चिकन बिर्याणी रेसिपी मराठी Chicken Biryani Recipe in Marathi

Chicken Biryani Recipe in Marathi चिकन बिर्याणी रेसिपी मराठी चिकन बिर्याणीचे नाव घेतले कि तोंडामध्ये पाणी येते कारण हि डिश तितकी स्वादिष्ट असते आणि ही एक सुंदर रेसिपी भारतीय असून मुघलांच्या काळामध्ये तयार झाली म्हणजेच या डिशचा शोध मुघलांनी लावला. ही चिकन बिर्याणी रेसिपी कोणत्याही प्रसंगी, पार्ट्या, लग्न, वाढदिवस आणि विशेषत: ईदच्या सणात दिल्या जाणार्‍या आश्चर्यकारक शाही भारतीय खाद्यपदार्थांपैकी एक आहे. चिकन बिर्याणी हि डिश लांब तांदूळ, चिकनचे तुकडे आणि काही मसाले यापासून बनवली जाते आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हि डिश लोक आवडीने खातात.

चिकन बिर्याणी ही थोडी अवघड असते आणि ती करायला थपडा वेळ लागतो परंतु या डिशच्या चवीमुळे आपण हि डिश करायला घालवलेल्या वेळेचा चांगला वापर झाल्याचे समाधान देखील मिळते.

चिकन बिर्याणी हि भारतामध्ये सर्व ठिकाणी बनवली जाते आणि भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे बिर्याणीचे प्रकार बनवले जातात. आज आपण ह्या लेखामध्ये चिकन बिर्याणी कशी बनवायची ते पाहणार आहोत.

 chicken biryani recipe in marathi
chicken biryani recipe in marathi
अनुक्रमणिका hide
1 चिकन बिर्याणी रेसिपी मराठी – Chicken Biryani Recipe in Marathi

चिकन बिर्याणी रेसिपी मराठी – Chicken Biryani Recipe in Marathi

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
मॅरीनेटसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ६० ते ६५ मिनिटे
वाढणी१० ते ११ व्यक्ती
पाककलाभारतीय

चिकन बिर्याणी बनवण्यासाठी लागनारे मुख्य साहित्य – key ingredients 

  • तांदूळ : चिकन बनवण्यासाठी तांदूळ वापरला जातो आणि तांदूळ या डिश मधील एक महत्वाचा घटक आहे. बिर्याणीसाठी जर आपण चांगल्या दर्ज्याचा आणि लांब तांदूळ वापरला तर बिर्याणी चांगली बनू शकते. बिर्याणी बनवण्यासाठी वापरले जाणारे काही तांदूळ म्हणजे इंडिया गेट, झीबा प्रीमियम बासमती तांदूळ, डावात बिर्याणी बासमती तांदूळ आणि फॉर्च्यून बिर्याणी स्पेशल बासमती तांदूळ इत्यादी
  • चिकन : चिकन बिर्याणीमध्ये वापरले जाणारे चिकन हे ताजे आणि च्नागल्या दर्ज्याचे असावे त्यामुळे आपली बिरयानी स्वादिष्ट होण्यास मदत होते.
  • खडे मसाले : बिर्याणीमध्ये मसाले वापरल्यामुळे बिर्याणीला चांगली टेस्ट येते. दालचिन, वेलदोडे, मसाला वेलदोडे, बदाम फुल, तमाल पत्री, काळी मिरी आणि लवंग हे खडे मसाले बिर्याणीमध्ये वापरले जातात.

चिकन बिर्याणी कशी बनवायची – How to Make Chicken Biryani Recipe in Marathi

चिकन बिर्याणी ही रेसिपी एक भारतीय डिश आहे जी मुघलांनी भारताला दिलेली एक स्वादिष्ट डिश आहे. आता आपण चिकन बिर्याणी कशी बनवतात आणि ती बनवण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते ते पाहणारा आहोत.

तयारीसाठी लागणारा वेळ१० ते १५ मिनिटे
मॅरीनेटसाठी लागणारा वेळ१५ मिनिटे
शिजण्यासाठी लागणारा वेळ३० मिनिटे
एकूण लागणारा वेळ६० ते ६५ मिनिटे
वाढणी१० ते ११ व्यक्ती
पाककलाभारतीय

चिकन बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य – ingredients needed to make chicken biryani 

जर तुम्हाला रेस्टॉरंट सारखी चिकन बिर्याणी घरी बनवायची असेल तर बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घरामध्ये असणे आवश्यक आहे. कारण बिर्याणी बनवण्यासाठी जे साहित्य लागते ते घातल्या शिवाय बिर्याणी चांगली लागत नाही.

चिकन मॅरीनेट करण्यासाठी लागणारे साहित्य

  • 4 चमचे दही.
  • अर्धा चमचा हळद पावडर.
  • अर्धा चमचा लाल मिरची पावडर.
  • १ चमचा गरम मसाला पावडर.
  • १ चमचा धने पावडर
  • १ चमचा आले लसूण पेस्ट.
  • मीठ (चवीनुसार ).

मुख्य चिकन बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ किलो बासमती ( लांब तांदूळ )
  • ३ चमचे धने पावडर.
  • २ चमचे आले लसूण पेस्ट.
  • १ मोठी वाटी कांदा ( उभा चिरलेला ).
  • २ चमचे टोमॅटो प्युरी.
  • १ चमचा गरम मसाला पावडर.
  • २ चमचे लाल मिरची पावडर.
  • १ चमचा हळद पावडर.
  • २ चमचे तेल.
  • २ चमचे तूप.
  • मीठ (चवीनुसार घालावे).

बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे खडे मसाले

  • ५ वेलदोडे .
  • १ मसाला वेलदोडा.
  • २ बदाम फुल.
  • ६ लवंगा.
  • ५ ते ६ मिरी.
  • २ तमालपत्र.
  • १ दालचिन तुकडा.

चिकन बिर्याणी बनवण्याची कृती – process to make chicken biryani 

कृती १ – चिकन मॅरीनेट करण्यासाठी करावी लागणारी कृती 

  • चिकन मॅरीनेट करण्यासाठी एका बाऊल मध्ये दही, धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर, आले लसूण पेस्ट, गरम मसाला आणि मीठ ( चवीनुसार ) घालून सर्व मिश्रण चांगले एकत्र करा.
  • मग ते मॅरीनेट केलेले चिकन १५ ते २० मिनिटे झाकून बाजूला ठेवा.

कृती २  – तांदूळ शिजवण्यासाठी केली जाणारी कृती 

  • सर्व प्रथम लांब बासमती तांदूळ घ्या आणि तो स्वच्छ धुऊन ते तांदूळ १५ ते २० मिनिटे भिजू द्या.
  • नंतर एक भांडे घेऊन त्यात पाणी घालून त्या पाण्यामध्ये वेलदोडे, मसाला वेलदोडा, लवंग, मिरी, तमाल पत्री, दालचिनी, बदाम फुल आणि दालचिन घाला आणि पाणी उकळू द्या.
  • पाणी उकळले कि त्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून ते ७० ते ८० टक्के शिजवून घ्या.

कृती ३ – भाताला दम देण्याची कृती

  • शिजलेल्या भाताला दम देण्यासाठी एक जाड तळाचे भांडे घ्या आणि तूप आणि तेल एकत्र टाका. तूप आणि तेल तापले की त्यात आले लसूण पेस्ट आणि चिरलेला कांदा घालून सोनेरी रंग येईपर्यंत परता.
  • मग त्यामध्ये धनेपूड, गरम मसाला पावडर, लाल मिरची पावडर, हळद आणि तमालपत्र, वेलची, जिरे असे काही संपूर्ण मसाले घालून सर्व मिश्रण एकत्र करा.
  • मग त्यामध्ये मॅरीनेट केलेले चिकन घाला आणि त्यामध्ये थोडे पाणी घालून ते ६ ते ७ मिनिटे शिजवा.
  • नंतर चिकन पसरवा आणि चिकनवर शिजवलेला भात पसरवा आणि शेवटी बिर्याणीला कोथिंबीर, पुदिन्याची पाने, केशर चवीचे दूध आणि लिंबाचा अर्क आणि तळलेला कांदा घालून सजवा आणि त्यावर झाकण ठेवा आणि मग एक जाड तवा घ्या आणि तो गॅसवर ठेवा.
  • तव्यावर बिर्याणीचे भांडे ठेवा आणि बिर्याणीसाठी दम द्या.
  • बिर्याणी १० मिनिटे उच्च आचेवर आणि बिर्याणी २० मिनिटे मंद आचेवर शिजवा.
  • मग गॅस बंद करा आणि बिर्याणी खाण्यासाठी तयार झाली.
  • बिर्याणी पापड किंवा कांदा रायत्यासोबत सर्व्ह करा.

बिर्याणी आपण कश्यासोबत खाऊ शकतो – serving suggestions

चिकन बिर्याणी आपण तशीच खाऊ शकतो त्याचबरोबर आपण चिकन बिर्याणी कांदा रायता, पापड किंवा काकडीच्या रायात्यासोबत छान लागते.

घरगुती पध्दतीने एकदम उत्तम बिर्याणी बनवण्यासाठी खाली काही टिप्स दिल्या आहेत – tips to make perfect chicken biryani recipe 

  • उत्तम आणि चांगली चिकन बिर्याणी बनवण्यासाठी चांगले लांब तांदूळ, चांगल्या प्रतीचा खडा मसाला आणि ताजे चिकन वापरा त्यामुळे आपल्या बिर्याणीची टेस्ट चांगली होते.
  • तांदूळ शिजवतेवेळी ७० ते ८० टक्के शिजवा, जर आपण तांदूळ जास्ती शिजवला तर तांदूळ मोडला जाईल आणि शिजलेला किंवा दम दिलेला भात लांब दिसणार नाही.
  • उत्तम परिणामासाठी प्रीमियम दर्जाचा बासमती तांदूळ वापरा.
  • आपण चिकन बिर्याणी कुकर मध्ये देखील बनवू शकतो.
  • बिर्याणीला दम देतेवेळी मद आचेवरच द्या त्यामुळे तांदूळ खाली लागणार नाहीत.

आम्ही दिलेल्या chicken biryani recipe in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर चिकन बिर्याणी रेसिपी मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या layer chicken biryani recipe in marathi या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि information of chicken biryani in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये chicken biryani recipe in marathi by madhura Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!