CBSE Full Form in Marathi – CBSE Meaning in Marathi सीबीएससी म्हणजे काय? आज आपण या लेखामध्ये सीबीएसई ( CBSE ) याचे पूर्ण स्वरूप आणि सीबीएसई ( CBSE ) विषयी माहिती पाहणार आहोत. सीबीएसई ( CBSE ) हि एक शैक्षणिक संस्था आहे ज्या ठिकाणी चांगले शिक्षण दिले जाते आणि सीबीएसई ( CBSE ) हा शब्द कोणाला ऐकून माहित नसेल असे नाही तर हा शब्द सर्वांना माहित आहे. चला तर आता पण सीबीएसई ( CBSE ) विषयी आणखीन माहिती घेवूया. सीबीएसई ( CBSE ) ला मराठीमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणून ओळखले जाते आणि सीबीएसई ( CBSE ) चे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप central board of secondary education असे आहे.
सीबीएसई ( CBSE ) ही सार्वजनिक आणि खाजगी शाळांसाठी एक राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था आहे जी भारत सरकारच्या थेट नियंत्रणाखाली आहे. सीबीएसई दरवर्षी १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर बोर्ड परीक्षा घेते. इ.स १९६२ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर दोन दशकांपेक्षा कमी कालावधीनंतर सीबीएसई ( CBSE ) ची स्थापना करण्यात आली.
यामुळे ते इतर मोठ्या भारतीय शैक्षणिक मंडळांपेक्षा जुने आहे. दिल्ली, चेन्नई, अजमेर इत्यादी शहरांमध्ये प्रादेशिक कार्यालयांसह त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. सीबीएसई ( CBSE ) ने सर्व सीबीएसई ( CBSE ) संबधित शाळांच्या मध्ये एनसीइआरटी ( NCERT ) पुस्तके घेतली आहेत आणि ती नियंत्रित केली आहेत. भारतात आणि २८ वेगवेगळ्या देशांमध्ये अंदाजे २१२७१ शाळा सीबीएसई ( CBSE ) संबधित शाळा आहेत.
सीबीएससी म्हणजे काय – CBSE Full Form in Marathi
सीबीएसई चे पूर्ण स्वरूप | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ स्वरूप (central board of secondary education) |
सीबीएसई ची स्थापना | इ.स १९६२ मध्ये |
सीबीएसई चे मुख्यालय | नवी दिल्ली |
सीबीएसई म्हणजे काय – CBSE Meaning in Marathi
सीबीएसई ( CBSE ) ही सार्वजनिक आणि खाजगी शाळांसाठी एक राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था आहे जी भारत सरकारच्या थेट नियंत्रणाखाली आहे. सीबीएसई दरवर्षी १० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर बोर्ड परीक्षा घेते.
सीबीएसई बोर्डची स्थापना केंव्हा झाली ?
सीबीएसई बोर्डची स्थापन ३ नोव्हेंबर १९६२ मध्ये झाली आणि सीबीएसई ( CBSE ) बोर्डाचे मुख्यालय हे नवी दिल्ली मध्ये आहे.
सीबीएसई चे पूर्ण स्वरूप – cbse long form in marathi
सीबीएसई ( CBSE ) ला मराठीमध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणून ओळखले जाते आणि सीबीएसई ( CBSE ) चे इंग्रजीमधील पूर्ण स्वरूप central board of secondary education असे आहे.
सीबीएसई चा इतिहास – history of CBSE
उत्तर प्रदेश बोर्ड ऑफ हायस्कूल आणि इंटरमीडिएट एज्युकेशन हे १९२१ मध्ये स्थापन झालेले पहिले शैक्षणिक बोर्ड होते जे राजपुताना, मध्य भारत आणि ग्वाल्हेरच्या नियंत्रणाखाली होते. नंतर भारत सरकारने राजपुताना बोर्ड ऑफ हायस्कूल आणि इंटरमिजिएट एज्युकेशन नावाचे संयुक्त मंडळ स्थापन केले आणि त्यालाच नंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ असे नाव देण्यात आले.
सीबीएसई परीक्षांची उद्दिष्टे
- सीबीएसई ( CBSE ) चे प्राथमिक उद्दिष्ट जागतिक दर्जाचे गुण आणि सुविधांसह तणावमुक्त आणि बाल-केंद्रित शैक्षणिक उपलब्धी प्रदान करणे आहे.
- राष्ट्रीय उद्दिष्टांच्या अनुषंगाने शालेय शिक्षणाला चालना देण्यासाठी योजना सुचवणे.
- परीक्षेची अट आणि स्वरूप निर्धारित करण्यासाठी आणि १० वी आणि १२ वी वर्गाच्या अंतिम परीक्षा आयोजित करणे
- सीबीएसई ( CBSE ) परीक्षा सूचना किंवा मार्गदर्शक तत्त्वांची शिफारस आणि सुधारणा करण्याचे उदिष्ठ समोर होते.
सीबीएसई शिक्षण मंडळाचे फायदे – benefits of CBSE
शिक्षण हे आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये एक महत्वाचा भाग आहे आणि सध्या शिक्षणाला खूप महत्व प्राप्त झाले आहे कारण सध्या शिक्षणाशिवाय कोणतीही गोष्ट आपण करू शकत नाही आणि सीबीएसई ( CBSE ) चे शिक्षण म्हटले तर काय विषयच नाही. चला तर आता आपण सीबीएसई ( CBSE ) शिक्षणाचे काही फायदे पाहूयात.
- इतर भारतीय बोर्डांच्या तुलनेत सोपा आणि खूप हलका अभ्यासक्रम म्हणजे सीबीएसई ( CBSE ) अभ्यासक्रम आहे.
- सीबीएसई ( CBSE ) विद्यार्थी सहसा त्यांच्या आयसीएसइ ( ICSE ) , आयएससी ( ISC ) किंवा राज्य-बोर्ड समकक्षांपेक्षा जास्त गुण मिळवतात.
- सीबीएसई ( CBSE ) शाळांची संख्या इतर कोणत्याही बोर्डापेक्षा खूप जास्त आहे, ज्यामुळे शाळा बदलणे खूप सोपे होते आणि विशेषत: जेव्हा विद्यार्थ्याला वेगळ्या राज्यात जावे लागते.
- भारतातील बहुतेक अंडरग्रेजुएट स्पर्धा परीक्षा CBSE च्या विहित अभ्यासक्रमावर आधारित असतात.
- सीबीएसई ( CBSE ) विद्यार्थ्यांना अतिरिक्त सह-अभ्यासक्रमात भाग घेण्यास प्रोत्साहित करते
- सीबीएसईचे विद्यार्थी सहसा बहुतांश राज्य मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत इंग्रजीमध्ये अधिक निपुण असतात.
- विद्यार्थ्यांना मिळणार्या शिक्षणाची गुणवत्ता बोर्डापेक्षा त्यांच्या स्वतःच्या विशिष्ट शाळेवर अधिक अवलंबून असते, परंतु सीबीएसई ( CBSE ) ने जे मानके सेट केली आहेत ते खात्री देतात की बहुतेक सीबीएसई ( CBSE ) शाळा त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगले आणि योग्य शिक्षण देतात.
सीबीएसई परीक्षांना उपस्थित राहण्यासाठी पात्रता निकष
सीबीएसई ( CBSE ) ही सार्वजनिक आणि खाजगी शाळांसाठी एक राष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था आहे जी भारत सरकारच्या थेट नियंत्रणाखाली आहे आणि भारत सरकारच्या नियंत्रणाखाली असणाऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी काही पात्रता निकष पार पडावे लागतात जर एखादा व्यक्ती हे निकष पार पडण्यास अपात्र ठरला तर त्याला सीबीएसई ( CBSE ) साठी प्रवेश मिळू शकत नाही. चला तर आता आपण सीबीएसई ( CBSE ) मध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणकोणते पात्रता निकष पार पडावे लागतात ते पाहूयात.
- साधारणपणे फक्त सीबीएसई ( CBSE ) संलग्न शाळांमध्ये नावनोंदणी केलेले विद्यार्थी १० वी मध्ये ( AISSE ) आणि १२ वी मध्ये ( AISSCE ) साठी परीक्षा देऊ शकतात.
- ज्या विद्यार्थ्यांनी युजीसी ( UGC ) मान्यताप्राप्त विद्यापीठातून मानविकी, सामाजिक विज्ञान इत्यादी विषयात एकूण ५५ टक्के ( नॉन-सामान्य श्रेणींसाठी ५० टक्के ) पेक्षा जास्त गुणांसह पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे ते सीबीएसई ( CBSE ) नियमांनुसार राष्ट्रीय पात्रता परीक्षेला बसू शकतात.
- कोणत्याही जात, धर्म, पंथ, आर्थिक पार्श्वभूमीलिंग, जमाती किंवा वंशातील विद्यार्थी या परीक्षांना बसू शकतात.
सीबीएसई दिल्लीची प्रादेशिक कार्यालये
आता आपण सीबीएसई ( CBSE ) ची प्रादेशिक कार्यालये कोठे कोठे आहेत आणि त्या कार्यालयामध्ये कोणकोणते भाग येतात ते पाहूया.
- चेन्नई चे मुख्यालय – चेन्नई चे मुख्यालया मध्ये आंध्र प्रदेश, अंदमान आणि निकोबार बेटे दमण आणि दीव, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, पुडुचेरी आणि तेलंगणा यांचा समावेश आहे.
- अजमेर – ज्यामध्ये गुजरात, दादरा आणि नगर हवेली, राजस्थान आणि मध्य प्रदेश यांचा समावेश होतो.
- गुवाहाटी – गुवाहाटी च्या सीबीएसई ( CBSE ) आसाम, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा आणि सिक्कीम समाविष्ट आहेत.
- डेहराडून – ज्यामध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड समाविष्ट आहे.
- पंचकुला – पंचकुला मध्ये हरियाणा, चंदीगड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर समाविष्ट आहे.
- पटना – ज्यामध्ये झारखंड आणि बिहार समाविष्ट आहेत.
- भुवनेश्वर – भुवनेश्वर कार्यालयामध्ये मध्ये पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि ओडिशा समाविष्ट आहे.
आम्ही दिलेल्या cbse full form in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर सीबीएससी म्हणजे काय? माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या cbse meaning in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि cbse long form in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट