कुरकुरीत भजी रेसिपी मराठी Bhaji Recipe in Marathi

Bhaji Recipe in Marathi कुरकुरीत भजी रेसिपी मराठी भजी हा एक भारतीय पदार्थ असून या पदार्थाचे नाव जरी घेतले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते कारण भजी हा पदार्थ अनेकांचा आवडता पदार्थ असतो. भजी हि डिश आपण केंव्हाही बनवून खाल्ली तरी चालते जसे कि नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणामध्ये, रात्रीच्या जेवणामध्ये किंवा आपण भजी हा पदार्थ आपल्या केंव्हाही खावू वाटल्यास बनवू शकतो किंवा आपण संध्याकाळच्या चहासोबत भजी या पदार्थाची मजा घेवू शकतो. भजी हा पदार्थ घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये म्हणजेच घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासून बनवता येतो.

भजी वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकतो जसे किं साधे भजी, कांदा भजी, मिरची भजी, कोबी भजी यासारखे अनेक भजीचे प्रकार बनवू शकतो त्यामधील काही आपण या लेखामध्ये पाहूयात. चला तर मग आज आपण वेगवेगळ्या भजी रेसिपीज कश्या बनवायच्या ते पाहूयात.

Bhaji Recipe in Marathi
Bhaji Recipe in Marathi
अनुक्रमणिका hide
1 कुरकुरीत भजी रेसिपी मराठी – Bhaji Recipe in Marathi

कुरकुरीत भजी रेसिपी मराठी – Bhaji Recipe in Marathi

भजी बनवण्यासाठी लागणारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • डाळीचे पीठ : हरभरा डाळीचे पीठ हे अनेक प्रकारचे भाजी बनवण्यासाठी लागणारे एक महत्वाचे साहित्य आहे. डाळीचे पीठ वापरून भजीचे २ ते ३ प्रकार बनवले जातात.
  • तिखट आणि मीठ : भजी मध्ये लाल मिरची पावडर किंवा हिरवी मिरची जर आपण घातली तर त्या भजीला चांगला तिखट पणा येतो तसेच मीठ घातल्यामुळे भजीला चव येते.
  • तेल : कोणत्याही प्रकारचे भजी तळण्यासाठी तेल हे गरजेचे असते म्हणून तेल हा भजी बनवण्यासाठी लागणारा महत्वाचा घटक आहे असे आम्ही मानतो.

भजी रेसिपीज 

भजी हा पदार्थ आपण केंव्हाही बनवून खावू शकतो सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी कारण हा पदार्थ खाण्यासाठी काही नियम नाही आहेत कि हा पदार्थ सकाळी नाश्त्यामध्ये खावा किंवा रात्री जेवणामध्ये खावा आणि हा पदार्थ अनेक लोकांचा आवडता पदार्थ देखील आहे. भजी हा पदार्थ घरी बनवण्यासाठी खूप सोपा आहे आणि खूप कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये बनतो. आता आपण वेगेवेगळ्या प्रकारे भजी कशी बनवतात ते पाहणार आहोत.

साधे भजी – simple bhaji recipe in marathi

साधे भजी हे पूर्वीच्या काळापासून बनवले जातात म्हणून या भज्याच्या प्रकाराला पारंपारिक भजी म्हणून आपण ओळखू शकतो. साधे भाजी हे पूर्वी चौकोनी चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, तिखट, मीठ, हळद आणि सोडा वापरून बनवली जायची. आता आपण साधे भजी कसे बनवायचे ते पाहूयात.

साधे भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make simple bhaji recipe 

हे भजी खूप साध्या पध्दतीने बनवली जातात आणि आणि यामध्ये कांदा, तिखट आणि मीठ यासारखे घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असलेले साहित्य वापरतात. चला तर मग साधे भजी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ मोठी वाटी हरभरा डाळीचे पीठ.
  • १ मोठा कांदा ( चौकोनी चिरलेला ).
  • अर्धा मोठा चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर.
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • १ चमचा हळद.
  • १/२ चमचा खायचा सोडा.
  • मीठ ( चवीनुसार ).

साधे भजी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make kanda bhaji recipe 

  • आता आपण वर दिलेले सर्व साहित्य वापरून साधे भाजी कसे बनवायचे ते पाहूयात.
  • सर्वप्रथम एक कांदा घ्या आणि तो बारीक चौकोनी चिरून घ्या तसेच कोथिंबीर देखील बारीक चिरून घ्या.
  • आता एक भांडे घ्या आणि त्यामध्ये हरभरा डाळीचे पीठ एक मोठी वाटी घ्या आणि त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घाला आणि त्यामध्ये लागेल तसे पाणी घालून ते घट्ट ( आपल्याला पिठाचे भजी बनवता येतील )भिजवून घ्या. ( टीप : आपण या मिश्रणामध्ये थोडासा लिंबू रस देखील घालू शकतो ).
  • हे भिजवलेले पीठ १० मिनिटे भाजुला ठेवा.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि कढई मध्ये भजी तळण्यासाठी तेल घाला आणि तेल गरम होईपर्यंत वाट पहा.
  • आता त्या पिठामध्ये सोडा घाला आणि ते चांगले मिक्स करा.
  • तेल चांगले गरम झाले कि त्यामध्ये जितके भजी मावतील तितके भजी टाकून ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्या आणि तळल्यानंतर ते तेलातून बाहेर काढा.
  • आणि राहिलेल्या पीठाचे देखील भजी तळून घ्या.
  • अश्या प्रकारे तुमचे पारंपारिक भजी खाण्यासाठी तयार झाले. हे भजी आपण तसेच किंवा चपाती सोबत खाऊ शकतो.

कांदा भाजी रेसिपी – kanda bhaji recipe in marathi

कांदा भाजी हा पदार्थ सर्वांना आवडणारा आणि भारतीय स्वयंपाक घरामध्ये वारंवार बनवला जाणारा एक अगदी चविष्ट पदार्थ आहे. कांदा भजी हा असा पदार्थ आहे जो आपण नाश्ता किंवा जेवणामध्ये देखील बनवू शकतो. आता आपण कांदा भजी कशी बनवायची ते पाहूयात.

कांदा भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make kanda bhaji recipe 

कांदा भजी बनवण्यासाठी हरभरा डाळीचे पीठ  आणि कांदा हे मुख्य साहित्य लागते आणि काही इतर साहित्य देखील लागते आणि ते आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असू शकते. खाली आपण कांदा भजी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • ३ वाटी उभा चिरलेला कांदा.
  • १ वाटी डाळीचे पीठ.
  • २ ते ३ चमचे रवा.
  • १ ते २ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
  • दीड चमचा लाल मिरची पावडर.
  • १/२ चमचा हळद.
  • १ चमचा ओवा.
  • १/२ मोठा चमचा कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
  • १/४ चमचा खायचा सोडा.
  • २ चमचे लिंबू रस.
  • मीठ ( चवीनुसार ).
  • तेल ( तळण्यासाठी ).

कांदा भजी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make kanda bhaji recipe 

  • सर्वप्रथम चिरून २ वाटी होईल इतके कांदे घ्या आणि बारीक उभे चिरून घ्या आणि ते एका भाड्यात घालून ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि त्यामधील पाणी काढून घ्या. ( टीप : भाडे थोडे मोठे असावे कारण त्यामध्ये आपण इतर साहित्य देखील मिक्स करायचे असते आणि मोठे भांडे असले कि सर्व मिश्रण चांगले एकत्र करता येते ).
  • चिरलेला कांदा धुतल्यानंतर सुट्टा होतो त्यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि आणि ते मिक्स करून कांदा १० मिनिटे बाजूला ठेवा.
  • तोपर्यंत हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
  • आता मीठ लावून ठेवलेले कांद्याचे भांडे घ्या, त्या कांद्याला पाणी सुटले असेल आता डाळीचे पीठ घ्या आणि त्या कांद्यामध्ये मावेल तेवढे पीठ घाला आणि ते चांगले मिक्स करून घ्या. मावेल तेवढे पीठ घालूनही जर कांदा थोडा सुट्टा वाटत असेल तर त्यामध्ये अनखील थोडे पीठ घाला.
  • आता त्यामध्ये रवा, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबू, रस, लाल तिखट, हळद, ओवा आणि थोडे मीठ घालावे लागत असेल तर ते सर्व घालून ते चांगले एकत्र करून आणि थोडे पाणी लावून मिश्रण एकत्र करून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि कढई मध्ये भजी तळण्यासाठी तेल घाला आणि तेल गरम होईपर्यंत वाट पहा.
  • आता त्या पिठामध्ये सोडा घाला आणि ते चांगले मिक्स करा.
  • तेल चांगले गरम झाले कि त्यामध्ये जितके भजी मावतील तितके भजी टाकून ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्या आणि तळल्यानंतर ते तेलातून बाहेर काढा.
  • आणि राहिलेल्या पीठाचे देखील भजी तळून घ्या.
  • कुरकुरीत कांदा भाजी खाण्यासाठी तयार झाले.
  • कांदा भजी आपण तसेच, चहासोबत किंवा शिरा आणि भजी असे कॉम्बिनेशन देखील खावू शकतो.

मिरची भजी रेसिपी – mirchi bajji recipe in marathi

मिरची भजी हा प्रकार देशामध्ये आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे आणि हा प्रकार भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीने बनवला जातो. मिरची भजी हा प्रकार अनेक लोकांना आवडण्याचे कारण म्हणजे या भजीच्या पिठामध्ये अखंड हिरव्या मिरच्या घातलेल्या असतात आणि त्या अखंड हिरव्या मिरची सोबत भजी बनवले जातात आणि ते भजी खातेवेळी मिरची तोंडामध्ये आली कि एक वेगेळीच चव लागते म्हणून काही लोकांना मिरची भजी आवडते. काही ठिकाणी मिरची भजी आकाराने लहान असते आणि काही ठिकाणी मोठी असते. चला तर मग पाहूयात मिरची भजी कशी बनवायची.

मिरची भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make mirachi bhaji recipe 

मिरची भजी बनवण्यासाठी विशेष असे काही साहित्य लागत नाही म्हणजेच आपल्याला हा पदार्थ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपल्या घरामध्ये अगदी सहजपणे उपलब्ध असू शकते. आता आपण मिरची भजी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.

  • १ मोठी वाटी हरभरा डाळीचे पीठ.
  • अर्धी मध्यम आकाराची वाटी रवा.
  • ७ ते ८ हिरव्या मिरच्या.
  • १/२ मोठा चमचा बारीक हिरलेली कोथिंबीर.
  • १ चमचा ओवा.
  • १/२ चमचा हळद.
  • १/२ चमचा खायचा सोडा.
  • मीठ ( चवीनुसार ).

मिरची भजी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make mirachi bhaji recipe 

  • सर्वप्रथम मिरच्या स्वच्छ धुवून घ्या आणि कोथिंबीर देखील धुवून बारीक चिरून घ्या.
  • आता डाळीचे पीठ भिजवण्यासाठी एक भांडे घ्या आणि त्यामध्ये १ मोठी वाटी डाळीचे पीठ, रवा, हळद. ओवा आणि मीठ ( चवीनुसार ) घाला आणि त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून मिरचीच्या भज्याचे पीठ भिजवून घ्या ( टीप : मिरचीच्या भज्याचे पीठ हे थोडे पातळ असू द्या कांदा भजीसारखे एकदम घट्ट नको कारण मिरची त्यामध्ये टाकून मिरची सोबत ते पीठ तेलामध्ये सोडायचे असते म्हणजेच त्याचे भजी बनवायचे असतात ).
  • हे पीठ ९ ते १० मिनिटे भिजण्यासाठी बाजूला ठेवा.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि कढई मध्ये भजी तळण्यासाठी तेल घाला आणि तेल गरम होईपर्यंत वाट पहा.
  • आता त्या पिठामध्ये सोडा घाला आणि ते चांगले मिक्स करा.
  • तेल चांगले गरम झाले कि त्यामध्ये जितके ( मिरची पीठामध्ये टाकून मिरची सोबत ते पीठ तेलामध्ये सोडायचे असते म्हणजेच त्याचे भजी बनवायचे असतात ).भजी मावतील तितके भजी टाकून ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्या आणि तळल्यानंतर ते तेलातून बाहेर काढा आणि राहिलेल्या पीठाचे देखील भजी तळून घ्या.
  • तुमचे मिरची खाण्यासाठी तयार झाले. आपण हे चहा सोबत किंवा तसेच देखील खावू शकतो.

कोबी भजी रेसिपी – cabbage bhaji recipe in marathi

सध्या कोबीचे भजी बनवून खाणे हि देखील सवय झाली आहे कारण सध्या कोबीचा वापर जेवणामध्ये मोठ्या प्रमाणात होतो जसे कि भाजी बनवण्यासाठी, कोशिंबीर बनवण्यासाठी तसेच कोबीचे भजी देखील बनवले जातात. कोबी या भाजीमध्ये अनेक पोषक घटक असतात पण लहान मुले किंवा काही मोठे लोक कोबीची भाजी किंवा कोशिंबीर खाण्यास नकार देतात त्यावेळी आपण कोबी घालून भजी बनवू शकतो. चला तर मग पाहूयात कोबीज भजी कशी बनवतात ते.

कोबी भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make cabbage bhaji recipe 

  • १ वाटी डाळीचे पीठ किंवा तांदळाचे पीठ ( आवडीनुसार ).
  • अर्धी वाटी किसलेला कोबी.
  • १ ते २ चमचे रवा.
  • दीड चमचा लाल मिरची पावडर.
  • १ छोटा चमचा हळद.
  • १ चमचा ओवा.
  • २ हिरव्या मिरच्या ( बारीक चिरलेल्या ).
  • कोथिंबीर ( बारीक चिरलेली ).
  • १/४ चमचा खायचा सोडा.
  • १ चमचा लिंबू रस.
  • मीठ ( चवीनुसार ).

कोबी भजी बनवण्यासाठी केली जाणारी कृती – process to make cabbage bhaji recipe 

  • सर्वप्रथम कोबीज खिसून घ्या तसेच कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्या.
  • आता एक भांडे घ्या आणि त्या भांड्यामध्ये डाळीचे पीठ आणि रवा घाला आता त्यामध्ये खिसलेला कोबी, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चिरलेली कोथिंबीर घाला.
  • मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, ओवा, लिंबू रस आणि मीठ ( चवीनुसार ) घालून ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून ते घट्ट म्हणजे त्याचे भज्जी बनतील अशे पीठ भिजवून घ्या.
  • ते भिजवलेले पीठ ६ ते ७ मिनिटे चांगले भिजत ठेवा. ज्यावेळी आपण त्या पीठाचे भजी बनवणार आहोत त्यावेळी त्यामध्ये सोडा घालून ते चांगले मिक्स करून घ्या.
  • आता गॅसवर मध्यम आचेवर कढई गरम करण्यासाठी ठेवा आणि कढई मध्ये भजी तळण्यासाठी तेल घाला आणि तेल गरम होईपर्यंत वाट पहा.
  • तेल चांगले गरम झाले कि त्यामध्ये जितके भजी मावतील तितके भजी टाकून ते चांगले कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्या आणि तळल्यानंतर ते तेलातून बाहेर काढा.
  • आणि राहिलेल्या पीठाचे देखील भजी तळून घ्या.
  • कुरकुरीत कोबी भाजी खाण्यासाठी तयार झाले.

Palak Bhaji Recipe in Marathi

टिप्स ( Tips )

  • कोबी भजीमध्ये आपण कोबी खिसून टाकण्याऐवजी चिरून देखील घालू शकतो.
  • मिरची भजी बनवताना आपण पिठामध्ये मिरच्या आपण अखंड टाकण्याऐवजी अर्ध्या मोडून देखील टाकू शकतो.
  • लिंबू रस भजीच्या पिठामध्ये घातल्यामुळे भजीला आंबट गोड चव येते.

आम्ही दिलेल्या zatpat bhaji recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर कुरकुरीत भजी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या kanda bhaji recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि palak bhaji recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये batata bhaji recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!