नीलकंठ पक्षाची माहिती Blue Jay Bird Information in Marathi

Blue Jay Bird Information in Marathi नीलकंठ पक्षाची माहिती हा एक भारतीय पक्षी असून या पक्ष्याला ‘नीलकंठ’ किवा ‘नीलपंख’ या नावाने ओळखले जाते. एक मोठ्या आकाराचा एक सामान्य पक्षी ज्याचा पिसारा निळा, पांढरा, करडा आणि काळ्या रंगाचा असते, तपकिरी रंगाची छाती आणि पाठ, चोच काळ्या रंगाची, निळ्या रंगाचे पंख आणि शेपूट तसेच या पक्ष्याचा कॉल गोंगाट करणारा आहे. या पक्ष्यांची विशेषता म्हणजे या हे पक्षी आयुष्यासाठी जोडी बनवतात आणि जेव्हा अंडी घरट्यामध्ये त्यावेळी मादी त्या अंड्यांचे रक्षण करते आणि नर पक्षी आपल्या साथीदाराला अन्न पुरवतात. या पक्ष्यांचा आकार साधारणपणे ३० ते ३१ सेंटी मीटर असतो आणि या पक्ष्याचे सरासरी वजन ७० ते ११० ग्रॅम असते . नीलकंठ हा पक्षी भारतामध्ये तर आढळतोच पण हा पक्षी श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश या देशांमध्येही आढळतो.

blue jay bird information in marathi
Blue Jay Bird Information in Marathi

नीलकंठ पक्षाची माहिती – Blue Jay Bird Information in Marathi

नीलकंठ पक्ष्याचे वैज्ञानिक वर्गीकरण ( scientific classification )

सामान्य नावभारतीय नीलपंख
स्थानिक नावनीलकंठ
प्रांतअॅनिमलीया
वर्गअॅव्हस
कुटुंब / कुळकोरासिडे
प्रजातीकोरासिअस
वैज्ञानिक नावसायनोसीट्टा क्रीस्टाटा

नीलकंठ पक्ष्याचे वर्णन ( description ) 

एक मोठ्या आकाराचा एक सामान्य पक्षी ज्याचा पिसारा निळा, पांढरा, करडा आणि काळ्या रंगाचा असते, तपकिरी रंगाची छाती आणि पाठ, चोच काळ्या रंगाची, निळ्या रंगाचे पंख आणि शेपूट असते आणि पाय आखूड आणि क्रीम कलरचे असतात. डोळ्याच्या वरती काळ्या रंगाची एक रेष असते ती पापणी सारखी दिसते.

नावनीलकंठ, नीलपंख
प्रकार पक्षी
इंग्रजीblue jay, indian roller
शास्त्रीय नावसायनोसीट्टा क्रीस्टाटा
आकार / लांबी३० ते ३१ सेंटी मीटर
वजन७० ते ११० ग्रॅम
आयुष्य (blue jay life cycle)५ ते ७ वर्ष

नीलकंठ हे पक्षी कुठे राहतात ( habitat ) 

नीलकंठ हे पक्षी बहुतेकदा सर्व प्रकारच्या जंगलामध्ये आढळतात. पण हे विशेषता ओकची झाडे असणाऱ्या जंगलांमध्ये राहणे पसंत करतात. त्याचबरोबर हे पक्षी शहरी तसेच उपनगरी भागामध्ये कधी कधी पाहायला मिळतात. नीलकंठ हे पक्षी शेतामध्ये, पानगळीच्या जंगलामध्ये किवा वन किनाऱ्याजवळहि पाहायला मिळतो.

नीलकंठ पक्ष्याचे घरटे ( nest )

या पक्ष्याचे घरटे शंकूच्या आकाराचे असते आणि हे झाडाच्या बाह्य शाखांमध्ये बनवलेले असते आणि हे घरटे १० ते २५ फुट उंच असलेल्या झाडावर बनवलेले असते. नर आणि मादी दोघेही घरटे बनवतात आणि घरटे बनवण्यासाठी लागणारे सामान नर नीलकंठ पक्षी गोळा करून आणतो. घरटे बनवण्यासाठी लागणारे सामान म्हणजे वाळलेले गवत, वाळलेली पाणी, डहाळे आणि कधी कधीहे पक्षी घरटे बनवण्यासाठी चीखलाचाही वापर करतात. या पक्ष्यांना घरटे बनवण्यासाठी १५ ते २१ दिवस लागतात.

नीलकंठ पक्ष्याचा आहार ( food ) 

नीलकंठ ( blue jay ) हे पक्षी सर्वभक्षी किवा सर्वआहारी पक्षी आहेत म्हणजे हे सर्व प्रकारचे अन्न खातात ( शकाहारी आणि मांसाहारी ) हे पक्षी झाडावरील फळे, काजू, बदाम, बिया तसेच शेतातील धान्य ( ज्वारी, मका, बाजरी ) खातात. या पक्ष्याचा शेतामधील शेंगदाने खायला खूप आवडतात. त्याचबरोबर हे पक्षी झाडावर सापडणारे कीटक, अळ्या, मुंग्या खातात तसेच हे पक्षी काही वेळेस मृत किवा मारत असलेले पक्षीहि खातात. तसेच हे पक्षी दुसऱ्या पक्ष्याची घातलेली अंडी खाण्यासाठी दुसऱ्या पक्ष्यांच्या घरट्यावर छापे घालतात.

विणीचा हंगाम आणि सवयी ( mating season and habits )

विणीचा कालावधीमार्च ते जुलै
अंडीमादी एका वेळी ४ ते ५ अंडी देते
उष्मायन कालावधी१७ ते १८ वर्ष
अंड्याचा आकार२.५ ते ३.५ सेंटी मीटर
अंड्याचा रंगनिळे किवा फिकट तपकिरी रंगाचे असतात  आणि त्यावर गडद तपकिरी रंगाचे टीपके असतात.

नीलकंठ हे पक्षी एकपात्री असतात कारण हे पक्षी आयुष्यभरासाठी आपला जोडीदार बनवतात हे पक्षी विणीच्या हंगामाच्या अगोदर घरटे बनवतात ( नर आणि मादी दोघेही घरटे बनवतात ) नीलकंठ या पक्ष्याचा विणीचा हंगाम हा मार्च ते जुलै पर्यंत असतो आणि मादी पक्षी एका वेळी ४ ते ५ अंडी देते आणि हि अंडी निळे किवा फिकट तपकिरी रंगाचे असतात आणि त्यावर गडद तपकिरी रंगाचे टीपके असतात.

या अंड्यांचा उष्मायन कालावधी १७ ते १८ दिवस असतो. या पक्ष्याचे पिल्लू जन्मल्यानंतर नग्न, असहाय्य असते आणि पिल्लाचे डोईल बंद असतात. मादी नीलकंठ पक्षी अंडी उबवण्याचे काम करते तर नीलकंठ पक्षी आपल्या साथीदाराला अन्न पुरवण्याचे काम करतो तसेच अंड्यांचे इतर शत्रुपाक्ष्यांपासून संरक्षण करतो म्हणजेच पक्ष्यांचे संगोपन करणे, घरटे बनवणे, अंडी उबवाने , अन्न गोळा करणे हि कामे नर आणि मादी दोघे मिळून करतात.

नीलकंठ पक्ष्याविषयी काही अनोखी तथ्ये ( interesting facts about blue jay bird )

 • नीलकंठ हा एक हुशार आणि रंगीबेरंगी पक्षी आहे.
 • नीलकंठ नर आणि मादी पक्षी दिसायला एकसारखे असतात.
 • हे पक्षी दीर्घकाळ जगू शकतात म्हणजेच हे पक्षी ५ ते ७ वर्ष जगू शकतात.
 • हा पक्षी भारत, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश या देशामध्ये विपुल प्रमाणात आढळतात.
 • नीलकंठ हे पक्षी इतर पक्ष्यांसाठी स्थानिक गजर प्रणाली आहे.
 • हे पक्षी आपले घरटे गवत, पणे, डहाळे, काड्या आणि चिखल या सामग्रीपासून घरटे बनवतात.
 • नीलकंठ हे पक्षी ५००० फुट उंचीच्या डोंगरावर राहू शकत नाहीत कारण या पक्ष्यांना खूप उंचीवर राहायला आवडत नाही.
 • नीलकंठ हा पक्षी कर्नाटका, ओडिशा, आंध्र प्रदेश तसेच तेलंगणाचा राज्य पक्षी आहे.
 • नीलकंठ मादी पक्षी एका वेळी ४ ते ५ अंडी देते.
 • नीलकंठ हा पक्षी ताशी २० ते २५ मैल चे अंतर उडून पार करू शकतो.
 • या पक्ष्यांचा प्रजनन कलावधी मार्च ते जुलै आहे.
 • नीलकंठ पक्ष्यांना खूप आवडतात.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा नीलकंठ पक्षी blue jay bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. blue jay bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about blue jay bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही नीलकंठ पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या blue jay bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.  अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!