Capsicum Recipe in Marathi ढोबळी मिरची रेसिपी आपण एका भाजी पासून वेगवेगळे पदार्थ बनवतो तसेच आपण शिमला मिरची वापरून देखील वापरून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. शिमला मिरची पासून आपण भाजी, भरलेली मसाला शिमला मिरची, शिमला मिरची मसाला राईस या सारखे अनेक पदार्थ बनवून खावू शकतो. शिमला मिरची हि एक फळ भाजी आहे ज्याची भाजी बनवली जाते आणि हि भाजी किंवा करी आपण चपाती, रोटी किंवा नान सोबत खावू शकतो शिमला मिरची पासून बनणारे पदार्थ भारतामध्ये सर्व ठिकाणी बनवले जातात आणि शिमला मिरची पासून वेगवेगळे पदार्थ घरी बनवणे खूप सोपे आहे.
आणि खूप कमी वेळेमध्ये म्हणजेच काही रेसिपीज २० ते २५ मिनिटामध्ये बनतात आणि रेसिपीज बनवण्यासाठी मोजकेच साहित्य लागते. चला तर आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शिमला मिरचीपासून रेसिपीज कश्या बनवायच्या ते पाहूयात.
ढोबळी मिरची रेसिपी – Capsicum Recipe in Marathi
शिमला मिरची रेसिपीज – capsicum recipes in marathi
भारताच्या बहुतेक भागामध्ये शिमला मिरची वापरून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि आज आपण देखीलशिमला मिरची पासून बनवले जाणारे काही पदार्थ पाहणार आहोत. शिमला मिरची पासून वेगवेगळे पदार्थ घरी बनवणे खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनतात. चला तर आता आपण शिमला मिरची पासून वेगवेगळ्या रेसिपीज कश्या बनवायच्या आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.
- नक्की वाचा: शिमला मिर्च रेसिपी मराठी
शिमला मिरची भाजी रेसिपी – capsicum bhaji recipe in marathi
शिमला मिरचीची भाजी हा एक कॉमन प्रकार आहे जो भारतामध्ये बहुतेक स्वयंपाक घरामध्ये आठवड्यातून एकदा बनवला जातो. शिमला मिरचीची भाजी बनवणे खूप सोपे आहे आणि खूप झटापट बनते. आपण गडबडीच्या वेळी चपातीसोबत खाण्यासाठी शिमला मिरचीची भाजी बनवू शकतो. चला तर मग आता आपण भाजी कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते.
शिमला मिराचीची भाजी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते शक्यतो आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि नसेल तर आपण ते बाजारातून अगदी सहजपणे उपलब्ध करून घेवू शकतो. चला तर आता आपण भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- ४ ते ५ शिमला मिरची.
- ३ चमचे खोबरे कोथिंबीर पेस्ट.
- २ चमचे कुट.
- १ मध्यम आकाराचा कांदा ( बारीक चिरलेला ).
- १ चमच्याला थोडी कमी लाल मिरची पावडर.
- १/४ चमचा हळद.
- २ ते ३ चमचे तेल.
- १/४ चमचा जिरे.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- शिमला मिरचीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम शिमला मिरच्या स्वच्छ धुवून त्यामधील नि काढून त्या उभ्या किंवा चौकोनी चिरा आणि बाजूला ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा आणि त्यामध्ये २ ते ३ चमचे तेल घाला आणि तेल गरम झाले कि त्यामध्ये जिरे घाला जिरे लगेच फुलातील मग त्यामध्ये लगेच कांदा घाला आणि कांदा चांगला लासर रंग येईपर्यंत भाजा आणि मग त्यामध्ये शिमला मिरची घाला आणि ते चांगले १० मिनिटे भाजून घ्या.
- शिमला मिरची चांगली भाजली कि त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि साखर, खोबरे कोथिंबीर पेस्ट आणि कुट घाला आणि मिक्स करा.
- आणि त्यामध्ये थोडेसे ( २ ते ३ चमचे ) पाणी घालून ते मिक्स करा आणि त्यावर झाकण लावून ते ७ ते ८ मिनिटे चांगले शिजवून घ्या.
- आपली शिमला मिरचीची भाजी तयार झाली.
भरलेली शिमला मिरची रेसिपी – stuffed capsicum recipe in marathi
आता आपण भरलेली शिमला मिरची कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
- ४ ते ५ शिमला मिरची.
- अर्धी वाटी शेंगदाणा कुट.
- ४ ते ६५ चमचे खोबरे कोथिंबीर पेस्ट.
- दीड चमचा आले लसून पेस्ट.
- २ चमचे लाल मिरची पावडर.
- १/३ चमचा हळद.
- १ चमचा गरम मसाला.
- १ मध्यम आकाराचा कांदा ( बारीक चिरलेला ).
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- २ ते ३ चमचे तेल.
- ४ ते ५ चमचे दुध.
- पाणी ( आवश्यकतेनुसार ).
- सर्वप्रथम शिमला मिरचीचा वरचा भाग कडून त्यामधील आतील बिया काढून घ्या आणि ह्या शिमला मिरच्या बाजूला ठेवा.
- आता एका मिक्सिंग बवूल मध्ये शेंगदाणा कुट, खोबरे कोथिंबीर पेस्ट, लाल मिरची पावडर, आले लसून पेस्ट, हळद, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि त्यामध्ये ४ ते ५ चमचे दुध घाला आणि ते मिश्रण चांगले एक जीव करून घ्या.
- हे बनवलेले मिश्रण बिया काढून ठेवलेल्या मिरच्यांमध्ये भरा आणि बाजूला ठेवा.
- आता मोदक पात्राची चाळण बसेल असे भांडे घ्या आणि त्यामध्ये पाणी घाला आणि त्यावर चाळणीला आतून तेल लावून त्यावर ठेवा आणि भरलेल्या शिमला मिरच्या त्या चाळणीमध्ये ठेवा आणि ते भांडे गॅसवर मध्यम आचेवर ठेवा आणि त्यावर एक चाकण ठेवून भरलेल्या शिमला मिरच्या कमीत कमी १० मिनिटे उकडू द्या.
- उकडल्या नंतर गॅस बंद करा आणि त्या मिरच्या एक प्लेटमध्ये काढून घ्या.
- आता एका भांड्यामध्ये तेल गरम करा आणि त्याला कांद्याची फोडणी द्या आणि कांदा थोडावेळ भाजा मग त्यामध्ये थोडीसी हळद, लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला घा आणि ते मिक्स करून त्यामध्ये लगेच उकलेल्या शिमला मिरच्या घाला आणि त्या मिरच्या तेलामध्ये थोडावेळ ( ५ मिनिटे ) भाजा आणि मग गॅस बंद करा.
- भरलेली शिमला मिरची सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.
शिमला मिरची मसाला राईस रेसिपी – capcicum masala rice recipe in marathi
आता आपण शिमला मिरची मसाला राईस कसा बनवायचा आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
- १ वाटी बासमती तांदूळ.
- २ वाटी पाणी.
- २ शिमला मिरच्या ( चौकोनी चिरलेल्या ).
- १ कांदा ( उभा चिरलेला ).
- १ टोमॅटो ( बारीक चिरलेला ).
- अर्धी वाटी मटार.
- दीड चमचे भाताचा मसाला.
- १/२ चमचा जिरे.
- १ चमचा लाल मिरची पावडर.
- अर्धा मोठा चमचा तेल.
- मीठ ( चवीनुसार ).
- सर्वप्रथम तांदूळ चांगले निवडून घ्या आणि ते बाजूला ठेवा.
- आता गॅसवर मध्यम आचेवर कुकर ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला तेल गरम झाले कि त्यामध्ये जिरे टाका. जिरे घातले कि त्यामध्ये लगेच कांदा घाला आणि कांदा थोडावेळ लालसर रंग येई पर्यंत भाजा. मग त्यामध्ये शिमला मिरची घाला आणि ती देखील ५ ते ६ मिनिटे भाजा मग त्यामध्ये टोमॅटो आणि मटार घाला आणि तेलामध्ये ते थोडावेळ भाजा.
- आता यामध्ये भाताचा मसाला, लाल मिरची पावडर घाला आणि मिक्स करा.
- मग त्यामध्ये तांदूळ घालून तांदूळ चांगले मिक्स करा आणि थोडा वेळ ते भाजा आणि मग त्यामध्ये २ वाटी गरम पाणी, चवीनुसार मीठ घाला आणि ते मिक्स करून कुकरचे झाकण लावून गॅसची आच मोठी करून कुकरला तीन शिट्ट्या आणा आणि गॅस बंद करा.
- कुकर थोडा थंड झाला कि शिमला मिरची मसाला राईस सर्व्ह करण्यासाठी तयार झाला.
आम्ही दिलेल्या capsicum recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर ढोबळी मिरची रेसिपी माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या capsicum besan recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि capsicum bhaji recipe in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये stuffed capsicum recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट