करणे इत्यादी कामे फीनिक्स आश्रमातून गांधीजीनी केली. फीनिक्स आश्रम स्थापन करण्याचा जो उद्देश होता तो हाच की दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह चळवळ सुरू होती. या चळवळीत सहभागी आणि त्यांच्या मुलांना राहण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती म्हणून गांधीजींनी फीनिक्स आश्रम स्थापन केले व त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली.
टॉलस्टाय फार्म :
सत्याग्रह चळवळीच्या दरम्यान गांधीजींना असे वाटू लागले की फिनिक्सला थोडा वेगळेच स्वरूप देण्याची आवश्यकता आहे. सत्याग्रह चळवळ हळूहळू पुढे सरकत होती आणि या चळवळीत लोक मोठ्या संख्येने सामील होत होते. तेव्हा गांधीजींनी अजून एक आश्रम स्थापन करण्याचे ठरवले. गांधीजींचे मित्र हार्मन कॅलेन बेक यांनी आफ्रिकेत अकराशे एकर जमीन दान केली. सन 1913 मध्ये जोहानिस्बर्ग जवळ गांधीजींनी टॉलस्टाय फार्म स्थापन केले.हार्मन कॅलेन बेक तसे मूळ जर्मनचे होते. परंतु गांधीजींचे विचार शैलीने प्रभावित होते.
सत्याग्रह आश्रम :
गांधीजींचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखले त्यांना सांगितले होते की जोपर्यंत तुम्ही संपूर्ण भारत भ्रमण करत नाही तोपर्यंत कुठलेही स्टेटमेंट देऊ नये. मग गांधीजींनी भारतभ्रमण केले. या भ्रमनादरम्यान त्यांना अनेक लोक भेटले आणि आपल्या क्षेत्रात आश्रम स्थापन करण्यासाठी विनंती करू लागले.
भारतातील अनेक ठिकाणाहून लोक त्यांना आश्रम स्थापित करण्यासाठी विनंती करतात मात्र गांधीजींना अहमदाबाद येथील आश्रम स्थापन करायचे होते. कारण त्यांना जे कार्य करायचे आहे त्यासाठी अहमदाबाद ठिकाण योग्य होते. तेथील व्यापारी मिल्सचे मालक त्यांना सहकार्य करण्यास तयार असल्यामुळे फंडिंगचे काम गांधीजींना सुलभ होणार होते. त्यावेळेस अहमदाबादला भारताचे मॉनजेस्टर म्हटले जाई.
1915 मध्ये अहमदाबाद येथील कोचरब गावात भारतातील पहिले कोचरब आश्रम स्थापित केले. या कोचरब आश्रमाला सत्याग्रह आश्रम ही म्हटले जायचे. कारण महात्मा गांधींनी सत्याग्रहाची सुरुवात तिथूनच केली होती. साऊथ आफ्रिकेचे आश्रम होते त्या तुलनेत गांधीजींनी भारतातील या पहिल्या आश्रमाची विभावना थोडी वेगळी राखली. सत्याग्रह आश्रमात राहून गांधीजीनी अहमदाबाद मिलच्या संपाचे सफल संचालन केले. मिलचे मालक व कर्मचाऱ्यांच्या विवादाला सोडवण्यासाठी गांधीजींना प्रयत्न केले.
ज्यामुळे 21 दिवसांपासून सुरू असलेल्या संप गांधीजीनी तीन दिवसातच समाप्त केले. त्यानंतर गांधीजींनी खेडा सत्याग्रह केले. रोलेट समितीच्या शिफारशीचा विरोध दर्शवणे करिता तत्कालीन राष्ट्रीय नेत्यांचे एक संमेलन आयोजित केले आणि उपस्थित सगळ्या लोकांचे सत्याग्रह प्रतिज्ञापत्रावर हस्ताक्षर घेतले. सन 1916 -17 मध्ये अहमदाबाद मध्ये प्लेग रोग पसरला होता.त्यामुळे त्यांना आश्रमाची ती जागा खाली करावी लागली. त्यानंतर साबरमती नदीच्या किनाऱ्यावर आश्रम हलवले म्हणून त्याला साबरमती आश्रम असे नाव दिले.
सेवाग्राम आश्रम:
1930 नंतर गांधीजीनी साबरमती अश्रम बंद करण्याचे ठरवले. मग प्रश्न उपस्थित केला की तिथल्या आश्रमातील लोकांना कुठे स्थलांतरित करावे? गांधीजींचा जमनालाल बजाज यांच्याशी पहिल्यापासून संपर्क होता. त्यावेळी जमनालाल बजाज वर्धा येथे होते. त्यांनी गांधींना वर्ध्याला आमंत्रित केलं. गांधीजी पहिल्यांदा 1934 ला वर्ध्यात गेले होते.पुढे 1936 मध्ये त्यांनी सेवाग्राम आश्रम स्थापन केले.
गांधीजी सेवाग्रामचे पूर्वीचे नाव सेवा सेगाव.सन 1940 मध्ये गांधीजींनी सेगाव या गावाचे नामकरण सेवाग्राम असे केले. महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पुनीत झालेले सेवाग्राम शेत्र आहे. 30 एप्रिल 1936 ला महात्मा गांधी वर्धा पासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या सेवाग्राम या ठिकाणी पोहोचले. सहा दिवस ते त्या ठिकाणी राहिले. तेथील ग्रामस्थांना त्यांनी त्यांच्या यामागील उद्देश सांगितला.
तसेच आपली भूमिका विशद केली.त्यानंतर हळूहळू सेवाग्राम आश्रम भारताच्या स्वातंत्र्य संग्राम चळवळीचे केंद्र बनले. सेवेचा भाव किती असला पाहिजेत असं गांधीजींचा मत होतं. या आश्रमात त्यांनी कुष्ठरोग्यांची सेवा केली. हे आश्रम 1942 च्या भारत छोडो आंदोलन आणि त्यानंतर रचनात्मक कार्य खादी ग्रामोद्योग सहित सामाजिक सुधारात्मक कार्य अस्पृश्यता निवारणाचे प्रमुख अहिंसात्मक केंद्र राहिले.
त्यानंतर गांधीजींना अटक करण्यात आली. 1904 पर्यंत गांधीजी सेवाग्राममध्ये परतु शकले नाहीत. स्वातंत्र्य लढा सुरू होता. 1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि 1948 मध्ये गांधीजींची हत्या झाली.
महात्मा गांधी जयंती – Mahatma Gandhi Jayanti information in Marathi
दरवर्षी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती मोठ्या उत्साहाने 2 ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येते. हा दिवस सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याबद्दल आणखी माहिती लवकरच घेऊन येऊ.
महात्मा गांधी यांचे निधन
नथूराम गोडसे यांचे भाषण साठ वर्षापर्यंत भारतात प्रतिबंधित होते की त्यांनी गांधीजींना का मारले. 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीजींची गोळी झाडून हत्या केली होती. पण नथुराम गोडसे या घटनेनंतर घटनास्थळावरून फरार नाही झाला. त्याने आत्मसमर्पण केले. नथुराम गोडसे सोबत 17 अभियोक्तावर गांधी हत्या साठी केस चालवली गेली. या केसच्या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती खोसला यांनी नथुरामला आपले वक्तृत्व वाचून दाखवायला सांगितले.
त्याला न्यायमूर्तींनी स्वीकारले. सरकारांनी नथुरामच्या या वक्तत्यावर प्रतिबंध लावला होता. पण नथुरामचा छोटा भाऊ आणि त्यांचे सहयोगी गोपाळ गोडसेने साठ वर्षाची मोठी कायद्याची लढाई लढल्या नंतर सुप्रीम कोर्टात विजय मिळवला आणि आपल्या भावाचे वक्तृत्व प्रकाशित केले. नथुराम गोडसेने गांधीहत्याच्या पक्षात आपली दीडशे मतं न्यायालयासमोर मांडली .
नथुरामचा विचार होता की गांधीजींची अहिंसा हिंदूना कायर बनवुन टाकेल. कानपूरमध्ये गणेश शंकर विद्यार्थी ला मुस्लिमांनी निर्दयीपणे मारून टाकले होते. महात्मा गांधी हिंदूंना गणेश शंकर विद्यार्थी सारखे झाले आणि बलिदान द्यायच्या गोष्टी करायचे. नथुराम गोडसेला भीती होती की गांधीजींची अहिंसा वादी नीती हिंदूंना कमकुवत बनवेल आणि ते आपल्या अधिकार प्राप्त नाही करू शकणार. यामुळे नथुराम गोडसे यांनी गांधीजीवर गोळी झाडून हत्या केली.
महात्मा गांधीजींची हत्या 30 जानेवारी 1948 ला झाली होती. हत्येनंतर अवघ्या काही तासातच जगभरातून शोक संदेश, शोक भावना प्राप्त होऊ लागल्या. संपूर्ण जग शोकमग्न झाले होते.महात्मा गांधीजींच्या अंत्ययात्रेत सगळ्याच गोष्टी “न भूतो न भविष्यती” अशा होत्या. जवळपास दहा लाख लोक त्यांच्या अंत्ययात्रेत चालत होते.पंधरा लाखापेक्षा जास्त लोक रस्त्यावर, झाडावर उभे होते. संयुक्त राष्ट्र संघाचा ध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आला होता.
स्थलसेना वायुसेना नौसेना च्या दोनशे सैनिकांचे दल चार दोरखंड द्वारे गांधीजींचे पार्थिव असलेली गाडी ओढत होते.हजारो सैनिक पोलीस अंतिम यात्रेत मागे पुढे चालत होते.त्यांच्या वस्तीचे 22 कलश तयार करण्यात आले होते. एक कलश बीडला हाऊस मध्ये तर 21 कलश देशातील विविध ठिकाणी दर्शनासाठी पाठविण्यात आले होते.गांधीजींच्या मूळ अस्थी विशेष रेल्वे द्वारा दिल्लीहून अलाहाबादला पाठविण्यात आल्या.
महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर आज सात दशकांचा काळ लोटला आहे, तरीदेखील महात्मा गांधीजींचे विचार कार्य प्रभाव अनेक ठिकाणी आजही पाहायला मिळतात.जगभरातील अनेक घटनांमध्ये गांधीजींच्या विचारांचे प्रतिबिंब पडलेले दिसते. सत्य, अहिंसा हा गांधीजींनी जगाला दिलेला एक तारक मंत्र आहे. सर्वस्वाचा त्याग करून देशासाठी नव्हे तर जगाला शांती आणि अहिंसेचा मंत्र गांधीजींनी दिला. अराजकतेचा उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशाला शांती आणि अहिंसेचा मंत्र तारू शकतो हे गांधीजींनी सांगितले.
साबरमती चे संत तुम्ही
तुमचे नाव आहे बापू
अहिंसेचे शस्त्र उचलतात
इंग्रज लागले कापू
रघुपती राघव राजाराम
ही प्रार्थना अजरामर झाली
पंचा नेसून बापू तुम्ही
भारत माता स्वतंत्र केली
स्वातंत्र्याचे शिल्पकार तुम्ही
राष्ट्रपिता म्हणून गौरवले
साध्या तुमच्या आचरणाला
महात्मा म्हणून संबोधले
तुमच्यासारखे होणे नाही
बापू या जगी कोणी
त्रिवार वंदन करतो आम्ही
बापू तुमच्या चरणावरती
महात्मा गांधीजींच्या जीवनकार्यावर नजर टाकली तर लक्षात येते की ते ज्यांच्याविरुद्ध आयुष्यभर लढले, ते ब्रिटिश लोक महात्मा गांधीजी यांना श्रद्धांजली वाहण्यात आघाडीवर होते. आजही ब्रिटिश संसदेच्या बाहेर महात्मा गांधीजींचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. गांधीजी नेहमी म्हणत असत, विरोधकांच्या विषयी माझ्या मनात कधीही द्वेष भावना उत्पन्न होऊ नये हीच माझी प्रार्थना आहे.
जर मला कोणाच्या गोळीला बळी पडावे लागले तरी त्यावेळी देखील ईश्वराचे स्मरण करत मी त्याला शरण जाईल. विश्वशांतीचा इतका व्यापक विचार कदाचित दुसऱ्या कोणी केला नसेल. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गांधीजींनी सत्याग्रह, अहिंसा तत्त्वाचा अवलंब केला. गांधीजींनी दिलेल्या सत्याग्रहाच्या वाटेने चालत जगभरातील जवळपास पंचावन देशांनी स्वातंत्र्य मिळवले आहे.
भारताला त्यांनी केवळ स्वातंत्र्य मिळवून दिले नाही तर, त्यांनी आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक स्वातंत्र्याचा मार्ग देखील दाखवला. सर्वांना समान अधिकार आहेत असा आग्रह ते नेहमी धरत असत.
गांधीजी केवळ व्यक्ती नव्हते तर ते दृढ विचारांचे आचरण करणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या विचारांचा प्रभाव आजही आपण अनेक ठिकाणी पाहू शकतो. त्यांच्या विचार कार्याने प्रेरित झालेले असंख्य व्यक्तिमत्व आज जगभरात अस्तित्वात आहे. अमेरिकेतील नागरी अधिकार आंदोलनाचे नेते मार्टिन ल्युथर किंग, दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेला, खान अब्दुल गफार खान, स्टिव बिको ही सारी व्यक्तिमत्वे गांधीजींच्या विचाराने प्रेरित झाल्याचे आपण पाहतो.
भौतिक विज्ञानाचे महान संशोधक अल्बर्ट आईन्स्टाईन गांधीजींना नेहमी पत्र लिहीत असत.येणार्या पिढीसाठी आदर्श व्यक्तिमत्व असा उल्लेख त्यांनी गांधीजींच्या संदर्भात आपल्या पत्रात केलेला आढळतो.
ब्रिटिश नौसेनेचे अधिकाऱ्यांची मुलगी मीराबेन गांधी आश्रमापासून प्रेरित होऊन भारतात आली. तीने सर्वाधिक काळ गांधीजींच्या सेवेत घालवला. संयुक्त महासचिव ॲटोनियो ग्यटेरस म्हणाले होते,अहिंसा द्वारा इतिहास बदलू शकतो हे गांधीजीनी सिद्ध केले आहे.जगाच्या सर्व लोकांसाठी शांतता, विकास आणि मानवी हक्क अबाधित ठेवण्यासाठी गांधीजींचे विचार प्रेरणा देत राहतील.
गांधीजी म्हणायचे की,आपण आत्मविश्वासाने अध्यात्मिक विचार करण्याच्या मार्गावर आहोत.आपण जगामध्ये बदल पाहू इच्छित असाल तर तो बदल आधी स्वतःमध्ये झाला पाहिजे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात आश्रमात राहून केली. महात्मा गांधीजी 1904 मध्ये जेव्हा साऊथ आफ्रिकेला गेले होते, तेव्हा प्रवासादरम्यान त्यांचे मित्र हेनरी पोलाक त्यांना स्टेशन वर सोडायला गेले होते.
यावेळी पोलाक त्यांनी गांधीजींना इंग्रजी लेखक जॉन रस्किन द्वारा लिखित ‘अनटू दिस लास्ट ‘ हे पुस्तक भेट म्हणून देत म्हटले की, ‘ गांधी भाई आपण हे पुस्तक जरूर वाचा ‘. गांधीजींनी आपल्या प्रवासादरम्यान चे पुस्तक रात्रभर वाचून काढले.या पुस्तकातील जॉन रस्किन यांचे बहुतांश तत्व गांधीजींना स्पर्श करून जातात. त्या तत्वांचा गांधीजीवर फार प्रभाव झाला.
तेव्हा आपणही अशी जीवनशैली आत्मसात केली पाहिजे असा स्वतःची निश्चय गांधीजींनी केला. मग त्यानंतर गांधीजींनी आश्रम किंवा फिनिक्स नामक सेटलमेंट स्थापित केले. जॉन रस्किन या लेखकाच्या पुस्तकातील ते तीन मुख्य सिद्धांत ज्यांनी गांधीजी प्रभावित झाले. ते याप्रमाणे होते – पहिला – सगळ्यांच्या कल्याणच माझे कल्याण आहे,
दुसरा – वकील आणि नवी या दोघांचे कार्य एक समान आहे आणि दोघांचे एकच महत्त्व आहे, तिसरा – सगळ्यात साधे आणि महत्त्वपूर्ण असे जीवन शेतकरी आणि मजुरांची आहे. या तीन सिद्धांताच्या आधारे मला जीवन व्यतीत करायचा आहे. या तीन सिद्धांताचं दर्शन माझ्या जगण्याने मला घडवायचे आहे असे गांधीजींनी ठरवले.
महात्मा गांधी यांनी लिहिलेली पुस्तके
- गांधी विचार दर्षन : सत्याग्रह प्रयोग
- गांधी विचार दर्शन : सत्याग्रह विचार
- गांधी विचार दर्शन : सत्याग्रहाची जन्मकथा
- गांधी विचार दर्शन : हरिजन
- Indian Home Rule (हिंद स्वराज्य)
- गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा
- गांधीजीचे जीवन त्यांच्याच शब्दांत
- गांधी विचार दर्शन : अहिंसाविचार
- गांधी विचार दर्शन : राजकारण
- नैतिक धर्म
- माझ्या स्वप्नांचा भारत
आम्ही दिलेल्या mahatma gandhi information in marathi speech माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information about mahatma gandhi in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mahatma gandhi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनराठी.नेट
Thanks for the info
प्रतिसादाबद्दल धन्यवाद