व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी Vyayamache Mahatva Essay in Marathi

Vyayamache Mahatva Essay in Marathi – Importance of Exercise in Marathi व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी मित्रांनो, आज मी तुम्हाला आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये व्यायामाचे काय महत्त्व आहे हे सांगणार आहे. आजकाल सर्व लोक दिवसभर आपल्या कोणत्या ना कोणत्या कामामध्ये खूप व्यस्त असतात. त्यांना त्यांच्या शरीराकडे लक्ष द्यायला सुद्धा वेळ नसतो. पण, हे अत्यंत चुकीचे आहे. आपण जेवढे आपल्या कामाला महत्त्व देतो, तेवढेच महत्त्व आपण आपल्या शरीराला देणे गरजेचे आहे. कारण, जर आपलं शरीरचं मजबूत नसेल तर आपण काम करू शकणार नाही आणि जर आपल्याला आपलं शरीर मजबूत करायचं असेल तर, न चुकता अगदी रोजच्या रोज म्हणजेच नियमितपणे व्यायाम करणे गरजेचे आहे.

Vyayamache Mahatva essay in marathi
Vyayamache Mahatva essay in marathi

व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी – Vyayamache Mahatva Essay in Marathi

व्यायाम म्हणजे नेमकं काय – Exercise Information in Marathi

शरीराला मजबूत करण्यासाठी, शरीरातील स्नायू बळकट करण्यासाठी आणि शरीराची ताकद वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रक्रियेस व्यायाम असे म्हणतात. व्यायामामध्ये धावणे, पळणे, पोहणे, मैदानी खेळ खेळणे, जोर-बैठका मारणे, जड वजन उचलणे इत्यादी. अनेक गोष्टींचा समावेश होतो.

निरोगी जीवनासाठी व्यायामाचे महत्त्व – Importance of Exercise in Marathi

मित्रहो, आजच्या आधुनिक काळामध्ये हवा  प्रदूषण खूप जास्त प्रमाणात वाढले आहे आणि या वाढत्या प्रदूषणामुळे लोक वारंवार आजारी पडत आहेत. कारण, विकासाच्या प्रक्रियेमध्ये माणूस खूप पुढे निघून गेला आहे. पण, स्वतःचे आरोग्य मात्र पूर्णपणे बिघडवून बसला आहे आणि म्हणूनच निरोगी जीवन जगण्यासाठी तसेच, कोणत्याही आजारापासून वाचण्यासाठी व्यायाम करणे अत्यंत गरजेचे आहे.

त्यामुळे, सर्वांनी व्यायाम करणे ही काळाची गरज आहे. मित्रहो, समजा तुमच्याकडे सर्व गोष्टी आहेत पण, तुमचे आरोग्य व्यवस्थित नाही तर, मग तुम्ही त्या सर्व गोष्टींपासून मिळणाऱ्या सुखांचा अनुभव आनंदाने किंवा व्यवस्थितपणे घेऊ शकाल का? तर अजिबात नाही घेऊ शकणार.

नियमित व्यायामामुळे शरीराला होणारे फायदे 

 • आत्मविश्वास वाढवते आणि कोणतेही कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते.
 • व्यायामामुळे शरीर निरोगी राहते आणि कोणतेही आजार होत नाही.
 • शरीरामध्ये बल वाढते आणि शरीरातील स्नायू बळकट होतात.
 • नियमितपणे व्यायाम केल्यामुळे शरीराला लवचिकता प्राप्त होते.
 • शरीराची पचन शक्ती वाढते आणि मजबूत होते.
 • शरीरातील अनावश्यक चरबीचे प्रमाण कमी होते.
 • व्यायामामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालू राहतो.
 • व्यायामामुळे आळस येत नाही.
 • व्यायामामुळे मन नेहमी प्रसन्न राहते.
 • नियमित व्यायामामुळे शरीरातील बल वाढते आणि आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वृद्धी होते.
 • मानसिक तणाव कमी होतो.
 • नियमित व्यायामामुळे झोप व्यवस्थित लागते.
 • व्यायामामुळे शरीरातील धमक वाढते.
 • हृदय आणि फुप्फुसांची कार्यक्षमता वाढते.
 • उच्च रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा असे आजार व्यायामामुळे होत नाहीत.
 • व्यायामामुळे थकवा जाणवत नाही.
 • शरीरातील हाडे मजबूत होतात.
 • व्यायामामुळे शरीराला चांगला आकार प्राप्त होतो.
 • नियमितपणे व्यायाम केल्यामुळे शरीर खूप छान दिसते.

बदलत्या आधुनिक जीवनशैलीत व्यायामाचे फायदे – Vyayamache Fayde

मित्रहो, अलीकडे विकासाच्या, धावपळीच्या आणि आधुनिक विज्ञानाच्या युगात सर्व प्रकारच्या वयोगटातील लोक हल्ली व्यायामाकडे खूप दुर्लक्ष करत आहेत. शिवाय, तरुण वर्गातील जास्तीत जास्त मुले अभ्यासाच्या ताणतणावामुळे व्यायामाकडे दुर्लक्ष करत आहेत. वृद्ध वर्गातील लोकांना असे वाटते की, आता वय झाले आहे तर व्यायाम करण्याचा काय उपयोग, त्यामुळे ते व्यायाम करत नाहीत पण हे चुकीचे आहे.

कारण व्यायामासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही, त्यामुळे तुम्ही कोणत्याही वयाचे असो तुम्ही व्यायाम करू शकता. वृद्ध लोकांनी जर व्यायाम केला तर त्यांना होणारे विविध प्रकारचे त्रास म्हणजे गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, वयोमानानुसार हाडे कमकुवत होणे, तसेच हालचाल करण्यात समस्या उद्भवणे आणि मधुमेह इत्यादी. कमी होऊ शकतात.

अलीकडील काळामध्ये सर्व लोक सुख, समृद्धी आणि पैसे कमवण्याच्या मागे लागले आहेत पण, या सगळ्यांत मात्र ते स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करत आहेत. समजा आपल्या सर्वांकडे खूप पैसा आहे, ऐश्वर्य आहे, सर्व सुख-सुविधा आहेत पण जर चांगले आरोग्य नसेल तर या सर्व गोष्टींचा काय फायदा कारण, आपण ह्या सर्व गोष्टींमधील सुख अनुभवू शकणार नाही.

म्हणूनच मित्रहो, जर तुम्हाला सर्व प्रकारच्या सुखसुविधा अनुभवायच्या असतील तर तुम्हाला रोजच्या रोज आणि नियमितपणे व्यायाम करावा लागेल. कारण, व्यायाम केल्याने आपले तन आणि मन स्वस्थ, निरोगी आणि प्रसन्न राहते.

व्यायामाचे फायदे – Benefits of Exercise in Marathi

मित्रहो, नियमितपणे व्यायाम केल्याने आपल्या शरीराची कष्ट करण्याची क्षमता म्हणजेच धमक वाढते. समजा जर तुम्ही तुमचा मोबाईल फोन चार्जिंग केलाच नाही तर तो चालेल का? अगदी असचं आपल्या शरीराचं सुद्धा आहे, त्याला सुद्धा चार्जिंग करण्याची आवश्यकता असते. फरक फक्त एवढाच मोबाईल फोनसाठी चार्जिंग करण्याचे काम जसे त्या मोबाईलचे चार्जर करत असतो, अगदी तसेच आपल्या शरीराला चार्जिंग करायचे असेल तर रोज व्यायाम करणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यासाठी, आपण कमीत कमी नियमितपणे तीस मिनिटे तरी व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम केल्याने शरीरावर एक विशिष्ट प्रकारचे तेज येते. आपण इतरांपेक्षा आकर्षक आणि वेगळे दिसू लागतो. आपण नेहमीच्या धावपळीच्या जीवनामध्ये रोज कमीत कमी अर्धा तास ते एक तास वेळ खास आपल्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी दिला पाहिजेत.

व्यायामाचे विविध प्रकार – Types of Exercise in Marathi

आपणा सर्वांना माहीत आहे की व्यायामाचे  खूप प्रकार आहेत. परंतू, यामध्ये फक्त मुख्य चार प्रकार आहेत. समतोल व्यायाम, स्ट्रेचिंग व्यायाम, एरोबिक व्यायाम आणि अनएरोबिक व्यायाम हे चार प्रकार आहेत. व्यायामाच्या या चार प्रकारांमध्ये धावणे, पोहणे, योगासन करणे, डान्स करणे, जोर-बैठका मारणे, पुश-अप्स मारणे, दोरीउड्या मारणे आणि वजन उचलणे इत्यादी हालचालींचा समावेश होतो.

समतोल व्यायाम

व्यायामाच्या या प्रकारामध्ये व्यायाम करताना एकाच स्थितीमध्ये बराच वेळ उभे राहून आपण आपल्या संपूर्ण शरीराचा समतोल साधावा लागतो. योगासने हे या व्यायामाच्या प्रकारामध्ये येतात. आपण नियमितपणे योगासने केली तर, आपल्या शरीरातील  लवचिकतेचे प्रमाण वाढते आणि आपले स्नायू देखील  बलवान होतात. त्याचबरोबर, योगासने, ध्यान आणि प्राणायाम केल्याने आपला मानसिक ताणतणाव  देखील भरपूर प्रमाणात कमी होण्यास मदत होते.

स्ट्रेचिंग व्यायाम

व्यायामाचा दुसरा प्रकार म्हणजे स्ट्रेचिंग व्यायाम होय. व्यायामाच्या या प्रकारामध्ये आपल्या शरीराला दुखापत, त्रास अथवा कोणत्याही प्रकारची इजा होत नाही, अशा स्थितीमध्ये शरीराला आणणे म्हणजे स्ट्रेचिंग करणे होय. वयोमानानुसार आणि योग्य त्या व्यायामाच्या अभावानुसार आपल्या शरीरामधील शिरा ताठतात आणि स्नायू कडक होतात.

त्यामुळे, त्या स्नायूंमधील बल व कार्य करण्याची क्षमता कमी होते. यामुळे, आपल्या शरीराला दुखापत आणि इजा होण्याची शक्यता वाढते. आपल्या शरीराला दुखापत न होण्यासाठी आपण सर्वांनी नेहमी स्ट्रेचिंग व्यायाम केले पाहिजेत. व्यायामाच्या या प्रकारामध्ये शरीराला विशिष्ट प्रकारचे ताण दिले जातात, त्यामुळे आपल्या शरीराची लवचिकता आणि शरीरातील बळ टिकून राहते.

एरोबिक व्यायाम

आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या फुफ्फुसांची, हृदयाची, स्नायूंची गती आणि शक्ती वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या व्यायामाला एरोबिक व्यायाम असे म्हणतात. व्यायामाच्या या प्रकारामध्ये रक्तवाहिन्या व हृदयरोग संबंधित रोग, उच्च रक्तदाब आणि मधुमेह यांसारखे आजार होण्याची शक्यता कमी होते. एरोबिक व्यायामामध्ये पोहणे, जॉगिंग करणे, दोरी उड्या मारणे, चालण्याचा व्यायाम करणे, झुम्बा डान्स करणे, सायकल चालवणे आणि आपल्या इतर शारीरिक क्रियांचा समावेश होतो.

या व्यायामामध्ये श्वासाचे प्रमाण आणि हृदयाचे ठोके साधारणतः २० ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत वाढले पाहिजे. शिवाय, हा व्यायाम नियमितपणे दररोज ३० ते ४० मिनिटे केला पाहिजे. हा व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराची कार्य करण्याची क्षमता वाढते म्हणजेच कोणतेही काम करताना लवकर थकवा येत नाही व आपण कोणतेही काम जास्तीत जास्त वेळ करू शकतो. ज्या व्यक्तींना हृदयविकाराचा त्रास आहे, त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय हा व्यायाम करू नये.

अनएरोबिक व्यायाम

मित्रहो, आपल्या शरीरातील ताकद किंवा बल वाढवण्यासाठी केल्या जाणाऱ्या विशिष्ठ अशा या  व्यायामाला अनएरोबिक व्यायाम असे म्हणतात. ताकद म्हणजे कोणतेही कार्य करण्यासाठी आवश्यक असणारी शक्ती होय. व्यायामाच्या या प्रकारामध्ये जोर-बैठका करणे, पुश अप्स करणे, वेगाने धावणे, जड वजन उचलणे इत्यादी. विविध गोष्टींचा समावेश होतो. या प्रकारामध्ये कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त उर्जा वापरली जाते.

त्यामुळे, अशा प्रकारच्या व्यायांमामुळे आपल्या शरीरामधील सर्व स्नायू ताकददार, मजबूत आणि पिळदार होतात. शिवाय,  यामध्ये आपल्या शरीराची कॅलरीज इतर व्यायामाच्या तुलनेने जास्त जळतात त्यामुळे वजन कमी होण्यास फायदा होतो. परंतू, हृदयविकार असलेल्या व्यक्तीने हा व्यायाम करू नये.

आम्ही दिलेल्या Vyayamache Mahatva essay in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर व्यायामाचे महत्त्व निबंध मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या exercise information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि importance of exercise in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये benefits of exercise in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!