कृष्णा नदी माहिती Krishna River Information in Marathi

Krishna River Information in Marathi कृष्णा नदी ही गंगा, गोदावरी आणि ब्रह्मपुत्रानंतर पाण्याची आवक क्षमता आणि नदीपात्र क्षेत्रातील चौथ्या क्रमांकाची नदी आहे. नदी जवळपास 1400 किलोमीटर (800 मैल) लांब आहे. नदीला कृष्णवेणी असे देखील म्हणतात. कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशसाठी सिंचनाचे प्रमुख स्रोत आहे. महाराष्ट्र पठारावरून वाहणाऱ्या गोदावरी नदीच्या खालोखाल महत्त्वाची कृष्णा ही नदी आहे. दख्खनच्या पठारावर पश्चिम घाटापासून पूर्व घाटापर्यंत वाहून पुढे बंगालच्या उपसागरास मिळते.

krishna river information in marathi
krishna river information in marathi

कृष्णा नदी माहिती – Krishna River Information in Marathi

कृष्णा नदीमाहिती
लांबीसुमारे 1400 किमी
राज्य क्षेत्रमहाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश
नदीप्रणाली ते क्षेत्र2,58,948 चौरस किमी
उपनद्याकोयना, पंचगंगा, घटप्रभा नदी, मालप्रभा नदी, भीमा नदी, तुंगभद्रा नदी आणि मुसी नदी, दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा, ताम्रपर्णी
उगमस्थान (krishna nadi ugam sthan)सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला

नदीप्रणालीचे क्षेत्र व उगमस्थान:- Krishna River Birthplace

कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरला 1,220 मीटर उंचीवर 17° 59 उ. अ. व 73° 38 पू. रे. येथे झालेला आहे. श्री क्षेत्र ‘महाबळेश्वर’ येथे कृष्णा, गायत्री, सावित्री, वेण्णा, कोयना, या पाच नद्यांची उगमक्षेत्रे पहावयास मिळतात. कृष्णा नदीच्या उगमाच्या ठिकाणापासून पश्चिमेस 65 कि.मी. अंतरावर अरबी समुद्र आहे.

कृष्णा नदीचा उतार सुरुवातीस दक्षिणेस आहे. नंतर नदीचा प्रवाह पूर्वेस व आग्नेयेस होतो. महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातून कृष्णा नदी वाहत जाते व शेवटी त्रिभुज प्रदेश निर्माण होऊन मच्छलीपट्टणजवळ बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते.

कृष्णा नदीची लांबी व तिचे क्षेत्रफळ:-

कृष्णा नदीची एकूण लांबी 1,400 कि.मी. असून नदीप्रणालीचे क्षेत्र 2,58,948 चौ.कि.मी. आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीचा प्रवाह फक्त 282 कि.मी. लांबीचा असून तिचे नदीप्रणालीचे क्षेत्र 28,700 चौ.कि.मी. आहे. महाराष्ट्रात कृष्णा नदीचे खोरे व भीमा उपनदीचे खोरे मिळून वार्षिक पाण्याचा प्रवाह 27,920 दशलक्ष घनमीटर आहे.

राजकीय क्षेत्र:-

 • कृष्णा नदीच्या खोऱ्यात सातारा (भीमा खोऱ्याचे खंडाळा, फलटण व माण तालुके वगळून); सांगली (जत व खानपुरचा पूर्व भाग वगळून) व संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होतो.
 • पश्चिमेस सह्याद्री पर्वत व पूर्वेस शंभू-महादेव डोंगररांगाच्या  दरम्यान कृष्णा नदी वाहते. तसेच सर्वसाधारणपणे नदीप्रवाहाची दिशा उत्तर-दक्षिण असून सह्याद्री पर्वतास बरयाच अंशी महाराष्ट्रात समांतर आहे.
 • महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्यास अप्पर कृष्णा खोरे’ असे म्हटले जाते. कृष्णा नदीच्या उगमाच्या क्षेत्रात महाबळेश्वरच्या परिसरात पावसाचे प्रमाण 500 ते सहाशे 625 सें. मी. च्या दरम्यान आहे.
 • कृष्णा नदीला बहुतेक सर्व नद्या उजव्या किनाऱ्याने किंवा पश्चिम व दक्षिणेकडून मिळतात. वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दुधगंगा, वेदगंगा या नद्या उजव्या किनाऱ्याने तर येरळा नदी डाव्या किना-याने कृष्णेस मिळते.

कृष्णा नदीचा प्रवाहमार्ग:-

कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाल्यावर ती आग्नेयेस वाहू लागते. त्यानंतर कृष्णा नदी वाई क्षेत्रास पावन करून सातारा जिल्ह्यात माहुली येथे येते. येथे कृष्णा व वेण्णा या नद्यांचा संगम होतो. नंतर कृष्णा नदी दक्षिणवाहिनी होते. पूर्वेकडील सुळक्यांना वळसा घालून माहुलीपासून सुमारे 50 कि.मी. अंतरावर कऱ्हाड येथे कृष्णा व कोयनेचा प्रितिसंगम  होतो. सातारा जिल्ह्यात या नद्यांव्यतिरिक्त कुडळी, उरमोडी तारळी या नद्या वाहतात. वारणा नदी पूर्व व पुढे आग्नेय दिशेने 130 कि.मी. वाहत जाते व सांगलीजवळ उजव्या किनाऱ्याने कृष्णेस मिळते.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातून वाहणारी पंचगंगा नदी कुरुंदवाडजवळ कृष्णा नदीस मिळते. तेथून जवळच श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (नर्सोबची वाडी) येथे दत्ताचे जागृत देवस्थान आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात दक्षिण भागातून वाहणाऱ्या दूधगंगा व वेदगंगा या नद्या ईशान्यकडे वाहत जाऊन त्यांचा संगम होतो व कुरुंदवाडच्या पुढे 15 कि.मी. अंतरावर कृष्णा नदीस हा संयुक्त प्रवाह येऊन मिळतो. कोल्हापूर जिल्ह्याची उत्तर सरहद्द वारणा नदीप्रवाहने निश्चीत होते. डाव्या किनाऱ्याने कृष्णा नदीस फक्त येरळा नदी मिळते.

नदीचा उगम सातारा जिल्ह्यात खटाव (वडूज) तालुक्यात शंभू-महादेव डोंगररांगात होतो. भिलवडीजवळ कृष्णा नदीस येरळा नदी मिळते.

कृष्णा नदीच्या महत्त्वाच्या उपनद्या:-

1.कोयना नदी:-

कोयना नदीचा उगम कृष्णा नदीप्रमाणेच क्षेत्र महाबळेश्वर येथे होतो. नंतर ही दक्षिणेकडे वाहते. सातारा जिल्ह्यातील ही महत्त्वाची नदी दक्षिणेकडे हेळवाकपर्यंत 65 कि.मी. पर्यंत वाहते. तेथे कोयना धरण बांधलेले आहे. वीज निर्मितीसाठी तेथील पाणी बोगद्यातून पश्चिमेस पोफळी येथे सोडले जाते. हेळवाकनंतर कोयनेचा प्रवाह एकदम पूर्वेकडे वळतो आणि आणखी 65 कि.मी. गेल्यावर कऱ्हाड येथे कृष्णा व कोयनेचा संगम होतो

2.पंचगंगा नदी:-

 • कोल्हापूर जिल्ह्यातील जीवनवाहिनी म्हणून पंचगंगा ओळखली जाते. ती पाच नदीप्रवाहांपासून तयार झालेली आहे म्हणून तिला `पंचगंगा’ असे म्हणतात.
 • कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती या चार उपनद्या व पाचवी सरस्वती गुप्त नदी मानली जाते. अशी ही पंचगंगा नदी कृष्णेस मिळते.
 • घटप्रभा नदी, मालप्रभा नदी, भीमा नदी, तुंगभद्रा नदी आणि मुसी नदी या कृष्णा मध्ये सामील झालेल्या मुख्य उपनद्या आहेत.
 • कोल्हापूर जिल्ह्यातून दक्षिण भागातून दूधगंगा, वेदगंगा, घटप्रभा व ताम्रपर्णी नद्या वाहतात.
 • कृष्णा नदीच्या खोऱ्यात महाबळेश्वर, वाई, सातारा, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूर तसेच किर्लोस्करवाडी, इस्लामपूर यांसारखी शहरे आहेत.
 • सांगलीजवळ कृष्णा नदीला पंचगंगा, वारणा आणि येरला या तीन उपनद्या  येऊन मिळतात.
 • ही जागा अतिशय पवित्र मानली जातात. असे म्हणतात की भगवान दत्तात्रेयांनी आपले काही दिवस कृष्णा नदीच्या काठी औदुंबरबर येथे घालवले होते.

कुडाळसंगम, उत्तर कर्नाटक:-

 • कुडाळसंगम(कुडाळा संगम) असेही म्हटले जाते. कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील अल्मट्टी धरणापासून सुमारे 15 किलोमीटर (9.3 मैल) अंतरावर आहे.
 • कृष्णा आणि मालप्रभा नदी नद्या येथे विलीन होतात. ऐक्य मंतप्पा किंवा बसवन्नाची पवित्र समाधी, लिंगायत पंथातील लिंगायत संप्रदायाचे संस्थापक लिंगासह स्वयंभू मानतात. ते येथे आहे आणि नदी पूर्वेकडे श्रीशैलम (आणखी एक तीर्थक्षेत्र) आंध्र प्रदेशच्या दिशेने वाहते.
 • आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील संगमेश्वरम हे हिंदूंचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे जिथे तुंगभद्र आणि भवनासी नद्या कृष्णा नदीत मिसळतात.
 • संगमेश्वरम मंदिर आता श्रीशैलम जलाशयात बुडले आहे आणि जलाशयातील पाण्याची पातळी खाली आल्यावरच उन्हाळ्यात भाविकांसाठी दृश्यमान आहे.

कृष्णा खोऱ्यातील वनस्पती आणि प्राणी:-

कृष्णा नदीच्या जवळच पसरलेल्या प्रदेशात समृद्ध वनस्पती आणि प्राणी आहेत. कृष्णा वस्तीतील शेवटच्या काळात जगलेल्या मॅंग्रोव्ह जंगलांना कृष्णा वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले गेले.

अभयारण्य मोठ्या संख्येने रहिवासी आणि स्थलांतरित पक्ष्यांचे घर आहे. फिशिंग मांजर, ऑटर, इस्टुअरीन मगर, कलंकित हरण, सांबर, काळा बोकड, साप, सरडे आणि सॅकल देखील या अभयारण्यात दिसू शकतात. हे अभयारण्य रायझोफोरा, अ‍ॅव्हिसेंनिया आणि एजिकिरस सारख्या वनस्पतींनी समृद्ध वनस्पतींना देखील आधार देते.

मृदावस्था:-

खोऱ्यात सापडलेल्या महत्त्वाच्या मातीचे प्रकार म्हणजे काळी मातृ, लाल मातीत, लॅटोराईट आणि लॅटरिटिक माती, नीलवाहिनी, मिश्र मातीत, लाल आणि काळ्या मातीत आणि खारट आणि क्षारीय माती.

पूरपरिस्थिती:-

 • ऑगस्ट-सप्टेंबर 2019 मध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पूर आला होता आणि सुमारे 500 लोकांचा बळी गेला.
 • ऑक्टोबर 2009 मध्ये, मुसळधार पूर आला होता आणि 350 गावे वेगळी झाली आणि कोट्यावधी लोक बेघर झाले. ही घटना 1000 वर्षात प्रथमच घडली असा विश्वास आहे. या पुरामुळे कुर्नूल, महाबूबनगर, गुंटूर, कृष्णा आणि नालागोंदा जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
 • संपूर्ण कुर्नूल शहर सुमारे 3 दिवस सुमारे 10 फूट (3 मीटर) पाण्यात विसर्जित केले.
 • नक्की वाचा: महापुराची माहिती 

कृष्णा नदी पत्रावरील ठिकाणे आणि मंदिरे :-

 • हिंदूंनी ही नदी पवित्र मानली आहे. या नदीत आंघोळ करुन लोकांचे सर्व पाप दूर करतात असेही मानले जाते. कृष्णा पुष्करम जत्रेचे आकर्षण केंद्र म्हणजे जी कृष्णा नदीच्या काठावर बारा वर्षांत एकदा भरते.
 • नदीच्या काठावर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात बरीच तीर्थक्षेत्र आहेत.
 • कृष्णा नदीवरील पहिले पवित्र स्थान वाई येथे आहे, जे महागणपती मंदिर आणि काशिविश्वेश्वर मंदिरासाठी परिचित आहे. नदीकाठी सात घाट आहेत. सांगलीजवळील नरसोबावाडी आणि औदुंबर येथील कृष्णाच्या काठावर महाराष्ट्रातील लोक दत्तदेव मंदिरासारखे मंदिर आहेत. कर्नाटकातील यादूर हे कृष्णाच्या तटावर असलेले एक महत्त्वाचे पवित्र स्थान आहे. वीरभद्र मंदिर हे एक प्रसिद्ध मंदिर आहे.
 • महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातून अनेक भाविक या ठिकाणी भेट देतात. तसेच, कृष्णा नदीच्या काठावर हरीपूर येथील संगमेश्वर शिव मंदिर आहे. इतर काही मंदिरांपैकी विजयवाड्यातील कनक दुर्गा मंदिर, सांगलीजवळील रामलिंग मंदिर, मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग (श्रीशैलम), अमरेश्वर स्वामी मंदिर, वेदद्री नरसिंह मंदिर, दत्तदेव मंदिर आणि तेलंगणातील आलमपुर व गडवाल येथील संगमेश्वर शिव मंदिर आहेत.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि कृष्णा नदी कोठून कोठे वाहते तिची लांबी किती आहे त्याचबरोबर नदीचे ऐतिहासिक व भौगोलिक महत्व कसे आहे तसेच नदीची वैशिट्ये कोणती आहेत. krishna river information in marathi language हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about krishna river in marathi language हा लेख कसा वाटला व अजून काही कृष्णा नदी विषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या krishna river in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!