Vardhman Bhagwan Mahavir Information in Marathi भगवान वर्धमान महावीर जैन धर्माला प्रभावशाली बनवणारे, अहिंसेचे मूर्तिमंत प्रतिक, जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेत विश्लेषण करण्याचे काम ज्यांनी केले असे जैन धर्माचे २४ वे तीर्थकर भगवान महावीर यांचे अवघे जीवनच आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी कर्मकांड, अवडंबर आणि भीती यांच्या ओझ्याखाली दबलेल्या भारतीय जनतेला अहिंसा आणि सत्याच्या मार्गावरून जाण्यास शिकविले.
वर्धमान भगवान महावीर माहिती – Vardhman Bhagwan Mahavir Information in Marathi
भगवान महावीर यांचा जीवन परिचय
नाव | भगवान महावीर |
जन्म | इ.स. ५९९ पूर्वी |
जन्मस्थळ | कुंडग्रामात, बिहार |
वडील | राजा सिद्धार्थ |
आई | राणी त्रिशलादेवी |
पत्नी | यशोदाशी |
अपत्ये | प्रियदर्शनी |
टोपणनावे | सन्मती, महावीर, वर्धमान, जितेंद्र |
धर्म | जैन |
निर्वाण | इ.स. ५२७ पूर्व पावापुरी, बिहार |
महावीरांचा जन्म आणि बालपण
वर्धमान महावीर यांचा जन्म कोणत्या गणराज्यात झाला?
इ. स. पुर्व ६ व्या शतकात मगध देशातील (सध्याच्या बिहारमधील कुंडलपूर) वैशाली नगरीचे उपनगर असलेल्या कुंडग्रामात राजा सिद्धार्थ व राणी त्रिशलादेवी यांच्या पोटी चैत्र महिन्यातील त्रयोदशीला क्षत्रिय कुटुंबात भगवान महावीरांचा जन्म झाला. वडील सिद्धार्थ हे ईश्वाकु वंशाचे राजा होते. तर आई त्रिशला हि वैशालीच्या लीच्छविवंशीय राजाची मुलगी होती. महावीर गर्भावस्थेत असताना त्यांना देवानंदा नावाच्या ब्राम्ह्नीच्या उदरातून त्रिशला या क्षत्रिय राणीच्या उदरात आणण्यात आले होते, अशी पुराणकथा सांगितली जाते. भगवान महावीर हे लहानपणापासूनच अत्यंत तेजस्वी आणि कुशाग्र बुद्धीचे होते. कठीण तपोबलाने त्यांनी आपल्या जीवनाला महान बनविले.
भगवान महावीराना वर्धमान, सन्मती, महावीर, वर्धमान, जितेंद्र या वेगवेगळ्या नावांनी देखील ओळखले जातं. अस म्हणतात कि त्यांच्या जन्मानंतर राज्यात खूप संपन्नता आणि वृद्धी झाली, त्यामुळे त्यांचे ‘वर्धमान’ हे नाव ठेवण्यात आले. लहानपणापासूनच त्यांच्यातील साहस, तेज, बल यामुळे त्यांना ‘महावीर’ असा म्हटल गेलं. आपल्या सगळ्या इच्छा आणि इंद्रियांवर त्यांनी विजय प्राप्त केल्यामुळे त्यांना ‘जितेंद्र’ हे नावाने ओळखण्यात आले.
संत महावीरांना संसारिक सुखाविषयी विशेष आसक्ती कधीच नव्हती, परंतु आई- वडिलांच्या इच्छेनुसार त्यांनी वसंतपूर येथील महासामंत समरवीराची कन्या यशोदाशी हिच्याशी विवाह झाला. लग्नानंतर त्यांना प्रियदर्शनी नावाची एक कन्या झाली.
तपश्चर्या आणि ज्ञानप्राप्ती
महावीरांची विचारधारणा हि चिंतनशील असल्याने राजघराण्यातील भौतिक वैभव त्यांना अधिक काल आकर्षित करू शकले नाही. त्यांच्या आई वडिलांच्या मृत्यूमुळे तर महावीर अधिकच विरक्त झाले. ऐहिक सुखाबद्दल त्याच्या मनात उरलेसुरले जे आकर्षण होते तेही कमी झाले. मानवी जीवनातील दुःख हे सुखापेक्षाही अधिक आहे याची तीव्र जाणीव त्यांना झाली. दुःख कमी करण्याचा काहीतरी मार्ग शोधला पाहिजे असे त्यांना वाटायचे. त्यामुळे वयाच्या ३० व्या वर्षी त्यांनी ऐहिक संपत्ती, संसार व राजपाट याचा त्याग करून वैराग्य स्वीकारले.
अध्यात्मिक जागृतीचा प्रसार व आत्मकल्याण करण्यासाठी जैन दीक्षा घेऊन ते एक तपस्वी बनले. घनदाट अरण्यात त्यांनी सलग १२ वर्ष कठोर तपश्चर्या आणि आत्मध्यान केले आणि त्यांना ज्ञानाची प्राप्ती झाली. वयाच्या ४२ व्या वर्षी केवळज्ञान (सर्वज्ञान) प्राप्त झाले.
जैन धर्माचा इतिहास
जैन धर्म हा जगातील एक प्रमुख धर्म आहे. हा प्राचीन धर्म असून त्याचे पुरुज्जीवन या युगात प्रथम तीर्थकर श्री रिषभदेवांनी केले. लोकसंख्येच्या दृष्टीने हा भारतातील सहाव्या क्रमांकाचा धर्म आहे. हा धर्म वैदिक परंपरेतून उदयाला आला असून तो एक स्वतंत्र धर्म मानला जातो. ‘जगा आणि जगू द्या’ या विचारांवर जैन धर्माचे तत्वज्ञान आधारलेले आहे. जैन साहित्यानुसार या काळात जगामध्ये ६२ धर्म संप्रदाय उदयाला आले.
अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्त्वाचा विचार आहे, कि जो मानवी कल्याणाचा पुरस्कार करतो. मानवतेच्या कल्याणासाठी सतत जागृत राहून कार्य करण्याचे अभिवचन हे अनेकांतवादातून दिले गेलेले आहे.
जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेत विश्लेषण करण्याचे काम जैन धर्मातील २४ वे तीर्थकर भगवान महावीरांनी केले.
भगवान महावीर यांची शिकवण
जैनांचे २४ वे तीर्थकर भगवान महावीरांनी आपल्या शिकवणुकीतून आणि उपदेशाच्या सहाय्याने लोकांना जीवन जगण्याची कला शिकवली आणि सत्य व अहिंसेचा मार्ग दाखविला.
भगवान महावीरांनी जैन धर्माचे पुनरुत्थान केले. त्यांनी पूर्व वैदिक काळातील पूर्वीच्या तीर्थ्कारांच्या आध्यात्मिक, दार्शनिक आणि नैतिक शिकवणीचा विस्तार केला.
ज्ञानप्राप्तीनंतर लोककल्याणाच्या तळमळीने ते सर्वत्र हिंडले. वयाच्या ४२ व्या वर्षी केवळज्ञान प्राप्त केल्यानंतर महावीरांनी असे शिकवले कि, ‘अहिंसा’, ‘सत्य’, ‘अस्तेय’ (चोरी न करणे), ‘अपरिग्रह’ (संपत्ती जमा न करणे) व ‘ब्रम्हचर्य’ (शुद्ध आचरण ) हि पंचमहाव्रते आध्यात्मिक मुक्तीसाठी आवश्यक आहेत. त्यांनी अनेकान्तवाद (अनेक बाजूंनी केलेले सापेक्ष कथन) व स्यादवाद यांचे सिद्धांत शिकवले.
वैदिक यज्ञयागातील हिंसा कालबाह्य झाली, याचे एक प्रमुख कारण म्हणजे महावीर आणि गौतम बुद्ध यांनी हिंसेला केलेला विरोध होय.
पशुहत्या आणि हिंदू समाजात पसरलेल्या जाती व्यवस्थेचा विरोध करणारे भगवान महावीर यांच्या सिद्धांताना आणि शिकवणुकीला स्वीकारून कोणताही मनुष्य सच्चा जैन अनुयायी होऊ शकतो.
भगवान महावीर यांचे महान विचार सुविचार (भगवान महावीर के संदेश)
भगवान महावीरांनी आपल्या शिकवणुकीतून आणि आपल्या उपदेशांमधून लोकांना जीवनात यशस्वी होण्याचा मूलमंत्र दिला आहे. त्यांचे काही प्रेरणादायक आणि अनमोल विचार असे आहेत,
- “जगा आणि जगू द्या” कुणालाही दुःख पोहचवू नये, प्रत्येकाचे जीवन त्याच्यासाठी अनमोल आहे.
- आत्मविश्वास हे संरक्षणाचे साधन आहे.
- अंतःकरण स्वच्छ ठेवण्याकरिता नियमितपणे ईश्वर प्रार्थना केली पाहिजे.
- क्षमा वृत्ती ठेवून जग जिंकावा.
- जिभेचे मौन हे खरे मौन नाही. मनाला मौनाची दीक्षा दिली पाहिजे.
- जो शक्तिशाली असूनही क्षमा करतो, आणि दळीद्री असूनही दान करतो असे पुरुष स्वर्गाच्याही वर राहत असतात.
- ज्ञानी मनुष्य हा विश्वाचा स्वर्ग बनवू शकतो.
- ज्याचे मन निरंतर धर्मरत असते त्याला देव देखील नमस्कार करतो.
- दया अशी भाषा आहे कि ती बहिर्यालाही ऐकायला येते आणि मुक्याला देखील समजू शकते.
- दुष्टांच्या संगतीने सदाचार लोप पावतो.
- नम्रता म्हणजे ज्ञानाचा मापदंड आहे.
भगवान महावीर यांचे निर्वाण
३० वर्षे भारतभर संपूर्ण मानवजातीला सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याचा उपदेश करणारे आणि जैन तत्वज्ञानाचा प्रचार करणारे भगवान महावीर यांनीवयाच्या ७२ व्या वर्षी इ.स. ५२७ पूर्व कार्तिक महिन्यातील आश्विन वद्य अमावस्येला बिहार मधील पावापुरी येथे आपल्या नश्वर शरीराचा त्याग केला आणि त्यांचे निर्वाण झाले.
या स्थळाला जैन धर्मीय त्यांच्या प्रमुख स्थळांपैकी एक मानतात. भगवान महाविर यांच्या ध्यानधारणेच्या अवस्थेत व सिहांकित चिन्हासह अशा मूर्ती भारतातील जैन तीर्थक्षेत्री आढळून येतात.
चैत्र शुद्ध त्रयोदशीला महावीर जयंती साजरी केली जाते. हा दिवस जैन लोक ‘दिपावली’ म्हणून साजरा करतात. दीप + आवली म्हणजे दिव्यांची ( ज्ञानरूप दिवा ) आवली (माळ) अर्थात त्यांच्या उपदेशाने दिव्य अशा मोक्षप्राप्तीसाठी आवश्यक अशा ज्ञानाची परंपरा निर्माण झाली.
महावीर जयंती हा जैन धर्मियांचा मुख्य सण आहे. हा सण शेवटचे जैन तीर्थकर महावीर यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो.
आम्ही दिलेल्या vardhman bhagwan mahavir information in marathi wikipedia माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर भगवान वर्धमान महावीर यांच्याबद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bhagwan mahavir information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about bhagwan mahavir in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण या लेखाचा वापर bhagwan mahavir in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट
धन्यवाद.भगवान महाविरांबद्दल थोडक्यात छान माहिती मिळाली.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ..!