माहिती तंत्रज्ञान व त्याचे फायदे Information Technology in Marathi

Information Technology in Marathi माहिती तंत्रज्ञान म्हणजे नेमक काय ? एकविसाव्या शतकामध्ये माहिती तंत्रज्ञान हा आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. technology meaning in marathi माहिती तंत्रज्ञान म्हणजे जगासाठी वरदान सिद्ध होत आहे. लहान मुलांपासून ते वयस्कर आजी आजोबांपर्यंत सुद्धा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक जागी तंत्रज्ञानाचे उपकरणांचा वापर करत होत आहे. माहिती तंत्रज्ञानाने मानवी जीवन पूर्णपणे बदलून टाकले आहे. आजच्या काळात माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग बर्‍याच ठिकाणी केला जातो.

जसे की मोबाईल, इंटरनेट, व्यवसाय आजचा कोरोना सारख्या जागतिक महामारी च्या दिवसात माहिती तंत्रज्ञानाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रस्त्यांवरची वर्दळ कमी झाली, शाळा महाविद्यालय बंद पडली, परीक्षा रद्द झाल्या पण या सर्वांमध्ये माहिती तंत्रज्ञानामुळे काही गोष्टी सुरळीत पार पडल्या.

शाळा बंद झाल्या तरी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना शिक्षण दिले जात आहे. ऑनलाइन परीक्षा घेतल्या जात आहेत. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शासन-प्रशासन त्यांची जबाबदारी, कर्तव्य व्यवस्थित पार पाडत आहेत. माहिती तंत्रज्ञानामुळे गोष्टी सुलभ होण्यास मदत होत आहे.

information technology in marathi
information technology in marathi

तर आज आपण जाणून घेऊया,

अनुक्रमणिका hide
1 माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय? – Information Technology in Marathi

माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय? – Information Technology in Marathi

technology information in marathi माहिती तंत्रज्ञान म्हणजे इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी हे असे क्षेत्र आहे, ज्याच्या मध्ये संगणक किंवा इतर भौतिक उपकरणांचा समावेश माहिती तयार करण्यासाठी, माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी, माहितीवर प्रक्रिया करण्यासाठी आणि ती माहिती साठविण्यासाठी केला जातो.

माहिती तंत्रज्ञानाच्या technology in marathi अंतर्गत आपण संगणक दूरसंचार, दूरध्वनी यांचा अभ्यास करतो आणि त्यांचा वापर माहिती तयार करून ठेवणे, माहिती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी केला जातो. संगणक वापरून केलेले किंवा संगणकाद्वारे केलेले कार्य आणि इंटरनेट, माहिती व्यवस्थापन हे सर्व माहिती तंत्रज्ञानाचे भाग आहेत.

माहिती तंत्रज्ञानामुळे आज आपल्याला घरात बसून जगभरातील माहिती मिळत असते. तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आले आहे. तासन्- तास वेळ लागणारी कामे आपण काही सेकंदात करत आहोत. माहिती तंत्रज्ञानामुळे आपले आयुष्य ॲडव्हान्स बनले आहे. आजच्या काळात मानवी जीवनावर माहिती तंत्रज्ञान चा सर्वात जास्त प्रभाव झालेला आहे.

तंत्रज्ञानाचे प्रकार – The Types of Technology

यांत्रिकी – Mechanical.
इलेक्ट्रॉनिक – Electronic.
औद्योगिक आणि उत्पादन – Industrial and manufacturing.
वैद्यकीय – Medical.
संप्रेषणे – Communications

माहिती तंत्रज्ञान उद्योग :

माहिती तंत्रज्ञान हे खूप मोठे क्षेत्र आहे. ज्यामध्ये वेगवेगळे असे बरेच विभाग आहेत. जसे की कॉम्प्युटर हार्डवेअर टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी, नेटवर्क टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि ह्यूमन रिसोर्स. माहिती तंत्रज्ञानाचा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मानवी संसाधने.

तंत्रज्ञान हे मानवाने मानवांसाठी विकसित केले आहे. मानवच नसेल तर हे तंत्रज्ञान विकसित कोण करणार? आणि कोण वापरणार? म्हणून सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे मानवी संसाधने. सिस्टिम चालवण्यासाठी सिस्टीम analytics, प्रोग्रामर, चिफ इन्फॉर्मेशन ऑफिसर या सर्वांचा खूप महत्त्वाचा आणि मोठा वाटा आहे.

माहिती तंत्रज्ञान विभागांमध्ये आज करोडो लोक काम करत आहेत हे  आपल्या संगणक माहिती ला सुरक्षित करण्यासाठी काम करत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये फायदाही आणि तोटाही असतो तसेच माहिती-तंत्रज्ञानाचे सुद्धा फायदे आणि तोटे आहेत.

माहिती तंत्रज्ञानाचे फायदे :

तंत्रज्ञानाचा शिक्षणात उपयोग:

सध्या जागतिक महामारी च्या काळात तंत्रज्ञानाचा शिक्षणात काय उपयोग आहे हे सांगायची गरज नाही. आज सर्व विद्यार्थी शिक्षक शाळेत जाऊ शकत नाही पण शिक्षण कुठेही थांबलेले नाही. शिक्षणामध्ये माहिती-तंत्रज्ञानाच्या उपयोगासाठी, वापरासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञानामुळे शिक्षण व्यवस्था चांगली विकसित होत आहे.

आता फळ्यावर शिकवण्याची पद्धत मागे पडत आहे. विद्यार्थ्यांना संगणक तंत्रज्ञान, इंटरनेट यांच्या द्वारे चांगले प्रशिक्षण देऊन सक्षम केले जात आहे. आधी सर्व पुस्तके हार्ड कॉपी च्या स्वरुपात विकत घ्यावी लागत होती आणि सर्वांचीच पुस्तके विकत घ्यायची ऐपत नसल्यामुळे काही मुले पुस्तकांना मुकत होती.

परंतु आता इंटरनेटवर ही पुस्तके काही प्रमाणात कमी किमतीमध्ये किंवा मोफत सॉफ्ट कॉपी मध्ये, पीडीएफ फाईल मध्ये उपलब्ध होत आहेत. विद्यार्थ्यांना महत्वपूर्ण नोट्स मिळताहेत. प्रत्येकांना पैशाच्या अभावी कोचिंग क्लासेस लावता येत नाहीत. परंतु तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना काही क्लासेस मोफत उपलब्ध होत आहेत.

यूट्यूब वर या क्लासेसचा विद्यार्थी फायदा घेत आहेत. तसेच वेगवेगळे ॲप्स उपलब्ध आहेत ज्याच्या माध्यमातून विद्यार्थी शिकत आहेत. हे व्हिडिओ लेक्चर ते कधीही, कोठेही, केव्हाही त्यांच्या सोयीप्रमाणे पाहू शकतात. महत्वाचे म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी इतर कोणाच्याही मदतीशिवाय कोणत्याही विषयाचा अभ्यास करू शकतात, शिकू शकतात. माहिती तंत्रज्ञान हे शिक्षणासाठी एक वरदान बनले आहे.

दळण -वळणा मध्ये माहिती तंत्रज्ञानाचे उपयोग:

आज आपण तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण जगात कधीही आणि कुठेही माहितीचे आदान-प्रदान करू शकतो. तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आले आहे. आज आपण फोन  कॉलच्या माध्यमातून जगभरात कोठेही संपर्क साधू शकतो. व्हिडिओ कॉल च्या माध्यमातून कितीही दूर असलो तरीही एकमेकांना पाहू शकतो.

अवकाश तंत्रज्ञानामध्ये माहिती तंत्रज्ञानाचे उपयोग:

अवकाश तंत्रज्ञानामध्ये जो काही विकास होत आहे तो सर्व माहिती तंत्रज्ञानाचा परिणाम आहे.माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने आज अमेरिकेच्या नासा आणि भारतातील इस्रो यांसारख्या वेगवेगळ्या देशांतील वेगवेगळ्या संशोधन संस्थांनी अवकाशात त्यांचे उपग्रह स्थापित करण्यात यश मिळवले आहे.चांद्रयान आणि मंगळयान मोहिमेमध्ये माहिती तंत्रज्ञान हे खूप महत्त्वाचे आहे.

प्रवासामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग:

आधी आपल्याला प्रवासाला निघायचे असेल तर रेल्वे कार्यालय, बस कार्यालय, एअरपोर्टवर चौकशीसाठी, तिकीटासाठी रांगा लावल्या लागत असत. आज घरबसल्या फक्त एका क्लिक वर आपल्याला तिकीट किंवा पास मिळतो. गाडी कधी सुटणार,तिकिटाचे दर किती, किती वेळ लागणार हे सर्व घरात बसून कळते. हे सर्व शक्य झाले आहे माहिती तंत्रज्ञानामुळे.

बँकिंग मध्ये माहिती तंत्रज्ञान:

बँकेतून पैसे काढायचे असतील किंवा कुणालाही ट्रान्सफर करायचे असतील तर आधी बँकेत रांगेत थांबावे लागत असे. परंतु आता इंटरनेट बँकिंग, गुगल पे, फोन पे यामुळे आपल्याला घरबसल्या पैसे भरता येतात ट्रान्सफर करता येतात.

व्यवसायामध्ये माहिती तंत्रज्ञान:

तंत्रज्ञानामुळे सर्व प्रकारचे व्यवसायांना बराच फायदा होत आहे. माहिती तंत्रज्ञानामुळे वेळेची आणि पैशाची बचत होते. बऱ्याच कंपन्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना सुविधा पुरवत आहेत. ॲमेझॉन, फ्लिपकार्ड यासारख्या कंपन्या जगभरात व्यवसाय करत आहेत. ऑनलाइन शॉपिंग होत आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून काही कंपन्या जेवण सुद्धा घरपोच करत आहेत.

अर्थव्यवस्थेमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग:

कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेच्या  वाढीमध्ये तंत्रज्ञानाचे महत्त्वाचे योगदान आहे.तंत्रज्ञानामुळे बऱ्याच कंपन्या उद्योग करत आहेत. ते बर्‍याच लोकांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच नवीन रोजगार सुद्धा विकसित होत आहेत.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स:

माहिती तंत्रज्ञाना मुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स द्वारे माणसांसारखी कामे करणारी स्मार्ट मशीन्स विकसित झाली आहेत.

ऑटो मोबाईल मध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग:

ऑटोमोबाईल क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचे योगदान खूप मोठे आहे. या क्षेत्रात रोबोट किंवा ऑटोमॅटिक मशीन चा उपयोग कार्य करण्यासाठी केला जातो. रोबोट हे कोणतेही कार्य वेगाने करू शकतो. म्हणून या तंत्रज्ञानामुळे अवघड काम सोपे झाले आहे.

वैद्यकीय क्षेत्र :

वैद्यकीय क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाने बऱ्याच मशीन तयार केले आहेत. या प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने जटील ऑपरेशन सुद्धा सुलभ केले जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या किंवा रोगांची  तपासणी या तंत्राद्वारे विकसित झाले आहे.

कृषी व्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग:

भारत हा कृषिप्रधान देश मानला जातो. शेतामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अल्प कालावधीत काम झाल्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्याच कामाचा फायदा होतो. शेती करण्यासाठी आपण ट्रॅक्टर, हार्वेस्टर, सिंचन प्रणाली वापरत आहोत. या तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात बराच फायदा होत आहे. तसेच आता फोन मध्ये असे ॲप्स किंवा अशा काही वेबसाइट आहेत, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांसाठी मार्गदर्शन मिळते. बाजारातील पिकांच्या किमती समजतात.

तंत्रज्ञानाचे जसे फायदे बघितले तसेच तोटेही जाणून घेऊ:

आज काल सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. ज्याप्रमाणे याचा वापर करून आपण जनजागृती करू शकतो तसा त्याचा वापर नकारात्मक गोष्टी पसरवण्यासाठी सुद्धा होतो. काही लोकांच्या चुकीमुळे जातीय दंगली वाढल्याच्या घटनाही घडल्या आहेत. एका चुकीमुळे बऱ्याच लोकांची गोपनीय माहिती सार्वजनिक होऊ शकते.

ही माहिती चुकीचे लोकांपर्यंत पोहोचल्यास ते लोक चुकीचा वापर करू शकतात.
ज्याप्रमाणे आपण वेळ वाचवण्यासाठी इंटरनेट बँकिंगचा वापर करतो त्याच वेळी हॅकर हे इंटरनेट बँकिंगचा  वापर करून बँक खात्यातून पैसे काढून घेऊ शकतात.

तंत्रज्ञानामुळे आपले आयुष्य जितके सोयीस्कर झाले आहे तितकीच आरोग्य बिघडवून मध्ये सुद्धा तंत्रज्ञानाने मोठे योगदान दिले आहे. तासंतास संगणकासमोर किंवा मोबाईल घेऊन बसल्यामुळे तणाव, नैराश्य वाढत आहे.लहान मुलांमधील लठ्ठपणा ची समस्या भेडसावत आहे. लोकांमध्ये सुस्तपणा येत आहे लोकांच्या आरोग्याशी संबंधित दुष्परिणाम  वाढताहेत.

निष्कर्ष:

तंत्रज्ञानाने आपले काम सोपे केले आहे. परंतु त्यामध्ये सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. माहिती तंत्रज्ञानाचा आपल्या मेंदूवर चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचा प्रभाव पडतो. आपण तंत्रज्ञानाचा वापर कसा करतो यावर सगळे अवलंबून आहे. जर तो संतुलित पद्धतीने केला तर तो खूप फायदेशीर आहे. जर आपण त्याच्या मर्यादा ओलांडल्या तर तंत्रज्ञान आपल्यासाठी हानीकारक ठरू शकते.

आम्ही दिलेल्या information technology in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर “माहिती तंत्रज्ञान व त्याचे फायदे” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information technology information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि mobile shap ki vardan in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण technology meaning in marathi या लेखाचा वापर it in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!