sparrow information in marathi चिमणी या पक्ष्याचे वर्णन बालकथे मध्ये किवा कवितांमध्ये असते लहानपणी शाळेमध्ये एक कविता होती चिमणी ग चिमणी पंख देणा मला घरावरून झाडावरून मजेत फिरायला आणि या कविते प्रमाणेच चिमणी घरावरून झाडावरून चिवचिव असा मधुर आवाज करत मजेत फिरत असते आणि या कवितेमुळेच लहानपणी चिमणी हा पक्षी सगळ्यांचा आवडता पक्षी असतो. (chimni chi mahiti)
चिमणीची माहिती (Sparrow Information In Marathi/information about sparrow in marathi)
चिमणी माणसाच्या रोज परिचयात येणारा पक्षी आहे जो गावामध्ये व गावातल्या घरांमध्ये आपले घरटे बनवते म्हणून चिमणीला माणसांजवळ राहणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. या आकाराने खूप लहान असतात आणि त्यांचे घरटे हि छोटे असते चिमण्या वाळलेल्या गवताच्या काड्यांपासून आपले घरटे बनवतात त्याचबरोबरकीटक आणि धान्य हे चिमण्याचे अन्न आहे . हा पक्षी भारताच्या सर्व राज्यामध्ये आढळून येतो पण पूर्वीच्या काळात हा पक्षी फक्त आशिया आणि युरोप खंडामध्येच आढळून यायचा पण आता तो जगभरामध्ये आढळून येतो. शहरी भागामध्ये चिमण्याचे प्रमाण कमी होत चाललेलं आहे याचे कारण वाढते अधुनिकरण आणि दूरध्वनी पासून येणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरींमुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होवून त्यांची संख्या कमी होत चालली आहे.
चिमण्यांचा आहार (sparrow food)
चिमण्यांचा नैसर्गिक आहार त्या जिथे राहतात तिथे उपलब्ध असलेल्या अन्नानुसार बदलत असतो. बर्ड फीडर हे हिवाळ्यादरम्यान चिमण्यांसाठी आहाराचा महत्त्वपूर्ण स्रोत असू शकतात. आपण या पक्ष्यांना कोणकोणते पदार्थ खायला देवू शकतो.
मुख्यता चिमण्या धान्य आणि बियाणे तसेच पशुधन आहार घेतात. त्याचबरोबर शेतातील पिकांपैकी ज्वारी, ओट्स, गहू आणि कॉर्न हा आहार त्या खातात. जंगली खाद्यपदार्थांमध्ये क्रॅबग्रास, रॅगवीड आणि इतर गवत आणि हिरव्या भाज्या असतात तसेच शहरामध्ये चिमण्या टाकून दिलेला खाद्यपदार्थ सुद्धा खातात. घरगुती चिमण्या बाजरी, मिलो आणि सूर्यफुलाच्या बिया आणि किडे खातात.
चिमणीचे घरटे (sparrow nest)
चिमण्या आपले घरटे इमारतींच्या छिद्रांमध्ये, स्ट्रीटलाइट्समध्ये, ट्रॅफिक लाइट्स चिन्हांमध्ये, गॅस-स्टेशन छप्परावर तसेच विहिरीन मध्ये, झुडुपांमध्ये बनवतात काही वेळा चिमण्या कधी कधी इमारतींच्या भिंतींवर चढलेल्या वेलींमध्ये घरटे बांधतात.
घरट्याचे वर्णन : चिमण्या आपले घरटे वाळलेल्या गवतापासून बनवतात. वाळलेले गवत इमारतींच्या छिद्र भरून येईपर्यंत भरतात व त्याला अजून मऊ बनवण्यासाठी त्यामध्ये पंख किवा कागदाचा वापर करतात.
चिमण्याचे विविध प्रकार (different types of sparrow)
चिमण्यांचे मुख्यता दोन प्रकार आहेत ते म्हणजे न्यू वर्ल्ड चिमण्या आणि जुनी जागतिक चिमण्या त्यामधील काही चिमण्यांचे प्रकार खाली दिलेले आहेत.
हाऊस स्पॅरो (house sparrow information in Marathi)
ह्या चिमण्या ग्रामीण तसेच शहरामध्ये हि आढळतात त्यांचे घरटे घराजवळ करतात आणि या चिमण्यांना माणसांमध्ये राहायला आवडते. ह्या प्रकारची चिमणी आकाराने लहान आणि तपकिरी रंगाची असते. ह्या चीमाण्यांमध्ये नर आणि मादी आपण सहजपणे ओळखू शकतो. नर तपकिरी रंगाचा असतो व त्यावर एक काळी पट्टी असते राखाडी रंगाची छाती असते आणि पांढरे गळ असतात आणि मादी फिकट तपकिरी रंगाची असते आणि पांढरे गळ असतात आणि मुकुट असतो. चीमण्याचा ८ ते १० जणांचा गट असतो. या चिमणीची लांबी १६ सेंटी मीटर आणि त्यांचे वजन २५ ते ३८ ग्रॅम असते.
स्पॅनिश चिमणी (Spanish Sparrow information in Marathi)
स्पॅनिश चिमणी ह्या स्थलांतरित पक्षी असून देशाच्या उत्तरेकडील भागामध्ये ह्या आढळतात. ह्या चिमण्या नेपाळ आणि पाकिस्तानहून भारतीय उपखंडात स्थलांतर करताना दिसतात. स्पॅनिश चिमण्या ह्या house sparrow किवा italian sparrow सारख्याच असतात. माल्टा बेटासारख्या काही भागांमध्ये स्पॅनिश चिमणी आणि इटालियन चिमण्याचे संकरीत जाती शोधणे शक्य आहे. भूमध्य माकिसच्या झुडुपात स्पॅनिश चिमण्या घरटी करतात परंतु बर्याचदा लहान शहरांमध्येही आढळतात.
रुसेट चिमणी (Russet Sparrow information in Marathi)
रुसेट चिमणी मुख्यत: पूर्वोत्तर हिमालयीन परिसरामध्ये आढळते. या चिमण्या हि दुसऱ्या चिमन्यांसारख्या तांबूस रंगाच्या असतात पण त्यांच्या अंडरपार्ट्सवर पिवळसर रंगाची छटा असतात. रुसेट चिमणीला सिनॅमॉल किवा सिनॅमॉल ट्री चिमणी असेही म्हणतात. या चिमणीची लांबी १४ सेंटी मीटर इतकी असते.
सिंध चिमणी (sindh sparrow information in Marathi)
सिंध चिमन्या दक्षिण आशियातील इंडस दरी मध्ये आढळतात आणि या चिमण्या दिसायला हाऊस स्पॅरो सारख्याच असतात. या चिमण्यांना जंगल सिंध चिमणी किवा रुफौस बॅक स्पॅरो असेही म्हणतात. सिंध चिमणी हि १३ सेंटी मीटर लांब असते.
सोमाली चिमणी (somali sparrow information in Marathi)
सोमाली चिमणी हि पेसरिडे प्रजातीपैकी एक आहे. या चिमण्या सोमालीलँड, इथिओपिया आणि केनिया मध्ये आढळतात. या चिमण्या दिसायला जवळ जवळ रुसेट चिमणी सराळ्याच असत्तात.
सॉकोट्रा चिमणी (socotra sparrow information)
सॉकोट्रा चिमणी हि पेसरिन प्रजातींपैकी आहे. या चिमण्यांची लांबी १४ सेंटी मीटर असते आणि ए चिमण्यांचे वजन २० ते ३५ ग्रॅम इतके असते. या चिमण्या झुडूपांमध्ये घरटे बनवून राहतात.
युरेशियन ट्री चिमणी (eurasian Tree Sparrow information)
या चिमण्या हे पूर्व भारतात (बांगलादेश जवळ) आढळतात. या चिमण्याची लांबी १४ सेंटी मीटर असते व त्या ३ वर्ष जगू शकतात. या चिमण्यांच्या कानजवळ काळे डाग असतात . नर आणि मादी दोघेही दिसायला एकसारखेच असतात.
चिमण्यांचे काही अनोखे तथ्य (Some interesting facts of sparrow) (chimni chi mahiti)
- २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.
- चिमणी एका वेळेला ४ ते ५ अंडी देतात
- चिमणीचे वजन ३० ते ३५ ग्रॅम इतके असते.
- त्यांच्याकडे ताशी ३८.५ किमी वेगाने उड्डाण करण्याची क्षमता असते.
- चिमणी बिहारच आणि दिल्लीचा राष्ट्रीय पक्षी आहे.
- चिमणीचे घरटे बनवण्याची जबाबदारी नर चिमणीची असते.
- चिमण्या तीन वर्ष जगू शकतात आणि जर त्यांना पिंजऱ्या मध्ये कैद करून ठेवले तर त्या १२ वर्ष जगू शकतात.
- चिमण्या मांसाहारी पक्षी आहे कारण तो धान्य आणि किडेही खातो.
- सन २०२० पासून जागतिक चिमणी दिवस साजरा केला जात आहे.
- सर्वात जास्त चिमण्या आशिया खंडांमध्ये आहेत.
- चिमण्याच्या जवळ जवळ ४३ प्रजाती आहेत.
- चिमणीचे वैज्ञानिक नाव पासर डोमेस्टिकस (pass domesticus) असे आहे.
- चिमण्यांचे शरीर तपकिरी, काळ्या आणि पांढऱ्या पंखांनी झाकलेली असतात आणि त्यांचे पंख गोल असतात.
puffin bird information in marathi
वरील सर्व गोष्टी पाहून आपणास अंदाज लागला असेलच कि हा चिमणी पक्षी कसा आहे त्याची रचना व त्याचे जीवन कसे आहे. sparrow information in Marathi हा लेख आपल्याला आवडल्यास आपल्या मित्र परिवारासोबत फेसबुक ओट्सअप्प सारख्या विविध सोशियल मेडिया वरून माहिती पोहचवा. तसेच chimni chi mahiti हा लेख कसा वाटला व अजून काही information about sparrow in marathi या पक्षाविषयी राहिले असेल तर आपण comments द्वारे कळवू शकता धन्यवाद.
आम्ही दिलेल्या माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. अधिक माहितीसाठी भेट द्या :inmarathi.net