आवळा मराठी माहिती Amla Information in Marathi

amla information in marathi आवळा मराठी माहिती, बेरी या फळाच्या आकारासारखी अनेक फळे असतात आणि आवळा देखील बेरीच्या आकाराचा असतो आणि आज आपण या लेखामध्ये आवळा हा छोट्याश्या फळाविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. आवळा हे फळ हलक्या हिरव्या रंगाच्या अवरनासह असते आणि या फळाची त्वचा हि थोडी अर्धपारदर्शक असते आणि आतमध्ये ६ ते ८ फिकट पिवळ्या रंगाचे डाग असतात ज्यामुळे आवळा विभागला जातो. या फळाची चव हि आंबट आणि थोडीसी कटवट जरी असली तरी या फळाचे अनेक औषधी फायदे आहेत.

त्याचबरोबर या फळामध्ये ५ ते ६ बिया असतात आणि त्वचा थोडीशी कठीण असते आणि आतील मांस हे कुरकुरीत असते. आवळा किंवा ज्याला आपण गुझबेरी म्हणून देखील ओळखतो ते फळ भारतातील मूळ फळ आहे म्हणजेच या फळाची निर्मिती किंवा उगम हा भारतामध्येच झाला आणि हे फळ भारतामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

आवळा हे फळ उष्णकटीबंधीय फळ आहे म्हणजेच हे फळ उष्ण प्रदेशामध्ये पिकवले जाते आणि हे बाजारामध्ये थंडीमध्ये उपलब्ध असू शकते. आवळा या फळा गोड, आंबट, तुरट, कडू आणि तिखट अश्या अनेक वेगवेगळ्या चवींनी परिपूर्ण आहे आणि हे आपले मन आणि शरीराचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करतो. चला तर खाली आपण आवळा या फळाविषयी आणखीन माहिती जाणून घेवूया.

amla information in marathi
amla information in marathi

आवळा मराठी माहिती – Amla Information in Marathi

फळाचे नावआवळा
इंग्रजी नाव(इंडीयन गुझबेरी)  indian gooseberry
रंगहलका हिरवा रंग किंवा फिकट हिरवा रंग
आकारबेरीसारखा
मूळभारतीय फळ

आवळा फळ काय आहे – amla meaning in marathi

आवळा हे एक प्रकारचे लहान आकाराचे म्हणजेच बेरीच्या आकाराचे फळ आहे ज्याचा रंग हा फिकट हिरवा असतो आणि हे फळ जवळजवळ पारदर्शी असते. या फळाचे वरचे आवरण हे थोडे कठीण असते परंतु ते खाता येते आणि आतील मांस हे कुरकुरीत असते आणि या फळाची चव हि आंबट, तिखट, गोड, तुरट आणि कडू असते.

आवळा या फळाची वेगवेगळ्या भाषांच्यामधील नावे – different names in different laungauges

आवळा या फळाला वेगवेगळ्या भाषांच्यामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते आणि खाली आपण वेगवेगळी नावे पाहणार आहोत.

भाषानाव
मराठीआवळा (Indian Gooseberry in Marathi)
हिंदीअमला
इंग्रजीइंडियन गुझबेरी (Indian Gooseberry)
तेलगुउशिरी काया
कन्नडनेल्ली
तमिळनेल्लीकाई
संस्कृतअमलकी, तीष्यफळा, धात्री

आवळा या फळाचे फायदे – amla benefits in marathi

कोणत्याही फळामध्ये काही ना काही आयुर्वेदिक गुण असतात आणि तसेच आवळा या फळामध्ये देखील काही आयुर्वेदिक आणि औषधी गुणधर्म असतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी हे फळ खूप चांगले आहे. आपण खाली आवळा या फळाच्या सेवनाने होणारे काही आरोग्य फायदे काय काय आहेत ते पाहणार आहोत. चला तर आता आपण आवळा या फळाचे फायदे काय आहेत ते पाहूया.

  • जर एकद्या व्यक्तीला पित्ताचा त्रास होत असेल तर त्याने जेवणानंतर एक आवळा कँडी खाल्ली तर त्याचा पित्ताचा त्रास हा थोड्या प्रमाणात कमी होईल.
  • मधुमेह हा जास्त तणावामुळे होतो आणि जर तुम्हाला मधुमेह नियंत्रित करायचा असल्यास तुम्ही आवळा या फळाचा ज्यूस किंवा आवळा कँडी खावू शकता ज्यामध्ये व्हीटॅमीन सी आणि अॅटीऑक्सिडंट असते जे आपल्यामधील प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
  • आवळा या फळाच्या कोणत्याही प्रकारच्या सेवनामुळे म्हणजेच आवळा कँडी, आवळा ज्यूस, आवळा पावडर आणि इतर प्रकारच्या सेवनामुळे आपली पचन शक्ती सुधारण्यास आणि सुरळीत काम करण्यास मदत होते.
  • जर एखाद्या व्यक्तीला वजन कमी करायचे असेल तर त्या व्यक्तीला नियमितपणे कच्चा आवळा खाल्ला किंवा आवळ्याची पावडर कोमट पाण्यामध्ये मिक्स करून पिली तर त्या व्यक्तीचे वजन कमी होण्यास मदत होते.
  • आवळा ह्या फळाचा वापर करून तेल देखील तयार करतात आणि या तेलाचा वापर हा आपण केसांच्यासाठी देखील करू शकतो आणि यामुळे केस वाढीस मदत होते त्याचबरोबर केसांचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते.  
  • आवळ्याच्या सेवनामुळे आपले त्वचेचे आरोग्य देखील सुधारण्यास मदत होते.
  • आवळा या फळामध्ये टीऑक्सिडंटचे प्रमाण हे जास्त प्रमाणात असते आणि त्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे हे फळ उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी देखील मदत करते.

आवळा कँडी रेसिपी – amla candy recipe in marathi

आवळा या फळापासून अनेक पदार्थ बनवले जातात परंतु खाली आपण आवळा कँडी कशी बनवतात ते थोड्क्यात पाहणार आहोत.

आवळा कँडी रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients

  • १ किलो ताजे मोर आवळे.
  • १ किलो साखर.
  • अर्धी वाटी पिठी साखर.
  • पाणी (आवश्यकतेनुसार) (आवळे उकळण्यासाठी).

आवळा कँडी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make amla candy

  • आवळा कँडी बनवताना सर्वप्रथम आवळे स्वच्छ धुवून घ्या आणि मग ते एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये सर्व आवळे बुडतील इतके पाणी घाला आणि ते गॅसवर मोठ्या आचेवर ठेवा आणि त्याला एक उकळी आणा.
  • पाण्याला एक उकळी आली कि लगेच गॅस बंद करा आणि आवळे जास्त शिजू देवू नका नाही तर त्याच्या चांगल्या पाकळ्या निघू शकत नाहीत.
  • हे पाणी थोडे गार झाले कि आवळ्याच्या आपोआप पाकळ्या निघण्यास सुरुवात होईल आता त्यामधील पाणी काढून टाकून आवळ्याच्या पाकळ्या काढून घ्या आणि त्यामधील बिया काढून टाका.
  • आता या निघालेल्या आवळ्यांच्या पाकळ्यामध्ये आता १ किलो साखर घाला आणि ती त्यामध्ये चांगली मिक्स करून हवा बंद डब्यामध्ये झाकून तो डबा चार ते पाच दिवस तसाच ठेवा. जेणेकरून आवळ्याच्या पाकळ्यांमध्ये साखरेचा गोडपणा उतरेल.
  • आता चार ते पाच दिवसांनी यामध्ये झालेले पाणी गाळून घ्या आणि तो आवळा परातीमध्ये पातळ पसरून कडक उन्हामध्ये १० ते १५ दिवस वाळवा  ज्यामुळे तो कडक बनेल आणि जास्त काळ चांगला राहील.
  • मग तो चांगला वाळला कि त्यामध्ये अर्धी वाटी पिठी साखर घालून ती चांगली मिक्स करा आणि तो आवळा डब्यामध्ये पॅक करून ठेवा.
  • आणि तुम्हाला हवा तेंव्हा तो खावू शकता.

आवळा या फळामधील पोषक घटक – nutrition value

घटकप्रमाण ( प्रती १०० ग्रॅम )
फायबर४.३ ग्रॅम
कॅल्शियम२५ मि ग्रॅम
कार्बोहायड्रेट१० ग्रॅम
प्रथिने०.८० ग्रॅम
कॅलरीज४४ किलो कॅलरी
जस्त०.१२ मि ग्रॅम
पोटॅशियम१९८ मी ग्रॅम

आम्ही दिलेल्या amla information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आवळा मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या amla meaning in marathi या indian gooseberry in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about amla in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!