Computer Information in Marathi संगणकाची माहिती नमस्कार मित्रांनो आपण “संगणक” या विषया वर पूर्ण माहिती मिळवणार आहे. मानव हा विकसित प्राणी आहे. आणि मानवाकडे विचार करण्याची शक्ती आहे. मानवाने सुरुवात पासूनच नेहमी हा विचार केला आहे कि, आपले श्रम कशा प्रकारे कमी करता येईल आणि आपली कार्यक्षमता कशा प्रकारे वाढविता येईल. मानवाने त्या संदर्भात त्याने अनेक उपकरणे सुद्धा शोधून काढलीत. या युगा मध्ये असा कोणताच व्यक्ती नसेल कि, ज्याने संगणक पाहिलेला नसेल. जरी कोणाला संगणक वापरता येत नसेल परंतु संगणक मात्र पहिलाच असेल. गेल्या दशकापासून संगणक आपल्या रोजच्या जीवनाचा इतका अत्यावश्यक भाग झाला आहे.
जणू काही संगणका शिवाय जीवन सुद्धा अपुरे वाटायला लागले आहे. त्याला कारण पण तसेच आहे संगणकाची काम करण्याची अचूकता एक मुख्य कारण आहे आणि वेग सुद्धा.
संगणकाची माहिती – Computer Information in Marathi
संगणक म्हणजे काय ? – Computer in Marathi
संगणकाला इंग्लिश मध्ये कॉम्पुटर (computer)असे म्हणतात. ५० वर्षां पुर्वी जेव्हा संगणक (computer) हा शब्द प्रचलित झाला, तेव्हा संगणक या यंत्र चा वापर प्रमुख आकडे मोड किंवा गणना करण्यासाठीच केला जात होता, जसे काळ बदलत गेला तसेच या यंत्रात अनेक बदल होत गेले. बदल नव्हे तर सुधारणा होत गेल्या. अर्थात संगणक हे सांकेतिक स्वरूपातील माहितीवर संस्करण करणारा एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे.
संगणकाचा इतिहास – History of Computer in Marathi
प्राचीन काळी चीन मध्ये अंक मोजणी साठी बँबिलोनियन संस्कृती म्हणजेच अबँकस (Abacus) या यंत्राचा उपयोग केला जात होता. १८७१ साली चार्ल्स बँबेज यांच्या गणन यंत्रात विशिष्ट बदल घडून आले. १८८० साली डॉ. हरमन होलेरिथ-एक अमेरिकन शास्त्रज्ञांनी यांनी पंचड़कार्ड प्रणालीचा शोध लावला. या प्रणाली द्वारे अनेक कामे वेगाने पार पडू लागले. डॉ. हरमन यांने आईबीएम (इंटरनेशनल बिज़नेस मशीन) सुरु केली. १९४७ साली अमेरिकेतील हावर्ड विद्यापीठ व आईबीएम या कंपनी ने सयुक्त जगातील पहिला इलेक्ट्रानिक्स संगणक तयार केला.
- नक्की वाचा: माहिती तंत्रज्ञान म्हणजे काय ?
संगणकाचे भाग व माहिती – Computer Parts Information in Marathi
हार्डवेअर :
हार्डवेअर म्हणजे आपल्या संगणकाचा कोणताही भाग, जसे की किबोर्ड, माऊस, सीपीयू, प्रिंटर, एत्यादी.
सॉफ्टवेअर :
सॉफ्टवेअर हा तुमच्या संगणकाचा कोणताही भाग असू शकतो, जे हार्डवेअर धारे इनपुट दिले जाते ते सॉफ्टवेअर प्रक्रिया करून माहिती तुम्हाला देण्याचे काम करते. उदाहरण घ्यायचं झाल्यास आता तुम्ही हे वाचण्यासाठी जो ब्राउझर वापरत आहे हे एक सॉफ्टवेअर आहे आणि कोणतेही पेज ओपेन करण्यासाठी ज्या माऊसचा वापर करता हे एक हार्डवेअर आहे.
मदरबोर्ड :
मदरबोर्ड हा संगणकाचा मुख्य भाग किंवा मेनफ्रेम आहे, ज्याद्वारे सर्व घटक इंटरफेस केलेले असतात. हे एक जटिल इलेक्ट्रॉनिक प्रणाली बनविणारे केंद्रीय सर्किट बोर्ड आहे. मदर बोर्डमध्ये अनेक घटकांचा समावेश आहे. सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सीपीयू), Random एक्सेस मेमरी (रॅम), फर्मवेअर आणि अंतर्गत बाह्य घटक.
सीपीयू :
सेंट्रल प्रोसेसिंग युनिट (सी.पी.यू.) (प्रोसेसर) ही एक मशीन आहे जी संगणकाचा प्रोग्रॅम कार्यक्षम करू शकते. याला आपण कधीकधी संगणकाचा मेंदू ही म्हटले जाते. सीपीयूचे काम चार विभागामध्ये मध्ये चालते, प्राप्त करणे, डीकोड करणे, कार्यान्वित करणे आणि राइटबॅक करणे.
रॅम :
रॅनडम अॅक्सेस मेमोरी ही एक फास्ट अॅक्सेस मेमोरी आहे जी संगणक बंद केल्यावर रीफ्रेश होते. रॅम ही डायरेक्ट मदरबोर्डला अटॅच केलेली असते, आणि सध्या आपल्या संगणकामध्ये जे काम सुरू आहे त्याचा डेटा सेव करण्याचे काम करते. रॅम हा एक इंटेग्रटेड डेटा सेट आहे जे स्टोअर केलेल्या डेटाला अॅक्सेस देण्याचे काम करते. सध्या मार्केट मध्ये वेगवेगळ्या टाइप मध्ये रॅम उपलब्ध आहेत. त्यामधील फरक: स्टाटिक व्हीएस डायनॅमिक, स्थिर व्हीएस अस्थिर.
फर्मवेअर :
फर्मवेअर बेसिक इनपुट आऊटपुट सिस्टमवरून चालणार्या केवळ वाचनीय मेमरी (ROM) वरून घेण्यात आली आहे. हा एक कॉम्प्युटरचा प्रोग्रॅम आहे जो हार्डवेअर डिवाइस मध्ये एम्बेड केलेला आहे, उदाहरण: फर्मवेअर हा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर मधील भाग आहे. सॉफ्टवेअर प्रमाणेच, हा एक कॉम्प्युटर प्रोग्राम आहे जो मायक्रोप्रोसेसर किंवा मायक्रोकंट्रोलरद्वारे चालविला जातो.
हार्ड ड्राइव :
हार्ड ड्राइव ही जास्त करून संगणक मध्ये आढळते. ही एक मेकॅनिकल डिवाइस आहे जे डाटा साठवून ठेवण्याचे काम करते.डेटा साठवण्याव्यतिरिक्त याचा वापर आपण ड्राइव बूट करण्यासाठी ही करू शकतो जेणेकरून ऑपरेटिंग सिस्टम आपल्या संगणक मध्ये चालेल. हार्ड ड्राइवची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे शारीरिकरित्या नाजूक स्वभाव.
एक अडथळा चुकीचा मार्ग संपूर्ण ड्राइव्ह नष्ट करू शकतो. मेकॅनिकल हार्ड ड्राइव्हमध्ये एक किंवा अधिक प्लेटर्स असतात जी ५२०० ते १०००० RPM (प्रति मिनिट रिव्होल्यूशन) दरम्यान कुठेही फिरतात.
संगणकाचे गुणधर्म :
- गती
- स्वयंचलित आणि उत्स्फूर्त
- अचूकता आणि सत्यता
- अष्टपैलत्व
- मेहनती
- साठवणुकीची उत्तम गुणवत्ता
संगणकाचे वर्गीकरण :
महासंगणक :
जगामधील सर्वात वेगवान अचूक आणि शक्तिशाली संगणक म्हणजे महासंगणक. जगातल्या विविध संस्था महासंगणकाचा वापर करतात. महा संगणकाचा आकार एका खोलीपासून ते एखाद्या इमारती एवढा मोठा देखील असतो. जगातील पहिला महासंगणक होण्याचा मान सेमूर क्रे निर्मित ‘CDC 6600’ या कॉम्प्युटर ला जातो.
अमेरिकेच्या NASA या अंतराळ संस्थेमध्ये उपग्रहांना नियंत्रित करण्यासाठी महासंगणकाचा वापर होतो.
मेनफ्रेम संगणक :
महा संगणकाच्या तुलनेत अधिक माहिती साठवण क्षमता असणाऱ्या मेनफ्रेम संगणकावर अत्याधिक ताण असतो परिणामी कामाचा प्रचंड ताणामुळे मेनफ्रेम कॉम्प्युटर त्वरित गरम होतो. या कॉम्प्युटर थंड करण्यासाठी वातानुकूलित यंत्रणा बसवलेल्या खोलीमध्ये ठेवावे लागते. मेनफ्रेम कॉम्प्युटर एकाच वेळी हजार पेक्षा जादा वापरकर्त्यांना नियंत्रित करु शकतात तसेच मेनप्रेम कॉम्प्युटर एकाच वेळी हजार पेक्षा जादा प्रोग्रॅम देखील रन करू शकतात. अशी त्याची रचना असते प्रामुख्याने मेनफ्रेम कॉम्प्युटरचा वापर विविध सरकारी संस्था अथवा सोशल मीडिया संस्था तसेच बँका इत्यादी द्वारे केला जातो.
मिनीफ्रेम संगणक :
मिनिफ्रेम संगणक हे मायक्रो संगणक व मेनफफ्रेम संगणक यांच्यामध्ये बसतात. हे संगणक मेनफ्रेम संगणकापेक्षा लहान मात्र मायक्रो संगणकापेक्षा मोठे असतात. मिनिफ्रेम संगणक हे कार्याने मेनफ्रेम संगणकासारखे असले तरीही यावर एकाचवेळी कमीत कमी 5 ते जास्तीत जास्त 250 वापरकर्ते नियंत्रित होऊ शकतात. या प्रकारच्या संगणकाचा वापर विविध संस्था अथवा विभागाद्वारे होत असला तरीही प्रमुख्याने संगणक वर्ग चालवणाऱ्या संस्था तसेच शैक्षणीक संस्थेद्वारे सर्वाधिक होतो.
मायक्रो कॉम्प्युटर :
मायक्रो संगणक म्हणजेच तुमचा आमचा वयक्तिक संगणक अथवा personal computer
आपण आपल्या दैनंदिन वापरात वापरत असलेले डेक्सटोप लॅपटॉप टॅबलेट अथवा स्मार्टफोन हे मायक्रो संगणक आहेत. CPU , मेमरी, स्टोरेज तसेच इनपुट व आउटपुट इत्यादी मायक्रो संगणकाचे वैशिष्ठे आहेत सर्वत्र वापरल्या जाणाऱ्या संगणकापैकी मायक्रो संगणक सर्वाधिक वापरला जाणारा प्रकार आहे.
संगणकाचे फायदे व तोटे :
संगणकाचे फायदे :-
गती :
संगणकाची गती हा एक महत्वाचा व उपयोगी पडणारा फायदा आहे.संगणक असंख्यांचे गणित एका वेळेस सोडवू शकतो.संगणकाची गती एवढी आहे की मानव जीव संगणक पेक्षा जास्त वेगाने गणिते सोडवू शकत नाही. संगणकाची गती मोजण्यासाठी मायक्रोसेकंद, नॅनोसेकंद आणि पिकोसेकंद ही एकक वापरली जाते.
अचूकता :
संगणकाची गती तेज आहेच, तेवढंच नव्हे तर, संगणकाने सोडवलेली गणिते ही १००℅ बरोबर असतात. आता तुम्ही विचार करत असाल हे सर्व कस शक्य आहे ? याचे कारण असे की संगणकतील प्रोग्रॅम टाकलेले असतात. मानवाच्या क्षमते बाहेरची कामे संगणक अचूकतेने करतो.
ज्ञनाचा श्रोत :
या आधुनिक काळात संगणकाला ज्ञनाचे श्रोत असे मानले जाते.याचा श्रेय इंटरनेट ला जातो, इंटरनेट व संगणकाचे एकत्रित आल्याने संपूर्ण मानवी जीवन बदलून टाकले. आजच्या काळात इंटरनेट वर आगीणत वेबसाईट आहेत.
आपण संगणकाचे फायदे पाहिलेत, जस प्रत्येक वस्तू चे फायदे असतात व तोटे ही असतात,तसेच संगणकाचे तोटे ही बघुयात…!
संगणकाचे तोटे :
सायबर गुन्हे :
आज काल सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहेत. या सोशल मीडिया च्या युगात कोणती गोष्ट वाइरल होईल सांगताच येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर काही शेअर करताना विचार करून शेअर करावे.
सुरक्षा :
सुरक्षा ही सर्वाधिक महत्वाची गोष्ट आहे, कारण असे की, आपण आपली वयक्तिक माहिती जसे- फ़ोटो, विडिओ,कागदपत्र हे सर्व संगणक मध्ये साठवून ठेवतो. आपली ही माहिती सुरक्षित असून ही काही पट्टीने असुरक्षित असते. याचे मुख्य कारण म्हणजेच हॅकर्स!!! हॅकर्स हे आपल्या संगणकातील माहिती चोरू शकतात. इतकंच नव्हे तर हे हॅकर्स राष्ट्रीय सुरक्षेचा डेटा ही चोरू शकतात.
आरोग्याच्या समस्या :
संगणकाचा आरोग्यावर सरासरी दुष्परिणाम होतो. इलेक्ट्रॉनिक्स डीवाइसेस जसे मोबाईल, टॅबलेट,लॅपटॉप इ. यांचे अत्यंत वापर आरोग्यासाठी हानिकारक ठरवू शकते.
आम्ही दिलेल्या computer information in marathi माहितीमध्ये काहीही चुकीचे असल्यास आपण लवकरात लवकर आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे आपण दिलेली माहिती अचूक असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू.
मित्रानो तुमच्याकडे जर “संगणकाची माहिती” विषयावर अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा आम्ही ते या basic computer information in marathi pdf या article मध्ये upadate करू, मित्रांनो हि computer mahiti जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये Share करायला विसरू नका. तसेच आपण computer chi mahiti या लेखाचा वापर computer in marathi असा देखील करू शकता. धन्यवाद अधिक माहितीसाठी भेट द्या :इनमराठी.नेट