Jaigad Fort Information in Marathi जयगड किल्ल्याची माहिती जयगड हा किल्ला एक ऐतिहासिक सागरी दुर्ग आहे जो रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. जयगडया किल्ल्याची बांधणी १६ व्या शतकामध्ये विजापूरच्या राजाने केली आहे पण हा किल्ला विजापूरचा राजा आपल्या ताब्यात फर काल ठेवू शकला नाही कारण कारण संगमेश्वरचे नाईक याने या किल्ल्यावर हल्ला करून जयगड हा किल्ला आपल्याल ताब्यात घेतला आणि किल्ल्यावर त्यांचे वर्चस्व फक्त २ ते ३ वर्ष राहू शकले. या किल्ल्यावर खूप चढाओढीच्या लढाया झाल्या कधी पोर्तुगीजांनी गडावर हल्ला केला तर कधी विजापूरमधून हल्ला झाला. जयगड हा किल्ला जलददुर्ग प्रकारातील आहे म्हणजे या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने समुद्र आहे.
जयगड किल्ला माहिती – Jaigad Fort Information in Marathi
किल्ल्याचे नाव | जयगड किल्ला |
स्थापना | १६ व्या शतकामध्ये |
ठिकाण | रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड या गावामध्ये हा किल्ला वसलेला आहे. |
प्रकार | जलदुर्ग |
समुद्र | अरबी समुद्र |
उंची | या किल्ल्याची उंची समुद्रसपाटी पासून ५५ मीटर आहे. |
एकूण क्षेत्रफळ | १२ एकर |
किल्ल्यावरील ठीकाणे | गणपती मंदिर, हनुमान मंदिर, बुरुज, महादरवाजा, जयबा स्मारक आणि ब्रिटीशांच्या काळातील इमारत. |
जयगड हा किल्ला विजापूरच्या सल्तनतला हा किल्ला पुन्हा कधी आपल्या ताब्यात घेता आला नाही. इ. स. १६९५ मध्ये ह्या किल्ल्यावर स्वराज्याचे पहिले सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या वर्चस्वा खाली हा किल्ला आला आणि त्यांनी या किल्ल्यावर खूप वर्ष राज्य केले परुंतु इ. स. १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.
- नक्की वाचा: तोरणा किल्ल्याची माहिती
जयगड किल्ल्याविषयी माहिती – information about in jaigad fort in marathi
जयगड हा किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड या गावामध्ये आहे आणि गणपतीपुळे ( जयगड पासून हा किल्ला १० ते १५ किलो मीटर अंतरावर आहे ) या प्रसिध्द देवस्थानापासून खूप जवळ आहे. हा किल्ला जलदुर्ग प्रकारातील असून या किल्ल्याच्या तिन्ही बाजूने पाणी आणि एका बाजून जमीन आहे. या किल्ल्याची उंची समुद्रसपाटी पासून ५५ मीटर इतकी आहे आणि हा किल्ला १२ एकर मध्ये विस्तारलेला आहे. जयगड या किल्ल्याचे मुख्यता दोन भागामध्ये विभागलेला आहे एक म्हणजे बालेकिल्ला आणि दुसरा पडकोट आणि या किल्ल्याला संरक्षक तटबंदी देखील आहे.
- नक्की वाचा: सिंहगड किल्ल्याची माहिती
मुख्य किल्ल्याला एकूण १४ बुरुज आहेत आणि आणि पडकोटाला एकूण १० बुरुज आहेत असे या किल्ल्यावर एकूण २४ मजबूत बुरुज आहेत. या किल्ल्यावर आपल्याला गणपती मंदिर, हनुमान मंदिर, बुरुज, महादरवाजा, जयबा स्मारक, ब्रिटीशांच्या काळातील इमारत या प्रकारची अनेक ठिकाणे आपल्याला किल्ल्यावर पाहायला मिळतात. या किल्ल्याला जयगाव किवा जयस्थी किल्ला या नावाने देखील ओळखले जाते.
जयगड किल्ल्याचा इतिहास – jaigad fort history in marathi
जयगड हा किल्ला १६ व्या शतकामध्ये विजापूर सल्तनतने बांधला पण हा किल्ला त्यांना फार वेळ टिकवता आला नाही आणि संमेश्वरमधील नाईक याने हा किल्ला ताब्यात घेतला त्यावेळी त्याने तेथी ८ गावे देखील आपल्या ताब्यात घेतला. त्यानंतर काही दिवसांनी पोर्तीगीजांनी आणि विजापूर सल्तनतने या किल्ल्यावर हल्ला केला पण त्यांना यश मिळाले नाही आणि संमेश्वरमधील नाईक यांनी या किल्ल्यावर आपले वर्चस्व कायम ठेवले. त्यानंतर हा प्रदेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्वाटचा एक भाग बनला आणि बालाजी विश्वनाथ पेशवे यांनी हा किल्ला इ. स. १६९५ मध्ये स्वराज्याचे पहिले सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात देण्यात आला. कान्होजी आंग्रे यांना खूप वर्ष हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये राखून ठेवला पण तिसऱ्या इंग्रज आणि मराठा युध्दामध्ये हा किल्ला इ. स. १८१८ मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गेला.
जयगड किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे
महादरवाजा :
महादरवाजा म्हणजे जयगड किल्ल्याचा मुख्य दरवाजा ज्या दरवाज्यामधून किल्ल्यामध्ये प्रवेश केला जातो. किल्ल्याचा मुख्य दरवाजा हा दोन बुरुजांच्या मध्ये आहे. हा दरवाजा आपल्यला सहसा दिसत नाही कारण तो दोन्ही बुरुजांच्या आतमध्ये लपवलेला आहे.
खंदक :
किल्ल्याचा समोर तसेच चारही बाजूने किल्ल्याला खंदक आहे जे पूर्वी पाणी साठवण्यासाठी वापरले जायचे. हे आपल्यला किल्ल्यामध्ये जाण्याअगोदर महादारवाज्या जवळ पाहायला मिळेल.
ध्वजस्तंभ :
किल्ल्यावर ज्यांचे राज्य आहे त्यांचा ध्वज फडकावण्यासाठी बनवलेला ध्वजस्तंभ आहे आणि या किल्ल्यावर देखील एका बुरुजावर ध्वजस्तंभ आपल्याला आजदेखील पाहायला मिळतो.
ब्रिटीशांच्या काळातील इमारत :
आपल्यला किल्ल्याच्या आतमध्ये गेल्यानंतर एक पडझड झालेली तीन मजली इमारत पाहायला मिळते ती म्हणजे ब्रिटीशांच्या काळातील इमारत त्या इमारतीचा ब्रिटीशांच्या काळामध्ये गेस्ट हाऊस म्हणून वापर केला जात होता.
गणपती मंदिर :
या किल्ल्यावर आपल्याला गणपती मंदिर पाहायला मिळते आणि या किल्ल्यावर हि वास्तू थोडी सुव्यवस्थित आपल्यला पाहायला मिळते.
जायबा स्मारक :
जयाबा स्मारक हे आपल्यला गणपतीच्या मंदिराच्या समोर पाहायला मिळते आणि असे म्हंटले जाते कि जयगड किल्ल्याचे नाव हे जयबा नावाच्या एका व्यक्तीवरून पडले आहे आणि त्यांचे छोटे स्मारक आपल्यला या किल्ल्यावर पाहायला मिळते.
बुरुज :
या किल्ल्यावर मुख्य किल्ल्याला १४ बुरुज आणि पडकोटाला १० बुरुज म्हणजे या किल्ल्याला एकूण २४ बुरुज आहेत.
- नक्की वाचा: प्रतापगड किल्ल्याची माहिती
जयगड किल्ल्याच्या काही अंतरावर असणारी प्रेक्षणीय स्थळे
- गणपती पुळे मंदिर
- जयगड लाईट हाऊस – jaigad lighthouse
- थिबाव पॉइंट
- पावस
- गणपती पुळे बीच
जयगड किल्ला फोटो:
या किल्ल्यावर कसे जायचे ?
रेल्वेमार्गे : जर तुम्हाला हा किल्ला पाहण्यासाठी रेल्वेने यायचे असेल तर तुम्हाला रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरावे लागते आणि तेथून रायगड पर्यंत टॅक्सीने जावे लागते.
रस्तामार्गे : आपण जर हा किल्ला पाहण्यासाठी खाजगी करणे आलो तर ते खूप सोयीस्कर होईल कारण आपण रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक बीच, किल्ले आणि इतर पर्यटन स्थळे पाहू शकतो.
टीप :
- जयगड हा किल्ला आपण सकाळी ८ ते संध्याकाळी ७ या वेळेमध्ये केव्हाही पाहू शकतो.
- हा किल्ला पाहण्यासाठी २ ते ३ तास लागतात.
- जयगड हा किल्ला पाहण्यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाहीत.
- जयगड किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची आणि जेवणाची सोय नाही त्यामुळे आपण सोबत जेवण आणि पाणी घेवून गेलो तर ते सोयीस्कर होईल.
- नक्की वाचा: जंजिरा किल्ल्याची माहिती
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच, जयगड किल्ला jaigad fort information in marathi language हा कसा आहे? कोठे आहे? त्याचा इतिहास काय आहे? तिथे पाहण्यासारखी ठिकाणे आणि तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. jaigad fort information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about jaigad fort in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही जयगड किल्ला विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या jaigad fort ratnagiri information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट