राजधानी दिल्ली माहिती Delhi Information in Marathi

Delhi Information in Marathi दिल्ली माहिती आज या लेखामध्ये आपण भारताची राजधानी असणाऱ्या दिल्ली या शहराबद्दल माहिती घेणार आहोत. दिल्ली हे शहर अगदी पूर्वीच्या काळापासून राजकीय काराभारांचे मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणून कायमच दिल्ली या शहराला दर्जा दिलेला आहे. दिल्ली हे शहर सरकारी आणि व्यावसायिक दृष्टीने सर्वात मोठे शहर असल्यामुळे या शहराची एकूण लोकसंख्या १६.३ दशलक्ष इतकी असून या ठिकाणी लोक जास्तीत जास्त लोक हिंदी भाषा बोलतात म्हणजेच या शहराची हिंदी हि भाषा आहे त्याचबरोबर दिल्ली या शहरामध्ये राहिलेले भारतातील इतर रहिवासी अनेक दुसऱ्या भाषा बोलतात.

हे शहर जगातील सर्वात वेगाने बदलणाऱ्या शहरांपैकी एक आहे ज्यामध्ये अनेक तांत्रिक बदल स्वीकारण्याची क्षमता आहे आणि जागतिक कनेक्टिव्हिटी मजबूत करताना जलद वाढणाऱ्या लोक संखेस सामोरे जाण्याची क्षमता या शहरामध्ये आहे कारण या शहराचे एकूण क्षेत्रफळ १४८४ चौरस किलो मीटर इतके आहे म्हणून या शहराला भारतातील सर्वात मोठे शहर म्हणून ओळखले जाते.

delhi information in marathi
delhi information in marathi

भारताची राजधानी दिल्ली माहिती – Delhi Information in Marathi

शहराचे नाव दिल्ली
शहराचे क्षेत्रफळ या शहराचे एकूण क्षेत्रफळ १४८४ चौरस किलो मीटर इतके आहे
ओळख भारत देशाची राजधानी
लोकसंख्य १६.३ दशलक्ष
प्रेक्षणीय ठिकाणे इंडिया गेट, लाल किल्ला, कमळ मंदिर, दिल्ली झू आणि कुतुब मिनार या सारखी अनेक प्रेक्षणीय ठिकाणे आहेत

इतिहास 

सध्या भारताची राजधानी असणारे दिल्ली या शहराचा खूप जुना आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला इतिहास आहे. दिल्ली या शहरावर अनेक वेगवेगळ्या वंशाच्या राजांनी राज्य केले आणि दिल्ली या शहराची सत्ता एका राज्याकडून दुसऱ्या राज्याकडे गेली. दिल्ली या शहराचा इतिहास हा महाभारत ज्यावेळी घडले त्यावेळीच असावा कारण त्याकाळी या शहराला इंद्रप्रस्त असे नाव होते.

या शहरामध्ये पाच पांडव राहत होते. दिल्ली हे शहर अगदी पूर्वीच्या काळापासून राजकीय काराभारांचे मध्यवर्ती ठिकाण आहे म्हणून कायमच दिल्ली या शहराला दर्जा दिलेला आहे कारण दिल्ली हे शहर अगदी ५ व्या शतकापासून राजकीय कारभारांचा साक्षीदार आहे कारण या शहरावर राष्ट्रकुट, यादव, राजपूत, सातवाहन, खिलजी, तुघलक आणि मुघलांनी राज्य केले.

इ. स ११९२ मध्ये घोरीच्या अफगाण योद्धा मुहम्मदच्या सैन्याने राजपूत शहर काबीज केले आणि दिल्ली सल्तनत स्थापन झाली. इ. स १३९८ मध्ये तैमूरने ययाने दिल्ली या शहरावर आक्रमण केले आणि त्यामुळे घोरीच्या मुहम्मदने स्थापन केलेल्या दिल्ली सल्तनतचा अंत झाला.

दिल्लीच्या सुलतानांपैकी शेवटच्या लोदींनी बाबरला दिल्लीचे राज्य पाहण्याची संधी दिली ज्याने इ. स १५२६ मध्ये पानिपतच्या लढाईनंतर मुघल साम्राज्याची स्थापना केली.

सुरुवातीच्या मुघल सम्राटांनी आग्रा या शहराला आपली राजधानी म्हणून अनुकूल केले आणि तसेच शहाजहानने त्याच्या राजकीय कालावधी मध्ये जुन्या दिल्लीच्या भिंती इ. स १६३८ मध्ये बांधल्यानंतरच दिल्ली त्यांची कायमची राजकीय कारभाराचे ठिकाण बनले. अश्याप्रकारे दिल्ली या शहरावर अनेक हिंदू राजांनी तसेच सुलतानांनी राज्य केले आहे.

संस्कृती 

दिल्ली हे शहर भारताची राजधानी असून हे शहर व्यावसायिक दृष्ट्या भारतासाठी खूप महत्वाची आहे. दिल्ली या शहरामध्ये हातमाग, फॅशन, वस्त्र, इलेक्ट्रॉनिक उद्योग आणि आयटी क्षेत्र या सारखे उद्योग दिल्लीच्या अर्थव्यवस्थेला खूप हातभार लावतात. दिल्ली या शहरामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक अगदी गोण्या गोविंदाने राहतात.

या शहरामध्ये हिंदी भाषा बोलली जाते जी या शहराची मुख्य भाषा आहे. या शहरामध्ये दिवाळी, होळी, बुद्ध पोर्णिमा, ईद, गुरु पोर्णिमा आणि ख्रिसमस यासारखे अनेक अगदी आनंदाने साजरे केले जातात.

लोकप्रिय पदार्थ 

आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंपाक पध्दती आणि वेगवेगळे खाण्याचे पदार्थ देखील वेगवेगळे असतात. तसेच दिल्लीमध्ये देखील वेगवेगळे प्रकारचे पदार्थ बनवले जातात आणि काही पदार्थांना येथे विशेष महत्व सुद्धा आहे. त्यामधील काही लोकप्रिय पदार्थ म्हणजे छोले भटुरे, बटर चिकन, चाट, मोमोज आणि बिर्याणी इत्यादी.

दिल्ली पाहाण्यासारखी ठिकाणे

इंडिया गेट – India Gate Delhi information in Marathi

दिल्ली येथे इंडिया गेट हे एक युद्ध स्मारक बांधले आहे. जे भारतीय आणि ब्रिटिश दोन्ही ८२००० सैनिकांना समर्पित म्हणून बांधले आहे. इंडिया गेट हे दिल्ली या शहरातील एक ऐतिहासिक ठिकाण आहे. ज्याला आपण दिल्ली मध्ये आल्यानंतर भेट देवू शकतो.

कुतुब मीनार 

कुतुब मीनार हे दिल्लीतील प्रसिद्ध ऐतिहासिक स्मारकापैकी एक आहे आणि हे दिल्लीचे दुसरे सर्वात उंच स्मारक आहे जे ७२ मीटर उंच आहे.

लाल किल्ला 

लाल किल्ला हा जुन्या दिल्ली परिसरातील एक ऐतिहासिक किल्ला आहे जो यमुना नदीच्या काठावर शहाजहानने इ. स १६३९ मध्ये बांधला आहे आणि लाल किल्ला हा दिल्लीतील मुख्य आकर्षणातील एक आहे त्यामुळे तुम्ही जर दिल्लीला गेला तर लाल किल्ला आवर्जून पहा.

कमळ मंदिर 

दिल्लीमध्ये असणारे कमळ मंदिर हे जगभरातील सात बहाई उपासनास्थानांपैकी एक आहे. या मंदिराची रचना कमळाच्या फुलासारखी आहे म्हणून त्याला कमळ मंदिर असे नाव पडले आहे. हे मंदिर दिसायला खूप आकर्षक आहे आणि या ठिकाणी देखील पर्यटकांची हे मंदिर पाहण्यासाठी खूप गर्दी असते.

दिल्लीतील मैदानांची नावे

या सारखी अनेक प्रेक्षणीय ठीकाणे आपल्याला दिल्ली या शहरामध्ये पाहायला मिळतात जसे कि अग्रसेन कि बावली, हुमायु टोंब, लोधी गार्डेन, दिल्ली झु, रेल मुझीयम, गुरुद्वारा बंगला, मुघल गार्डन, चांदणी चौक, जमा मशीद, बिर्ला मंदिर आणि प्रगती मैदान इत्यादी.

दिल्ली शहराविषयी मनोरंजक तथ्ये – facts about delhi 

  • नवी दिल्ली आणि दिल्ली हे दोन्ही वेगवेगळी ठिकाणे आहेत हे एक नाही. अनेक लोकांचा असा समाज होतो कि नवी दिल्ली आणि दिल्ली एकाच ठिकाण आहे.
  • दिल्ली हि भारताची राजधानी आहे.
  • दिल्ली या शहरामध्ये एकूण अकरा राजकीय क्षेत्रे आहेत जी ९५ पोलीस ठाण्यांमध्ये विभागली गेली आहेत.
  • दिल्ली या शहरामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे, इमारती आणि स्मारक आहेत.
  • या शहराची एकूण लोकसंख्या १६.३ दशलक्ष इतकी असून या ठिकाणी लोक जास्तीत जास्त लोक हिंदी भाषा बोलतात.
  • आपल्या देशाचा सर्व राजकीय कारभार दिल्ली या शहरातूनच चालतो.
  • दिल्ली या शहराला ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते.

दिल्ली या शहरामध्ये कसे पोहचावे 

दिल्ली हे शहर भारतातील मोठे आणि मुख्य शहर असल्यामुळे या शहराला रस्ता, हवाई आणि रेल्वे या सर्व मार्गाने चांगले जोडलेले आहे.

रस्ता मार्गे 

दिल्ली हे शहर भारतातील मुख्य शहर असल्यामुळे हे शहर भारतातील सर्व राष्ट्रीय मार्ग आणि महामार्गांना चांगले जोडलेले आहे त्यामुळे आपण ह्या शहरामध्ये कोणत्याही मुख्य शहरातून बस पकडून किंवा प्रायवेट बस पकडून दिल्ली मध्ये पोहचू शकतो.

रेल्वे मार्गे 

दिल्ली या शहरामध्ये नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, जुनी दिल्ली रेल्वे स्टेशन आणि हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशन ही दिल्लीची तीन महत्त्वाची रेल्वे स्टेशन आहेत आणि हि रेल्वे स्टेशन बहुतेक भारतातील सर्व शहरांशी चांगले जोडलेले आहे. त्यामुळे आपण दिल्ली या शहराला भेट देण्यासाठी रेल्वेने येवू शकतो.

हवाई मार्गे 

दिल्ली देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह, भारतातील आणि भारताबाहेरील सर्व प्रमुख शहरांशी चांगले जोडलेले आहे. दिल्ली या शहरामध्ये इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे ज्या ठिकाणी सर्व भारतातील आणि भारताबाहेरील विमाने उतरतात.

आम्ही दिलेल्या delhi information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर भारताची राजधानी दिल्ली माहिती बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या delhi information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of delhi in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये information about delhi in marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!