“ मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा ”
Maharashtra Information in Marathi – Information About Maharashtra in Marathi महाराष्ट्र राज्याची माहिती महाराष्ट्र राज्य बद्दल माहिती महाराष्ट्र भूमी हि एक मंगल आणि पवित्र भूमी मानली जाते कारण या भूमीवर संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव या सारखे संत होऊन गेले तसेच महाराष्ट्र भूमीवर मोठ मोठे शूरवीर होऊन गेले त्यामधील एक महाराष्ट्रातील एक प्रसिध्द आणि लोकप्रिय शूरवीर ज्यांनी आपले स्वताचे साम्राज्य उभे केले आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते.
त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सण अगदी आनंदाने साजरे केले जातात आणि येथे आपली भारतीय संस्कृती टिकवून ठेवली जाते. महाराष्ट्र भूमी हि अनेक कला गुणांनी समृध्द आहे असे मानले जाते कारण येथूनच अनेक अभिनेते, राजकारणी, क्रिकेटपटू तयार झाले आहेते. अश्या या मंगल आणि पवित्र असणाऱ्या महाराष्ट्र भूमी विषयी आज आपण या लेखामध्ये काही माहिती पाहणार आहोत.
आपला भारत देश हा अनेक (२८ राज्य) राज्यांनी विभागलेला आहे आणि त्यामधील एक महत्वाचे राज्य म्हणजे महाराष्ट्र आणि हे देशाच्या पश्चिमेकडील क्षेत्रफळामध्ये तिसऱ्या क्रमांकावर असणारे एक राज्य आहे. जे लोकसंख्येमध्ये भारतातील दुसऱ्या क्रमांकावरचे राज्य आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मी १९६० मध्ये झाली असली तरी या राज्याचा एक भला मोठा इतिहास आहे.
कारण या भूमीवरच छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टीळक, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महान व्यक्तींचा जन्म झाला. महाराष्ट्र राज्य हे क्षेत्रफळामध्ये भारतातील तिसऱ्या क्रमांकावरील राज्य असून या राज्याचे संपूर्ण क्षेत्रफळ ३,०७,७१३ चौरस किलो मीटर इतके आणि या राज्याची लोकसंख्या जवळ जवळ ११ कोटी इतकी आहे.
तसेच या राज्याला एक सुंदर आणि निसर्गरम्य अरबी समुद्राची किनारपट्टी लाभलेली आहे जी ७२० किलो मीटर इतकी आहे. महाराष्ट्राच्या मधल्या काळामध्ये सातवाहन, मौर्य, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, पोर्तुर्गीज, मुघल, निजाम आणि मराठ्यांनी राज्य केले.
महाराष्ट्र राज्याची माहिती – Maharashtra Information in Marathi
नाव | महाराष्ट्र |
प्रकार | राज्य |
महाराष्ट्राचे क्षेत्रफळ | ३,०७,७१३ चौरस किलो मीटर |
महाराष्ट्राची लोकसंख्या | महाराष्ट्र या राज्याची लोकसंख्या जवळ जवळ ११ कोटी इतकी आहे आणि हे राज्य लोकसंखेमध्ये भारतातील दुसऱ्या क्रमांकावरचे राज्य आहे. |
समुद्र किनारपट्टी | जी ७२० किलो मीटर |
महाराष्ट्राची राजधानी | मुंबई |
महाराष्ट्राचा इतिहास – History of Maharashtra in Marathi
ई. पू. च्या दुसऱ्या शतकात महाराष्ट्राने आपल्या पहिल्या बौद्ध लेण्यांच्या बांधकामासह नोंदवलेल्या इतिहासात प्रवेश केला. त्यानंतर असे म्हटले जाते कि सातव्या शतकामध्ये हुआन त्सांग या चीनी प्रवाशाच्या खात्यामध्ये महाराष्ट्र नाव प्रथम दिसले होते. महाराष्ट्राच्या मधल्या काळामध्ये सातवाहन, मौर्य, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव, पोर्तुर्गीज, मुघल, निजाम आणि मराठ्यांनी राज्य केले.
महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि महान योध्दा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांविरुध्द संघर्ष करून महाराष्ट्रातील बराचसा भाग आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये मोलाची कामगिरी बजावून महाराष्ट्रातील एक लोकप्रिय योध्दा बनले.
तसेच त्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे वेगळे मराठा साम्राज्य स्थापन करून ते मोठे बनवले. शिवाजी महाराज हे महान योद्धा आणि महाराष्ट्रातील तसेच भारतातील उत्कृष्ट शासकांपैकी एक होते म्हणून त्यांना मराठा इतिहासातील सर्वोच्च स्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा छत्रपती संभाजी महाराज गाडीवर आले.
त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ताराराणी, बालाजी विश्वनाथ आणि पेशवे वंश राज्य करणारे राजकर्ते होऊन गेले. भारताच्या स्वातंत्र्या नंतर महाराष्ट्राची निर्मिती १ मे १९६० मध्ये झाली आणि त्यावेळी महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई बनली आणि मग महाराष्ट्र राज्य हे दक्षिण ते उत्तर भारतातील सांस्कृतिक देवाणघेवाणीचे मुख्य माध्यम बनले.
महाराष्ट्राची स्वयंपाक पध्दती
आपण ज्या भागामध्ये जातो त्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या पध्दतीने बनवलेले अन्न खायला मिळते तसेच महाराष्ट्राची देखील एक वेगळी आणि अनोखी स्वयंपाक पध्दती आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये रोजच्या आहारामध्ये तांदूळ, गहू, ज्वारी, भाज्या आणि फळे यांचा समावेश असतो.
महाराष्ट्र राज्यातील बहुतेक कुटुंबामध्ये जो स्वयंपाक केला जातो तो कमी मसालेदार आणि गोड असतो. महाराष्ट्रातील प्रसिध्द डिशेश वडा पाव, मिसळ पाव, पाव भजी, श्रीखंड आणि पूरण पोळी ह्या आहेत. जे लोक बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रामध्ये येतात ते आवर्जून या डिशेश चा लाभ घेतात.
पुरण पोळी
पुरण पोळी हा महाराष्ट्राचा एक प्रसिध्द डिश आहे. गव्हाच्या मळलेल्या पिठातील त्यातील छोटासा गोळा घेवून त्यामध्ये पुरण (पुरण हे शिजवलेली चना डाळ, गुळ, वेलची पावडर) भरले जाते. आणि ती पोळी लाटली जाते आणि ती तेल लावून तव्यावर भाजली जाते. पुरण पोळी हि महाराष्ट्राची खूप जुनी डिश आहे आणि ती आज देखील महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय आहे आणि हि शक्यतो सण साजरा करताना केली जाते.
वडा पाव
वडा पाव हा महाराष्ट्रामध्ये आवडीने खाल्ली जाणारी एक डिश आहे. यामध्ये बटाट्याची भाजी करून त्याचे छोटे छोटे गोळे करून ते डाळीच्या पिठाच्या बॅटर मध्ये बुडवले जातात आणि ते तेलामध्ये तळले जातात आणि पाव सोबत खाल्ले जातात.
मिसळ पाव
सर्वात प्रसिद्ध महाराष्ट्रीयन पदार्थांपैकी एक जे या राज्याच्या स्ट्रीट फूडचा राजा मानला जातो. मिसळ हि एक आमटी असते जी मोड आलेल्या कडधान्यांपासून बनवली जाते आणि ती आमटी फरसाण, ब्रेड, कांदा, कोथिंबीर आणि लिंबू सोबत दिली जाते आणि त्याच्या सोबत खायला ब्रेड दिला जातो.
पाव भाजी
पाव भाजी हि एक महाराष्ट्रातील प्रसिध्द पदार्थांपैकी आहे जी महाराष्ट्रामध्ये अगदी चवीने खाल्ली जाते.
मोदक
गणपती बाप्पांची आवडती आणि महाराष्ट्रातील अजून एक पारंपारिक डिश म्हणजे मोदक. मोदक हे गूळ मिसळलेल्या किसलेल्या नारळापासून बनवले जाते आणि ते तांदळाच्या पानामध्ये ते सारण घालून त्याला मोदकाचा आकार दिला जातो आणि ते उकडले जाते.
महाराष्ट्रामध्ये साजरे केले जाणारे सण
महाराष्ट्र राज्यामध्ये आपली संस्कृती जपण्यासाठी वेगवेगळे सण साजरे केले जातात ते म्हणजे नाग पंचमी, बैल पोळा, गणेश चतुर्थी, दिवाळी, गोकुळ अष्टमी, गुढी पाडवा, नारळी पौर्णिमा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती.
गणेश जयंती
गणेश जयंती हा महाराष्ट्रामध्ये तसेच सर्वत्र भारतामध्ये अगदी उत्साहने साजरा केला जाणारा सण आहे. या सणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ५ किंवा ६ दिवस पुजली जाते आणि बाप्पांना मोदक, खीर, पुरण पोळी यासारख्या गोड पदार्थांचा नैवैद्य डकवला जातो आणि त्याची ५ ते ६ दिवस रोज पूजा करून दुर्वा घालून त्यांची रोज आरती केली जाते.
नाग पंचमी
महाराष्ट्र राज्यामध्ये विविध असे सण अगदी आनंदाने आणि गुण्यागोविंदाने साजरे केले जातात त्यामधील एक महत्वाचा सण म्हणजे नाग पंचमी या दिवशी विशेषता लोक नागाची पूजा करतात. हिंदू पौराणिक कथांमध्ये नागाला विशेष स्थान आहे. या दिवशी नागांना आणि इतर सापांना दूध दिले जाते आणि दिवे लावून, मंदिरे फुलांनी सजवून आणि यज्ञ आणि मिठाई अर्पण करून त्यांची पूजा केली जाते.
नाग पंचमी हा सण साजरा केला जातो कारण श्रावण महिन्यात प्रचंड पाऊस पडतो. त्यामुळे या काळात, साप बऱ्याचदा त्यांच्या बुऱ्यातून / बिळातून बाहेर पडतात कारण पावसामुळे त्यांचे बुर्ज / बीळ पाण्याने भरतात. ते स्वतःला वाचवण्यासाठी मानवांचा जीव घेऊ शकतात. हे टाळण्यासाठी नाग पंचमीचा सण साजरा केला जातो.
हिंदू पौराणिक कथेनुसार नागदेवतेसह भगवान शिव यांची पूजा केल्याने एखाद्याच्या आयुष्यातील सर्व त्रास दूर होतात आणि या विविध श्रद्धा आणि कथांमुळे साप देखील देवांप्रमाणे आदरणीय आहेत.
बैल पोळा
कृषिप्रधान संस्कृतीतील एक महत्वाचा सण म्हणजे बैल पोळा आणि बैल पोळा हा सण आपल्यासाठी सैदैव कष्ट करणाऱ्या मुक्या प्राण्याबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी साजरा केला जाणारा एक सण आहे. जो महाराष्ट्रासह अनेक राज्यामध्ये केला जातो. महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
या सणाच्या आधल्या दिवशी बैलांना नदीवर किवा ओढ्यावर नेले जाते आणि त्यांना स्वच्छ अंघोळ घातली जाते आणि मग त्यांच्या पाठीवर नक्षीची झूल घालतात, डोक्याला बाशिंग, गळ्यात फुलांचा हार, पायात चांदीचे किवा करदोड्याचे तोडे घालतात.
तसेच पुरणपोळीचा नैवैध दाखवला जातो आणि त्यांना ज्वारीचा किचडा हि करून घातला जातो आणि खेड्यामध्ये आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात तसेच बैल जोड्यांचे वाजंत्री, ढोल, ताशे वाजवत गावभर मिरवणूक हि काढली जाते.
दिवाळी
दिवाळी हा एक भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये साजरा केला जाणारा एक मुख्य आणि मोठा सण आहे. दिवाळी हा सण दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो कारण या सणामध्ये घरामध्ये तसेच दारात दिव्यांची आणि पंक्त्यांची झगमगाट केली जाते. तसेच दारामध्ये रंगीबेरंगी रांगोळी काढली जाते तसेच घर आकाश दिव्यांनी आणि फुलांच्या माळांनी सजवले जाते.
दिवाळी हा सण चार दिवसांचा असतो त्यामधील पहिला दिवस दिवाळी पाहट आणि अभ्यंग स्नान करून साजरा केला जातो त्यानंतर दिवाळी पाडवा आणि भाऊबीज साजरी केली जाते. दिवाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फराळाचे पदार्थ देखली केले जातात जसे कि चिवडा, लाडू, चकली, करंज्या इ.
गुढी पाडवा
गुढी पाडवा हा सण महाराष्ट्रामध्ये साजरा केल्या जाणाऱ्या सणांपैकी एक आहे. हा सण शक्यतो मराठी लोक साजरा करतात आणि गुढी पाडवा सण मराठी वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० मध्ये झाला होता. महाराष्ट्रातील एक प्रसिध्द आणि लोकप्रिय शूरवीर ज्यांनी आपले स्वताचे साम्राज्य उभे केले आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना ओळखले जाते. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मोठी लोकप्रियता असल्यामुळे त्यांचा जन्म दिवसही मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
महाराष्ट्रामध्ये बोलली जाणारी भाषा
महाराष्ट्राची अधिकृत भाषा हि जरी मराठी असली तरी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जातीचे आणि धर्माचे लोक राहत असल्यामुळे तेथे अनेक भाषा बोलल्या जातात. महाराष्ट्रामध्ये इतर भाषांमध्ये हिंदी, इंग्लिश आणि गुजराती या सारख्या इतर भाष्या बोलल्या जातात. महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य लोक बहुभाषिक आहेत आणि सहसा मराठी आणि हिंदी दोन्ही भाषा बोलतात.
महाराष्ट्रातील लोकनृत्य आणि संगीत
महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती खूप मोठी आहे. त्यामुळे येथे पोवाडा नृत्यप्रकार सदर केले जातात जे मराठा शासक शिवाजी महाराजांचे कर्तृत्व दर्शवितो. महाराष्ट्राचे लोकसंगीत आणि नृत्य म्हणजे लावणी नृत्य, कोळी, पोवाडा, बंजारा आणि होळी नृत्य हे आहेत. लावणी हा नृत्य प्रकार महाराष्ट्रातील एक लोकप्रिय नृत्य प्रकार आहे.
महाराष्ट्र राज्यातील चित्रपट उद्योग
भारतातील सर्वात मोठी film industry हि महाराष्ट्र राज्यामध्ये आहे कारण अमिताभ बच्चन, सलमान खान, दीपिका पदुकोन, रणवीर सिंग, अमीर खाण, आलिया भट्ट, वरून धवन, सिध्दार्थ मल्होत्रा, कियारा अडवाणी, प्रियांका चोप्रा, करीना कपूर या सारखे film industry प्रसिध्द असणारे कलाकार महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मुंबई शहरामध्ये राहतात.
हे हिंदी, मराठी आणि इंग्रजी प्रेक्षकामध्ये लोकप्रिय आहे. त्याचबरोबर मराठी film industry देखील कलाकार महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मुंबई शहरामध्ये राहतात.
महाराष्ट्रातील प्रसिध्द प्रेक्षणीय स्थळे
पुणे आणि मुंबई पासून जवळचा असणारे लोणावळा हे शहर विकेंड साठी एक सुंदर ठिकाण आहे. लोणावळा या शहरामध्ये आपण निसर्ग रम्य परिसराचा अनानाद लुटू शकतो. या शहरामध्ये वॉटर पार्क, डेला अॅडव्हेंचर पार्क, लोहगड आणि वलवण धरण हे सर्वात प्रसिद्ध पर्यटकांचे आकर्षण आहे.
महाबळेश्वर
महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वोत्तम हिल स्टेशन आहे आणि महाबळेश्वर हे सह्याद्री डोंगररागांवर वसलेले आहे आणि समुद्रसपाटी पासून याचे अंतर ४५०० फुट इतके उंच आहे. महाबळेश्वरला प्रेक्षणीय स्थळांचा “बिंदू” असे म्हटले जाते, कारण ते बहुतेक पर्वतांच शेवट आहे. नयनरम्य सौंदर्य आणि ताजेतवाने वातावरणासाठी चांगले असणारे महाबळेश्वर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात वसलेले एक सुंदर हिल स्टेशन आहे.
हे हिरव्यागार जंगलांसह मैदानाचे मोहक दृश्य देते जे नेत्रदीपक आणि आश्चर्यकारक दिसते. उन्हाळ्यात आणि ख्रिसमस आणि दिवाळीच्या सुट्टीत हिल स्टेशनवर खूप गर्दी असते. येथे ब्रिटीश काळात बांधलेले असंख्य भव्य वाडे आजही राजांचे स्मारक म्हणून उभे आहेत. तसेच विदेशी हिरवाई, सुंदर बाग आणि श्वासोच्छ्वास घेणारे दृश्य पाहून पर्यटक भारावून जातात.
गणपतीपुळे
गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील प्रसिध्द प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे. गणपती पुळे हा परिसर समुद्रकिनारपट्टी व्यापलेला आहे त्यामुळे हा भाग नैसर्गिक सौंदर्याने नटलेला आहे. गणपतीपुळे येथे समुद्र किणाऱ्यावर एक गणपतीचे मंदिर आहे जे प्रेक्षणीय स्थळामधील एक लोकप्रिय मंदिर आहे.
रत्नागिरी
रत्नागिरी हे महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावरील एक बंदर शहर आहे. हे मुंबई या शहरापासून ३५० किलो मीटर अंतरावर आहे आणि पुणे शहरापासून ३०० किलो मीटर अंतरावर आहे. रत्नागिरी हे शहर सह्याद्रि डोंगर रांगांनी वेढलेले आहे आणि पर्यटकांच्यासाठी एक सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे. या ठिकाणी समुद्र किनाऱ्याव्यतिरिक्त अनेक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.
जसे कि विजय दुर्ग किल्ला, रत्नदुर्ग किल्ला, जयगड किल्ला, गणपतीपुळे, पावस मंदिर, मांडवी बीच आणि गणेशघुले बीच. तसेच रत्नागिरी हे शहर आंबा ह्या फळासाठी प्रसिध्द आहे. कारण ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंबे पिकवले जातात. रत्नागिरी हाफूस हा आंबा भारतामध्ये तसेच आपल्या देशाच्या बाहेर देखील लोकप्रिय आहे.
कोल्हापूर
कोल्हापूर हे एक महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचे आणि प्रसिध्द शहर आहे. कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले एक शहर आहे.
महाराष्ट्रातील लोकप्रिय किल्ले – Maharashtratil Kille
महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि महान योध्दा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघालांविरुध्द संघर्ष करून महाराष्ट्रातील बराचसा भाग आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता. या मध्ये अनेक किल्ले होते. जे आजही पहिले कि छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महाराष्ट्रातील इतिहासाची आठवण करून देतात.
शिवनेरी किल्ला
संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला यामुळे या किल्ल्याला इतिहासामध्ये आणि आत्ताही खूप महत्त्वाचे स्थान आहे. या किल्ल्याचे बांधकाम १७ व्या शतकामध्ये यादवांनी नाणेघाट डोंगरावर सुमारे ३५०० फुट उंचीचा हा किल्ला बांधला होता.
डोंगराच्या पोटामध्ये लेणी आणि त्याच्यावर किल्ला अशी या गडाची बांधणी केली होती. हा किल्ला ३०० मीटर उंच टेकडीवर बांधलेला आहे. ज्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी ओढ आहे त्यांना हा किल्ला आजही पाहता येतो.
प्रतापगड किल्ला
प्रतापगड हा किल्ला महाराष्ट्रमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आहे. हा किल्ला समुद्र सपाटी पासून १००० मीटर उंच बांधला आहे आणि या किल्ल्याची उंची ३५५६ फुट इतकी आहे. हा किल्ला आंबेनळी घाटाजवळील महाबळेश्वर गावाजवळ आहे. प्रतापगड हा किल्ला मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि भारतातील वीर योध्दा छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६५६ मध्ये बांधला.
पन्हाळा किल्ला
पन्हाळा हा किल्ला कोल्हापूर पासून २० किलो मीटर अंतरावर असणारा हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारातील आहे आणि या किल्ल्याची उंची ४०४० फुट इतकी आहे. पन्हाळा हा एकमेव किल्ला आहे जो सुवैवास्थित आहे. या गडावर आपल्याला सज्जाकोठी, अंबर खाना, संभाजी मंदिर, तीन दरवाजा, सोमेश्वर मंदिर, सोमाळे तलाव, गांधार बावडी ज्याला अंदर बाव असे देखील म्हंटले जाते, पराशर गुहा, राजदिंडी, धर्मकोठी, रेडे महाल, महाराणी ताराबाई यांचा वाडा यासारक्या इमारती आणि ठिकाणे पाहायला मिळतात.
पन्हाळागड हा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामध्ये आहे. हा किल्ला कोल्हापूर पासून २० किलो मीटर अंतरावर आहे. कोल्हापूर हे पन्हाळगडापासून जवळ असल्यामुळे आपण पन्हाळा गडावर जाण्यासाठी आपण कोल्हापुरातून पन्हाळा बसने जावू शकतो किवा टॅक्सीने जावू शकतो.
जंजिरा किल्ला
महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर गेले ५०० वर्षापासून अरबी समुद्राच्या लाठा झेलत असलेला एक आकर्षक आणि अजेय असा किल्ला म्हणजे जंजिरा किल्ला. हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड ताल्याक्यामधील राजपुरी गावाजवळून ३ ते ४ किलोमीटरच्या अंतरावर हा किल्ला आहे. या किल्ल्याच्या थोड्याच अंतरावर अजून एक किल्ला आहे.
तो म्हणजे पद्मदुर्ग जलदुर्ग किल्ला जो छत्रपती संभाजी राजांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी बांधला होता. महाराष्ट्रातल्या अनेक किल्ल्यावर जशी शिल्प आहेत तसेच या किल्ल्यावर देखील आहेत आणि या शिल्पांना शाराबाची शिल्प म्हणतात.
हि शिल्प अशी होती कि वाघाच्या तोंडामध्ये आणि पायामध्ये हत्ती पकडले आहेत आणि शिल्पे अमर्याद सागरी सत्तेचे प्रतिक दर्शवितात. या किल्ल्यामध्ये आपल्याला दर्या दरवाजा, गायमुख तोफ, भुयारी मार्ग, गोड्या पाण्यातील तलाव पाहायला मिळतो.
रायगड किल्ला
रायगड हा किल्ला महाराष्ट्रमधील रायगड जिल्ह्यातील महाड येथे दख्खनच्या डोंगरावर विस्तारलेला आहे. या किल्ल्याची खासियत म्हणजे या किल्ल्यावरील अनेक वास्तू आणि बांधकाम छत्रपती शिवाजी महाराजांनी विकसित केली आहेत. रायगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील महाड या गावामध्ये सह्याद्रीच्या डोंगर रांगेमध्ये वसलेला आहे आणि हा किल्ला महाडपासून २५ किलो मीटर अंतरावर आहे.
या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून २७०० फुट होती. या किल्ल्यावर चढण्यासाठी जवळ जवळ १४०० पायऱ्या आहेत आणि या किल्ल्याला प्राचीन काळी रायरी म्हणून ओळखले जात होते.
रायगड या किल्ल्यावरील पाहण्यासारखी ठिकाणे म्हणजे महादरवाजा, नाना दरवाजा, मेणा दरवाजा, बाले किल्ला, वाघ दरवाजा, नगारखाना दरवाजा, पालखी दरवाजा, जगदीश्वर मंदिर, शिरकाई मंदिर, पाचाड जिजाबाई वाडा, हत्ती तलाव, महाराजांची समाधी, राजसभा, राजभवन, टकमक टोक, राणीवसा, धान्याचे कोठार आणि बाजारपेठ. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला होता.
विशाळगड किल्ला
विशाळगड हा किल्ला महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यामध्ये अंबा घाटाच्या जवळ मुख्य सह्याद्रीच्या पर्वत रांगेला लागून विशाळगड किल्ला वसलेला आहे. विशाळगड हा किल्ला समुद्र सपाटीपासून १०२१ मीटर उंच आहे. विशाळगड हा किल्ला कोल्हापूर मधून ८० किलो मीटर आहे.
विशाळगड हा नावाप्रमाणेच विशाळ आहे. हा किल्ला अनेक ऐतिहासिक प्रसंगांचा साक्षीदार आहे. राजवाडा, पावन खिंड, गोलाकार विहीर, बाजी प्रभू देशपांडे समाधी, भगवंतेश्वर मंदिर, भुयारी मार्ग आणि टकमक टोक हि किल्ल्यावरील ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
महाराष्ट्रातील मोठी शहरे
अ. क्र | शहराचे नाव | क्षेत्रफळ | लोकसंख्या |
१ | मुंबई | ११३५ चौरस किलो मीटर | १,८३,९४,९०० |
२ | पुणे | ६६९ चौरस किलो मीटर | ५०,५७,७०९ |
३ | नाशिक | ३२१ चौरस किलो मीटर | १५,६१, ८०९ |
४ | वसई विरार | ३८० चौरस किलो मीटर | १२,२२,३९० |
५ | नागपूर | २२९ चौरस किलो मीटर | २४,९७,८७० |
६ | औरंगाबाद | १४८ चौरस किलो मीटर | ११,९३,१६७ |
७ | सोलापूर | १७८ चौरस किलो मीटर | ९,५१,५५८ |
८ | अमरावती | १२१ चौरस किलो मीटर | ६,४७,०५७ |
९ | कोल्हापूर | ६७ चौरस किलो मीटर | ५,६१,८३७ |
१० | सांगली | १२० चौरस किलो मीटर | ५,१३,९६१ |
११ | जालना | ८१ चौरस किलो मीटर | २,८५,५७७ |
महाराष्ट्र विषयी महत्वाची माहिती – Information of Maharashtra in Marathi
महाराष्ट्राचा जनक कोणाला मानले जाते ?
महाराष्ट्राचे जनक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मानले जाते कारण महाराष्ट्रातील एक लोकप्रिय आणि महान योध्दा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुघलांविरुध्द संघर्ष करून महाराष्ट्रातील बराचसा भाग आपल्या स्वराज्यामध्ये सामील करून घेतला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रामध्ये मोलाची कामगिरी बजावून महाराष्ट्रातील एक लोकप्रिय योध्दा बनले तसेच त्यांनी महाराष्ट्रामध्ये मराठ्यांचे वेगळे मराठा साम्राज्य स्थापन करून ते मोठे बनवले. शिवाजी महाराज हे महान योद्धा आणि महाराष्ट्रातील तसेच भारतातील उत्कृष्ट शासकांपैकी एक होते म्हणून त्यांना मराठा इतिहासातील सर्वोच्च स्थान आहे.
असे म्हटले जाते कि सातव्या शतकामध्ये हुआन त्सांग या चीनी प्रवाशाच्या खात्यामध्ये महाराष्ट्र नाव प्रथम दिसले होते आणि या भूमीला महाराष्ट्र हे नाव त्यानेच दिले असे म्हंटले जाते.
महाराष्ट्र राज्य हे श्रीमंत का आहे ?
महाराष्ट्र राज्य हे क्षेत्रफळामध्ये भारतातील तिसऱ्या क्रमांकावरील राज्य आहे आणि ह्या देश अनेक कला गुणांनी समृध्द आहे त्यामुळे येथे उत्पन्नासाठी अनेक मार्ग आहेत. तसेच महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे औद्योगिक राज्य आहे. जे राष्ट्रीय औद्योगिक उत्पादनाच्या २० टक्के योगदान देते. या मोठ्या औद्योगिकारणामुळे महाराष्ट्र राज्याचे उत्पन्न जास्त आहे आणि हे एक श्रीमंत राज्य मानले जाते.
महाराष्ट्र राज्याविषयी अनोखी तथ्ये
- असे म्हटले जाते कि सातव्या शतकामध्ये हुआन त्सांग या चीनी प्रवाशाच्या खात्यामध्ये महाराष्ट्र नाव प्रथम दिसले होते.
- छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्राचे जनक मानले जाते.
- भारताच्या स्वातंत्र्या नंतर महाराष्ट्राची निर्मिती १ मे १९६० मध्ये झाली आणि त्यावेळी महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई बनली.
- महाराष्ट्र राज्य हे भारतामधील क्षेत्रफळामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि लोकसंखेमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील राज्य आहे.
- महाराष्ट्र या राज्याची लोकसंख्या जवळ जवळ ११ कोटी इतकी आहे आणि हे राज्य लोकसंखेमध्ये भारतातील दुसऱ्या क्रमांकावरचे राज्य आहे.
- महाराष्ट्र भूमी हि संतांची भूमी म्हणून ओळखले जाते कारण या भूमीवर संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव या सारखे संत होऊन गेले.
आम्ही दिलेल्या Maharashtra Information in Marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर महाराष्ट्र राज्याची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या History of Maharashtra in Marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि Information of Maharashtra in Marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Information About Maharashtra in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट