Bharleli Shimla Mirch Recipe in Marathi – Capcicum Recipes in Marathi भरलेली शिमला मिरची रेसिपी मराठी आपण रोज काही ना काही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवून खातो आणि त्यामध्ये वांग्याची भाजी, शिमला मिरची भाज,भिंडी, दोडका यासारख्या भाज्या बनवून खातो. परंतु रोज रोज एक प्रकारची भाजी खावून कंटाळा येतो अश्यावेळी आपण ह्याच भाज्या वापरून मसाले तर भाज्या बनवू शकतो जसे कि भरलेली वांगी, भिंडी मसाला, दोडका मसाला, भरलेली शिमला मिरची, शिमला मिरची मसाला यासारख्या भाज्या बनवून खावू शकतो आणि आज आपण यामधील एक प्रसिध्द आणि बहुतेक लोकांना आवडणारी भरलेली शिमला मिरची रेसिपी कशी बनवायची ते पाहणारा आहोत.
भरलेली शिमला मिरची घरी बनवणे खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर मग आता आपण भरलेली शिमला मिरची कशी बनवायची ते पाहूयात.
भरलेली शिमला मिरची रेसिपी – Bharleli Shimla Mirch Recipe in Marathi
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
वाढणी | ५ व्यक्ती |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
शिमला मिरची बनवताना सर्वप्रथम मिरच्या धुवून त्या त्या कापडाने पुसून कोरड्या केल्या जातात आणि मग त्याचा वरचा भाग गोल कट करून रिकामा केला जातो आणि मग त्यामधील बिया काढून त्या मिरच्या पोकळ करून घेतल्या जातात आणि काही मसाले आणि इतर साहित्य वापरून बनवलेले सारण त्यामध्ये भरले जाते आणि ह्या मिरच्या उकडून मग त्या तेलामध्ये फोडणी दिल्या जातात.
- शिमला मिरची : भरलेली शिमला मिरची रेसिपी बनवण्यासाठी शिमला मिरची हे महत्वाचे साहित्य आहे. मिरचीचा वरचा भाग गोल कट करून रिकामा केला जातो आणि मग त्यामधील बिया काढून त्या मिरच्या पोकळ करून घेतल्या जातात आणि मग त्यामध्ये मसाला भरला जातो.
- खोबरे : मिरची मध्य भरण्यासाठी आपण जे सारण बनवतो त्यामध्ये खोबरे वापरले जाते आणि यामध्ये खोबरे वापरल्यामुळे मिरचीला चांगली टेस्ट येते.
- गरम मसाला : सारणामध्ये गरम मसाला वापरल्यामुळे भरलेली शिमला मिरची खमंग आणि स्वादिष्ट होते.
भरलेली शिमला मिरची रेसिपी – bharli simla mirchi
भरली शिमला मिर्च हा भारतीय लोकप्रिय प्रकार आहे जो भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवला. भरलेली शिमला मिरची घरी बनवणे खूप सोपे आहे आणि खूप कमी वेळेमध्ये आणि कमी साहित्यामध्ये बनते. चला तर आता आपण भरलेली शिमला मिरची कशी बनवायची आणि त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूयात.
तयारीसाठी लागणारा वेळ | १० मिनिटे |
बनण्यासाठी लागणारा वेळ | २० ते २५ मिनिटे |
एकूण लागणारा वेळ | ३० ते ३५ मिनिटे |
पाककला | भारतीय |
वाढणी | ५ व्यक्ती |
बनवण्याची पध्दत | खूप सोपी |
भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी जे साहित्य लागते त्यामधील बहुतेक साहित्य आपल्या घरामध्ये उपलब्ध असते आणि जर ते घरामध्ये उपलब्ध नसेल तर ते आपण बाजारातून विकत अनु शकतो. परंतु आपण ज्या शिमला मिरच्या वापरणार आहोत त्या ताज्या आणि चांगल्या असाव्यात. चला तर मग आता आपण भरलेली शिमला मिरची बनवण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पाहूयात.
- ५ ताज्या शिमला मिरच्या.
- २ मोठे चमचे शेंगदाण्याचा कुट.
- १ वाटी वाटलेली खोबरं आणि कोथिंबीर.
- १ चमचा आले लसून पेस्ट.
- १ चमचा गरम मसाला.
- २ चमचे लाल मिरचीची मसाला चटणी किंवा लाल मिरची पावडर.
- १/२ चमचा हळद.
- मीठ ( चवीनुसार ).
- साखर ( चवीनुसार ).
- कांदा ( चिरलेला ).
- मोहरी.
- तेल ( आवश्यकतेनुसार ).
- शिमला मिरची बनवताना सर्वप्रथम मिरच्या धुवून त्या त्या कापडाने पुसून कोरड्या केल्या जातात आणि मग त्याचा वरचा भाग गोल कट करून रिकामा केला जातो आणि मग त्यामधील बिया काढून त्या मिरच्या पोकळ करून घ्या आणि त्या बाजूला ठेवा.
- मग एक प्लेट घ्या आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट, वाटलेले खोबरं आणि कोथिंबीर, आले लसून पेस्ट, गरम मसाला, लाल तिखट, हळद, मीठ ( चवीनुसार ) आणि साखर घाला आणि ते मिश्रण एक जीव करून घ्या आता ते मिश्रण सर्व शिमला मिरच्यांमध्ये भरा आणि थोडेसे सारण फोडणीमध्ये घालण्यासाठी ठेवा.
- जर तुम्ही भरलेली शिमला मिरच्या उकडण्यासाठी मोदक पात्राच्या चाळणीचा वापर करत असाल तर चाळण वरती झाकणासारखी बसेल अशे भांडे घ्या आणि त्या भांड्यामध्ये ३ ते ४ वाटी पाणी घाला आणि ते गॅसवर उकळण्यासाठी ठेवा.
- चाळणीला तेल लावून त्यामध्ये भरलेल्या शिमला मिरच्या घालून ती चाळण त्या भांड्यावर ठेवा आणि त्यावर गच्च झाकण घाला आणि ते १० ते १५ मिनिटे उकडून घ्या.
- मिरच्या उकडल्यामुळे त्या चांगल्या शिजली जातील.
- त्यानंतर एका भांड्यामध्ये थोडे तेल घालून ते गरम झाले कि त्यामध्ये मोहरी घाला आणि मोहरी तडतडली कि त्यामध्ये कांदा घाला आणि तो लालसर होईपर्यंत चांगला भाजा आणि त्यामध्ये थोडीसी हळद आणि लाल तिखट घाला. मग त्यामध्ये थोडेसे शिल्लक ठेवलेले सारण घाला आणि ते मिक्स करून त्यामध्ये थोडे पाणी घालून त्याची घट्ट ग्रेव्ही बनवून घ्या आणि मग त्यामध्ये उकडलेल्या शिमला मिरच्या आणि चवीनुसार मीठ आणि साखर घाला ( मीठ घालताना काळजीपूर्वक घाला कारण आपण सारणामध्ये देखील मीठ घातलेले आहे म्हणून मीठ घालताना बघून घाला ).
- आणि हे मिक्स करून त्यावर झाकण लावून मंद आचेवर मिरच्या ३ ते ४ मिनिटे वाफवून घ्या/
- भरलेली शिमला मिरची सर्व्ह करण्यासाठी तयार झाली.
शिमला मिरची कश्यासोबत सर्व्ह करावी – serving suggestion
- शिमला मिरची आपण चपाती, रोटी किंवा नान सोबत सर्व्ह करू शकतो.
आम्ही दिलेल्या bharleli shimla mirch recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर भरलेली शिमला मिरची रेसिपी मराठी shimla mirch fry recipe in marathi बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या capcicum recipes in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि shimla mirch in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये shimla mirch recipe in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट