बीएससी अ‍ॅग्रीकल्चर कोर्स Bsc Agri Information in Marathi

Bsc Agri Information in Marathi – Bsc Agree Information in Marathi बीएससी अ‍ॅग्रीकल्चर कोर्स संपूर्ण माहिती बी एस सी (Bsc) अग्री हा एक शैक्षणिक कोर्स आहे ज्यामध्ये कृषी संशोधन आणि कृषी विषयक पध्दती विषयी शिक्षण दिले जाते. बी एस सी (Bsc) अग्री हा पदवीधर शिक्षण असून बीएससी अ‍ॅग्रीकल्चर (Bsc agriculture) हा ४ वर्षांचा अंडरग्रेजुएट कोर्स आहे जो प्रामुख्याने कृषी विज्ञानातील संशोधन आणि पद्धतीं यांच्याविषयी माहिती देतो त्याचबरोबर या कोर्स मध्ये शेतीतील झाडांच्या विषयी माहिती, संकरित  झाडे कशी बनवायची, अ‍ॅग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी, मातीचे परीक्षण आणि संशोधन, प्लांट पॅथॉलॉजी इत्यादी विषयांशी संबंधित माहिती दिली जाते.

त्याचबरोबर विद्यार्थ्यांना यामधून जलस्रोत आणि त्याचे व्यवस्थापन, पशुसंवर्धन व्यवस्थापन, जमीन सर्वेक्षण आणि जैवतंत्रज्ञानाच्या काही पैलूंचे सखोल ज्ञान मिळू शकते.

शेती हा आपल्या देशाचा कणा असल्यामुळे भारतात बीएससी कृषी कार्यक्रमाच्या पदवीधरांसाठी नेहमीच रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील आणि या प्रकारच्या पदवीधर शिक्षणाला कायमच महत्व असेल. कृषी अधिकारी, कृषी संशोधन शास्त्रज्ञ आणि कृषी विश्लेषक ही बीएससी अ‍ॅग्रीकल्चर (Bsc agriculture) शिक्षण पदवीधरांसाठी उपलब्ध असलेली काही प्रमुख पदे आहेत.

bsc agri information in marathi
bsc agri information in marathi

बीएससी अ‍ॅग्रीकल्चर कोर्स – Bsc Agri Information in Marathi

कोर्सचे नावबीएससी अ‍ॅग्रीकल्चर (Bsc agriculture)
बीएससी अ‍ॅग्रीकल्चर अभ्यासक्रम कालावधी४ वर्ष
बीएससी अ‍ॅग्रीकल्चरचे पूर्ण स्वरूपबॅचलर ऑफ सायन्स इन अ‍ॅग्रिकल्चर
बीएससी कृषी पात्रतामान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र) विषयात बारावीमध्ये ५०% गुण
वर्णनबीएससी अ‍ॅग्रीकल्चर (Bsc agriculture) हा ४ वर्षांचा अंडरग्रेजुएट कोर्स आहे जो प्रामुख्याने कृषी विज्ञानातील संशोधन आणि पद्धतीं यांच्याविषयी माहिती देतो.

बीएससी अ‍ॅग्रीकल्चर म्हणजे काय ? – bsc agriculture means 

bsc ag full form हा पदवीधर शिक्षण असून बीएससी अ‍ॅग्रीकल्चर (Bsc agriculture) हा ४ वर्षांचा अंडरग्रेजुएट कोर्स आहे जो प्रामुख्याने कृषी विज्ञानातील संशोधन आणि पद्धतीं यांच्याविषयी माहिती देतो त्याचबरोबर या कोर्स मध्ये शेतीतील झाडांच्या विषयी माहिती, संकरित झाडे कशी बनवायची, अ‍ॅग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी, मातीचे परीक्षण आणि संशोधन, प्लांट पॅथॉलॉजी इत्यादी विषयांशी संबंधित माहिती दिली जाते.

कृषी विज्ञान मधील शाखा – branches in Bsc agriculture 

कृषी विज्ञानामध्ये कृषीशास्त्र, वनस्पती रोगशास्त्र, मृदा विज्ञान, कीटकशास्त्र, अन्न तंत्रज्ञान, फलोत्पादन, कृषी अर्थशास्त्र, मत्स्यपालन, गृहविज्ञान, वनीकरण आणि पशुवैद्यकीय विज्ञान यासारख्या शाखा आहेत.

बीएससी अ‍ॅग्रीकल्चर करण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी असणारे पात्रता निकष 

  • बीएस्सी कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी १२ विज्ञान शिक्षण पूर्ण केले पाहिजे.
  • विद्यार्थ्यांनी त्यांच्या उच्च माध्यमिक शाळेच्या परीक्षेत किंवा कोणत्याही समकक्ष परीक्षेत किमान ५० टक्के गुण मिळवले पाहिजेत.
  • विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विज्ञान विषयांसह त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेले असावे.
  • काही विद्यापीठे बीएससी अ‍ॅग्रीकल्चर (Bsc agriculture) अभ्यासक्रमासाठी पात्र होण्यासाठी त्यांच्या स्वत: च्या प्रवेश परीक्षा घेतात जसे की सामान्य प्रवेश परीक्षा.

बीएससी अ‍ॅग्रीकल्चर शिक्षण का घ्यावे 

  • बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भरपूर त्यांचे करिअर अजून फुलवण्यास मदत होऊ शकते. ते कृषी विज्ञान किंवा एमएससी अभ्यासक्रमात पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतात त्याचबरोबर ते एमबीए किंवा पीजीडीएम यासारखे शिक्षण देखील घेवू शकतात.
  • कृषी प्रवेश परीक्षांद्वारे कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा म्हणजेच उच्च शिक्षणाचा पर्याय उपलब्ध होऊ शकतो.
  • बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर विद्यार्थी पदवीधर असल्यामुळे सरकारी नोकऱ्यांसाठीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्यास पात्र ठरतात.

बीएससी अ‍ॅग्रीकल्चर या शिक्षणामधील महत्वाचे विषय – b.sc agriculture subjects

अ.    क्र.विषय
१.       कृषी हवामानशास्त्र
२.       मृदा विज्ञानाची मूलभूत तत्त्वे
३.       प्राथमिक पीक विज्ञान
४.       वनस्पती प्रजननाची तत्त्वे
५.       पीक उत्पादनाची तत्त्वे
६.       प्रास्ताविक वनस्पती विज्ञान
७.       पशुधन उत्पादन आणि व्यवस्थापन
८.       वनस्पती जैवतंत्रज्ञान परिचय

बीएससी अ‍ॅग्रीकल्चर  शिक्षण प्रवेश प्रक्रिया कशी असते – admission process 

बीएससी अ‍ॅग्रीकल्चर (Bsc agriculture) या शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया हि विद्यापीठ किंवा संस्थांनुसार बदलत असते. काही महाविद्यालये गुणवत्ता आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारावर थेट बीएससी अ‍ॅग्रीकल्चर (Bsc agriculture) प्रवेश देतात आणि काही महाविद्यालये इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय, राज्य-स्तरीय किंवा विद्यापीठ स्तरावरील प्रवेश परीक्षा घेतात.

थेट प्रवेशासाठी 

थेट प्रवेशासाठी विद्यार्थ्याला संबधित विद्यापीठामध्ये अर्ज करावा लागतो त्या अर्जावरून त्या विद्यार्थ्याला बोलवून महाविद्यालये त्याची गुणवत्ता आणि वैयक्तिक मुलाखतीच्या आधारावर प्रवेश देतात.

प्रवेश परीक्षा आधारावर 

काही महाविद्यालये इच्छुक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी राष्ट्रीय, राज्य-स्तरीय किंवा विद्यापीठ स्तरावरील प्रवेश परीक्षा घेतात.

बीएससी अ‍ॅग्रीकल्चरसाठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षा आणि त्याचे स्वरूप 

बीएससी अ‍ॅग्रीकल्चर हे पदवीधर शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात आणि बीएससी अ‍ॅग्रीकल्चर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना १२ विज्ञान परीक्षा उतीर्ण करणे आवश्यक असते.

परीक्षा 

  • बीसीइसीइ ( BCECE ).
  • आयसीएआर एआयइइए ( ICAR AIEEA )
  • एमपी पीएटी ( MP PAT )

परीक्षेचे स्वरूप 

  • परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे आयोजित केल्या जाऊ शकतात.
  • काही परीक्षा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणितावर आधारित असतील तर इतर परीक्षा संख्यात्मक योग्यता, मौखिक क्षमता, वाचन आकलन इत्यादींवर आधारित असतील.
  • परीक्षेची वेळ मर्यादा १२० ते १८० मिनिटे असू शकते.

बीएससी अ‍ॅग्रीकल्चर झालेल्या विद्यार्थ्यांना कोठे नोकरी मिळू शकते

अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, पदवीधरांना सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही क्षेत्रात नोकऱ्या मिळू शकतात. शेती हा आपल्या देशाचा कणा असल्यामुळे भारतात बीएससी कृषी कार्यक्रमाच्या पदवीधरांसाठी नेहमीच रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील. त्यांना कृषी अधिकारी, कृषी संशोधन शास्त्रज्ञ आणि कृषी विश्लेषक ही बीएससी अ‍ॅग्रीकल्चर (Bsc agriculture) शिक्षण पदवीधरांसाठी उपलब्ध असलेली काही प्रमुख पदे आहेत.

  • कृषी अधिकारी.
  • कृषी विश्लेषक.
  • कृषी संशोधन शास्त्रज्ञ.
  • सहाय्यक वृक्षारोपण व्यवस्थापक.

आम्ही दिलेल्या bsc agri information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर बीएससी अ‍ॅग्रीकल्चर कोर्स माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या bsc agree information in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of bsc agri in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये bsc agriculture means Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!