शिकाऊ कायदा माहिती Apprentice Act 1961 Pdf in Marathi

apprentice act 1961 pdf in marathi – apprentice information in marathi शिकाऊ कायदा माहिती आज आपण या लेखामध्ये अप्रेंटाईस अॅक्ट (Apprentice act) म्हणजेच शिकाऊ कायदा किंवा शिकाऊ अधिनियम या विषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. अप्रेंटाईस अॅक्ट म्हणजेच शिकाऊ कायदा हा शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षणाचे नियमन आणि नियंत्रण आणि त्यांच्याशी संबधित अनेक गोष्टींच्यासाठी या कायद्यामध्ये तरतुदी आहेत. शिकाऊ कायदा किंवा शिकाऊ अधिनियम हा १९६१ चा कायदा आहे आणि ह्या कायद्याचा मुख्य उद्देश हा तांत्रिकदृष्ट्या पात्र असणाऱ्या व्यक्तींना विविध व्यवसायामध्ये व्यवहारिक प्रशिक्षण देणे हा आहे.

या कायद्यानुसार अभियांत्रिकी, नॉन इंजिनीरिंग, तंत्रज्ञान किंवा कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी हा नियम लागू आहे. नियोक्त्याने शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण सुविधा देणे आवश्यक आहे. अनेक नियोक्ते एकत्र येणे आणि ते स्वताहून एकत्र येतातात किंवा मान्यताप्राप्त एजन्सीद्वारे एकत्र येतात आणि मग त्यांना प्रशिक्षण दिले जाते. शिकाऊ कायदा हा क्लस्टर मध्ये कार्यरत असलेल्या छोट्या आणि सूक्ष्म कंपन्यांना संयुक्तपणे कामावर घेण्यासाठी आणि सामायीकरण आधारावर शिकाऊ नियुक्त करण्याची परवानगी देतो. चला तर आता आपण या कायद्याविषयी आणखीन खाली माहिती घेवूया.

apprentice act 1961 pdf in marathi
apprentice act 1961 pdf in marathi

शिकाऊ कायदा माहिती – Apprentice Act 1961 Pdf in Marathi

कायद्याचे नावअप्रेंटाईस अॅक्ट (Apprentice act)
केंव्हा लागू झालाहा कायदा १९६१ मध्ये लागू झाला
कायद्यातील सुधारणा५ डिसेंबर २०१४
कोणी लागू केलाभारत सरकारने

शिकाऊ कायदा म्हणजे काय -act apprentice meaning in marathi

शिकाऊ कायदा हा कंपनीमध्ये असणाऱ्या शिकाऊ उमेदवारांच्या प्रशिक्षणाचे नियमन करण्यासाठी, नियंत्रण करण्यासाठी आणि प्रशिक्षणासंबधित तरतुदी या कायद्यामध्ये आहे आणि हा कायदा १९६१ मध्ये लागू केला आणि २०१४ मध्ये या कायद्यामध्ये आणखीन सुधारणा करण्यात आल्या होत्या.

शिकाऊ व्यक्ती कोण असते ?

शिकाऊ व्यक्ती म्हणजे हि अशी व्यक्ती आहे जी विशिष्ठ उद्योगासाठी एका संबधीत कंपनी मध्ये प्रशिक्षण घेत असते.

शिकाऊ कायद्याविषयी महत्वाची माहिती – apprentice information in marathi

शिकाऊ कायद्याला मराठीमध्ये शिकाऊ अधिनियम किंवा प्रशिक्षणार्थी कायदा म्हणून ओळखले जाते आणि हा कायदा १९६१ मध्ये कंपनी मध्ये शिकाऊ व्यक्तीला प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचे नियमन, नियंत्रण आणि प्रशिक्षणाच्या बाबतीत तरतुदी या कायद्यामध्ये दिल्या आहेत. शिकाऊ कायदा हा उद्योगामध्ये सिध्दांतिक आणि व्यावहारिक प्रशिक्षणाद्वारे नवीन कार्यशक्तीला क्षमता देणे, कार्यशक्ती सुधारणे आणि अभिरुची सुधारण्यासाठी मदत करत असतो.

या कायद्यानुसार कंपनीमध्ये नवीन अभियंत्याला प्रत्यक्ष कामाचे वातावरण उपलब्ध करून देण्याचे तरतूद देखील या कायद्यामध्ये आहे. हा कायदा जरी १९६१ मध्ये सुरु झाला असला तरी ह्या कायद्यामध्ये २०१४ मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या होत्या. अश्या प्रकारे शिकाऊ कायदा किंवा प्रशिक्षणार्थी कायदा म्हणतात.

शिकाऊ कायद्यामधील सुधारणा

शिकाऊ कायदा हा १९६१ मध्ये लागू केला आणि हा तांत्रिकदृष्ट्या पात्र असणाऱ्या व्यक्तींना विविध व्यवसायामध्ये व्यवहारिक प्रशिक्षण देण्यासाठी सुरु केला. परंतु २०१४ मध्ये या कायद्यामध्ये काही सुधारणा करता आल्या या सुधारणा राष्ट्रपतींची संमत्ती मिळाल्या नंतर करण्यात आल्या म्हणजेच ५ डिसेंबर २०१४ रोजी यामध्ये सुधारणा करण्यात आल्या त्या आता आपण खाली पाहणार आहोत.

  • या सुधारणेमध्ये नियोक्त्याला पर्यायी व्यवहार करण्याची परवानगी देण्यात आली.
  • विकसित केल्या जाणाऱ्या साईट वर तपशील इलेक्ट्रॉनिक दाखल करणे.
  • शिकाऊ कायद्याच्या तरतुदीनुसार अभियांत्रिकी नसलेली क्षेत्रे समाविष्ट आहेत.
  • जर नियोक्ता ५०० हून अधिक कामगारांना काम देत असेल तर ज्यांनी कोणतेही संस्थात्मक प्रशिक्षण घेतले नाही अशा व्यक्तींच्यासाठी किंवा कामगारांसाठी मुलभूत प्रशिक्षणाची तरतूद करणे ळूप गरजेचे आहे.
  • कामा करण्याचे तास तसेच कामगाराला दिल्या जाणाऱ्या रजा ह्या नियोक्त्याच्या निर्णयावर ठरलेल्या असतील.

शिकाऊ कायदा लागू होण्यासाठी पात्रता निकष – eiligibility 

शिकाऊ कायद्यानुसार त्या व्यक्तीला पात्र होण्यासाठी काही पात्रता निकष पूर्ण करावे लागतात ते आता आपण खाली पाहणार आहोत.

  • शिकाऊ व्यक्ती हा शारीरिकदृष्ट्या तंदुरस्त असावा.
  • त्या संबधित व्यक्तीचे वय हे १४ पेक्षा जास्त असावे आणि हा व्यक्ती शक्यतो १८ वय वर्ष पूर्ण झालेला असावा.
  • अनुसूची २ ( कलम ३ ) अंतर्गत निर्दिष्ट केलेल्या शिक्षणाच्या मानकांची त्या संबधीत व्यक्तीने पूर्तता केली पाहिजे.

शिकाऊ कायद्यामधील तरतुदी

शिकाऊ कायद्यामध्ये काही तरतुदी आहेत त्या आपण खाली पाहूया.

  • शिकाऊ व्यक्तीच्या अशा अपयशासाठी शिकाऊ किंवा त्यांच्या पालकाने नियोक्त्याला प्रशिक्षनाच्या एका महीण्याच्या स्टायपेंडचा खर्च परत करावा ज्यासाठी तो पात्र आहे.
  • शिकाऊ उमेदवारांच्या बाबतीत, शिकाऊ प्रशिक्षणाचा कालावधी राज्य शिकाऊ परिषदेने निर्दिष्ट केल्याप्रमाणे असेल.
  • कराराच्या अटी व शर्ती पूर्ण करण्यात नियोक्ता अयशस्वी झाल्यास नियोक्ता शिकाऊ व्यक्तीला स्टायपेंड देईल ज्यासाठी तो भरपाई म्हणून पात्र असेल.
  • जे शिकाऊ व्यक्ती दररोज किमान चार तास प्रशिक्षण घेतात त्यांना दरमहिना स्टायपेंडचा दर उपकलम (१) च्या खंड (अ), (ब) आणि ( सी ) मध्ये नमूद केलेल्या दरांच्या ५० टक्के असेल.
  • राज्य प्रशिक्षणार्थी परिषदेने नियुक्त केलेल्या ट्रेडमधील प्रशिक्षण कालावधी यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या शिकाऊ उमेदवारासाठी राज्य व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेद्वारे किंवा कोणत्याही परीक्षेसाठी उपस्थित राहू शकतात.
  • कंत्राटी किंवा दैनंदिन कर्मचाऱ्यांच्यासह आस्थापनेतील कर्मचाऱ्यांच्या एकूण संख्याबळाच्या किमान २.५ टक्के आणि कमाल २५ टक्के मर्यादेपेक्षा ट्रेड अप्रेंटीसना नियुक्त केले पाहिजे.

आम्ही दिलेल्या apprentice act 1961 pdf in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर शिकाऊ कायदा माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या apprentice act meaning in Marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि apprentice information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!