बीबी का मकबरा माहिती Bibi Ka Maqbara Information in Marathi

Bibi Ka Maqbara Information in Marathi बीबी का मकबरा विषयी माहिती बीबी का मकबरा हि एक ऐतिहासिक इमारत आहे. जी औरंगजेबाची पत्नी रबिया-उद-दुर्रानी / दिल्रास हिच्यासाठी बनवला होता. बीबी का मकबरा हि इमारत आग्रा ताजची एक प्रतिकृती आहे. जी दक्षिणेकडील एक लहान ताज म्हणून ओळखला जातो. बीबी का मकबरा हे एक ऐतिहासिक स्मारक असून इ. स १६६८ मध्ये औरंगजेब याचा मुलगा आजम शहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधला होता. बीबी का मकबरा हे एक आठवणीचे प्रतिक आहे कारणे हे मुलाने आपल्या आईच्या आठवणीसाठी आणि तिच्यावरच्या प्रेमापोटी बांधलेले आहे.

त्याचबरोबर बीबी का मकबरा ह्या इमारतीला ‘द लेबर टॉम्ब ऑफ द लेडी’ या नावाने देखील ओळखले जाते. या ठिकाणी रबिया-उद-दुर्रानी हिची समाधी असल्यामुळे या स्मारकाला दक्षिणेतील ताज म्हणून ओळखले जाते. औरंगजेब औरंगाबादचा प्रदीर्घ काळचा राज्यपाल असतानाच हे मंदिर औरंगाबाद शहरात अस्तित्वात आले आणि आज महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक स्मारकांपैकी एक आहे.

बीबी का मकबरा हि इमारत १५००० चौरस फुट क्षेत्रफळा मध्ये बांधला आहे आणि हा संगमरवरी आणि बेसाल्टिक सापळा या सारखे साहित्य वापरून बांधला आहे.

bibi ka maqbara information in marathi
bibi ka maqbara information in marathi

बीबी का मकबरा मराठी माहिती – Bibi Ka Maqbara Information in Marathi

नाव बीबी का मकबरा , दक्षिणेतील ताज किंवा दक्षिणेतील मिनी ताज.
ठिकाण औरंगाबाद मधील बेगमपुरा या शहरामध्ये.
प्रकार ऐतिहासिक स्मारक
कोणाच्या स्मरणार्थ बांधला आहे दिल्रास बानू बेगम / रबिया-उद-दुर्रानी
कोणी बांधला औरंगजेब याचा मुलगा आजम शहा
केंव्हा बांधला इ. स १६६८
इमारतीचे क्षेत्रफळ १५००० चौरस फुट
बांधकाम शैली मुघल
आर्किटेक्टअताउल्ला रशीदी आणि हंसपत राय

इतिहास – bibi ka maqbara history in marathi

इराणच्या सफाविद राजघराण्यात जन्मलेली राजकुमारी दिल्रास ही शाहनवाज खानची मुलगी होती जे  गुजरात राज्याचे तत्कालीन व्हाईसरॉय होते. तिचे इ.स १६३७ मध्ये औरंगजेबशी लग्न झाले. त्यांना मपाच मुले होती आणि तिच्या पाचव्या मुलाला जन्म दिल्यानंतर, दिल्रासचा मृत्यू झाला.

औरंगजेब आणि त्याचा मोठा मुलगा आजम शाह दोघेही त्यावेळी खूप दुखी झाले. त्यानंतर इ. स १६६८ मध्ये आझम शाहने ताजमहालच्या धर्तीवर आपल्या लाडक्या आईसाठी समाधी बांधण्याचे आदेश दिले तोच हा बीबी का मकबरा जो आजम शहाणे आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधला.

बांधकाम 

बीबी का मकबरा हि इमारत ताज पेक्षा अधिक भव्य असणार होता परंतु बांधकामासाठी दिलेल्या अर्थसंकल्पाचे काटेकोर पालन केल्यामुळे,  समाधी केवळ आगरा येथे असणाऱ्या ताजचे अनुकरण करू शकली. हि इमारत मुघल बांधकाम शैलीतील असून तेथे बागेसह, वाहणाऱ्या प्राण्याचा प्रवाह हे आकर्षक वाटते.

या इमारतीचा मुख्य दरवाजा हा दक्षिणेस आहे तर उत्तरेस बारा दरवाजा असलेली बारादरी आहे, पश्चिमेला एक मशीद आहे आणि पूर्वेकडे आयना खाना किंवा आरशाचा कक्ष आहे. बीबी का मकबरा या इमारतीच्या पांढऱ्या घुमटावर फुले कोरलेली आहेत. मकबऱ्याला चार मिनारांनी कोपऱ्यांवर चार पायऱ्या आहेत ज्या पायऱ्या तीन बाजूंनी थडग्याकडे जातात.

अष्टकोनी आकाराच्या कुंडांसह पाण्याचा तलाव आहे आणि मार्गाच्या मध्यभागी ६१ कारंजे आणि ४८८ फूट लांब आणि ९६ फूट रुंद जलाशय आहेत.

बीबी का मकबरा या ठिकाणी पाहण्यासारखी ठिकाणे

बीबी का मकबरा मध्ये अनेक आकर्षणे आहेत जी मुघल काळातील स्थापत्य भव्यता दर्शवतात.

 • बीबी का मकबरा हि इमारत औरंगजेबाचा मुलगा आजम शहा याने आपल्या आईच्या म्हणजेच दिल्रास बानू बेगम स्मरणार्थ बांधली आहे आणि या इमारती मध्ये तिची एक समाधी आहे जी या इमारतीचे मुख्य आकर्षण आहे.
 • या इमारतीच्या सुरुवातीला असणारे अष्टकोनी आकाराच्या कुंडांसह पाण्याचा तलाव आहे आणि मार्गाच्या मध्यभागी ६१ कारंजे आणि ४८८ फूट लांब आणि ९६ फूट रुंद जलाशय आहेत.
 • तेथे असणारी बागेची रचना देखील तेथील पाहण्यासारखे ठिकाण आहे.

बीबी का मकबरा या इमारती बद्दल काही अनोखी आणि मनोरंजक तथ्ये – facts about bibi ka maqbara building 

 • बीबी का मकबरा हे औरंगजेबाने बांधलेल्या स्मारकापैकी सर्वात मोठे स्मारक आहे.
 • बीबी का मकबरा या इमारतीचे बांधकाम औरंजेबाचा मोठा मुलगा आजम शहा याने इ. स १६६८ मध्ये बांधला.
 • बीबी का मकबरा हि इमारत ताज पेक्षा अधिक भव्य असणार होता परंतु बांधकामासाठी दिलेल्या अर्थसंकल्पाचे काटेकोर पालन केल्यामुळे, समाधी केवळ आगरा येथे असणाऱ्या ताजचे अनुकरण करू शकली.
 • हि इमारत १५००० चौरस फुट क्षेत्रफळा मध्ये बांधलेली आहे आणि या इमारतीच्या बांधकामासाठी संगमरवरीचे दगड वापरण्यात आले होते.
 • बीबी का मकबरा ह्या इमारतीला ‘द लेबर टॉम्ब ऑफ द लेडी’ या नावाने देखील ओळखले जाते.

बीबी का मकबरा येथे कसे जावे 

 • हवाई मार्गाने 

बीबी का मकबरा हे ठिकाण पाहायला जाण्यासाठी तुम्हाला जर विमानाने जायचे असल्यास या ठिकाणाचे जवळचे विमानतळ हे १० किलो मीटर अंतरावर औरंगाबाद शहरामध्ये आहे. विमानतळापासून तुम्हाला बस किंवा टॅक्सी पकडावी लागते.

 • रस्ता मार्गे 

हे ठिकाण औरंगाबाद शहरापासून खूप जवळ असल्यामुळे आपण कोणत्याही मुख्य शहरातून औरंगाबादला जाणारी बस पकडून औरंगाबाद शहरामध्ये येवू शकतो आणि तेथून रिक्षा किंवा टॅक्सीने जावू शकतो.

 • रेल्वे मार्गे 

जर तुम्हाला हे ठिकाण पाहण्यासाठी रेल्वे ने जावयाचे असल्यास या ठिकाणाहून ३६ किलो मीटर अंतरावर औरंगाबाद रेल्वे स्टेशन आहे. तुम्ही रेल्वे स्टेशन वर उतरून तेथून रिक्षा किंवा टॅक्सीने बीबी का मकबरा या इमारती जवळ जावू शकता.

टीप 

 • बीबी का मकबरा हि इमारत पर्यटकांच्यासाठी सकाळी ८ ते संध्याकाळी ८ पर्यंत सुरु असतो.
 • बीबी का मकबरा हे ठिकाण औरंगाबाद या शहरापासून ३ किलो मीटर अंतरावर आहे.
 • बीबी का मकबरा हि इमारत पर्यटकांच्या आठवड्याचे सातही दिवस पाहण्यासाठी सुरु असतो.
 • हि इमारत पाहण्यासाठी भारतीय पर्यटकांच्या कडून २५ रुपये प्रवेश शुल्क घेतला जातो आणि ३०० रुपये प्रवेश शुल्क वेदेशी लोकांच्या कडून घेतला जातो.

आम्ही दिलेल्या bibi ka maqbara information in marathi pdf माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बीबी का मकबरा मराठी माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bibi ka maqbara aurangabad information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information about bibi ka maqbara in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information of bibi ka maqbara in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!