bams full form in marathi – bams course information in marathi बीएएमएस कोर्स फुल फॉर्म व माहिती आज आपण या लेखामध्ये बीएएमएस याचे पूर्ण स्वरूप पाहणार आहोत तसेच बीएएमएस म्हणजे काय या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. आयुर्वेद ही सर्वात प्राचीन औषध प्रणालींपैकी एक आहे आणि या प्रणालीचे मूळ हे वैदिक काळापर्यंत आहे. हे औषधी वनस्पतींच्या उपचारात्मक गुणधर्मांवर आधारित आहे आणि त्यातील उपचार त्यांच्यात असलेल्या नैसर्गिक घटकांसाठी ओळखले जातात. आयुर्वेद हि एक पर्यायी उपचार पद्धती मानली जाते म्हणजेच याचा वापर केमिकलच्या मेडिसिनला एक चांगला पर्याय म्हणून केला जातो.
आणि हि आयुर्वेद औषध प्रणाली केवळ आजार बरे करते असे नाही तर आजार प्रतिबंधित करते त्याचबरोबर मानवी शरीरात रोग प्रवेश करण्याची वारंवारता देखील कमी करते. आयुर्वेदिक उपचारांच्या बद्दल असे म्हटले जाते कि हे शरीराच्या स्वयं-उपचार प्रणालीचा वापर करते आणि मग त्याच्या वर परिणाम करते.
जरी आयुर्वेदिक हे पूर्वीच्या काळी जास्त वापरले जात असले तरी सध्या देखील आयुर्वेदिक उपचारांना चांगले महत्व आहे आणि म्हणूनच अनेक असे विद्यार्थी आहेत जे आयुर्वेदातून शिक्षण घेतात आणि आपले करिअर त्यामध्येच घडवतात. बीएएमएस ( BAMS ) म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ( bachelor of ayurvedic medicine and surgery ) . बीएएमएस ( BAMS ) या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना आयुर्वेदाच्या सर्व संकल्पनांच्या विषयी तसेच वेगवेगळ्या आयुर्वेदिक गोष्टींच्या विषयी ओळख करून देण्यासाठी आणि रूग्णांच्या उपचारांसाठी त्यांचा वापर करण्यासाठी डिझाइन केलेला पदवीपूर्व पदवी किंवा शिक्षण कार्यक्रम आहे.
- नक्की वाचा: डॉक्टर विषयी माहिती
बीएएमएस ( BAMS ) या अभ्यासक्रमा मध्ये आधुनिक औषधांच्या कल्पनांसह आयुर्वेदाचा समावेश कअसतो आणि अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विद्यार्थ्यांना दोन्हीचे संयोजन बीएएमएस ( BAMS ) मध्ये शिकवले जाते. बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ( bachelor of ayurvedic medicine and surgery ) हा कोर्स ५ वर्षाचा कोर्स आहे आणि हा कोर्स करण्यासाठी संबधित विद्यार्थ्याने त्याचे १२ वी चे शिक्षण हे रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र मधून पूर्ण केलेले असावे जेणे करून त्या संबधित विद्यार्थ्याला आयुर्वेदाचा अभ्यासक्रम सोपा जाईल.
बीएएमएस कोर्स फुल फॉर्म व माहिती – BAMS Full Form in Marathi
कोर्सचे नाव | बीएएमएस ( BAMS ) |
बीएएमएस ( BAMS ) चे पूर्ण स्वरूप | बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ( bachelor of ayurvedic medicine and surgery ) |
अभ्यासक्रम कालावधी | ५ वर्ष |
शैक्षणीक पात्रता | संबधित विद्यार्थ्याने त्याचे १२ वी चे शिक्षण हे रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र मधून पूर्ण केलेले असावे |
नोकरीची संधी | आयुर्वेदिक डॉक्टर, व्यवसाय विकास अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, श्रेणी व्यवस्थापक, ज्युनियर क्लिनिकल चाचणी समन्वयक, वैद्यकीय प्रतिनिधी. |
बीएएमएस म्हणजे काय ? – BAMS meaning in marathi
बीएएमएस ( BAMS ) म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ( bachelor of ayurvedic medicine and surgery ) . बीएएमएस ( BAMS ) या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना आयुर्वेदाच्या सर्व संकल्पनांच्या विषयी तसेच वेगवेगळ्या आयुर्वेदिक गोष्टींच्या विषयी ओळख करून देण्यासाठी आणि रूग्णांच्या उपचारांसाठी त्यांचा वापर करण्यासाठी डिझाइन केलेला पदवीपूर्व पदवी किंवा शिक्षण कार्यक्रम आहे.
बीएएमएस चे पूर्ण स्वरूप – bams long form in marathi
बीएएमएस ( BAMS ) हे आयुर्वेदाशी संबधित आहे आणि बीएएमएस ( BAMS ) चे पूर्ण स्वरूप बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ( bachelor of ayurvedic medicine and surgery ) असे आहे.
बीएएमएस विषयी महत्वाची माहिती – bams course information in marathi
बीएएमएस ( BAMS ) या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना आयुर्वेदाच्या सर्व संकल्पनांच्या विषयी तसेच वेगवेगळ्या आयुर्वेदिक गोष्टींच्या विषयी ओळख करून देण्यासाठी आणि रूग्णांच्या उपचारांसाठी त्यांचा वापर करण्यासाठी डिझाइन केलेला पदवीपूर्व पदवी किंवा शिक्षण कार्यक्रम आहे. बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी हे शिक्षण घेण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याला १२ वी मध्ये कमीत कमी ५० टक्के ते ६० टक्के मार्क असावेत आणि त्या संबधी विद्यार्थ्याने १२ वी चे शिक्षण हे रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र मधून पूर्ण केलेले असावे. बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी ( bachelor of ayurvedic medicine and surgery ) हा कोर्स ५ वर्षाचा कोर्स आहे
बीएएमएस साठी पात्रता निकष – eiligibility
बीएएमएस ( BAMS ) हि एक वैद्यकीय क्षेत्रातील पदवी आहे जी आयुर्वेदाशी संबधित आहे आणि हि पदवी ५ वर्षाच्या कालावधी मध्ये पूर्ण करता येते परंतु बीएएमएस ( BAMS ) या शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी खाली दिलेले काही पात्रता निकष पार पाडावे लागतात आणि जर संबधित विद्यार्थी एखादा जरी पात्रता निकष पार पडू शकला नाही तर तो बीएएमएस ( BAMS ) करण्यासाठी अपात्र ठरतो.
- संबधित विद्यार्थ्याला भारतातील कोणत्याही विद्यापीठामध्ये बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी म्हणजेच बीएएमएस ( BAMS ) हे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२ वी चे शिक्षण हे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा जीवशास्त्र मधून म्हणजेच थोडक्यात विज्ञान शाखेतून पूर्ण केलेले असावे.
- काही विद्यापीठांमध्ये त्यांच्या बीएएमएस ( BAMS ) पात्रतेच्या निकषानुसार किमान वयोमर्यादा देखील असू शकते.
- बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी हे शिक्षण घेण्यासाठी त्या संबधित विद्यार्थ्याला १२ वी मध्ये कमीत कमी ५० टक्के ते ६० टक्के मार्क असावेत आणि काही वेळा या टक्केवारी मध्ये विद्यापीठा नुसार किमान टक्केवारीचे निकष बदलतात.
- बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी म्हणजेच बीएएमएस ( BAMS ) या पदवीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराने ( NEET ) हि परीक्षा उतीर्ण केली पाहिजे.
बीएएमएस प्रवेश प्रक्रिया
- बीएएमएस ( BAMS ) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ( NEET ) म्हणजेच राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा देणे खूप गरजेचे असते त्याचबरोबर ( NEET ) हि प्रवेश परीक्षा अनेक वैद्यकीय कार्यक्रमांना आता ही प्रवेश चाचणी आवश्यक आहे.
- निकालांच्या आधारे कॉलेज निवडण्यासाठी केंद्रीकृत समुपदेशन आमंत्रण मिळण्यास पात्र असतात तसेच महाविद्यालये उमेदवारांची संख्या कमी करण्यासाठी वैयक्तिक मुलाखत फेरी घेऊ शकतात.
- एमएस ( मास्टर ऑफ सर्जरी ) ( आयुर्वेद ) आणि एमडी ( डॉक्टर ऑफ मेडिसिन ) हे दोन कार्यक्रम आयुर्वेद मध्ये आहेत.
- बीएएमएस कोर्समध्ये कोणतेही स्पेशलायझेशन दिले जात नाही तसेच आयुर्वेद औषध आणि शस्त्रक्रियेतील पदव्युत्तर कार्यक्रमांसाठी उमेदवारांनी डोमेन निवडणे आवश्यक आहे.
बीएएमएस साठी अभ्यासक्रम
बीएएमएस ( BAMS ) हा पाच वर्षाचा कोर्स आहे आणि या कोर्समध्ये ६ महिन्याने परीक्षा असते. चला तर आता आपण बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी म्हणजेच बीएएमएस ( BAMS ) मध्ये कोणकोणत्या प्रकारचे विषय असतात ते पाहूया.
आयुर्वेदाची मूलभूत तत्त्वे | आयुर्वेदिक प्रणालीचा इतिहास |
शरीरशास्त्र | विषशास्त्र |
औषधनिर्माणशास्त्र | आयुर्वेदिक फार्मास्युटिकल सायन्स |
आधुनिक शरीरशास्त्र | शस्त्रक्रियेचे तत्व |
त्वचा | प्रसूती |
स्त्रीविज्ञान | बालरोग |
अंतर्गत औषध |
आम्ही दिलेल्या bams full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर बीएएमएस कोर्स फुल फॉर्म व माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या BAMS meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि bams course information in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट