आर्य चाणक्य माहिती Chanakya Biography in Marathi

Chanakya Biography in MarathiAcharya Chanakya Information in Marathi आर्य चाणक्य माहिती चाणक्य ज्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त म्हणून देखील ओळखले जात हे एक हिंदू राजकारणी आणि तत्त्वज्ञानी होते. अर्थशास्त्र (सायन्स ऑफ मटेरियल गेन) या राजकारणावरील आधारित ग्रंथाचे लेखन चाणक्यांनी केले आहे. हा एक उत्कृष्ट ग्रंथ मानला जातो. चाणक्य हे एक प्राचीन भारतीय बहु विज्ञानीय होते. जे शिक्षक, लेखक, रणनितीकार, तत्वज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, न्यायशास्त्रज्ञ आणि राजेशाही सल्लागार म्हणून सक्रिय होते. आजच्या लेखामध्ये आपण चाणक्य यांचा जीवनावर जाणून घेणार आहोत.

chanakya biography in marathi
chanakya biography in marathi

आर्य चाणक्य माहिती – Chanakya Biography in Marathi

पूर्ण नाव (Name)चाणक्य
जन्म गाव (Birth Place)गुजरातच्या सुरत
राष्ट्रीयत्व (Citizenship)भारतीय
ओळख (Identity)राजकारणी आणि तत्त्वज्ञानी
मृत्यू (Death)इसवी सन पूर्व २७५

Acharya Chanakya Information in Marathi

जन्म

चाणक्य यांचा जन्म तक्षशिला येथील (आता हे शहर पाकिस्तान येथे आहे) ब्राम्हण कुटुंबात झाला होता. चाणक्य यांनी आपले शिक्षण तक्षशिला येथून पूर्ण केले तक्षशिला हे उत्तर पश्चिम प्राचीन भारतातील शिक्षणाच एक प्राचीन केंद्र आहे. त्यांच्या वडिलांचे नाव चणक आणि आईचे नाव चनेश्वरी होतं. चाणक्य यांनी आपल्या बालपणात संपूर्ण वेदांचा अभ्यास केला आणि राजकारणाची माहिती घेतली.

चाणक्य हे अत्यंत विद्वान व राजकारण, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र, युद्ध रणनीती आणि ज्योतिषी या सारख्या विविध विषयांचे सखोल ज्ञान असलेले व्यक्ती होते. यांसारख्या विषयांतील ज्ञानाबरोबरच चाणक्य हे पर्शियन आणि ग्रीक शिक्षणाच्या घटकांशी देखील परिचित होते त्यांना वेद साहित्याचेही पूर्ण ज्ञान होते.

वैयक्तिक आयुष्य

चाणक्य यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तक्षशिला नालंदा जवळच्या भागात शिक्षक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. चाणक्य यांच्यामते शरीराने सुंदर असलेली स्त्री आपल्याला एक दिवस आनंद देऊ शकते. परंतु जी स्त्री मनाने, आत्म्याने सुंदर आहे ती आपल्याला आयुष्यभर सुखी ठेवू शकते. म्हणूनच चाणक्य यांनी आपल्या ब्राह्मण वंशातील यशोधरा नावाच्या मुलीशी विवाह केला.

सुरुवातीचे दिवस

त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात एक शिक्षक म्हणून केली आणि नंतर ते सम्राट चंद्रगुप्ताचा विश्वासू सहकारी बनले. चाणक्यांनी सम्राटचा सल्लागार म्हणून काम केले आणि मगध प्रदेशातील पाटलीपुत्र येथील नंदराजा वंशाची सत्ता उलथून टाकण्यासाठी चंद्रगुप्त राजाला मदत केली. त्याची शक्ती मजबूत करून देण्यामध्ये चाणक्य यांचा मोठा वाटा आहे. चाणक्य यांना शहाणपणाचे दात होते त्याकाळी शहाणपणाचे दात किंवा अक्कलदाढ असणं म्हणजे राजा होण्याचं एक लक्षण आहे.

अशी काही समजूत होती. मौर्य साम्राज्याचा उदय होण्यापूर्वी उत्तर भारत नंदाच्या अधिपत्याखाली होता. योग्य प्रशासन अभावी नंद साम्राज्याचे राजे लोकांचे शोषण करत होते. धनानंद सारख्या दरोडेखोरांना हटवण्यात आणि मौर्य साम्राज्याची स्थापना करण्यात चाणक्य यांचा मोठा वाटा आहे.

चाणक्य यांचा जन्म ईसाई पूर्व ३५० मध्ये ब्राह्मण कुटुंबात झाला असला तरी त्यांच्या जन्मस्थानाचा तपशील अद्याप अस्पष्ट आहेत. हेमचंद्र या जैन लेखकाच्या मते चाणक्य गोलला प्रदेशातील चणका गावात चनिन आणि त्यांची पत्नी चनेश्वरी यांच्या पोटी जन्माला आले होते. याउलट चाणक्य यांच्या वडिलांचे नाव चणक असल्याचा दावा करणारे इतर स्त्रोत देखील आहेत.

धनानंद व चाणक्य कथा: चाणक्य नीती मराठी

मगध राज्याचा सम्राट धनानंद याने पुष्पपुरी येथे ब्राह्मणांसाठी भोजन आयोजिले होते. या भोजनामध्ये अखंड भारताबद्दल सूचना देऊन राजा धनानंद त्याच्याकडून काही भेटवस्तू घेण्याच्या इच्छेने चाणक्य यांनी हजेरी लावली होती परंतु धनानंद हा अत्यंत गर्विष्ठ राजा होता त्याने चाणक्य यांचा भरपूर अपमान केला आणि त्यांच्या सूचना थेट नाकारल्या आणि त्यावेळी चाणक्य यांचा फार संताप झाला आणि त्यांनी धनानंदाच्या साम्राज्याचा नाश करण्याची शपथ घेतली.

धनानंद याने चाणक्य यांना अटक करण्याचे आदेश दिले परंतु चाणाक्य यशस्वीरीत्या तिथून निसटले. पुढील काळामध्ये चाणक्य यांची मैत्री आपला प्रतिस्पर्धी धनानंद यांचा मुलगा पब्बता याच्याशी झाली आणि चाणक्य याने पब्बताचे मन जिंकले आणि शाही अंगठी मिळवून ते जंगलात निघून गेले. चाणक्यांनी आपल्या बुद्धीचा वापर करून त्या शाही अंगठी मधून ८० कोटी सोन्याची नाणी मिळवली.

जंगलात खड्डा खोदून सोन्याची नाणी सुरक्षित ठेवत आणि धनानंदाला यशस्वीपणे संपवण्यात मदत करू शकेल अशा व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्याच वेळी चाणक्य यांचा परिचय चंद्रगुप्त मोरया यांच्याशी झाला. धनानंद राजाला मुळापासून संपवण्यासाठी चाणक्य यांनी आपले दोन शस्त्रे तयार केले त्यामध्ये एक चंद्रगुप्त होता तर दुसरा पब्बता होता. या दोघांपैकी एकाला प्रशिक्षण देऊन त्याला सम्राट बनवण्याचा निर्णय चाणक्यांनी घेतला आणि त्या दोघांमध्ये छोटीशी परीक्षा घेतली.

या परीक्षांमध्ये चंद्रगुप्त हे पब्बता ला हरवण्यात यशस्वी ठरले आणि विजय मिळवला. पुढील सात वर्ष चाणक्य यांनी चंद्रगुप्त याला कठोर लक्षरी प्रशिक्षण दिले चाणक्य यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त एक सक्षम योद्धा बनला. चाणक्य यांना धनानंदाच्या नंद घराण्याचा पाडवा करून मौर्य साम्राज्याची स्थापना करायची होती. म्हणून चंद्रगुप्त मौर्याने एक छोटेसे सैन्य तयार केले आणि नंदाची राजधानी असलेल्या मगध वर हल्ला केला परंतु धनानंद राजाचे सैनिक फार मोठे होते त्या समोर चंद्रगुप्ताचे छोटेसे सैन्यात चिरडले गेले.

पराभवानंतर चंद्रगुप्त व चाणक्य हताश झाले. चाणक्य यांना जाणीव झाली की जर आपल्याला संपूर्ण राज्य हव असेल तर आधी सीमेवर हल्ला केला पाहिजे. चाणक्याच्या मार्गदर्शनाखाली चंद्रगुप्त याने सीमेवर हल्ला केला आणि त्यातील काही प्रदेश ताब्यात घेण्यास सुरुवात केली. चंद्रगुप्ताने निरर्थक जंगलात फिरणाऱ्या लोकांना आपल्या सैन्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला.

सैन्य पूर्णपणे तयार झाल्यावर चाणक्य यांनी जंगलात लपवून ठेवलेली सोन्याची नाणी बाहेर काढण्याचा निर्णय घेतला जेणेकरून आपल्या सैन्याला आवश्यक सर्व सामान शस्त्र पुरवली जातील. अशाप्रकारे चाणक्य यांनी आपले सैन्य मजबूत केले. चाणक्य यांनी अतिशय हुशारी आणि गणिती चाली करून नंदाच्या नेतृत्वाखालील सर्व सीमावर्ती ठिकाण ताब्यात घेतली. योग्य वेळ पाहून चंद्रगुप्ताने मगधच्या राजधानी पाटलीपुत्रवर हल्ला करून धनानंदाचा वध केला.

धनानंदाच्या मृत्यूनंतर चंद्रगुप्ताने नंद वंशाचा पाडाव करून मौर्य साम्राज्याची स्थापना केली अशाप्रकारे चाणक्य यांनी आपला बदला पूर्ण केला. मौर्य साम्राज्याचा सम्राट झाल्यावर चाणक्य चंद्रगुप्ताचे पंतप्रधान झाले. चाणक्य यांनी साम्राज्यात मजबूत शासनासाठी सक्षम मंत्रिमंडळ तयार केले त्यांनी सर्व मंत्र्यांना स्वतंत्र्य मंत्रालय दिले. तसेच नागरिकांच्या हितासाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या‌. चाणक्य यांनी पुरुष अंगरक्षकांसह चंद्रगुप्ताला महिला अंगरक्षकही नेमले. चंद्रगुप्त मौर्य हा पहिला राजा ठरला ज्या च्या साम्राज्यात महिला अंगरक्षक होते.

मृत्यू

चाणक्य यांनी चंद्रगुप्ताचा सल्लागार म्हणून काम केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने चंद्रगुप्त अलेक्झांडरचा सेनापती चा पराभव करु शकला आणि चाणक्य यांनी मौर्य साम्राज्या ला सर्वात शक्तिशाली साम्राज्या पैकी एक बनविण्यात मदत केली. चाणक्य हे उच्च विद्वान व्यक्ती होते ज्यांना अनेक विषयांचे ज्ञान होते आणि त्यांनी अर्थशास्त्रात लिहिलेले ज्यामध्ये लष्करी रणनीती, आर्थिक धोरण, सामाजिक कल्याणाचे मुद्दे आणि यासाठी अनेक महत्त्वपूर्ण विषयांचा शोध घेण्यात आला.

चाणक्य यांचा मृत्यू इसवी सन पूर्व २७५ मध्ये झाला. त्यांच्या मृत्यूचे तपशील गुढतेत गुंफलेले आहेत.‌ काही आख्यायिका नुसार चाणक्यांनी स्वतःला उपासमारीने मरण दिले तर काही आख्यायिका म्हणतात की चाणक्य बिंदुसरच्या कारकिर्दीत राजकीय षड्यंत्र मुळे मरण पावले. चाणक्य (इसवी सन पूर्व ३५०च्या सुमारास) जे पारंपारिक कौटिल्य किंवा विष्णुगुप्त म्हणून ओळखले जातात.

ज्यांनी प्राचीन भारतीय राजकीय ग्रंथ अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला आहे. हा ग्रंथ अंदाजे चौथ्या शतकात इसा पूर्वी आणि तिसरे शतक सीई दरम्यानचा आहे. त्यामुळे त्यांना भारतातील राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या शेत्रातील प्रणेते मानले जाते. त्यांचे कार्य शास्त्रीय अर्थशास्त्रात एक महत्त्वाचे अग्रदूत मानले जाते. त्यांची कामे गुप्त साम्राज्याच्या समाप्ती जवळी सहाव्या शतकात नष्ट झाली होती. आणि विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत यांचा पुन्हा शोध लागला नाही.

सुमारे ३२१ ईसा पूर्व चाणक्यांनी पहिल्या मौर्य सम्राट चंद्रगुप्ताला त्यांच्या सत्तेच्या उदयात मदत केली आणि मौर्य साम्राज्याच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावल्या बद्दल व्यापकपणे त्यांना श्रेय दिले जाते. चाणक्याने चंद्रगुप्त आणि त्यांचा मुलगा बिन्दुसार या दोन्ही सम्राटांचे मुख्य सल्लागार म्हणून काम केले होते.

आम्ही दिलेल्या chanakya biography in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर आर्य चाणक्य माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या chanakya information in marathi language या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of chanakya in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Acharya Chanakya Information in Marathi Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!