चंडोल पक्षाची माहिती Chandol Bird Information in Marathi

Chandol Bird Information in Marathi चंडोल पक्षी हा एक चिमणीच्या आकाराचा गाणारा पक्षी आहे आणि या पक्ष्याचे नावही किती कुतूहल वाटण्यासारखे आहे आणि चंडोल या पक्ष्याच्या भारतामध्ये जवळ जवळ ५ ते ७ वेगवेगळ्या जाती आढळतात. या पक्ष्याचे तपकिरी आणि काळ्या रंगाचे पंख असतात ( चिमणीसारखे ), पंखांच्या आतील भाग, पोट, चेहरा आणि घसा क्रीम कलरचा असतो, डोक्यावर टोपी घातल्यासारखा आकार असतो आणि त्यावर तपकिरी-काळे पट्टे असतात, चोच छोटी आणि पाय मध्यम आकाराचे आणि फिकर तपकिरी रंगाचे असतात.

या पक्ष्यांमध्ये नर आणि मादी दिसायला वेगवेगळे असतात आणि मादी नरापेक्षा आकाराने थोडी मोठी असते. अंडी उबवने, घरटे बनवणे, अंड्यांचे रक्षण करणे, अन्न गोळा करणे हि कामे नर आणि मादी दोघेही करतात. नर चंडोल पक्षी मादी चंडोल पक्ष्याला आकर्षित करण्यासाठी सुंदर आवाजात गाणी गातात आणि आणि जसा धनुष्य बाण धनुष्यातून सोडल्या नंतर ज्या वेगाने हवेमध्ये जातो त्या वेगाने हे उड्डाण घेतात.

Chandol Bird Information in Marathi
Chandol Bird Information in Marathi

चंडोल पक्षाची माहिती – Chandol Bird Information in Marathi

नावचंडोल
इंग्रजी lark
प्रकारपक्षी
आकार१२ ते २५ सेंटी मीटर
वजन२० ते ७५ ग्रॅम
शास्त्रीय नावअॅलॉड गुलगुला

चंडोल पक्ष्यांचा इतिहास ( history )

१९७० ते २०१४ मध्ये या पक्ष्यांचे संख्येमध्ये ३२ टक्क्यांनी घट झाली होती. या पक्ष्यांची जगातील प्रजनन संख्या अंदाजे १० ते ११ दशलक्ष इतकी आहे आणि कॉन्टिनेंटल कन्सर्ण स्कोअरवर या प्रजाती २० पैकी १० रेट करतात. १८०० आणि १९०० च्या मध्यात पश्चिम आणि पूर अमेरिकेतील जंगले साफ केली त्यावेळी चंडोल या पक्ष्यांनी आपले स्थलांतर पूर्वे न्यूयॉर्क कडे वाढवले. या चिमण्यांचा इतिहास काहीही असला तरी आत्ताच्या काळामध्ये जंगलांचा नाश होत असल्यामुळे तसेच रिकाम्या जागी शहरीकरण तसेच औद्योगिकरन होत असल्यामुळे या पक्ष्यांच्या संख्येमध्ये घट होत चालली आहे.

चंडोल या पक्ष्याचा आहार ( food )

चंडोल हा पक्षी सर्वभक्षी पक्षी आहे आणि हे पक्षी विशेषता गवत, किडे, अळ्या, मुंग्या खातात आणि जेव्हा हिवाळ्यामध्ये किड्यांचे प्रमाण कमी असते तेव्हा हे पक्षी कळ्या, फुले, फळे, बिया आणि धान्य या प्रकारचे अन्न हि खातात.

चंडोल हे पक्षी कुठे व कसे राहतात ( habitat )

या पक्ष्यांना थव्यामध्ये राहणे पसंत करतात .चंडोल हा पक्षी भारत, अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रोलिया या देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे चंडोल पक्षी विपुल प्रमाणात आढळतात. हे पक्षी ओसाड भागात, शेतामध्ये किवा माळरानात पाहायला मिळतात त्याचबरोबर हे पक्षी आपले घरटे कापूस वापरून बनवतो त्यामुळे हे घरटे खूप मऊ आणि उबदार बनते तसेच काही जातीचे पक्षी वाळलेल्या गवतापासून आपले घरटे बनवतात आणि हे घरटे एका वाटीच्या आकाराचे असते.

चंडोल पक्ष्याचे 5 प्रकार ( types of lark bird ) 

चंडोल या पक्ष्याच्या भारतामध्ये जवळ जवळ ५ ते ७ वेगवेगळ्या जाती आढळतात. या पक्ष्यांचे सविस्तर वर्णन आणि माहिती खाली दिली आहे.

1.क्रेस्टेड चंडोल पक्षी ( crested lark bird )

क्रेस्टेड चंडोल या पक्ष्याला मराठी मध्ये तुरेबाज चंडोल असे म्हणतात. तुरेबाज चंडोल हे पक्षी आकाराने खूप लहान असतात या पक्ष्याचे वजन ३५ ते ५५ ग्रॅम इतके असते तर उंची १५ ते १७ सेंटी मीटर इतकी असते तसेच या पक्ष्यांच्या पंखांची लांबी ३० ते ४० सेंटी मीटर आहे. या पक्ष्याच्या डोक्यावर तुरे असतात म्हणून या पक्ष्याला तुरेबाज पक्षी म्हणतात. हा एक तपकिरी रंगाचा पक्षी आहे आणि त्याची शेप लहान असते आणि या पक्ष्याची पिसे फिकट तपकिरी रंगाची असतात.

2.सिंगिंग बुश चंडोल पक्षी ( singing bushlark bird )

सिंगिंग बुश चंडोल या पक्ष्याला मराठीमध्ये गाणारा भट पक्षी म्हणतात. या पक्ष्याच्या छातीवर छोटे छोटे तीपके असतात. लांब शेप असते, लहान आणि जाड चोच असते. हा पक्षी भारतासोबत आशिया आणि आफ्रिका या देशांमध्ये हि आढळतात. सिंगिंग बुश चंडोल या पक्ष्याचे वजन ७ ते ८ ग्रॅम असते तर आकार ३.५ ते ३.८ इंच असतो. हा पक्षी तपकिरी आणि पिवळ्या रंगाचा असतो आणि त्यावर काळ्या-पांढऱ्या रंगाचे नक्षी काम असते.

3.बेंगाल बुश चंडोल पक्षी ( bengal bush lark bird )

बेंगाल बुश चंडोल या पक्ष्याची लहान शेपूट असते असते आणि मजबूत स्टूट बिल असतात. या पक्ष्याची लांबी १५ सेंटी मीटर असते. हे पक्षी या पक्ष्यांचा वरचा भाग हा राखाडी रंगाचा असतो आणि या पक्ष्याच्या छातीवर आणि डोळ्याच्या बाजूला छोटे ठिपके असतात.

4.रेडविन्गड चंडोल पक्षी ( redwinged bush lark )

रेडविन्गड चंडोल पक्ष्याला मराठीमध्ये तांबडा भट चंडोल पक्षी म्हणतात. तांबडा भट चंडोल पक्षी हा चिमणीच्या आकाराचा असतो. या पक्ष्याच्या पंखावर तांबूस रंगाचे डाग असतात त्यामुळे या पक्ष्याला ओळखणे अगदी सोपे असते. नर आणि मादी पक्षी दिसायला एकसारखेच असतात त्यामुळे या दोघांना ओळखणे कठीण जाते. तांबडा भट चंडोल हा पक्षी झुडुपांच्या जंगलामध्ये किवा रानामध्ये राहणे पसंत करतो.

5.मालाबार क्रेस्टेड चंडोल पक्षी ( malabar crested lark bird )

मालाबार क्रेस्टेड चंडोल या पक्ष्याला मालाबार चंडोल पक्षी असे म्हणतात. मालाबार चंडोल पक्षी हा युरासीयान स्काय चंडोल पक्ष्यापेक्षा आकाराने लहान असतात. हे पक्षी भारतामधील रहिवासी नाहीत कारण हे भारतामध्ये थंडीच्या दिवसामध्ये बाहेरून येतात आणि थंडीचा काळ संपला कि दुसरीकडे स्थलांतरित होतात.

चंडोल पक्ष्याविषयी तथ्ये ( facts of lark bird )

  • चंडोल या पक्ष्याचे वैशिष्ठ म्हणजे हे पक्षी उंच आकाशामध्ये पाच ते दहा मिनिटे एका ठिकाणी हवेत उडू शकतात.
  • भारतामध्ये एक छोटासा गाणारा पक्षी आहे जो भारतामध्ये सर्व भागामध्ये आढळतो आणि या पक्ष्याला छोटा चंडोल पक्षी या नावाने ओळखले जाते.
  • या पक्ष्याच्या अंड्यांची लांबी ०.६ ते ०.९ इतकी असते.
  • अंडी उबवण्याचा कालवधी हा ११ ते १२ दिवस असतात.
  • गाणाऱ्या भट चंडोल या पक्ष्याचे अस्तित्व १५ ते २० दशलक्ष वर्षापासून आहे.
  • वसंत ऋतूतील या पक्ष्याचे गायन फार सुंदर असते.

वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा चंडोल पक्षी chandol bird information in marathi language हा पक्षी कसा आहे त्याची रचना, त्याचे जीवन कसे आहे तसेच त्यांची वैशिट्ये कोणती आहेत. chandol bird information in marathi wikipedia हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच information about chandol bird in marathi हा लेख कसा वाटला व अजून काही चंडोल पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.

आम्ही दिलेल्या chandol bird in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!