अंबर किल्ला माहिती Amber Fort Information in Marathi

Amber Fort Information in Marathi Language अंबर किल्ला मराठी माहिती अंबरचा हा किल्ला राजस्थान राज्यातील जयपूर शहरापासून ११ किलो मीटर अंतरावर असणाऱ्या आमेरच्या अरावली या पर्वत रांगेवर हा किल्ला विस्तारलेला आहे. अंबर किल्ला किवा आमेर चा किल्ला हा राजस्थान मध्ये असणाऱ्या प्रसिध्द किल्ल्यांपैकी एक आहे. अंबर किल्ला आकाराने मोठा आहेच पण त्यावर केलेली सुरेख हिंदू रजपुती शैली आणि नक्षीकाम पर्यटकांच्या मन आकर्षित करते. आमेर हे शहर मुळता मिनास नावाच्या जनजातीने स्थापन केली.

amer fort information in marathi तेथे अंबर हा किल्ला बांधला या नंतर या किल्ल्यावर राजा मान सिंह इ. स. १५५० ते इ. स. १६१४ पर्यंत यांनी आपले वर्चस्व गाजवले. आमेराचा हा किल्ला मुख्यता हिंदू रचनेच्या बांधकाम शैलीमुळे भारतामध्ये खूप प्रसिध्द आहे. या किल्ल्याला उंच, भक्कम आणि मोठमोठी तटबंदी आहे तसेच या किल्ल्याची खासियत म्हणजे या किल्ल्याचे रस्ते गोंधळात टाकणारे आहेत.

amber fort information in marathi language
amber fort information in marathi language

अंबर किल्ला मराठी माहिती – Amber Fort Information in Marathi Language

किल्ल्याचे नावअंबर किल्ला , आमेर किल्ला
ठिकाणराजस्थान राज्यातील जयपूर शहरापासून ११ किलो मीटर अंतरावर असणाऱ्या आमेरच्या अरावली या पर्वत रांगेवर हा किल्ला विस्तारलेला आहे
संस्थापकराजा मान सिंह
स्थापनाइ. स. १५९२
मुख्य उद्देशरजपूत राजांचे मुख्य निवासस्थान
किल्ला बांधण्यासाठी वापरलेली सामग्रीलाल वाळू, खडक आणि संगमरवरी
किल्ल्याला भेट देण्याची वेळसकाळी ८ ते सायंकाळी ५.३०
किल्ल्यावरील ठिकाणेशिश महल, सुखमहल, दिवान ए आम, गणेश पोळ, राजवाडा आणि शीला देवी मंदिर

गुलाबी शहरातील आमेरचा अंबर किल्ला १६ व्या शतकामध्ये राजा माण सिंह यांनी बांधला आहे आणि हा किल्ला लाल वाळू आणि संगरावर याचा वापर करून बांधला आहे. अंबरचा हा किल्ला राजस्थान राज्यातील जयपूर शहरापासून ११ किलो मीटर अंतरावर असणाऱ्या आमेरच्या अरावली या पर्वत रांगेवर वसलेला आहे आणि या किल्ल्याची रचना ४ भागामध्ये विभागलेली आहे आणि त्यांची स्वतंत्र्य दरवाजे आहेत.

या किल्ल्याचे मुख्य प्रवेश दार म्हणजे सुरज पोल या प्रवेश दरवाज्यातून आपल्यला किल्ल्यामध्ये प्रवेश करावा लागतो. या किल्ल्यातील एक मुख्य आणि आकर्षित आकर्षण म्हणजे माऊथ तलाव त्याचबरोबर या किल्ल्यामध्ये शिश महल, सुखमहल, दिवान ए आम, गणेश पोळ आणि शीला देवी मंदिर. अंबर या किल्ल्याला अंबर पॅलेस म्हणून देखील ओळखले जात. या किल्ल्यामध्ये आपल्याला एक राजवाडा देखील पाहायला मिळतो जो पूर्वीच्या काळी महाराजांचे निवासस्थान म्हणून वापरले जायचे.

अंबर किल्ल्याचा इतिहास – Amer Fort History in Marathi

एकेकाळी मिनांच्या चंदा वंशावर राज्य करणारा राजा अलन सिंह हा आमेरवर पाय ठेवणारा पहिला राजा होता. सध्या अंबर किल्ला असणाऱ्या टेकडीवर आपला वाडा बांधला आणि नवीन शहरावर आणि तेथील प्रजेवर राज्य करू लागला. त्याने त्यावेळी या शहराचे नाव खोगोंगे असे ठेवले होते.

एका वृध्द स्त्रीने त्याच्या लहान मुलासोबत अलन सिंहाच्या खोगोंगे या शहरामध्ये आश्रय मागितला आणि त्याला त्याने परवानगी दिली. या स्त्रीचा मुलगा येथेच मोठा झाला आणि त्याचे नाव ढोला राय असे ठेवण्यात आले आणि मग त्याला दिल्लीला मीना वंशाचा वारसा वाढवण्यासाठी पाठवण्यात आले. त्यावेळी तो राजा अलन सिंह यांची परवानगी न घेता खोगोंगे या गावामध्ये काही सैन्य घेवून परत आला त्यामध्ये राजपूत देखील समाविष्ट होते.

त्यांनी सर्व मिनांच्या सैनिकांना ठार मारले. असे म्हंटले जाते कि कि मिनांनी दिवाळीच्या दिवशी पितृ तर्पण म्हणून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खास कर्मकांडाची हत्या केली होती त्यावेळी मिनानी पितृपत्र सदर करताना त्यांची सर्व शस्त्रे बाजूला ठेवण्याची प्रथा होती आणि या प्रथेबद्दल रजपुतांना माहित होती आणि याचाच फायदा घेवून राजपुतांनी हा वाडा आपल्या ताब्यात घेतला आणि खोगोंगे शहर देखील कच्छवाह राजपुतांच्या कडे गेले.  

कच्छवाह घराण्याचे राजा मान सिंह यांनी १६ व्या शतकामध्ये तेथे असणारा वाडा पाडू तेथे अंबर हा किल्ला बांधला. पुढे हा किल्ला राजा मानसिंग, उत्तराधिकारी जयसिंग यांच्या पुढाकाराने विकसित केला गेला. पुढील २ शतकांमध्ये मिर्झा राजा जयसिंग यांच्यासह विविध राजपुत महाराजांच्या कारकिर्दीत या किल्ल्याचे अनेक नुतनीकरण आणि सुधरणा करण्यात आल्या. हा किल्ला १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात पूर्ण झाला आणि इ. स. १७२७ मध्ये रजपूत महाराजांनी आपली राजधानी आमेर हून जयपूर ला हलवली.

किल्ल्यावर पाहण्यासारखी ठिकाणे 

  • गणेश पोळ:

गणेश पोळ हे किल्ल्यातील मोगल आणि रजपूत वास्तुकलेचे एक उत्तम उदाहरण आहे. इ. स. १६२१ ते इ. स. १६२७ मध्ये राज्य करणारे मिर्झा राजा जयसिंग यांनी गणेश पोळ बांधण्यामध्ये मोलाची कामगिरी केली आहे. गणेश पोळ म्हणजे हे एक राजवाड्यामध्ये प्रवेश करण्याचे दार आहे.

  • शिश महल :

शिश महल हे किल्ल्यामधी एक मुख्य आकर्षण आहे . शिश महालाच्या रचनेत दर्जेदार भिंतीचे बांधकाम आपल्यला पाहायला मिळते. शिश महल हि इमारत पूर्वीच्या काळामध्ये मेणबत्त्यांच्या प्रकाशामध्ये देखील चमकत होती.

  • जय मंदिर :

जय मंदिर देखील किल्ल्याचे एक मुख्य आकर्षण आहे आणि हे देखील रजपूत आणि मोगल यांच्या वास्तूशैलीचे मिश्रण आहे.

  • जादूचे फुल :

आपल्यला या किल्ल्यामध्ये संगमरवरी केलेली एक कलाकुसर पाहायला मिळेल ते म्हणजे जादूचे फुल.

  • दिवान ए आम :

दिवान ए आम एक त्या काळातले न्यायालय होते जेथे प्रजेचे प्रश्न सोडवले जायचे. हि इमारत १६ व्या शतकामध्ये बांधण्यात आली आणि या इमारतीवर मुगल आणि रजपूत संस्कृतीचे काही शिक्के पाहायला मिळतात.

  • दिवान ए खास :

या ठिकाणी त्याकाळातील रजपूत राजे आपल्यला जवळच्या व्यक्तीशी किवा खास व्यक्तीशी भेट होते.

  • शीला देवी मंदिर :

असे म्हंटले जाते कि राजा मानसिंग एका युध्दा मध्ये पराजित झाला त्यावेळी त्याने काली देवीची पूजा करण्यास सुरुवात केली आणि त्या काळातच त्याने हे मंदिर बांधले असावे. हे मंदिर माक्राना संगमरवरी पासून बनवले आहे.

  • दिलराम बाग :

आपल्याला या किल्ल्यावर दिलराम बाग पाहायला मिळते. हि बाग किल्ल्याच्या खालील बाजूस आहे किल्ल्यामध्ये आत प्रवेश दारातून गेल्यानंतर मुख्य किल्ल्यामध्ये जाताना या बागेच्या जवळून जावे लागते.

  • किल्ल्यामधील इतर ठिकाणे :

या किल्ल्यामध्ये अनेक सुंदर आणि महत्व पूर्ण इमारती आहेत आणि त्या म्हणजे सुखमहल, राजवाडा, जल मंदिर आणि चहर बाग.

अंबर किल्ल्याजवळील इतर पाहण्यासारखी ठिकाणे 

  • जगात शिरोमणी मंदिर
  • जयगड किल्ला
  • पन्ना मीना का कुंड
  • जल महल
  • शीतला देवी मंदिर
  • मन सागर तलाव
  • आमेर बाग

अंबर किल्ला फोटो:

amber fort information in marathi language
amber fort information in marathi language

अंबर किल्ल्यावर कसे जायचे ?

अंबर हा किल्ला राजस्थानमधील जयपूर या मुख्य शहरापासून ११ किलो मीटर आमेर या शहरामध्ये आहे. जर आपल्यला हा किल्ला पाहण्यासाठी यायचे असल्याला आपण पुणे, मुंबई, बेंगळूरू, चेन्नई, कोलकत्ता, औरंगाबाद आणि कोणत्याही ठिकाणाहून पहिल्यांदा आपल्यला रेल्वे किवा विमानने जयपूर शहरामध्ये यावे लागते. जयपूर या शहरामध्ये आल्या नंतर आपल्यला स्थानिक बस, टॅक्सी किवा रिक्षा पकडून किल्ल्यापर्यंत जावू शकतो.

प्रवेश शुल्क : अंबर हा किल्ला पाहण्यासाठी भारतीय पर्यटकांच्या कडून १०० रुपये शुल्क आकाराला जातो आणि जर किल्ला पाहायला येणारा पर्यटक विदेशी असेल तर त्याच्या कडून ५०० रुपये प्रवेश शुल्क आकाराला जातो.

वेळ

पहिली वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ५.३०

दुसरी वेळ : सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३०

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, अंबर किल्ला किंवा आमेर किल्ला amber fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. amber fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about amber fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही अंबर किल्ला किंवा आमेर किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या amber fort jaipur information in marathi (amer ka kila) माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!