आट्यापाट्या खेळाची माहिती Atya Patya Game Information in Marathi

Atya Patya Game Information in Marathi आट्या पाट्या खेळाविषयी माहिती आट्यापाट्या खेळाची माहिती पूर्वीच्या काळामध्ये लहान मुले वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे आणि आम्ही देखील लहान पणी वेगवेगळ्या प्रकारचे गावाजाडील खेळ खेळत होतो ज्या मध्ये गोट्या, लपंडाव, लंगडी यासारखे खेळ खेळले जात होते आणि त्याचबरोबर आट्या पाट्या हा खेळ देखील पूर्वीच्या काळी खूप खेळला जाता होता आणि लोकप्रिय देखील होता. आट्या पाट्या हा भारतातील एक प्राचीन पारंपारिक खेळ आहे,  जो प्रामुख्याने ग्रामीण भागात खेळला जातो आणि हा खेळ महाराष्ट्र राज्यामध्ये अधिक लोकप्रिय आहे. या खेळाला फेंट्सचा खेळ असेही संबोधले जाते.

आट्या पाट्या हा असा खेळ आहे जो दोन संघाच्या मध्ये खेळला जातो आणि हे संघ एकमेकाविरुद्ध खेळत असताना एका संघातील खेळाडू आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी पुढे जात असते आणि त्याच्या विरुद्ध संघातील खेळाडू त्याला ठराविक ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करत असतो.

परंतु ध्येय पूर्ण करण्यासाठी खेळत असणाऱ्या खेळाडूला त्याच्या विरुद्ध खेळणाऱ्या खेळाडूला हुलकावणी देवून त्याच्या हातून निसटून पुढे जायचे असते आणि या सर्व प्रकीयेवरून असे समजते कि हा खेळ एकमेकांच्या पाठी लागणे ( शिवाशिवी ), पाठ शिवने, एकाद्या खेळाडूला अडवून ठेवणे किंवा त्याची कोंडी करणे तसेच हुलकावणी या प्रकारच्या प्रक्रियांचा असतो.

atya patya game information in marathi language
atya patya game information in marathi language

आट्यापाट्या खेळाची माहिती – Atya Patya Game Information in Marathi

खेळाचे नावआट्या पाट्या खेळ
संघ२ संघ
खेळाडूप्रत्येकी संघामध्ये ९ खेळाडू
मैदानाचा आकार११ फुट रुंद आणि ९० फुट लांब असते.

आट्या पाट्या म्हणजे काय ?                             

आट्या पाट्या या खेळामध्ये एक खेळाडू दुसऱ्या खेळाडूला अडवण्याचा तसेच त्याला स्पर्श करून खेळामधून बाद करण्याचा प्रयत्न करत असतो तर विरुद्ध खेलालाणारा खेळाडू त्या खेळाडूला चुकवून किंवा त्याला हुलकावून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो.

आट्या पाट्या या खेळाचा इतिहास – history of atya patya game in marathi

आट्या पाट्या या खेळाचा प्रथम प्रचार आणि आयोजन पुणे येथील डेक्कन जिमखाना मार्फत केले होते. त्यांनी या खेळाचे नियम तयार करून या खेळाचे सामने सामने आयोजित केले गेले. त्यानंतर हिंद विजय जिमखाना जो बडोदा या शहरामध्ये आहे खेळाच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन केले आणि खेळाच्या प्रचारासाठी स्पर्धांचे आयोजन केले.

त्याचबरोबर अखिल महाराष्ट्र शारिरिक शिक्षण मंडळाने खेळाच्या विकासासाठी आणि विभागीय स्पर्धा आयोजित करण्यासाठी मुख्य प्रयत्न केले होते आणि या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यातील खेळाडूंनी देखील सहभाग घेतला. मग त्यानंतर आशियाई खेळांच्या वेळी इ.स १९८२ मध्ये आट्या पाट्या फेडरेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली.

आट्या पाट्या या खेळाचे मैदान – atya patya game ground measurement

आट्या पाट्या हा खेळ मैदानी खेळ असल्यामुळे हा खेळ मैदानावर खेळला जातो आणि या खेळाच्या मैदानाची विशिष्ट प्रकारे रचना केलेली असते. या खेळाच्या मैदानाचा आकार ११ फुट रुंद आणि ९० फुट लांब असते आणि या खेळामध्ये एक उभी पाटी असते जी ९० फुट लांब असते आणि त्याचा पाटीवर आडव्या ९ पाट्या असतात त्या केळाच्या मैदानच्या रुंदी एवढ्या असतात.

या मैदानावरील उभ्या पाटीला सुरपाटी म्हणून ओळखले जाते आणि मैदानावरील आडव्या पाट्यांना संरक्षक पाट्या म्हणतात. या खेळामध्ये खेळ ज्या पाटीपासून सुरु होतो त्या पाटीला कपाळपाटी म्हणतात आणि ज्या ठिकाणी खेळ संपतो त्या पाटीला लोणपाटी म्हणतात. मध्यवर्ती उभी पाटी (सुर-पाटी) प्रत्येक ९ पाट्यांना समान भागांमध्ये विभागते तसेच या खेळाच्या मैदानाभोवती १० फूट मोकळी जागा असावी.

खेळातील संघ आणि संघातील खेळाडूंची संख्या – teams and players 

आट्या पाट्या हा असा खेळ आहे जो दोन संघाच्या मध्ये खेळला जातो आणि या दोन संघामध्ये प्रत्येकी ९ खेळाडू असतात.

आट्या पाट्या हा खेळ कसा खेळला जातो – how to play atya patya game 

या खेळामध्ये २ संघ एकमेका विरुद्ध खेळतात आणि प्रत्येक संघामध्ये ९ खेळाडू असतात एक संघ हल्ला करणारा असतो आणि एक संघ बचाव करणारा असतो. कोणता संघ बचाव करणार आणि कोणता संघ हल्ला करणार हे ओलीसुखी टकून ठरवले जाते. या खेळामध्ये उभी एक मोठी पाटी असते आणि त्यावर आडव्या ९ पाट्या असतात या ९ पाट्यांवर बचावकार्य करणाऱ्या संघाचे खेळाडू उभे असतात आणि दुसऱ्या संघातील हल्ला करणारे २ खेळाडू कपाळपाटी म्हणजेच सुरुवातीच्या पाटीजवळ उभे असतात.

एकदा खेळाला सुरुवात झाली कि हल्ला करणारे खेळाडू मैदानावरील सर्व पाट्या ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत असतात पण बचाव कार्य करणारे खेळाडू त्यांना स्पर्श करून किंवा अडवून बाद करण्याचा प्रयत्न करत असतात पण हल्ला करणाऱ्या खेळाडूंनी जर त्यांच्या हातून निसटून जावून लोणपाटी ओलांडली तर त्यांचे गुण वाढतात आणि खेळाडू बाद होत नाही तो परत खेळण्यास पात्र ठरतो.

आट्या पाट्या या खेळाचे नियम – rules 

  • आट्या पाट्या या खेळामध्ये चार डावांचा समावेश आहे, प्रत्येक डावाचा कालावधी ७ मिनिटांचा असतो.
  • प्रत्येक डावाच्या शेवटी ५ मिनिटांचा मध्यांतर असतो किंवा ५ मिनिटांची विश्रांतीची वेळ दिलेली असते.
  • जे पाट्या ओलांडण्याचा प्रयत्न करतात त्यांना हल्लेखोर म्हणतात
  • प्रत्येक संघात ९ खेळाडू असतात आणि प्रत्येक खेळात २ डाव असतात.
  • बचावकर्ते प्रत्येक पाटीवर समोरील खंदकाकडे तोंड करून उभे राहतील जेणे करून त्यंना हल्ला करण्यास येणाऱ्या खेळाडूला रीखता येयील.
  • हल्ला करणाऱ्या खेळाडूने जर सर्व पाट्या ओलांडल्या की लोना गोल झाला असे म्हणतात.
  • नाबाद असलेले सर्व हल्लेखोर समोरच्या पाटीवर ( कपाळपाटी ) जातील आणि पुन्हा ते आपला डाव चालू करतील म्हणजेच हल्ला करतील.
  • २ डावांमध्ये कोणता पक्ष अधिक गुण मिळवतो तो खेळ जिंकतो.

सध्या झालेल्या आट्या पाट्या स्पर्धा 

भटकळ आट्या पाट्या असोसिएशन आणि कर्नाटक आट्या पाट्या असोसिएशन दावणगेरे यांनी संयुक्तपणे २०१३ मध्ये भारतातील कर्नाटक राज्यातील भटकळ येथे राष्ट्रीय स्तरावर आट्या पाट्या स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

आम्ही दिलेल्या atya patya game information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आट्यापाट्या खेळाची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या atya patya game information in marathi wikipedia या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about atya patya game in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये history of atya patya game in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

4 thoughts on “आट्यापाट्या खेळाची माहिती Atya Patya Game Information in Marathi”

  1. आसाम मधील आमच्या गावात (नं 2 पार्वतीपुर, डाकघर मेरबिल, जिल्हा लखिमपुर, असम-784160) चहा कामगारांच्या जनजातीतील मुलांमध्ये हाच खेळ थोड्या क्रूड पध्दतीने खेळला जातो. वर वर्णन केल्याप्रमाणेच सर्व खेळ होतो पण नऊ ऐवजी सहा आडव्या पट्ट्या असतात (कारण कदाचित जागा अपूरी पडते) आणि दोन्ही संघातील खेळाडूंची संख्या उपलब्धतेनुसार कमी जास्त होते.
    हा खेळ मुलामुलींना इतका आवडतो कि ते तासन् तास तहानभूक विसरून खेळत राहतात. खेळातला उत्साह बघत रहावा असा असतो.

    उत्तर
  2. खुप सुंदर माहिती
    मला ह्या खेळाच्या प्रशिक्षण कुठे मिळेल

    उत्तर

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!