सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय Civil Engineering Information in Marathi

civil engineering information in marathi सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय, आपण जे मोठ मोठ्या इमारतींचे बांधकाम, रस्ते, योग्य रित्या केलेले पुलांचे डिझाईन, कळावे, धरणे, मंदिरे आणि इतर वस्तू आणि बांधकामे पाहतो ती सिव्हील अभियांत्रिकी या शाखेमार्फत रचना केलेली असतात आणि मग ती बांधकाम कामगारांच्या कडून बांधून घेतलेली असतात. आज आपण या लेखामध्ये सिव्हील अभियांत्रिकी (civil engineering) या विषयावर माहिती घेणार आहोत. सिव्हील अभियांत्रिकी हि खूप जुनी आणि खूप मोठी शाखा आहे आणि या शाखेमध्ये पायाभूत सुविधांचे नियोजन, रचना, बांधकाम आणि देखरेख या सर्व गोष्टींचा समावेश असतो.

या शाखेमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला खूप महत्व आहे तसेच या शाखेमध्ये चांगल्या प्रकारे करियर देखील घडु शकते त्यामुळे अनेक विद्यार्थी सिव्हील अभियांत्रिकीचा अभ्यास करत आहेत. खाली आपण सिव्हील अभियांत्रिकी कसे बनतात तसेच त्यासाठी काय काय पात्रता निकष आहेत तसेच सिव्हील अभियांत्रिकी बनण्यासाठी कोणती परीक्षा ध्यावी लागते ते पाहणार आहोत.

civil engineering information in marathi
civil engineering information in marathi

सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय – Civil Engineering Information in Marathi

सिव्हिल इंजिनिअर म्हणजे काय – civil engineer meaning in marathi

सिव्हील अभियांत्रिकी हि खूप जुनी आणि खूप मोठी शाखा आहे आणि या शाखेमार्फत वेगवेगळ्या प्रकारची बांधकाम केली जातात जसे कि रुग्णालये, रस्ते, पूल, कळावे, शाळा, महाविद्यालये, मोठी मोठी मंदिरे, धरणे आणि इतर अनेक बांधकामे.

सिव्हील अभियांत्रिकी विशेषज्ञता – specialization 

सिव्हील अभियांत्रिकी या शाखेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आणि विभागाची बांधकामे असतात आणि म्हणून आपण ज्यावेळी या शाखेमध्ये प्रवेश घेऊन शिक्षण घेतो त्यावेळी आपल्या एक विशेषज्ञता विषय निवडून त्यामध्ये अभ्यास करावा लागतो. खाली आपण कोणकोणते विशेषज्ञता विषय हे सिव्हील अभियांत्रिकीमध्ये असतात ते पाहणार आहोत.

 • बांधकाम अभियांत्रिकी.
 • धारण किंवा पूल बांधकाम अभियांत्रिकी.
 • पर्यावरण अभियांत्रिकी.
 • वाहतूक अभियांत्रिकी.
 • अग्निसुरक्षा अभियांत्रिकी.
 • जल संसाधन अभियांत्रिकी.
 • सिंचन अभियांत्रिकी.
 • स्ट्रक्चरल अभियांत्रिकी.
 • शहरी अभियांत्रिकी.
 • साहित्य अभियांत्रिकी.
 • तटीय आणि महासागर अभियांत्रिकी.

 सिव्हील अभियांत्रिकी दिल्या जाणाऱ्या परीक्षा – exams 

 • गेट (GATE) 

गेट हि परीक्षा भारतामधील सर्वोच्च स्थावरील परीक्षा आहे आणि हि परीक्षा देण्यासाठी भारतातील एकूण १० लाख अर्जदार अर्ज करतात आणि या परीक्षेतून कट ऑफ मिळाल्यानंतर एकूण भारतातील १४९५ महाविद्यालयामध्ये कोठेही प्रवेश मिळवता येतो. गेट हि प्रवेश परीक्षा आयआयटी ( IIT ) किंवा एनआयटी ( NIT ) मार्फत ३ तासांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाते आणि त्यातून विद्यार्थी निवडले जातात.

जेईई मेन हि परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते आणि हि परीक्षा MCQ प्रकारची असते आणि ज्या विद्यार्थ्यांना सिव्हील अभियांत्रिकी किंवा कोणत्याही अभियांत्रिकी शिक्षण घ्यायचे असते ते विद्यार्थी हि परीक्षा देवू शकतात. जेईई मेन हि परीक्षा कोणत्याही अभियांत्रिकी परीक्षेची मुख्य परीक्षा आहे किंवा बिंदू आहे असे म्हटले जाते.

 • जेईई अॅडव्हान्स (JEE Advance) 

जेईई अॅडव्हान्स हि परीक्षा भारतामध्ये वर्षातून एकदाच होते आणि हि अभियांत्रिकीसाठी असणारी एक महत्वाची परीक्षा आहे जी सिव्हील अभियांत्रिकी शिक्षण घेताना देखील द्यावी लागते. जेईई मेन या परीक्षेमध्ये उच्च कट ऑफ करणाऱ्या विद्यार्थ्याला हि परीक्षा देता येते आणि या परीक्षेमध्ये पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी असते.

 • केसीईटी (KCET) 

केसीईटी हि देखील अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेण्यासाठी दिली जाणारी परीक्षा आहे परंतु हि परीक्षा कर्नाटक राज्याशी संबधित आहे. ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटक राज्यामधील कॉलेजमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश घ्यायचा आहे अश्या विद्यार्थ्यांना हि परीक्षा द्यावी लागते.

सिव्हील अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी पात्रता निकष – eligibility criteria 

सिव्हील अभियांत्रिकी या शाखेमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याला आपले करिअर करायचे असेल तर त्या विद्यार्थ्याने सिव्हील अभियांत्रिकी या विभागातून बी टेक (BTech) शिक्षण पूर्ण केले पाहिजे त्यामुळे त्या संबधित विद्यार्थ्याला चांगल्या ठिकाणी आणि उच्च हुद्द्यावर नोकरी मिळते. सिव्हील अभियांत्रिकी मधून डिप्लोमा करण्यासाठी, बी टेक करण्यासाठी आणि एम टेक करण्यासाठी वेगवेगळे पात्रता निकष पार पडावे लागतात ते आता आपण खाली पाहूया.

सिव्हील अभियांत्रिकी डिप्लोमासाठी पात्रता निकष

 • सिव्हील अभियांत्रिकी डिप्लोमा हा दोन वर्षाचा कोर्स आहे.
 • ज्या विद्यार्थ्यांना सिव्हील अभियांत्रिकी डिप्लोमा करायचा आहे अश्यांनी दहावी किंवा समकक्ष परीक्षा चांगल्या गुणांनी पार पडली पाहिजे तसेच अनिवार्य विषय म्हणून गणित आणि विज्ञान मध्ये कमीत कमी ४५ टक्के गुणांच्यासह उतीर्ण असावे.

बीटेक सिव्हील अभियांत्रिकीसाठी पात्रता निकष

 • बीटेक सिव्हील अभियांत्रिकी हा ४ वर्षाचा पूर्ण वेळ कोर्स आहे आणि या चार वर्षामध्ये एकूण ८ सेमिस्टर असतात म्हणजेच एका वर्षामध्ये २ सेमिस्टर.
 • बीटेक करण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्याने सिव्हील अभियांत्रिकि डिप्लोमा केला असेल तर त्याला लगेच बीटेकसाठी प्रेवेश मिळू शकतो.
 • तसेच जर त्याला बीटेक साठी प्रवेश घ्यायचा असेल तर त्यांने आपले बारावीचे शिक्षण हे कोणत्याही मान्यताप्राप्त महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून आणि गणित किंवा रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्र या कोणत्याही एका विषयातून परीक्षा पास झालेली असावी.
 • बीटेक (BTech) साठी प्रवेश घेण्यासाठी अनेक वेगवेगळ्या परीक्षा देवू शकतो जसे कि जेईई मेन (JEE MAIN), जेईई अॅडव्हान् (JEE ADVANCE), एमएचसीईटी (MHCET), केसीईटी (KCET).

एमटेक सिव्हील अभियांत्रिकीसाठी पात्रता निकष

 • एमटेक सिव्हील अभियांत्रिकी शिक्षण हे २ वर्षाचे पूर्णवेळ शिक्षण आहे.
 • एमटेक सिव्हील अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी गेट ( GATE ) हि प्रवेश परीक्षा द्यावी लागते आणि यामध्ये चांगली गुणांची गुणवत्ता देखील असावी लागते.
 • तसेच विद्यार्थ्याने बीटेक सिव्हील अभियांत्रिकी शिक्षण हे चांगल्या गुणांच्यासह उतीर्ण झालेले असावे.

सिव्हील इंजिनीअरची कार्ये – functions 

 • रुग्णालये, रस्ते, पूल, कळावे, शाळा, महाविद्यालये, मोठी मोठी मंदिरे, धरणे आणि इतर अनेक बांधकामे यांची रचना करणे तसेच बांधकाम कामगारांच्या कडून त्या संबधित रचनेचे बांधकाम पूर्ण करणे तसेच त्याची देखरेख आणि दुरुस्ती करणे हे सिव्हील इंजिनीअरचे मुख्य कार्य आहे.
 • विशिष्ट प्रकल्पामध्ये वापरण्यासाठी डांबर, क्रोंक्रीट, लाकूड किंवा स्टील या सारख्या बांधकाम साहित्यावरील चाचण्यांच्या परिणामांचे विश्लेषण करणे.
 • सार्वजनिक आणि खाजगी पायाभूत सुविधांची देखरेख करणे तसेच दुरुस्ती करणे.
 • कोणत्याही मोठ्या प्रकल्पाची योजना तयार करण्यासाठी तसेच त्या प्रकल्पाची रचना करण्यासाठी लांब पल्ल्याची योजना तयार करणे त्याचबरोबर नकाशे, सर्वेक्षण अहवाल आणि इतर माहितीचे विश्लेषण करणे.
 • प्रकल्प विविध नियमांचे पालन करत आहेत कि नाही याची पडताळणी करणे तसेच स्थानिक, राज्य आणि फेडरल एजन्सींना परवानगी अर्ज संकलित करणे.
 • प्रकल्पाच्या नियोजन आणि जोखीम विश्लेषणाच्या टप्प्यामध्ये बांधकाम खर्च संभाव्य पर्यावरणीय धोके, बांधकाम खर्च आणि इतर घटकांचा विचार करणे.

आम्ही दिलेल्या civil engineering information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.

मित्रानो तुमच्याकडे जर सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे काय माहिती मराठी बद्दल अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या civil engineer meaning in marathi या article मध्ये update करू, मित्रांनो हि civil engineering in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट

Leave a Comment

error: छे.. छे... असं अजिबात चालणार नाही !!