बी फार्मसी म्हणजे काय B Pharmacy Information in Marathi

b pharmacy information in marathi – b pharmacy meaning in marathi बी फार्मसी म्हणजे काय, सध्या विद्यार्थी आपले करिअर चांगले घडवण्यासाठी एक चांगल्या कोर्सच्या किंवा शिक्षणाच्या शोधात असतात आणि तसाच फार्मसी हा देखील एक चांगला कोर्स आहे जो बारावीचे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याला करता येतो आणि आज आपण या लेखामध्ये फार्मसी विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. फार्मसी हा एक शिक्षणाचा प्रकार आहे आणि विज्ञान शाखेतून १२ वी चे शिक्षण झालेला कोणताही विद्यार्थी फार्मसीचे शिक्षण पूर्ण करू शकतो.

फार्मसी हे केवळ औषधाचे दुकान चालवण्यासाठीची पदवी नाही तर हा एक प्रकारचा डिप्लोमा कोर्स आहे ज्यामध्ये साठवणूक, वितरण आणि व्यवस्थापन या सारख्या अनेक औषधांच्या विषयी आणि औषधोपचाराविषयी शिकवले जाते आणि त्याचबरोबर या अभ्यासक्रमामध्ये औषध, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांचा देखील समावेश आहे.

फार्मसी हि पदवी मिळवण्याचा मुलभूत हेतू हा मानवतेच्या फायद्यासाठी औषधे आणि फार्मास्युटिकल्स तयार करण्याच्या प्रक्रियेचे आकलन करणे. चला तर खाली आपण फार्मसी विषयी आणखीन माहिती पाहूया.

b pharmacy information in marathi
b pharmacy information in marathi

बी फार्मसी म्हणजे काय – B Pharmacy Information in Marathi

फार्मसी करण्यासाठी पात्रता निकष – eiligibility

जर एखाद्या विद्यार्थ्याला कोणताही कोर्स करायचा असेल तर त्या व्यक्तीला त्या संबधित संस्थेने ठरवलेले काही पात्रता निकष पार पाडावे लागतात तरच त्या व्यक्तीला त्या संस्थेमध्ये प्रवेश मिळतो आणि तसेच जर एखाद्या विद्यार्थ्याला फार्मसी कोर्स करायचा असल्यास त्या संबधित विद्यार्थ्याला त्या संबधित संस्थेमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि ते कोणकोणते आहेत ते खिल आपण पाहणार आहोत.

 • जर एखाद्या विद्यार्थ्याला फार्मसी कोर्स करायचा असेल आणि तो बी फार्मसी, डी फार्मसी किंवा एम फार्मसी असो त्या विद्यार्थ्याला त्याचे १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे.
 • त्या संबधित विद्यार्थ्याने १२ वीचे शिक्षण तर उतीर्ण झालेले असले पाहिजेच परंतु त्याने १२ वीचे शिक्षण विज्ञान शाखेतून म्हणजेच रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित हे विषय घेऊन पूर्ण केलेलं असावे.
 • त्या विद्यार्थ्याला १२ वी विज्ञान शाखेमध्ये कमीत कमी ५५ टक्के पेक्षा अधिक गुण मिळालेले असावे आणि त्याने १२ वीचे शिक्षण एका मान्यताप्रपात विद्यापीठातुन केलेलं असावे.

फार्मसी मध्ये असणारे अभ्यासक्रमाचे विषय – syllabus

खाली आपण फार्मसी या कोर्समध्ये शिकवले जाणारे विषय कोणकोणते असतात ते पाहणार आहोत. चला तर मग पाहूया फार्मसी मधील अभ्यासक्रमाचे विषय.

 • मानवी शरीरविज्ञान.
 • उपचारात्मक गणित.
 • औषधी रसायनशास्त्र.
 • फार्मा विपणन व्यवस्थापन.
 • मानवी शारीरशास्त्र.
 • कॉस्मेटिक सायन्स.
 • जीवशास्त्र.
 • संभाषण कौशल्य.
 • सेंद्रिय रसायनशास्त्र.
 • हर्बल औषध तंत्रज्ञान.
 • फार्मास्यूटिक्स मायक्रोबायोलॉजी.
 • औषध निर्माण शास्त्र.
 • औषध वनस्पतीचे गुणवत्ता नियंत्रण आणि मानकीकरण.
 • सेल आणि आण्विक जीवशास्त्र.
 • हर्बल औषध तंत्रज्ञान.
 • भौतिकशास्त्र फार्मास्युटिकल.
 • फार्मसी सराव

फार्मसी कोर्सचे प्रकार – types

 बी फार्मसी (बॅचलर ऑफ फार्मसी)

बॅचलर ऑफ फार्मसी हा एक पदवीपूर्व अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये फार्मसीचा सराव करण्यासाठी पुरेसे ज्ञान आणि काही कौशल्ये प्रधान करते. विद्यार्थ्यांना उद्योग संबधित ज्ञान प्रदान करण्यासाठी या अभ्यासक्रमात मानवी शरीर रचना, गणित, जैवरसायनशास्त्र, फार्मास्युटिकल जैवतंत्रज्ञान आणि शरीर विज्ञान या सारख्या गोष्टींचा समावेश आहे.

बी फार्मसी करण्यासाठी संबधित विद्यार्थ्याने १२ वी चे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण केलेलं असावे आणि त्याला ५० टक्के पेक्षा धिक गुण मिळालेले असावेत.

एम फार्मसी (मास्टर्स इन फार्मसी)

एम फार्मसी हा प्रकार विद्यार्थ्यांना फार्माकोलॉजीकल सायन्समध्ये प्रगत ज्ञान मिळवण्यात मदत करतो. हि शिक्षण करण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याला बॅचलर ऑफ फार्मसी हे शिक्षण पूर्ण केलेले असावे आणि त्यामध्ये ५० टक्के तरी गुण मिळवलेले असावे. हे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो संबधित विद्यार्थी फार्मास्युटिकल विश्लेषक किंवा संशोधक म्हणून काम करू शकतो.

फार्मसीचे कार्य – functions

फार्मसी हि एक औषधोपचार, व्यवस्थापन आणि वितरण या सारख्या गोष्टींशी संबधित आहे आणि या शाखेचे कार्य काय आहे या विषयी खाली आपण पाहणार आहोत.

औषधोपचार व्यवस्थापन

अनेक औषध दुकाने हि रुग्णांच्या पालन प्रवृत्तीवर लक्षणीय प्रभाव दाखवते आणि औषध तज्ञांनी दिलेली प्रशासणाची हि व्यवस्था मेडिकेशन थेरीपी मॅनेजमेंट म्हणून ओळखली जाते. यामध्ये औषधांशी संबधित समस्यांचे निराकरण केले जाते तसेच रुग्ण प्रशिक्षण आणि आरोग्यावर शिक्षण दिले जाते आणि प्रिस्क्रिप्शन योजना तयार केली जाते.

रुग्णांची विचार योजना वाढवणे

यामध्ये सूचना आणि वेळापत्रक यासारखी प्रिस्क्रिप्शन अॅडहेरन्स उपकरणे वारली जाऊ शकतात. डॉक्टर आणि औषध विशेषतज्ञ वैद्यकीय उपचार योजनेवर एकत्रपणे काम करतात आणि नंतर परिणामांचे अनुसरण करतात.

औषध उपचारांची अंमलबजावणी आणि मुल्यांकन

औषध विशेषतज्ञ आणि डॉक्टर उपचारादरम्यान उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रिस्क्रिप्शन समस्या आणि अनुषंगिक परिणामांचे मुल्यांकन करतात.

रुग्णांचा डाटा गोळा करणे

रुग्णांचा डाटा गोळा करण्याचे महत्वाचे कार्य देखील फार्मसी विभाग पार पाडतो आणि हे चालू असलेल्या औषधांची यादी, क्लिनिकल इतिहास आणि त्यांच्या वैद्यकीय क्लिनिकच्या इएचआर मधील चाचणी परिणामांच्यासह विविध स्तोत्राकडून रुग्णांच्याविषयी माहिती गोळा करणे.

फार्मसी विभागाचे फायदे – benefits

 • अंतिम वापरकर्त्यांना रुग्णांच्या माहितीची देखरेख करण्यासाठी, हाताळणी करण्यासाठी तसेच प्रक्रिया सुलभ करण्यासाठी, औषध साठवणूक आणि वितरण यावर नियंत्रण ठेवण्यासाठी फार्मसी विभागाचा उपयोग होतो.
 • फार्मसी विभागामुळे कोणतीही वैद्यकीय फसवणूक टाळली जाते म्हणजेच ज्यावेळी औषधाचे वितरण केले जाते त्यावेळी ते तपासून त्याचे वितरण केले जाते.

आम्ही दिलेल्या b pharmacy information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बी फार्मसी म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या b pharmacy course information in marathi या b pharmacy details in marathi article मध्ये update करू, मित्रांनो हि information about b pharmacy in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये b pharmacy details in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!