संत बाळुमामा ची माहिती Balu Mama History in Marathi

Balu Mama History in Marathi – Balu Mama Real Story in Marathi संत बाळुमामा ची माहिती बाळूमामा हे अठराव्या शतकातील लोकसंत होते. ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक हि दोन राज्ये पालथी घालून संपूर्ण राज्यांमध्ये भ्रमण करून राज्यातील प्रत्येक भागात जाऊन वेगवेगळ्या व्यक्तींशी संवाद साधून त्यांच्या अडचणी त्यांचे प्रश्न सोडवले. बाळूमामानीं त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक लोकांचे आयुष्य सुधारले त्यांच्यासह आणि त्यांच्या सान्निध्यात राहणार्‍या प्रत्येक माणसाला त्यांनी माणसासारखं राहण्यास शिकवल. माणसात देव सापडतो असं म्हटलं जातं आणि त्याची प्रचिती संत बाळुमामा यांची कथा ऐकल्यावरती येते. या ब्लॉगमध्ये आपण संत बाळुमामा यांची कथा व त्यांचा इतिहास जाणून घेणार आहोत.

balu mama history in marathi
balu mama history in marathi

संत बाळुमामा ची माहिती – Balu Mama History in Marathi

जन्म व सुरुवातीचे आयुष्य – Balu Mama Information in Marathi

३ ऑक्टोंबर १८९२ रोजी बाळूमामा यांचा जन्म एका धनगर कुटुंबात झाला. बेळगाव जवळील चीक्कोडी या तालुक्यातील अक्कोळ या गावांमध्ये बाळूमामा यांचे कुटुंब राहत होते. त्यांचे वडील मायप्पा व आई सत्यवा या धनगर जोडप्याच्या घरी बाळूमामा जन्माला आले. बालप्पा असे त्यांचे मूळ नाव होते. बाळूमामानां इतर दोन भावंडे होती. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याचप्रमाणे लहानपणापासूनच बाळुमामा यांच वागणं त्यांच्या इतर भावांपेक्षा थोड विचित्र होतं. म्हणूनच त्यांच्या घरच्यांनी व इतरांनी त्यांना कलागुणी असं नाव ठेवलं.

गावातील कोणत्याही लोकांशी त्यांचे बोलणे नव्हतं, कधीही कुणाच्या अध्यात-मध्यात नाही, नेहमी एकांतात वेळ घालवणारे आणि नेहमी स्वतःच्याच दुनियेत मग्न असणारे बाळूमामा लहानपणापासून वेगवेगळे चमत्कार दाखवायला लागले होते. परंतु त्यांच्या अशा वागण्याची त्यांच्या आई-वडिलांना नेहमी चिंता वाटायची. त्यांच्या वडिलांनी त्यांना गावातील चंदुलाल यांच्याकडे काम करण्यास पाठवले जेणेकरून बाळूमामा यांना थोडं वळण लागेल.

चंदुलाल शेठ हे जैन समाजाचे होते ज्यांनी बाळूमामा यांना आपल्याकडे नोकरी दिली आणि त्यांच्यावर घरच्या बकऱ्या जंगलात चरावयास नेण्याचं काम सोपावल‌. ते त्यांची बहीण गंगुबाई खिलारे यांच्याकडे राहात होते आणि त्यांच्या बहिणीची पोर त्यांना लाडाने मामा हाक मारायचे आणि पुढे जसजशी त्यांची कीर्ती पसरत गेली तसे ते सर्वांचे लाडके बाळूमामा झाले.

Balu Mama Real Story in Marathi

संत बाळूमामा चंदुलाल शेठजी यांच्याकडे कामाला असताना बाळूमामा त्यांना मिळालेले काम अतिशय व्यवस्थित करत होते. चंदुलाल यांच्याकडे बाळूमामा बकऱ्या सांभाळायचे काम करायचे जेव्हा ते बकऱ्यांना घेऊन डोंगरात जायचे तेव्हा बाभळीच्या काटेरी झाडांची गादी करून ते त्या वरती झोपून जायचे. बाभळीच्या काटेरी झाडाला बाळूमामा खुशाल टेकून बसायचे, विश्रांती घ्यायचे. काम संपवून बाळूमामा चंदुलाल शेटजी यांच्या गोठ्यातील एका कोपऱ्यात विश्रांती घ्यायचे.

त्यांचे जेवण त्यांच्या गोठ्यातच व्हायचे. चंदुलाल हे एका फुटक्या थाळीमध्ये बाळू मामा यांना जेवायला देत असत बाळूमामा जेवण झालं की ती थाळी स्वच्छ धुऊन पुसून ठेवत असत. जेव्हा चंदुलाल शेठजीं ची आई एकदा गोठ्यामध्ये गेल्या तेव्हा ज्या थाळीतून बाळूमामा जेवायचे त्या वेळी त्यांना तेजस्वी प्रकाश परावर्तित होत असल्याचे दिसून आले. दिवसेंदिवस बाळूमामाचे वागणे बदलत चालले होते. आणि म्हणूनच त्यांच्या आई वडिलांनी त्यांचं लग्न लावायचे ठरवले लग्न लावून संसारामध्ये ते गुंततील आणि सुधारतील या हिशोबाने त्यांचा लग्न लावून दिले.

उन्हाळ्याचे दिवस होते गावांमध्ये फेरफटका मारत असताना बाळूमामा यांना दोन साधू मिळाले. त्यांना तहान लागली होती. बाळूमामा नि त्या दोन साधूंना एका अवघड ठिकाणाच्या खोल विहिरीतून पाणी पाजून तृप्त केले आणि म्हणूनच ते दोन साधू बाळूमामा यांच्यावरती प्रसन्न झाले आणि त्यांनी बाळूमामा यांना वाचासिद्धी व कार्यसिद्धी चा आशीर्वाद दिला. पुढे एक आकाशवाणी झाली तू गुरु करून घेणे हे ऐकताच बाळूमामांनी ठरवले भूत काढल्याचे जो कोणीही योग्य रक्कम सांगेल त्याला बाळूमामा गुरु करून घेतील असे त्यांनी ठरवले.

काही दिवसानंतर बाळूमामा शेतात फिरत असताना त्यांना मुळे महाराज भेटले व त्यांनी बाळू मामांना सांगितले की बाळू तू भुते काढलेले १२० रुपये मला दे हे ऐकून बाळूमामा थक्क झाले आणि त्यांनी मुळे महाराज यांना आपलं गुरु करून घेतले. ही अख्याईका बाळूमामा बद्दल सांगितली जाते. याच दरम्यान बाळूमामा यांचे लग्न देखील झाले होते परंतु त्यावेळी बाळूमामानां श्री मुळे महाराजांचा अनुग्रह झाला. व त्यांचा संसार मोडकळीला आला बाळू मामांनी पुढे संसार लांब करून लोकांच्या सुख दुःखा मध्ये सहभाग घेतला.

लोकांची दुःख लांब केली. मुळे महाराजांच्या सानिध्यात राहिल्यानंतर बाळूमामांच्या अवधूतस्वरूपी वागण्याला सांप्रदायिक शिस्तीची झालर लाभली. यापुढे बाळू मामांनी पंचक्रोशीतील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यास सुरुवात केली. स्वच्छ धोतर, पूर्ण बाह्यांचा शर्ट, डोक्याला रुमाल, पायात चपला, हातात धनगरी काठी, सडपातळ उंचपुरी अशी शरीरयष्टी आणि सावळा वर्ण असा बाळूमामा चा पेहराव असायचा. त्यांनी वेळोवेळी अनेक चमत्कार घडवले आहेत त्यांच्या अगदी साध्या सोप्या वागण्यातून बोलण्यातून त्यांनी अनेक लीला घडवल्या आहेत.

जे लोक त्यांच्या सानिध्यात राहिले त्यांच्यासाठी तर जीवन अतिशय सोप्प बनलेले त्यांच्या हातून कळत नकळत अनेक चमत्कार घडले ज्यामुळे अनेक लोकांचे जीवन सुधारले. ते अत्यंत साधे होते त्यांना मिळालेल्या सिद्धीचा उपयोग त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कधीच केला नाही. कानडी व मराठी भाषा त्यांना स्वच्छपणे बोलता यायची खेड्यातील लोकांसाठी ते खेडवळ भाषेत बोलत असत. बाळूमामा नेहमी बकऱ्यांच्या कळपासोबत फिरताना दिसायचे. त्यांनी अनेक चमत्कार घडवले परंतु त्याचे श्रेय त्यांनी स्वतःला कधीच घेतल नाही.

त्यांना कधी प्रसिद्धीची हाव नव्हती. त्यांच्या सानिध्यात असलेल्या प्रत्येकाच आयुष्य त्यांनी सुधरवले आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या सहवासात राहणारे प्राणी जनावरे देखील सद्गुणी होतात. त्यांच्याकडे भीमा नावाचा पांढराशुभ्र केसाळ कुत्रा होता जो शुद्ध शहाकारी होता. पंचमहाभूतांवर त्यांची सत्ता होती. त्यांच्यामुळेच समाजातील जुन्या चालीरीती अंधश्रद्धा मोडकळीस आल्या. नेहमी माणसाने माणसासारखे वागावे अशी त्यांची शिकवण होती त्यांना शिव्या देण्याची सवय होती परंतु लोक त्यांच्या शिव्या म्हणजेच आशीर्वाद समजायचे.

श्रीदत्त-‌ श्रीनृसिंहसरस्वती- श्री स्वामीनारायण महाराज- श्रीमौनी महाराज आणि श्री मुळे महाराज अशी बाळुमामाची गुरु परंपरा होती. बाळूमामांनी संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकामध्ये गावोगावी जाऊन चमत्कार घडवून जनकल्याण केलं. १९३२ मध्ये बाळूमामा यांनी भंडारा उत्सव चालू केला, जो आजही चालू आहे. या भंडारा उत्सवाचं एकमेव उद्दिष्ट म्हणजे गोरगरिबांना अन्नदान व्हावे.

दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक आदमापुर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधी मंदिराला भेट देतात. या मंदिराचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार तेथील लोकांचे मुख्य आकर्षण आहे. मंदिरात बाळुमामाची मूर्ती आहे मूर्तीच्या उजव्या बाजूला सद्गुरू परमहंस मुळे महाराज यांची गारगोटीची मूर्ती आहे तर मूर्तीच्या डाव्या बाजूला विठ्ठल रखुमाईची मूर्ती आहे. येथे दक्षिणा स्वीकारली जात नाही.

मृत्यू:

बाळूमामा यांचे व्यक्तिमत्व माणसात देव असतो याची साक्ष देतो. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य महाराष्ट्रा व कर्नाटक राज्यात भ्रमण करून गोरगरिबांचे, पीडितांचे आयुष्य सुधारले. व्यसनी लोकांना निर्व्यसनी केले. त्यांच्या सहवासात आलेल्या प्रत्येकाचे आयुष्य धन्य झाले मग तो माणूस असो किंवा जनावर. आपल आयुष्य, आपला संसार बाजूला सारून त्यांनी समाज कल्याणासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. ४ सप्टेंबर १९६६ रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी बाळूमामा यांनी आदामपुर येथे समाधी घेतली.

आदमपूर हे दुसरे पंढरपूर मानले जाते समाधीनंतरही बाळुमामांनी वेगवेगळ्या रूपातून आपल्या भक्तांना अनेक अनुभव दिल्याच्या दंतकथा प्रसिद्ध आहेत. मंदिरामध्ये बाळुमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्येकाचे हात नकळत जोडले जातात. आजही लाखोऊन भक्तजन येथे गर्दी करतात. मंदिरामध्ये सुमारे पहाटे पाच वाजता पूजा व आरती केली जाते. नऊ वाजता नैवेद्य दिला जातो आणि संध्याकाळी सात ते साडे सातच्या दरम्यान पुन्हा एकदा सायंकाळची आरती होते. वयाच्या ७४ व्या वर्षी बाळूमामा सगुणरूप अदृश्य झाले. नेहमी शिवारात किंवा बकऱ्यांच्या कळपामध्ये दिसून येणारे बाळूमामा आजही त्यांच्या भक्तांना वेगवेगळ्या रूपातून आशीर्वाद देतात.

आम्ही दिलेल्या balu mama history in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर संत बाळुमामा ची माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या balu mama real story in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of balu mama in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये balu mama information in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!