Table Tennis Information In Marathi जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळले जातात त्यामधील एक लोकप्रिय खेळ म्हणजे ‘टेबल टेनिस’ आहे . हा खेळ २ किवा ४ खेळाडूंमध्ये खेळला जातो आणि हा खेळ खेळण्यासाठी रॅकेट आणि चेंडू लागतो तसेच हा खेळ इनडोअर खेळला जातो कारण ह्या खेळाला मैदान लागत नाही तर एक विशिष्ठ प्रकारच्या टेबलची गरज असते बहुतेक त्या टेबलाला टेनिस कोर्ट म्हटले जाते ते समान दोन भागामध्ये मधी जाळी लावून विभागलेले असते. हा खेळ एकेरी किवा दुहेरी असा खेळला जातो एकेरी खेळामध्ये दोन खेळाडू खेळत असतात आणि दुहेरी खेळामध्ये चार खेळाडू खेळत असतात.
याचबरोबर वाचा क्रिकेट खेळाबद्दल माहिती
टेबल टेनिस बद्दल माहिती (Table Tennis Information In Marathi)
१९ व्या शतकात पहिल्यांदा या खेळाची सुरवात इंग्लंड मध्ये झाली या खेळाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे १९२६ मध्ये अंतराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन संस्थेची स्थापना करण्यात आली त्यानंतर १९८८ मध्ये हा खेळ ऑलंपिक मध्ये खेळला जावू लागला. या खेळाला व्हीप वॉफ किवा पिंग पोंग या नावानेही ओळखले जाते. शक्यतो हा खेळ सर्व जगामध्ये खेळला जातो पण आशिया, जपान, युरोप आणि चीन मध्ये हा खेळ एक स्पर्धा म्हणून खेळला जातो.
टेबल टेनिस या खेळाचा इतिहास ( history of table tennis)
टेबल टेनिस हा खेळ २० व्या शतकाच्या अगोदर म्हणजेच १९ व्या शतकात इंग्लंड मध्ये खेळला जात होता हा खेळ इंग्लंड मधील श्रीमंत कुटुंबातील लोक रात्रीचे जेवण झाल्यानंतर खेळत होते या खेळाचे जुने आणि खरे नाव पिंग पोंग असे होते. जस जसा हा खेळ प्रसिध्द होत गेला तेव्हा या खेळाचे नाव १९२२ मध्ये टेबल टेनिस असे पडले. १९०५ नंतर हा खेळ लंडनच्या बाहेरील भागात खेळला जावू लागला त्यांनर हा खेळ १९५० मध्ये अनेक देशामध्ये खेळला जावू लागला. हा खेळ वेगवेगळ्या देशामध्ये खेळला जावू लागल्यामुळे इंग्लंड, जर्मनी आणि हंगेरी या देशांच्या नेतृत्वाखाली अंतराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनची स्थापना १९२६ मध्ये करण्यात आली त्यांनतर या टेबल टेनिस फेडरेशनचे सदस्य वाढत गेले आणि १९९० दरम्यान या फेडरेशनचे १६५ पर्यंत सदस्य झाले. १९८० मध्ये टेबल टेनिस चा पहिला वल्ड कप झाला त्यामध्ये चीनचा गुओ युएहुअ याने हे बक्षीस जिंकले त्यानंतर लगेच १९८८ मध्ये मध्ये हा खेळ ऑलंपिक मध्ये खेळला जावू लागला.
टेबल टेनिस खेळाचे नियम (rules of table tennis)
- या खेळामध्ये तीन, पाच किवा सात सेट असतात.
- या खेळाची सुरुवात coin toss करून होते.
- coin toss केल्यानंतर जो विजेता असतो तोच पहिला बॉल serve करतो किवा त्याच्याकडे पर्याय असतात कि आपण serve करायच कि receive करायच.
- त्याचबरोबर त्यांच्याकडे हा हि पर्याय असतो कि आपण टेबलाची कुटली बाजू घ्यायची.
- जो खेळाडू पहिला बॉल टाकतो त्याला server म्हणतात आणि जो खेळाडू परत बॉल फिरवतो त्याला receiver म्हणतात.
- टेबल टेनिस खेलाताना बॉल जाळीच्या वरून गेला पाहिजे.
- खेळ खेळताना टेबलच्या पाठीमागचा भाग वापरला जातो.
- हा खेळ १५ मिनिटाचा असतो.
- जर खेळाडू खेळ खेळताना त्याचा स्पर्श जर टेबल ला झाला तर तो अवैध ठरवले जाते.
- प्रत्येक खेळांनंतर खेळाडूंची टेबलची बाजू बदलली जाते.
- बाजू बदलल्या नंतर receiver हा server होतो आणि server हा receiver होतो.
- खेळाडू ११ अंक बनवुन खेळ जिंकू शकतो.
खेळाडूला अंक कोणकोणत्या कारणामुळे गमवावे लागतात
- खेळाडू जर बॉलला दोन वेळा मारत असेल तर त्या खेळाडूचे अंक कमी होतो.
- जर बॉल एका खेळाडूच्या कोर्ट मध्ये दोनवेळा टप्पा खात असेल तर त्या खेळाडूचे अंक कमी होतो.
- जर खेळाडू बिना टप्पा खाल्ल्याशिवाय बॉल परत पाठवित असेल तर.
- बॉल खेळत असताना खेळाडूचा हात टेबलला स्पर्श झाला तर.
- जेव्हा खेळाडू server कडून आलेला चेंडू योग्यरित्या परत करण्यात अयशस्वी झाला तर.
टेबल टेनिस शॉट्स ( table tennis shots)
टेबल टेनिसमध्ये खेळाडू आपला वेग आणि खेळण्याचा कोण बदलून आपले शॉट्स चे प्रमाण वाढवू शकतो आणि त्यामुळे त्याचे खेळ सुधारण्यास मदत होते. टेबल टेनिसमधले काही लोकप्रिय शॉट्स खाली दिलेले आहेत.
टॉपस्पिन (topspin shot)
टॉपस्पिन हा शॉट विरुध्द खेळाडूवर हल्ला करण्यासाठी वापला जाणार शॉट आहे. खेळाडू बॉलला पुढे जोरात मारण्यासाठी ४५ डिग्रीच्या कोणामध्ये पॅडलच्या खालच्या बाजूला सरकतो आणि एकदम जलद गतीने बॉल मारतो त्यामुळे प्रतिस्पर्ध्याला वेळेवर परतावा तुलनेने अवघड होते.
चॉप (chop shot)
चॉप शॉट हा बचाव करण्यासाठी मारण्यात येणारा शॉट आहे यामध्ये खेळाडू टेबलपासून लांब राहून पॅडलच्या वरच्या बाजूचा वापर करून बॉलच्या खालच्या अर्ध्या भागाशी संपर्क साधताना खेळाडू ४५ डिग्री कोनात पाठीमागे खाली झुकतो आणि शॉट मारतो.
ब्लॉक (block shot)
टेबल टेनिस खेळचा परिचय देताना खेळाडूला शिकवलेला पहिला शॉट म्हणजे ब्लॉक शॉट होय. या शॉटमध्ये खेळाडू टेबल जवळ उभा राहून पॅडल चेहऱ्याजवळ धरून पॅडलसाईडचा वापर करून बॉल परत करतो.
टेबल टेनिस इकूपमेन्ट (table tennis equipment)
टेबल टेनिस खेळण्यासाठी जी उपकरणे लागतात ती खूप महत्वाची असतात कारण हि उपकरणे फक्त आपली खेळण्याची पध्दत दर्शवत नाहीत तर हि उपकरणे विजय मिळवण्याची क्षमता वाढवतात म्हणून ज्या वेळी आपण टेबल टेनिस ची उपकरणे खरेदी करते वेळी अगदी विचार करून खरेदी केली पाहिजेत. टेबल टेनिसची उपकरणे खाली दिली आहेत.
- टेबल :- टेबल टेनिसच्या स्पर्धेमध्ये वापरले जाणारे टेबल हे २.७४ मीटर लांब आणि १.५२५ मीटर रुंद असते. आणि जि मधी जाळी असते ती १५.२५ सेंटीमीटर उंच असते.
- रॅकेट :- रॅकेट हे ब्लेड आणि रबरने बनलेले असते आणि रॅकेट बनवायला दोन रंगाचे रबर वापरलेले असतात कारण रबरसाठी समान रंग वापरू शकत नाही. एक रबर काळा आणि दुसरा लाल असते आवश्यक आहे. ब्लेड आपल्या खेळण्याची शैली दर्शविते आणि रबर बॉलला फिरवण्यासाठी वेग देते.
- बॉल :- ४०+ mm टेनिस बॉल आणि रंग पांढरा किवा केशरी. अधिक (+) हे चिन्ह बॉलची नवीन आकार दर्शवितो आणि जर बॉल ४०mmअसेल तर तो बॉल ओल्ड सेलूलॉईड बॉल असतो
वांग नान ( wang nan)
वांग नान हि एक चायनीज महिला खेळाडू आहे आणि तिने ऑलंपिक मध्ये पाच मेडल्स मिळवले आहेत आणि त्यामधील चार मेडल्स हे गोल्ड मेडल्स आहेत त्याचबरोबर तिने पाच वेळा टेबल टेनिस वल्ड कप हि जिंकला आहे.
वांग हाओ (wang hao)
वांग हाओ हा चायनीज पुरुष खेळाडू आहे. ह्या खेळाडूने ऑलंपिक मध्ये पाच मेडल्स जिंकले आहेत यामधील दोन गोल्ड मेडल्स आहेत आणि तीन सिल्वर मेडल्स आहेत. वांग हाओ ए खेळाडूने २०१० मध्ये वल्ड टीम टेबल टेनिस चॅम्पियनशिप हा टायटल जिंकला होता.
देंग यापिंग (deng yaping)
देंग यापिंग हि सुद्धा एक चायनीज महिला खेळाडू आहे आणि तिने ऑलंपिक मध्ये ४ मेडल्स जिंकले होते आणि ते चारीही गोल्ड मेडल्स होते. १९९५ च्या वल्ड कप मध्ये तिने वूमन टीम गोल्ड मेडल्स जिंकले होते.
झहंग यीनिंग (zang yining)
झहंग यीनिंग हि सुद्धा एक चायनीज महिला खेळाडू आहे आणि तिने ऑलंपिक मध्ये ४ मेडल्स जिंकले होते आणि ते चारीही गोल्ड मेडल्स होते.
लिऊ गुओलिंअंग (liu guoliang)
लिऊ गुओलिंअंग हा चायनिज खेळाडू आहे ज्याने ऑलंपिक मध्ये चार मेडल्स जिंकले आहेत त्यामधील दोन गोल्ड मेडल्स आहेत एक सिल्वर आणि एक ब्रोंझ आहे.
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो तुमच्याकडे जर टेबल टेनिस या खेळाबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या table tennis information in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि table tennis game information in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट