Bombil Fry Recipe in Marathi बोंबील फ्राय रेसिपी मराठी महाराष्ट्रामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारच्या माश्याच्या डिश बनवल्या जातात जसे कि सुरमयी, फिश करी, फिश फ्राय आणि यामधील एक नॉनव्हेज लोकांना आवडणारा आणि मोठ्या प्रमाणात खाल्ला जाणारा प्रकार म्हणजे बोंबील फ्राय. बोंबील हा एक माश्याचा प्रकार आहे जो महाराष्ट्रामध्ये कोकण भागामध्ये जास्त प्रमाणात बनवतात तसेच देशाच्या काही इतर भागामध्ये देखील हा पदार्थ बनवला जातो. या माश्याचे शरीर एकदम पातळ असते त्यामुळे हा मासा शिजण्यासाठी देखील खूप वेळ लागत नाही आणि मग हि रेसिपी देखील पटकन बनते.
बोंबील फ्राय बनवताना सर्वप्रथम मासे स्वच्छ धुवून ते कापून ते कोरडे करावे लागतात आणि मग त्याला काही मसाले वापरून १५ ते २० मिनिटे मॅरीनेट केले जाते आणि मग त्याला पिठा मध्ये बुडवून तळले किंवा भाजले जातात.
बोंबील फ्राय हि रेसिपी जे नॉनव्हेज खातात त्यांना खूप आवडू शकतो आणि हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनते. चला तर आज आपण या लेखामाडे बोंबील फ्राय कसा बनवायचा ते पाहूयात.
बोंबील फ्राय रेसिपी मराठी – Bombil Fry Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
बोंबील फ्राय बनवताना सर्वप्रथम मासे स्वच्छ धुवून ते कापून ते कोरडे करावे लागतात आणि मग त्याला काही मसाले वापरून १५ ते २० मिनिटे मॅरीनेट केले जाते आणि मग त्याला पिठाच्या बॅटरमध्ये बुडवून तळले किंवा भाजले जातात.
- बोंबील : बोंबील हा एक प्रकारचा मासा आहे ज्याचे शरीर खूप पातळ आहे आणि हा रेसिपी बनवण्यासाठी महत्वाचा घटक आहे. हे मासे मधून थोडे कट केले जातात मग ते मॅरीनेट करून पिठामध्ये कोट करून तळले जातात.
- बेसन किंवा तांदळाचे पीठ : बेसन किंवा तांदळाचे पीठ हे साहित्य देखील एक महत्वाचे साहित्य आहे जे आपण बोंबील कोट करण्यासाठी वापरतो.
- तेल : तेल देखील महत्वाचे साहित्य आहे जे आपण बोंबील तळण्यासाठी वापरतो.
बोंबील फ्राय रेसिपी – bombil fry recipe
बोंबील फ्राय हि एक महाराष्ट्रीयन डिश आहे जी नॉनव्हेज लोकांच्यासाठी खास आहे कारण बोंबील हा एक माश्यांचा प्रकार आहे आणि ज्यांना वेगवेगळ्या माश्यांच्या रेसिपी खायला आवडतात त्यांच्यासाठी बोंबील फ्राय हि रेसिपी देखील एक उत्तम रेसिपी आहे. बोंबील फ्राय बनवण्यासाठी आपल्याला बोंबील, बेसन किंवा तांदळाचे पीठ, मॅरीनेट साठी काही मसाले या प्रकारचे साहित्य लागते.
आणि हे बनवताना स्वच्छ धुवून ते कट करून मॅरीनेट केले जातात आणि मग पिठामध्ये कोट करून तळले जातात. हे बोंबील फ्राय भाकरी सोबत खूप छान लागतात. चला तर मद अगदी सोपे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनणारे बोंबील फ्राय कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | १० ते १५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
पाककला | महाराष्ट्रीयन |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
बोंबील फ्राय बनवण्यासाठी जे जे साहित्य लागते त्यामधील काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि काही साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध नसते आणि म्हणून ते आपल्याला बाजारातून विकत आणावे लागते. चला तर मग बोंबील फ्राय बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- २५० ग्रॅम बोंबील.
- अर्धी वाटी तांदळाचे किंवा बेसन पीठ.
- ३ चमचे रवा.
- १ चमचा लाल मिरची पावडर.
- १/३ चमचा हळद.
- १/२ चमचा धणे पावडर.
- १ चमचा आले लसून पेस्ट.
- १ चमचा गरम मसाला पावडर.
- १/२ चमचा लाल मिरची पेस्ट.
- अर्धा चमचा लिंबू रस.
- मीठ ( चवीनुसार ).
- तेल ( तळण्यासाठी ).
हि रेसिपी घरी बनवण्यासाठी खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि मोजक्याच साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण वर दिलेले साहित्य वापरून बोंबील फ्राय कसा बनवायचा ते पाहूयात.
- बोंबील फ्राय बनवताना सर्वप्रथम बोंबील स्वच्छ धुवून ते मधून थोडे कात करून घ्या (हे मासे असे कट करा जसे आपण भरली वांगी बनवताना मसाला भरण्यासाठी जशी वांगी चिरतो तशी). बोंबील मधून चिरताना काळजी पूर्वक चिरा नाही तर त्याचे दोन तुकडे होऊ शकतात.
- आता ते एका कापडावर ठेवा आणि त्यावर अनेक कापड घालून ते वरून दाबा. असे केल्यामुळे यामधील सर्व पाणी निघून जाई.
- आता हे बोंबील ५ ते ६ मिनिटे तसेच ठेवा त्यामुळे ते चांगले कोरडे होतील.
- आता एका प्लेटमध्ये आले लसून पेस्ट, लाल मिरची पेस्ट, हळद. गरम मसाला, थोडीसी लाल मिरची पावडर, लिंबू रस, चवीनुसार मीठ आणि अगदी थोडेसे म्हणजे अर्धा चमचा पाणी घालून ते मिश्रण चांगले एकत्र करून घ्या.
- आणि ते कट करून ठेवलेल्या माश्यांना चांगले दोन्ही बाजूने चांगले लावा आणि ते १५ ते २० मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी बाजूला ठेवा.
- आता एक कढई मध्ये तेल घाला आणि ती कढई गॅसवर मध्यम आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. त्याचबरोबर एका प्लेटमध्ये बेसन पीठ, रवा, लाल मिरची पावडर, हळद, आणि चवीपुरते मीठ घाला आणि हे सर्व मिक्स करा.
- आता या मिश्रणामध्ये मॅरीनेट केलेले मासे बुडवून चांगले कोट करा आणि मग ते तेलामध्ये सोडा आणि लालसर रंग येईपर्यंत आणि चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- अश्या प्रकारे सर्व मासे तळून घ्या.
- बोंबील फ्राय सर्व्ह करण्यासाठी तयार झाला.
बोंबील फ्राय कश्यासोबत खातात – serving suggestions
- बोंबील फ्राय भाकरी सोबत खूप छान लागतात.
आम्ही दिलेल्या bombil fry recipe in marathi language माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर बोंबील फ्राय रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या suke bombil fry recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि bombil fish fry recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये dry bombil fry recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट