homemade beauty tips in marathi language – beauty tips for face in marathi language सौंदर्य विषयक टिप्स, घरगुती ब्युटी टिप्स आज आपण या लेखामध्ये सौंदर्य खुलवणाऱ्या काही टिप्स खाली पाहणार आहोत. सध्या सर्वजन आपण कसे चांगले दिसू आणि सगळ्यांच्यापेक्षा वेगळे कसे दिसू यावर लक्ष असते. एकूणच आपले सौंदर्य कसे वाढेल या कडे लक्ष देतात आणि सतत कोणते ना कोणते प्रयत्न देखील करत असतात. सध्या वाढत्या औद्योगीकारणामुळे वातावरनामध्ये अनेक दुषित कान पसरत आहेत आणि त्यामुळे हवा दुषित होत आहे आणि त्यामुके त्याचा परिणाम लोकांच्या त्वचेवर देखील होत आहे.
परंतु आपण या दुषित हवामानामुळे आपल्या त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होऊ नयेत म्हणून पहिलाच काळजी घेतली पाहिजे. काही लोक आपल्या त्वचेची किंवा चेहऱ्याच्या सौंदर्याची काळजी घेण्यासाठी ब्यूटी पार्लर मध्ये जातात किंवा आपल्या चेहऱ्याच्या अनेक वेगवेगळ्या थेरपी करून घेतात.
त्यामुळे आपले सौंदर्य खुलून दिसते परंतु हे सर्व करण्यासाठी खूपच खर्च होतो त्यामुळे हे सर्वांनाच परवडण्यासारखे नसते म्हणूनचा आता खाली आपण सर्वांना परवडणाऱ्या आणि सर्वांच्यासाठी उपयुक्त असणाऱ्या काही सौंदर्य विषयक टिप्स आता आपण खाली पाहणार आहोत.
घरगुती ब्युटी टिप्स – Homemade Beauty Tips in Marathi Language
सौंदर्य विषयक टिप्स – beauty tips for face in marathi language
सध्या सर्वजन आपण कसे चांगले दिसू आणि सगळ्यांच्यापेक्षा वेगळे कसे दिसू यावर लक्ष असते. एकूणच आपले सौंदर्य कसे वाढेल या कडे लक्ष देतात आणि सतत कोणते ना कोणते प्रयत्न देखील करत असतात. परंतु हवामानामुळे आणि अनेक कारणांच्या मुळे आपली त्वचा खराब होते म्हणून आपण आपल्या त्वचेची रोजच्या रोज काळजी घेतलेली केंव्हाही चांगलीच. चला तर आता आपण सौंदर्य विषयक टिप्स पाहूया.
- तुम्ही तुमच्या रोजच्या आहारामध्ये जितका सकस आहार घ्याल तितके तुमचे सौंदर्य खुलण्यास मदत होईल. तुमच्या रोजच्या आहारामध्ये तुम्ही फळे, पालेभाज्या, कडधान्य, अंडी या सारखे पदार्थ समाविष्ट करा.
- असे म्हणतात कि सकाळी ध्यान केल्याने आपल्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज येते आणि हे खरोखर आहे कारण ध्यानामुळे आपले मन शांत होते आणि त्यामुळे आपले समाधान वाढते आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरचे तेज देखील वाढते.
- जर आपल्याला आपले सौंदर्य वाढवायचे असेल तर आपल्याला रोजचा व्यायाम करणे देखील खूप गरजेचे असते.
- घरगुती उपायांपैकी एक चांगला उपाय म्हणजे एका वाटीमध्ये २ ते ३ चमचे कच्चे दुध घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा लिंबू रस घाला आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून ते मिश्रण १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा. आता हे मिश्रण १० ते १५ मिनिटांनी तुमच्या चेहऱ्याला आणि त्वचेला मास्क लावल्यासारखे लावा आणि ३० मिनिटे तसेच ठेवा आणि ३० मिनिटांनी पाण्याने स्वच्छ धुवा त्यामुळे तुमचा चेहरा उजळ दिसण्यास मदत होते.
- जर आपण बर्फाने आठवड्यातून चेहऱ्याला मसाज करा त्यामुळे देखील आपल्या त्वचेचे सौंदर्य वाढण्यास मदत होईल.
- चंदन चा वापर हा अनेक त्वचेच्या समस्यांच्यासाठी केला जातो आणि चंदन हे सौंदर्य खुलवण्यासाठी देखील केला जातो आणि चंदनचा वापर हा त्वचा उजळ बनवण्यासाठी केला जावू शकतो. आपल्याला बाजारामध्ये चंदनाची कांडी मिळते ती विकत आणून आपण ती चंदनची कांडी दुधा सोबत उगळून ती पेस्ट चेहऱ्याला आणि हाताला लावली तर आपली त्वचा काही दिवसामध्ये उजळ बनू शकते पण हा उपाय रोज केला पाहिजे.
- खूप पूर्वीच्या काळापासून त्वचेचे सौंदर्य खुलवण्यासाठी वापरला जाणारा उपाय म्हणजे डाळीचे / बेसन पीठ. असे म्हटले जाते डाळीचे पीठ हे आपला रंग उजळण्यासाठी मदत करतो म्हणून जर सावळ्या व्यक्तीने आठवड्यातून ३ दिवसातून डाळीचे पीठ आणि दुध मिक्स करून चेहऱ्याला आणि हाताला लावले आणि ते १५ ते २० मिनिटे ठेऊन ते पाण्याने स्वच्छ धुतले तर आपल्या चेहऱ्यामध्ये फरक पडतो.
- बाजारामध्ये त्वचेचे मसाज करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची तेल मिळतात जर आपण त्या तेलाने आपल्या चेहऱ्याचा आणि त्वचेचा मसाज हा आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा. त्यामुळे तुमची त्वचा मऊ, रेशमी आणि चमकदार बनण्यास मदत होईल.
- जर आपण कोणत्याही फंक्शन साठी जाणार असू तर त्याच्या आधल्या दिवशी तुम्ही चेहऱ्याला टोमॅटो रस आणि हळद मिक्स करून लावण आणि ते १० ते १५ मिनिटे चेहऱ्यावर तसेच ठेवा आणि मग १० ते १५ मिनिटाने ते पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या असे केल्याने तुमच्या चेहऱ्यावर दुसऱ्या दिवशी ग्लो आलेला असेल आणि तुमचा चेहरा खूप मऊ आणि उजळ दिसेल.
- कोरफड थंड आणि दाहक-विरोधी प्रभावामुळे त्वचेला प्रकाश देणारा एजंट म्हणून वापरला जाऊ शकतो. कोरफडीचा वापर केल्याने पेशी विभाजन आणि खराब झालेल्या ऊतींच्या दुरुस्तीला प्रोत्साहन मिळते. हे हायपरपिग्मेंटेशनच्या उपचारात मदत करू शकते. कोरफड चा गर त्वचेला १५ ते २० मिनिटासाठी लावला आणि २० मिनिटांनी दुताला तर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक झालेला दिसून येईल.
- मसूरच्या डाळीचे पीठ देखील त्वचेसाठी चांगले असते त्यामुळे देखील त्वचा उजळू शकते. पीठ दुधामध्ये भिजवा आणि त्याची पेस्ट बनवून चेहऱ्याला लावा आणि १० ते १५ मिनिटे तसेच ठेवा आणि मग स्वच्छ पाण्याने धुवा.
- सध्या सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक प्रकारच्या केमिकलयुक्त मास्कशीट वापरल्या जातात परंतु आपण मध हा देखील मास्क म्हणून चेहऱ्याला लावू शकतो कारण मधामध्ये देखील असे औषधी गुणधर्म असतात जे आपले सौंदर्य वाढण्यास मदत करते. तुम्ही मध मास्क सारखे लावा आणि ते १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा आणि मग ते वाळले कि १५ ते २० मिनिटाने स्वच्छ धुवा.
- जर आपण बदाम हे कच्च्या दुधासोबत उकळून लावले तरी आपला चेहरा किंवा त्वचा उजळ बनू शकते.
- तांदळाच्या पिठाचा पॅक लावल्यामुळे देखील आपली त्वचा सुंदर आणि उजळ दिसू शकते. एका वाटीमध्ये दोन चमचे तांदळाचे पीठ घ्या आणि मग त्यामध्ये थोडा मद आणि कच्चे दुध घाला आणि त्याची चेहऱ्याला लावता येईल अशी पेस्ट बनवून घ्या आणि मग ती पेस्ट चेहऱ्याला आणि हातांना लावा आणि १० ते १५ मिनिटे ठेवा आणि मग पाण्याने स्वच्छ धुवा
- बाजारामध्ये अशा अनेक क्रीम मिळतात जे सौंदर्य वाढवण्यासाठी मदत करतात त्यामधील काही चांगले क्रीम, फेसवॉश, जेल, नाईट क्रीम यासारख्या क्रीम देखील वापरून पाहू शकता.
- तुम्ही कोठूनही बाहेरून आला कि तुमचा चेहरा आणि त्वचा पाण्याने स्वच्छ करा कारण अंगावर धुळा आणि माती उडालेली असते आणि यामुळे त्वचा खराब दिसू शकते.
- हळद मेलेनिनचे उत्पादन रोखते आणि त्वचेला एकसमान रंग देते. ते निरोगी त्वचा राखण्यास देखील मदत करते कारण त्यात अँटीऑक्सिडंट आणि एंटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे हळदीचा वापर तुमच्या त्वचेवर केला तर तुमची त्वचा झटपट उजळ होण्यास मदत होते.
- आपल्या त्वचेची आपण रोजच्या रोज काळजी घेतली नाही तरी देखील त्वचा काळपट दिसू शकते म्हणून त्वचेची रोजच्या रोज काळजी घ्या.
टीप: या लेखात दिलेली माहिती बातम्या इंटरनेट वरून घेतलेली असून त्याचा वापर करण्याअगोदर तुमच्या डॉक्टरचा सल्ला आवश्य घ्या.
आम्ही दिलेल्या beauty tips in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर घरगुती ब्युटी टिप्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या beauty tips for face in marathi language या article मध्ये update करू, मित्रांनो हि homemade beauty tips in marathi language माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट