भीमा नदीची माहिती Bhima River Information in Marathi

Bhima River Information in Marathi भीमा नदी (चंद्रभागा नदी म्हणूनही ओळखली जाते) ही पश्चिम भारत आणि दक्षिण भारतातील प्रमुख नदी आहे. ही कृष्णा नदीत प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यातून 861 किलोमीटर (535 मैल) दक्षिणपूर्व वाहते. आजच्या या सदरात आपण भीमा नदीबद्दल bhima nadi माहिती जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर नदीचे ऐतिहासिक व भौगोलिक महत्व कसे आहे तसेच नदीची वैशिट्ये कोणती आहेत हे देखील पाहणार आहोत.

bhima river information in marathi
bhima river information in marathi

भीमा नदीची माहिती – Bhima River Information in Marathi

भीमा नदीमाहिती
लांबीसुमारे 861 किमी
राज्य क्षेत्रमध्य प्रदेश, महाराष्ट्र व गुजरात
नदीप्रणाली ते क्षेत्र46,184 चौरस किमी
उपनद्याइंद्रायणी, मुळा- मुठा, नीरा, माण, वेळ, घोड व सीना
उगमस्थान1000 मीटर उंचीच्या डोंगरावर भीमाशंकर येथे होतो

भीमा नदीचे खोरे:-

गोदावरी नदी च्या खालोखाल महाराष्ट्रात कृष्णा नदीचे खोरे आहे. परंतु कृष्णा नदीची उपनदी भीमा हिने महाराष्ट्राचा बराचसा भाग व्यापलेला आहे. तसेच भीमा नदी कृष्णेला महाराष्ट्राचे सरहद्दीबाहेर मिळत असल्याने भीमा नदीचा स्वतंत्रपणे विचार केला जातो पुण्याजवळील भीमाशंकर येथे उगम पावून भीमा नदी  आग्नेय दिशेने वाहते. पुणे, सोलापूर व काही प्रमाणात सातारा नगर, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांचा काही भाग आपल्या खोऱ्यात समाविष्ट करते.

उत्तरेस हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांगा व दक्षिणेस शंभू-महादेव डोंगररांगानी आणि मर्यादित झालेल्या भीमा नदीस तिच्या उपनद्या येऊन मिळतात.

नदीप्रणालीचे क्षेत्र व लांबी:-

  • भीमा नदीचा उगम पुण्याजवळील भीमाशंकर (19°4′ उ. अ. व 73° 32′ पू. रे.) येथे आहे. महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
  • खंडाळाच्या उत्तरेस 40 कि.मी. अंतरावर भीमा नदीचे उगमस्थान आहे. बालाघाट डोंगराच्या उत्तरेस गोदावरी नदी वाहते तसेच दक्षिणेस भीमा नदीचे खोरे आहे. नंतर भीमा नदी आग्नेयेस 451 कि.मी. अंतर वाहत जाते आणि कर्नाटकातील रायचूरजवळ कुरुगुड्डी येथे कृष्णा व भीमा नद्यांचा संगम होतो.
  • महाराष्ट्रात भीमा नदीप्रणालीचे  क्षेत्रफळ 46,184 चौ.कि.मी. आहे.

राजकीय क्षेत्र:-

भीमा खोऱ्यात पुणे व सोलापूर जिल्ह्यांचा संपूर्णपणे समावेश होतो तर सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण, दहिवडी (माण) तालुके; नगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील श्रीगोंदा. कर्जत व जामखेड तालुके; मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी तालुका आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा, भूम, तुळजापूर व उमरगा हे तालुके समाविष्ट होतात.

भीमा नदीचा प्रवाहमार्ग व उगमस्थान:- Bhima River Birthplace

  • भीमा नदीचा उगम सुमारे 1000 मीटर उंचीच्या डोंगरावर भीमाशंकर येथे होतो व पहिल्या 8 की.मी. च्या अंतरामध्येच नदी एकदम खाली कोसळते आणि 200 मीटर उंचीच्या प्रदेशावरून वाहू लागते.
  • सुरुवातीस नदीचा प्रवाह पूर्वेस आहे. नंतर तो आग्नेयेस होतो. त्यानंतर भीमा नदी भामनेर खोऱ्याच्या अतिशय खडकाळ आणि अरुंद दरीमधून सुमारे 50 ते 55 कि.मी. वाहते. त्यानंतर मार्गामध्ये भामा आणि इंद्रायणी नद्या उजव्या किनाऱ्याने आणि वेळ नदी येऊन मिळाल्यावर प्रवाह ईशान्येकडे वळतो.
  • काही अंतरानंतर हा प्रवाह दक्षिणेकडे वाहू लागतो आणि रांजणगावाजवळ उजव्या बाजूने मुळा-मुठा या नद्या येऊन मिळतात. नंतर भीमा नदी आग्नेयेस वळते व नागमोडी वळणाने 20-22 की.मी. गेल्यावर भीमा व भोर  घोडनदीचा संगम होतो. घोडनदीला डाव्या किनाऱ्यापासून कुकडी व मीना नद्या मिळतात. पुढे टेंभुर्णीजवळ उजव्या किना-याने भोर तालुक्यातून वाहत येणारी नीरा नदी येऊन मिळते. या आधी कऱ्हा व नीरा नद्यांचा संगम होतो.
  • पवित्र तीर्थक्षेत्र पंढरपूरातून भीमा नदी वाहत जाते व त्यानंतर उजव्या किनाऱ्याने येणारी माण नदी मिळते.
  • सीना खोरे:- भीमेच्या डाव्या किनार्‍याने सीना नदी वाहते. अहमदनगर जिल्ह्यात सीनेचा उगम होतो. तिला भोगावती व बोरी उपनद्या येऊन मिळतात. नंतर सीना नदी ही भीमेला सोलापूर जिल्ह्यात मिळते.

उपनद्या:-

भीमा नदीस उजव्या किनाऱ्याने म्हणजे दक्षिणेकडून भामा, इंद्रायणी, मुळा- मुठा, नीरा व माण या नद्या मिळतात.

तर डाव्या किना-याने म्हणजे उत्तरेकडून वेळ, घोड व सीना या नद्या येऊन मिळतात.

भीमा नदीस मिळणाऱ्या प्रमुख उपनद्या:-

वेळ नदी:-

सह्याद्रीचा एक सुळका धाकले’ येथे ह्या नदीचा उगम होतो. ही नदी आग्नेयेस वाहताना भीमा नदीस समांतर वाहते आणि तळेगाव-ढमढेरेच्या  खाली 8 कि.मी. अंतरावर भीमा नदीस मिळते. या नदीची लांबी 64 कि.मी. आहे.

घोड नदी:-

घोडनदीच्या उगमाचे स्थान सह्याद्री पर्वतावर असून भीमा नदीच्या उत्तरेस 15 कि.मी. अंतरावर आहे. सुमारे 24 कि.मी.च्या अंतरामध्ये प्रदेशाची 200 मीटर उंची कमी होते. तिला कुकडी व मीना या उपनद्या येऊन मिळतात व शिरोळ जवळ भीमा नदीस घोड नदी येऊन मिळते.

भामा नदी:-

भीमाशंकरच्या दक्षिणेस 10 कि.मी. अंतरावर भामा नदीचा उगम होतो. तिच्या खोऱ्यास भामनेर’ असे म्हणतात. पिंपळगावाजवळ ती भीमा नदीस येऊन मिळते.

इंद्रायणी नदी:-

लोणावळ्याच्या नैऋत्येस 5 कि.मी. अंतरावर कुरवंडे खेड्याजवळ नदीचा उगम होतो. नंतर ती पूर्वेस वाहते. डाव्या किनाऱ्याने तिला आंद्र/आंध्र नदी मिळते. नंतर इंद्रायणी देहू व आनंदी या संतभूमीत  वाहत जाते. व नंतर भीमा व इंद्रायणीचा संगम होतो.

मुळा-मुठा:-

बोरघाटच्या दक्षिणेस मुळा नदीचा उगम होतो. त्यानंतर ती पौड गावाजवळून वाहते; नंतर ती पूर्वेस वळते. मार्गात पवना व पुढे पुण्याजवळ उजवा किनाऱ्याने मुठा नदीस येऊन मिळते. मुळा- मुठा यांचा संयुक्त प्रवाह रांजणगाणजवळ भीमा नदीस येऊन मिळतो. मुठा नदीचा उगमही सह्याद्रीतील डोंगरामध्ये होतो. प्रवाहाचा पहिला भाग पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात आहे. पुढे मुठा नदी पुणे शहरातुन वाहते व मुळा नदीस मिळते.

नीरा नदी:-

भोर तालुक्यात नीरा नदीचा उगम होतो. नंतर ती ईशान्येस वाहते व काही अंतर पुणे व साताऱ्याची सरहद्द निर्माण करते. नंतर निरा व कऱ्हा नद्यांचा संगम होतो व शेवटी भीमा नदीस मिळते.

भीमा नदीवरील धरणे:-

  • भीमा नदीच्या पात्रात बावीस धरणे आहेत. पहिले धरण पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चास कामण धरण आहे.
  • सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णीजवळील उजनी धरण क्षमतेनुसार सर्वात मोठे धरण आहे. भीमा खोऱ्यातील पाणीसाठा क्षमता महाराष्ट्र राज्यात सुमारे 300 टीएमसी आहे.
  • महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील उजनी धरणाच्या मुख्य प्रवाहातुन भीमा नदीच्या जवळपास  बॅरेजेस कृष्णा पाणी विवाद न्यायाधिकरण वाटपापेक्षा नदीत उपलब्ध असलेल्या सर्व पाण्याचा उपयोग करण्यासाठी बांधण्यात आले आहेत.
  • भीमा ते सीना इंटरलिंक (जोड कलावा) उजनी जलाशयापासून २१ कि.मी. बोगद्यासह मुख्य भीमा नदीपासून सीना उपनद्याच्या पाणलोट क्षेत्रातील विस्तीर्ण जमिनींना पाणीपुरवठा करण्यासाठी बांधण्यात आले आहे.

जलविद्युत प्रकल्प :-

टाटा पॉवरद्वारे भिरा जलविद्युत प्रकल्प 300 मेगावॅट (150 मेगावॅटचा पंप स्टोरेज) मुळशी धरण, भुशी धरण, भिरा धरण, वाळवण धरण, ठोकरवाडी धरण व शिरवत धरणातील पाण्याच्या साहाय्याने ऊर्जा तयार करण्यासाठी उभारला गेला  आहे.

1.टापा पॉवरद्वारे खोपोली हायड्रो 72 मेगावॅट

2.टाटा पॉवरद्वारे भिवपुरी हायड्रो 78 मेगावॅट

3.उजनी धरण 12 मेगावॅट पंप स्टोरेज

4.भटघर धरण 16 मेगावॅट

5.पवना धरण 10 मेगावॅट

6.खडकवासला धरण 8 मेगावॅट

7.वीर धरण 9 मेगावॅट

8.डिंभे धरण 5 मेगावॅट

9.माणिकडोह धरण 6 मेगावॅट

भीमा, खोपोली व भिवपुरी येथून बहुतांश जलविद्युतता अनुक्रमे भीमा नदी पात्रातून पश्चिम वाहणार्‍या कुंडलिका, पातालगंगा व उल्हास नद्यांकडे वळविल्यामुळे निर्माण होते. वळवलेला पाणी सुमारे 42.5 टीएमसी इतका आहे जो मुख्यत: जलविद्युत निर्मितीनंतर अरबी समुद्राकडे वाया जातो. राज्य सरकार भिमा नदीपात्राच्या पाण्याचा वीजनिर्मितीसाठी वापर कमी करण्याचे ठरवते आणि उपलब्ध पाणीपुरवठा अपुरा असल्याने नदीपात्रातील पाणी पिण्यासाठी व सिंचन उद्देशाने पूर्णपणे वापरावे असे सांगितले जाते.

तथापि, अरबी समुद्राला पाणी न सोडता पीक वीज निर्मितीसाठी भिरा हायड्रो स्टेशन पंप स्टोरेज मोडमध्ये ऑपरेट केले जाऊ शकते.

भीमा पात्रावरील देवस्थाने:-

  • भीमाशंकर या बारा सन्माननीय ज्योतीर्लिंग मंदिरांपैकी एक.
  • सिद्धटेक, अष्टविनायक गणेश यांचे सिद्धिविनायक मंदिर
  • पंढरपुरातील विठ्ठल मंदिर.
  • मल्लिकार्जुन मंदिर चिनमल्ली काळबुरागी
  • श्री दत्तात्रेय मंदिर, गणगपुरा, गुलबर्गा जिल्हा, कर्नाटक.
  • श्री क्षेत्र घटतरगी भागम्मा, घाट्टर्गी, गुलबर्गा जिल्हा, कर्नाटक.
  • श्री क्षेत्र हुलकंठेश्वर मंदिर, हेरूर (बी), गुलबर्गा जिल्हा, कर्नाटक.
  • श्री क्षेत्र रसंगी बालभीमसेना मंदिर, रसनगी, जेवर्गी तालुका, गुलबर्गा जिल्हा, कर्नाटक
  • श्री क्षेत्र कोलाकूर सिद्धबावेश्वर मंदिर कोलाकूर, जेवर्गी तालुका, गुलबर्गा जिल्हा, कर्नाटक
  • होनगुंटा चंद्रला परमेश्वरी मंदिर, शहाबाद जवळच्या होनगुंटा, गुलबर्गा जिल्हा
  • श्री क्षेत्र, सन्नती चंद्रला परमवेश्वरी मंदिर
  • कानगनाहल्ली बौद्ध स्थळ, कर्नाटक

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि भीमा नदी कोठून कोठे वाहते तिची लांबी किती आहे त्याचबरोबर नदीचे ऐतिहासिक व भौगोलिक महत्व कसे आहे तसेच नदीची वैशिट्ये कोणती आहेत. bhima river information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about bhima river in marathi language हा लेख कसा वाटला व अजून काही भीमा नदी विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या bhima river in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!