बॅडमिंटन खेळाची माहिती Badminton Information in Marathi

Badminton Information in Marathi बॅडमिंटन खेळ आजच्या काळातील जगातील लोकप्रिय खेळ म्हणजे बॅडमिंटन होय आणि हा खेळ १८ व्या शतकापासून खेळला जातो. बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी दोन महत्वाच्या गोष्टी लागतात आणि त्या म्हणजे रॅकेट आणि शटलकॉक. बॅडमिंटन हा खेळ बंदिस्त जागेमध्ये खेळला जातो आणि या खेळाच्या मैदानाला कोर्ट असे म्हणतात. बॅडमिंटन हा खेळ महिला आणि पुरुष दोघेही खेळू शकतात आणि हा खेळ ऑलम्पिक मध्ये देखील समाविष्ठ आहे. बॅडमिंटन या खेळामध्ये जर हा खेळ एकेरी खेळ असेल तर या खेळामध्ये २ खेळाडू असतात आणि जर हा खेळ दुहेरी खेळ असेल तर या खेळामध्ये ४ खेळाडू असतात. हा खेळ तीन भागामध्ये विभागलेले असतो आणि यामधील प्रत्येक २१ अंकांचा असतो.

badminton information in marathi
badminton information in marathi

बॅडमिंटन खेळाची माहिती – Badminton Information in Marathi

खेळाची नावबॅडमिंटन ( badminton )
खेळाचा प्रकारबंदिस्त खेळ ( indoor game )
खेळाडूंची संख्याएकेरी खेळामध्ये २ खेळाडू आणि दुहेरी खेळामध्ये ४ खेळाडू
खेळाचे मैदानकोर्ट
मैदानाचा आकार१३.४ मीटर बाय ५.१८ मीटर
खेळासाठी लागणारे सामानरॅकेट आणि शटलकॉक

बॅडमिंटन खेळाचा इतिहास – history of badminton 

बॅडमिंटन खेळाचा पूर्वीचा इतिहास नक्की काय होता हे उलघडू शकले नाही परंतु काही इतिहासकारांच्या मते हा खेळ १५०० बीसी च्या काळात भारतामध्ये खेळला जायचा असे म्हंटले जाते. बॅडमिंटन या खेळाला पूर्वीच्या काळी पुना या नावाने ओळखले जायचे कारण या खेळाचा उगम हा पुणे शहरातुन झाला होता त्यानंतर भारतामध्ये असणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी १८७० मध्ये हा खेळ भारताबाहेर नेला. असे म्हणतात कि बॅडमिंटन हा खेळ ड्यूक ऑफ ब्युफर्टने हा खेळ पहिल्यांदा आपल्या मित्रासोबत खेळला होता म्हणून ड्यूक ऑफ ब्युफर्टला बॅडमिंटन या खेळाचा जनक मानले जाते.

बॅडमिंटन खेळाचे मैदान – badminton ground 

बॅडमिंटन हा खेळ बंदिस्त ( indoor game ) जागेमध्ये खेळला जाणारा खेळ असून हा खेळ एक आयताकृती कोर्टवर खेळला जातो. या कोर्टाचा आकार १३.४ मीटर बाय ५.१८ मीटर ( ४४ फुट बाय १७ फुट ) असतो. प्रत्येक बाजूला जर २ खेळाडू असतील तर या कोर्टचा आकार १३.४ मीटर ते ६.१ मीटर ( ४४ फुट बाय २० फुट ) असतो आणि कोर्टाच्या मध्य भागी १.५ मीटरचे ( ५ फुट ) जाळे असते त्याचबरोबर जाळीपासून ६ फुट अंतरावर २ फुट ६ इंच लांबीची सर्विस रेषा असते.

बॅडमिंटन खेळासाठी लागणारी उपकरणे – equipment’s needed to play badminton 

बॅडमिंटन हा खेळ खेळण्यासाठी २ गोष्ठी महत्वाच्या सतत आणि त्या म्हणजे रॅकेट आणि शटलकॉक. हा खेळ खेळताना २ रॅकेटची गरज असते रॅकेट हे अंडाकृती असते आणि ते धातूपासून बनवलेले असते आणि त्याला खाली धरण्यासाठी एक मुठ असते आणि रॅकेटच्या मधी जे छोटे छोटे चौकोण असतात ते फायबरचे असतात. रॅकेटची लांबी साधारण ६५० ते ७०० मिलीमीटर आणि रुंदी २०० ते २३० मिलीमीटर असते आणि रॅकेटचा वापर शटलकॉकला मारण्यासाठी केला जातो. शटलकॉक बॅडमिंटनचे फुल किवा बर्डी या नावाने देखील ओळखले जाते. हे शटलकॉक दिसायला फुलासारखे असते आणि हे खूप लहान आणि हलके असते. शटलकॉक याला १६ पंख लावलेले असतात आणि हे ४ ते ५ ग्रॅम वजनाचे असते.

बॅडमिंटन या खेळामध्ये स्कोरिंग कसे असते ? – scoring 

कोण सेवा देत आहे याची पर्वा न करता, जो खेळाडू शटलकॉक जेव्हा प्रतिस्पर्ध्याच्या बाजूने मजला मारतो तेव्हा गुण मिळविला जावू शकतो.

२१ गुणांपर्यंत पोहोचणारी पहिला गट खेळ जिंकते. तथापि, विजयी संघाने कमीत कमी दोन गुणांनी विजय मिळविला पाहिजे. टाय (प्रत्येक २० गुण) झाल्यास, दोन अतिरिक्त गुण मिळविणारा पहिला संघ विजेता होतो.

३० गुणांपर्यंत पोहोचनारा पहिला संघ विजेता असतो, इतर संघाने कितीही धावा काढल्या तरीही.

तीन पैकी दोन खेळ जिंकणारा पहिला संघ विजयी बनतो.

बॅडमिंटन खेळाचे नियम – rules of badminton 

  • या खेळामध्ये २ खेळाडू असतात आणि हा खेळ तीन भागामध्ये खेळला जातो.
  • एखाद्या खेळाडूने सर्व्ह करण्यापूर्वी आपला प्रतिस्पर्धी तयार होईपर्यंत प्रतीक्षा करणे आवश्यक आहे.
  • एका सामन्यात २१ गुणांच्या ३ सर्वोत्तम खेळाचा समावेश असतो
  • शटलकॉक कोर्टाच्या हद्दीबाहेर मारू नये.
  • खेळाडूला नेटला स्पर्श करण्याची परवानगी नसते.
  • शटलकॉकला रॅकेटने खाली मारू नये.
  • सर्व्हरने शटलकॉक मारण्यापूर्वी सर्व्हर प्राप्त करणाऱ्या गटाने कोर्टवरील रेषांना स्पर्श करू नये.
  • रॅली जिंकणारी गट त्याच्या गुणांमध्ये एक गुण जोडते.
  • २० गुणांनंतर जो गट सर्वप्रथम २ गुण मिळवते तो गट खेळ जिंकतो.
  • सर्व्ह होईपर्यंत दोन्ही खेळाडूंचे पाय स्थिर स्थितीत असणे आवश्यक आहे. यावेळी आपले पाय रेषेला स्पर्श करु शकत नाहीत.
  • प्रतिस्पर्ध्याच्या खाली येणाऱ्या स्ट्रोकला रोखण्यासाठी एखादा खेळाडू जाळ्याजवळ त्याचे रॅकेट धरु शकत नाही.
  • बॅडमिंटन या खेळामध्ये चूक ( फॉल ) केव्हा मनाला जातो
    • सर्व्हरचे पाय सर्व्हिस कोर्टात नसतात किंवा जर रिसीव्हरचे पाय सर्व्हरच्या विरुद्ध तिरपे असतात.
    • सर्व्हर जेव्हा तो सर्व्ह करतेवेळी पुढे सरकतो.
    • कोर्टाच्या हद्दीबाहेर उतरणारी, नेटच्या खाली किंवा त्याद्वारे जाणारी सेवा किंवा शॉट इतर कोणत्याही अडथळ्यांना किंवा खेळाडूंच्या शरीराला किंवा कपड्यांना स्पर्श करते.
    • खेळाडू किंवा कार्यसंघाकडून सलग दोनदा शटल मारणे.

बॅडमिंटन खेळाविषयी मनोरंजक तथ्ये -interesting facts about badminton game 

  • बॅडमिंटन हा खेळ जगातील दुसरा सर्वात लोकप्रिय खेळ आहे.
  • बॅडमिंटन हा खेळ टेनिस खेळापेक्षा तीव्रपणे खेळावा लागतो.
  • या खेळामध्ये आशियाई वर्चस्व आहे म्हणजे या खेळामध्ये अशीयाई खेळाडू सर्वोत्कृष्ट आहेत.
  • सुरुवातीला बॅडमिंटन खेळाडूंच्या पायाशी खेळला गेला म्हणजेच रॅकेट च्या ऐवजी शटलकॉक मारण्यासाठी पायांचा उपयोग करत होते.
  • या खेळाच्या शोधामध्ये भारताने आपली महत्वाची भूमिका बजावली आहे.
  • शटलकॉकला बर्‍याचदा पक्षी, फुल किंवा बर्डी म्हणून संबोधले जाते.
  • पहिला अधिकृत बॅडमिंटन क्लब १८७७ मध्ये युनायटेड किंगडमध्ये स्थापन झाला आणि त्यास ‘द बाथ बॅडमिंटन क्लब’ असे म्हटले जाते.
  • पुरुष आणि महिला एकेरी तसेच दुहेरी सामन्यांसाठी १९९२ मध्ये बॅडमिंटनला ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता मिळाली.
  • बॅडमिंटन रॅकेट बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या तारांची लांबी दहा मीटर लांब असते.

आम्ही दिलेल्या badminton information in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर कबड्डी या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या information of badminton in marathi  या article मध्ये update करू, मित्रांनो हि badminton player saina nehwal information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू my favourite game badminton in marathi नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!