cbi information in marathi सीबीआय म्हणजे काय?, भारतामधील एक प्रमुख तपास यंत्रणा म्हणजे केंद्रीय अन्वेषण विभाग या विषयी आज आपण माहिती घेणार आहोत ज्याला इंग्रजीमध्ये सेन्ट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन (central bureau of investigation) असे म्हणतात. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) हि भारतातील सर्वात मोठी आणि प्रमुख तपास यंत्रणा आहे आणि हि तपास यंत्रणा केंद्रीय दक्षता आयोग आणि लोकपाल यांना मदत पुरवते. केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) हि जरी वैधानिक संस्था नसली तरी तिला दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लीशमेंट कायदा १९४६ च्या कायद्यामधून शोध आणि तपास करण्याचा अधिकार आहे.
केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) या तपास संस्थेची स्थापन १९६२ ते १९६४ या दरम्यान झाली म्हणजेच ज्यावेळी १९६३ मध्ये भारतामध्ये गंभीर गुन्ह्यांच्यापासून संरक्षण, फसवणूक, घोटाळा, सामाजिक गुन्हे, काळाबाजार, साठेबाजी या सारख्या गुन्ह्याच्यावर आळा घालण्यासाठी आणि गुन्ह्यांचा शोध आणि तपास करण्यासाठी भारत सरकारने सीबीआय या संस्थेची स्थापना केली त्यानंतर हि संस्था अतिरेक्यांनी केलेले गुन्हे, हत्या आणि अपहरण या सारख्या गुन्ह्यांचा तपास करू लागली.
सीबीआय म्हणजे काय – CBI Information in Marathi
सीबीआयचे मराठी नाव | केंद्रीय अन्वेषण विभाग |
सीबीआयचे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप – cbi full form in marathi | central bureau of investigation (CBI) |
प्रकार | तपास यंत्रणा |
स्थापना | १९६३ |
कोणी स्थापन केली | भारत सरकार |
सीबीआय प्रवेश परीक्षा | यूपीएससी नागरी सेवा परीक्षा |
पात्रता निकष | उमेद्वाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयातून कमीत कमी ५५ टक्के गुणांच्या बरोबर पदवी उतीर्ण असले पाहिजे. |
सीबीआय संस्था कोणकोणत्या प्रकारच्या गुन्ह्याचा तपास करते
केंद्रीय अन्वेषण विभाग ( CBI ) हि एक तपास यंत्रणा आहे आणि हि संस्था वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्याचा तपास करते जसे कि हत्या, अपहरण, काळाबाजार, आतंकी हल्ल्याविषयक गुन्हे या सारख्या अनेक गुन्ह्याची तपासणी करते आणि खाली आपण त्या गुन्ह्यांच्या विषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.
आर्थिक गुन्हे
बँक ही पैश्याचा व्यवहार करणारे एक ठिकाण आहे आणि या विषयक बँक गुन्हे आणि सायबर गुन्हे या विषयी सीबीआय तपास करते तसेच बनवत भारतीय चलनी नोटा, अंमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात तस्करी किंवा बाजार, आर्थिक फसवणूक, परकीय चलन उल्लंघन आणि आयात निर्यात या विषय गुन्हे या सारख्या अनेक अर्थी गुन्ह्याचा तपास हा केंद्रीय अन्वेषण विभाग तपास करतो.
सुओ मोटो प्रकारने
यामध्ये सीबीआय हि संस्था फक्त केंद्रशासित प्रदेशामध्ये गुन्ह्याचा तपास करते. या प्रकरणांमध्ये केंद्र सरकर हे देशाच्या एकाद्या राज्यातील गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी सीबीआय ला नेमू शकते परंतु हे त्या संबधीत राज्य सरकारच्या संमतीने होते. पण सर्वोच्च आणि उच्च न्यायालय मात्र राज्याच्या संमती शिवाय त्या संबधित राज्यामध्ये सीबीआयला तपास करण्यासाठी संमती देऊ शकते.
विशेष गुन्हे
सीबीआय हि संस्था विशेष गुन्ह्यांचा देखील तपास करते जसे कि खंडणीसाठी अपहरण, माफिया म्हणजेच अंडरवर्ल्ड, बॉम्बस्फोट आणि दहशतवाद या सारखे गंभीर गुन्ह्याचा देखील शोध घेतात. परंतु हा तापस करण्यासाठी त्यांना सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या संमती शिवाय आदेश दिलेले असतात.
केंद्रीय अन्वेषण विभागाची कार्ये – Functions
सीबीआय (CBI) हि भारतामधील मुख्य तपास यंत्रणा आहे आणि हि संस्था अनेक गुन्ह्यांचा तपास तर करतेच परंतु हि संस्था अनेक कार्ये देखील पार पाडते आणि ती कार्ये काय आहेत ते आपण खाली पाहूयात.
- केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) चे मुख्य कार्य म्हणजे वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करणे.
- त्याचबरोबर सीबीआय हि तपास यंत्रणा देशामध्ये होणारे वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचार रोखते आणि प्रशासनामध्ये अखंडता राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते.
- राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय घोटाळे किंवा प्रकाराने असलेल्या गंभीर प्रकारच्या गुन्ह्यांचा शोध किंवा तपास करणे.
- वेगवेगळ्या राज्य पोलीस दल आणि भ्रष्टाचारविरोधी एजन्सीच्या क्रीयाकलापांचे समन्वय साधने.
- आर्थिक तसेच वित्तीय कायद्याच्या उल्लंघना संबधित प्रकरणांची चौकशी करणे म्हणजे केंद्रीय उत्पादन शुल्क, सीमाशुल्क, निर्यात व आयात नियंत्रण आणि परकीय चलन नियंत्रण.
- असेच सीबीआय गुन्हेगारीची आकडेवारी ठेवते तसेच देशामध्ये होणार्या गुन्हेगारीविषयक माहिती ठेवते.
- राज्य सरकारच्या आदेशानुसार केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) हे सार्वजनिक दृष्ट्या महत्वाचे प्रकरण किंवा गुन्हा हाती घेऊ शकते आणि त्याचा तपास करू शकते.
केंद्रीय अन्वेषण संस्थेचे मिशन आणि व्हिजन – Mission and vission
आता खाली आपण केंद्रीय अन्वेषण विभागाचे मिशन म्हणजेच ध्येय काय आहे आणि या संस्थेचे व्हिजन म्हणजेच दृष्टी काय आहे ते पाहणार आहोत.
मिशन (mission)
- कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यासाठी अग्रगण्य विभाग म्हणून काम करणे तसेच संपूर्ण तपासानीमार्फत भारताची घटना आणि जमीन कायदा राखण्याचे उदिष्ट आहे.
- तसेच पोलीस दलांना दिशा आणि नेतृत्व प्रदान करणे.
व्हिजन (vision)
- सायबर आणि उच्च तंत्रज्ञानाच्या गुन्ह्यांशी लढण्यास मदत करणे.
- काळजी पूर्वक तपासणी आणि आणि खटला चालवण्याद्वारे हिंसक आणि आर्थिक गुन्हे नियंत्रित करते.
- राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यात सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचा शोध घेते.
सीबीआय मधील रँक – ranks
जसे केंद्रीय आणि राज्य पोलीस विभागाप्रमाणेच सीबीआय मध्ये देखील कॉन्स्टेबल ते संचालक रँकिंग असते. चला तर खाली आपण सीबीआयचे रँकिंग पाहूया.
अ. क्र. | रँकिंग |
१. | कॉन्स्टेबल |
२. | प्रमुख कॉन्स्टेबल |
३. | सब इन्स्पेक्टर |
४. | सहाय्यक उपनिरीक्षक |
५. | निरीक्षक |
६. | अतिरिक्त पोलीस अधीक्षक |
७. | पोलीस अधीक्षक |
८. | वरिष्ठ पोलीस जनरल |
९. | अतिरिक्त संयुक्त संचालक |
१०. | विशेष संचालक |
केंद्रीय अन्वेषन विभाग विषयी काही महत्वाची माहिती – important information about cbi in marathi
सीबीआय म्हणजे काय – cbi full form in marath
सीबीआय ( CBI ) ला इंग्रजीमध्ये सेन्ट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टीगेशन असे म्हणतात या संस्थेला केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणतात. हि संस्था अनेक प्रकारचे वेगेवगळे गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी भारत सरकारने १९६२ ते १९६४ या दरम्यान स्थापन केली आहे. हा विभाग हत्या, अपहरण, दहशतवाद, बॉम्बस्फोट, आर्थिक गुन्हेगारी या सारख्या गुन्ह्यांचा तपास घेते.
सीबीआय पात्रता काय आहे ?
उमेद्वाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयातून कमीत कमी ५५ टक्के गुणांच्या बरोबर पदवी उतीर्ण असले पाहिजे. तसेच सीबीआय मधील सब इन्स्पेक्टर साठी शैक्षणिक पात्रता म्हणजे त्या संबधीत व्यक्तीने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयामध्ये बॅचलर हि पदवी पास करणे आवश्यक आहे आणि २० ते ३० या वायोगातील पदवीधर या पोस्टसाठी अर्ज करू शकतात.
केंद्रीय अन्वेषण विभागाची कार्ये काय आहेत ?
सीबीआय चे मुख्य काम गुन्ह्याचा तपास करणे त्याचबरोबर भारतामधील गंभीर गुन्ह्यांच्यापासून संरक्षण, फसवणूक, घोटाळा, सामाजिक गुन्हे, काळाबाजार, साठेबाजी या सारख्या गुन्ह्याच्यावर आळा घालने आणि गुन्ह्यांचा शोध घेणे हि या संस्थेची प्रमुख भूमिका आहे.
आम्ही दिलेल्या cbi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर सीबीआय म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cbi information in marathi wikipedia या article मध्ये update करू, मित्रांनो हि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट